Skip to main content

तुम्ही खोटं बोलता का : एक सर्वेक्षण. :)

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी मंगळवार, 18/12/2012 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी. समाजजीवनात वावरतांना मला कधी कधी वाटतं की काही माणसं थोडं थोडं खोटं बोलत असतात, अर्थात अशा विधानाला कोणताही अधिकृत विदा नाही आणि काही संदर्भही नाही. आणि मग माझ्या मनात विचार आला की माणसं खोटं बोलतात ही गोष्ट खरी आहे, पण हे खोटं बोलण्याचं प्रमाण काय असावं ? आणि ते मोजण्याचं माप कोणतं ? आणि अशा खोटं बोलण्यानं माणसाचा समाजजिवनात फायदा होतो की तोटा होतो, असा एक विचार हा सर्वेक्षण घेतांना मनात आला. प्रतिसाद समजून घेण्यासाठी 'मिसळपाव' आणि 'अ ते ज्ञ' या दोन संकेतस्थळ सदस्यांच्या प्रतिक्रियांची नोंद घेणार आहे. (अ ते ज्ञ संकेतस्थळावर सध्या केवळ अ‍ॅडमिनच वावरतात, त्या संकेतस्थळावर सदस्य नेण्यासाठी ही सर्वेक्षणाची आयडिया आहे, असे कृपया समजू नये. ) सर्वक्षण करतांना दहा प्रश्न विचारले आहेत. पत्येक प्रश्नाचे प्रामाणिक उत्तर द्यायचे आहे. प्रत्येक प्रश्नाला एक गुण देणार आहे. गुणांची संख्या आणि आपण किती प्रामाणिकपणे हे उत्तर दिले आहे, त्याचा मनोमन अभ्यास करुन त्या विदाचे विश्लेषण आपल्यासमोर मांडणार आहे. सर्वक्षेणाचे उत्तर आपण धाग्यातच लिहावे. व्य.नि.अजिबात करु नये. समाजजीवनात सदरील निष्कर्षाचा हौस म्हणून आपणास फायदा होतो की तोटा हे शोधणे हाच या प्रश्नावलीचा प्रामाणिक हेतू आहे. सदरील विदाचे विश्लेषण एक जानेवारी दोनहजार तेराला करणार आहे, आपण प्रतिसाद एकतिस डिसेंबर पर्यंत लिहू शकता. प्रश्न पहिला : आपणास खोटे बोलणे आवडते. अ) होय. ब) नाही. क) कधीतरी ड ) नियमित. प्रश्न दुसरा : आपण आई-वडिलांशी बोलतांना खोटं बोलता. अ) कधीच नाही. ब) थोडं थोडं क) प्रसंग पाहून ड) मत मांडू इच्छित नाही. प्रश्न तिसरा : आपण पत्नीशी/ पतीशी खोटं बोलता. अ) कधीच नाही. ब ) कधीतरी क) नियमित ड ) अंदाज पाहून प्रश्न चौथा : आपण कामकाजाच्या ठिकाणी खोटं बोलता. अ) नियमित ब) कधीकधी क) कधीच नाही. ड) प्रसंग पाहून प्रश्न पाचवा : मैत्रीणीशी खोटं बोलता अ) भरपूर ब) नाही. क) कधीतरी ड) नियमित प्रश्न सहावा : आयुष्यात खोटं बोलण्याचं महत्त्व. अ) खूप आहे. ब) काहीच नाही क) खोटं बोलावंच लागतं. ड) तडजोडीमुळे प्रश्न सातवा : खोटं बोलण्याचे कारण. अ) आनंद ब) फायदा क) फसवाफसवी ड) आयुष्यातील तड्जोडी. प्रश्न आठवा : सर्वच माणसं आयुष्यात खोटं बोलतात. अ) अगदी खरं आहे. ब) खोटं आहे. क) पन्नास टक्के ड) सांगता येणार नाही. प्रश्न नववा : खोटं बोलणं हा गुण आहे अ) हो ब) नाही. क) नैमित्तिक ड ) सांगू शकत नाही. प्रश्न दहावा : खोटं बोललं पाहिजे. अ) हो ब) नाही.

वाचने 11863
प्रतिक्रिया 67

प्रतिक्रिया

यु नॉटी प्रोफेस्सर. :P हा विदा विकुन वा आमच्याच विरुद्ध वापरुन तुम्ही आमचा बाजार उठवणार नाही याची काय शाश्वती? तस्मात तुमच्या सर्वेक्षणाला फाट्यावर मारले आहे.

In reply to by गणपा

प्रतिसादाबद्दल आभारी आहे. प्रत्येक प्रतिसादाला उपप्रतिसाद देऊन प्रतिसादाची संख्या वाढवणारच आहे, असे कृपया समजू नये. आवश्यक असतील तिथे प्रतिसाद दिले जातील. विदा विकुन आम्ही कोणताही बाजार उठवणार नाही. शंभर रुपयांच्या बाँडवर अफ्यूड्युट करुन देतो. पण संशोधनाचे काम मोठे कठीन असते. सदरील संशोधनासाठी आम्ही नुकतेच ''डॉ.सदा क-हाडे यांचे संशोधन सिद्धांत आणि पद्धती'' हे पुस्तक विकत घेतले असून प्रश्नावलीच्या माध्यमातून काही गृहितं धरुन निष्कर्षाकडे कसे जाता येते, [आणि जाताच येते का] त्याचा अभ्यास करत आहोत. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बादवे सर पहिल्या प्रश्नाला होकारार्थी उत्तरं दिलं तर पुढच्या उत्तरांची विश्वासाहार्ता कशी धरायची.?

In reply to by गणपा

पहिल्या प्रश्नाचं उत्तर होकारार्थी असलं तरी इतर प्रश्नात त्याची खात्री करायचीच आहे. उत्तरात बदल होतो का ? तेही बघायचंच आहे की.... '' उदा. आई-वडीलांशी मी सदैवं खोटं(च) बोलतो'' असं उत्तर येणार नाही. (क्वचित, असं उत्तर आलं तरी तो पकडला जाणारच) -दिलीप बिरुटे

१. क. मला कधीतरी खोटं बोलायला आवडतं आता असं असल्यावर पुढील प्रश्न विचारणेच योग्य वाटत नाही. म्हणजे त्याने दिलेली उत्तरे खरी कशावरून? हे म्हणजे "तुम्ही जात मानता का?" असा प्रश्न विचारण्यासारखे आहे. ;)

In reply to by ऋषिकेश

ऋषिकेश, जबरदस्त प्रतिसाद! आवडला. - (खरं-खोटं देव जाणे असे समजून मनात असेल ते बोलणारा) सोकाजी

प्रश्न पहिला : आपणास खोटे बोलणे आवडते. ब) नाही. प्रश्न दुसरा : आपण आई-वडिलांशी बोलतांना खोटं बोलता. क) प्रसंग पाहून (क्वचित) प्रश्न तिसरा : आपण पत्नीशी/ पतीशी खोटं बोलता. अ) कधीच नाही. प्रश्न चौथा : आपण कामकाजाच्या ठिकाणी खोटं बोलता. ड) प्रसंग पाहून प्रश्न पाचवा : मैत्रीणीशी खोटं बोलता (मित्र मैत्रीण असे अभिप्रेत असेल असे समजून) ब) नाही. प्रश्न सहावा : आयुष्यात खोटं बोलण्याचं महत्त्व. ड) तडजोडीमुळे प्रश्न सातवा : खोटं बोलण्याचे कारण. अ) - ब) - क) - ड) - इ) दुसर्याला त्रास होउ नये म्हणून .. प्रश्न आठवा : सर्वच माणसं आयुष्यात खोटं बोलतात. ड) सांगता येणार नाही. प्रश्न नववा : खोटं बोलणं हा गुण आहे ब) नाही. प्रश्न दहावा : खोटं बोललं पाहिजे. ब) नाही.

तुम्हाला खरं उत्तर हवंय की खोटं? आधी निष्कर्ष सांगा म्हणजे तशी उत्तरे द्यायला बरे पडेल.

In reply to by पैसा

संशोधनात अगोदर निष्कर्ष निश्चित करायचे आणि नंतर संशोधन करायचं, हे चूक आहे. (आजकाल तसंच होतंय,ही गोष्ट गंभीरपणे मला मान्य करावी लागते आहे) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मग पहिल्या प्रश्नाचं उत्तर 'अ' असेल तर? पुढं दिलेल्या उत्तरांचं काय करणार? :)

जेणेकरून खोटे बोलावे लागेल, असे करणे मुळातच टाळावे. ते टाळता आले नाही, तर त्याविषयी मौन रहावे. मौन राहता आले नाही, (अगदी आवश्यक असेल तर) खरे तेच सांगावे. खरे सांगण्यातून होऊ शकणारे व्यावहारिक नुकसान सहन करण्याची तयारी ठेवावी. खोटे न बोलण्यामुळे मिळणारे आत्मिक बळ हा फार मोठा फायदा असतो, व्यावहारिक फायद्यापेक्षा असे आत्मबळ मिळवणे श्रेयस्कर. .....या प्रकारचे संस्कार आई-वडिलांनी स्वतःच्या वागणुकीतून दिलेले असल्याने तसेच जीवन जगत आलो, आणि त्याबद्दल समाधानच आहे. प्रश्नांची उत्तरे: प्रश्न पहिला : आपणास खोटे बोलणे आवडते..... ब) नाही. प्रश्न दुसरा : आई-वडिलांशी बोलतांना खोटं बोलता.(फार पूर्वीच दिवंगत झालेत) होते तेंव्हा :अ)कधीच नाही. प्रश्न तिसरा : आपण पत्नीशी/ पतीशी खोटं बोलता. (विचारभिन्नतेमुळे काही गोष्टी पत्नीला आवडण्यासारख्या नसल्यास त्याविषयी मौन रहाणे) एरवी खरे बोलणे. प्रश्न चौथा : आपण कामकाजाच्या ठिकाणी खोटं बोलता.(स्पष्ट, खरे बोलल्यामुळे जे नुकसान झाले, ते सहन केले, पण त्यामुळे वट राहिली) आज त्याबद्दल खंत नाही.... क) कधीच नाही. प्रश्न पाचवा : मैत्रीणीशी खोटं बोलता: 'मैत्रिणी' नाहीतच, पण मित्रांशी ..... ब) नाही. प्रश्न सहावा : आयुष्यात खोटं बोलण्याचं महत्त्व ..... ब) काहीच नाही प्रश्न सातवा : खोटं बोलण्याचे कारण ..... काहीच नाही, नसावे. प्रश्न आठवा : सर्वच माणसं आयुष्यात खोटं बोलतात: "सर्वच" माणसांबद्दल आपण कसं सांगणार ? म्हणूनः ड) सांगता येणार नाही. प्रश्न नववा : खोटं बोलणं हा गुण आहे ..... ब) नाही. प्रश्न दहावा : खोटं बोललं पाहिजे ..... ब) नाही.

आपल्या सर्वेक्षणाला गंभीरपणे प्रतिसाद दिला पाहिजे.पण आमच्या प्रोफाईलमध्ये वात्रटपणा हा एक विशेष म्हणून नोंदविला आहे. सबब ....... जगात खोटे बोलला नाही असा एकही माणूस नाही. "खर्‍याला मरण नसते हो" असे न म्हणणारा एकही माणूस नाही. असे आमचे सर्वेक्षण सांगते. आमचा आमच्या अपत्याना एकच सल्ला आहे तो असा की जेंव्हा समोरच्या माणसाला खरे पटणार नाही किंवा पचणार नाही त्यावेळी खुशाल खोटे बोलावे उदा. कमजोर मनाच्या माणसाला कर्करोग झाल्यास त्याला कर्क रोग झाला होता हे कधीही सांगू नये. बरे होणार्‍या पण दीर्घ काळाने अशा रोगाचे नाव खोटेच सांगावे. साहेबाना मला क्रिकेटची वनडे बघायची म्हणून सुटी मुकाट्याने तो देत नसेल तर दांडी मारून सकाळपासून सतत जुलाब होत आहेत असे सांगावे. विसू आपले सर्वेक्षणाचे कोणतेही कागदपत्र प्रधानमंत्री मनमोहन सिंग किवा शीला दीक्षित या आयव्हरी टॉवर मधील नेत्याना कुपया पाठवू नयेत. ( यात मात्र वात्रटपणा नाही बरे प्रोफेश्वर डॉ साहेब !)

तुम्हांला व्यनिमध्ये उत्तरे नकोत, सबब पास! पुन्हा, अ ते ज्ञवर खरेखोटे बोलण्याविषयी धागे न काढण्याची घोषणा झाली होती का? :D

In reply to by यशोधरा

>>> तुम्हांला व्यनिमध्ये उत्तरे नकोत, सबब पास ! प्लीज.प्लीज.प्लीज. असं करु नका. जाहीर लिहाच. संशोधन करणार्‍यांना विदा पुरवला पाहिजे. >>> अ ते ज्ञवर खरेखोटे बोलण्याविषयी धागे न काढण्याची घोषणा झाली होती का? नै नै, तिथं फक्त आमचं डॉक्टरेट लोकांचं असं ठरलं होतं की सदस्य संख्या वाढवायची. आणि त्यासाठी प्रतिसादात संस्थळाच्या लिंका द्यायच्या, इतकंच ठरलं होतं. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>नै नै, तिथं फक्त आमचं डॉक्टरेट लोकांचं असं ठरलं होतं की सदस्य संख्या वाढवायची. आणि त्यासाठी प्रतिसादात संस्थळाच्या लिंका द्यायच्या, इतकंच ठरलं होतं. अरेरे, काय हा विक्षिप्तपणा !! ;) अर्थात कोणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, मी फक्त निरीक्षण नोंदवलें.

थापा मारणे, टेपा लावणे, आणि खोटे बोलणे जर भिन्न मानले तर यात नक्की काय फरक असू शकतो? ;)

In reply to by रेवती

रेवती आज्जीशी (आनंदाने) बाडीस. :-D (आज्जीचे वरचे खरे समजले गेलेले मत समजा खोटे असले तरी खरे खोटे बोलतो हे खरे समजून व्यक्त केलेले माझे खरेखुरे मत खोटे असण्याचा आरोप माझ्यावर केला तर तो आरोप मी खरा समजेन असा गैरसमज करून घेवू नये!!)

In reply to by मोदक

साध्या, सरळ, सालस, निरागस माणसावर सर्वजण तुटुन पडतातच. हीच ह्या पापी जगाची रीत आहे. पण मी मुळात अतिशय उदार, मोठ्या मनाचा वगैरे असल्यामुळे रेवतीआजी. मोदक ह्या सर्वांना माफ केले आहे. आणि हो, हे खोटं बोलणं म्हणजे काय असतं ? ते कसं बोलतात ? कोणी अनुभवी असेल तर मार्गदर्शन करा प्लीज प्लीज प्लीज.

In reply to by अमोल खरे

पण मी मुळात अतिशय उदार, मोठ्या मनाचा
तुम्ही आहातच मोठ्यामनाचे ,उदार ,मनमिळावु, होतकरु यात काही शंका नाही,
हे खोटं बोलणं म्हणजे काय असतं ? ते कसं बोलतात ? कोणी अनुभवी असेल तर मार्गदर्शन करा प्लीज प्लीज प्लीज.
मी वर लिहील्याप्रमाणे ते सर्व मी अनुभवी असल्याकारणाने खर्र खर्र आहे हो शपथ

आम्ही विवाहित आहोत तेंव्हा आम्ही जास्त बोलत नाही. ज्या प्रश्नाचे उत्तर "हो -नाही / बरोबर -चूक " असे प्रश्नकरतीस अपेक्षित असते तसे देतो. त्यास खरे अथवा खोटे असे काहीही म्हणता येत नाही. कारण तो जी जी र जी जी र चा एक भाग असतो. काही जातीना वेद वगैरे वाचायला परवानगी नाही तसेच नवऱ्याच्या जातीला बोलायलाच परवानगी नाही . तेंव्हा खरे काय अन् खोटे काय ?

प्रश्न पहिला : आपणास खोटे बोलणे आवडते. क) कधीतरी प्रश्न दुसरा : आपण आई-वडिलांशी बोलतांना खोटं बोलता. क) प्रसंग पाहून प्रश्न तिसरा : आपण पत्नीशी/ पतीशी खोटं बोलता. ड ) अंदाज पाहून प्रश्न चौथा : आपण कामकाजाच्या ठिकाणी खोटं बोलता. क) कधीच नाही. प्रश्न पाचवा : मैत्रीणीशी खोटं बोलता क) कधीतरी प्रश्न सहावा : आयुष्यात खोटं बोलण्याचं महत्त्व. ड) तडजोडीमुळे प्रश्न सातवा : खोटं बोलण्याचे कारण. ड) आयुष्यातील तड्जोडी. प्रश्न आठवा : सर्वच माणसं आयुष्यात खोटं बोलतात. अ) अगदी खरं आहे प्रश्न नववा : खोटं बोलणं हा गुण आहे ब) नाही. प्रश्न दहावा : खोटं बोललं पाहिजे. अ) हो

प्रश्न दहावा : खोटं बोललं पाहिजे. अ) हो आधीच्या प्रश्नांची उत्तरे द्यायची गरज आहे काय!! ;)

माझा एक मित्र म्हणाला दारु सोडली. पुढच्या खेपेला बार मध्ये पिताना सापडला. म्हटलं दारु सोडलीस ना? म्हणे हो. मग? अरे पण खोटं बोलणं नाही सोडलं ना! :)

मला वाटतं खरं की खोटं हे व्यक्तिनिष्ठ असतं. मला जे खरं वाटेल ते दुसऱ्याला खोटं वाटू शकेल. कोणाला वीस लाख हा आकडा खरा वाटू शकेल कोणाला खोटा वाटेल. त्यामुळे मला तर वाटतं की जगातले सर्व जण दुर्योधन किंवा युधिष्ठिर कॅटेगरीत विभागलेले असतात. दुर्योधन कॅटेगरीतले कायम खोटं बोलतात, आणि त्यामुळे इतर सर्वही खोटंच बोलतात असं वाटतं. याउलट युधिष्ठिर लोकं कायम सत्य बोलतात व त्यांना सगळेच सत्य बोलणारे वाटतात. मी युधिष्ठिर कॅटेगरीतला भला माणूस असल्यामुळे मी कधी खोटं बोलत नाही, आणि कोणी कधी खोटं बोलतं असं मला वाटत नाही.

अ ते ज्ञ संकेतस्थळावर सध्या केवळ अ‍ॅडमिनच वावरतात, त्या संकेतस्थळावर सदस्य नेण्यासाठी ही सर्वेक्षणाची आयडिया आहे, असे कृपया समजू नये.
चीप शॉट सर. इतर संस्थळांवर दर्जेदार लेखन होत असते आणि विविध उपक्रम पण चालू असतात. आपणच छान आणि बाकी सगळे कंडम या गुर्मीत वावरले तर "मनोगत" व्हायला वेळ लागणार नाही. बाकी चालू द्या....

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

आज चक्क चक्क विमे ह्यांच्याशी सहमत व्हावे लागत आहे. ह्यामुळे आंतरजाल आता अजून किती अधोगतीला जाईल काय माहिती. ;) प्रा. डॉ. तुमच्यासारख्याकडून अशा वाक्याची खरेच अपेक्षा नव्हती. कोणी 'कंटकाने' हे केले असते तर समजू शकलो असतो, पण यू टू ? सदर संस्थळावरील अनेक धाग्यात तिथल्या एका अ‍ॅडमीनना 'ह्याच प्रकारची चर्चा मिपा वरती चालू आहे' असे लिहिताना आणि एक प्रकारे मिपाची जाहिरात करताना देखील पाहिले आहे. असे असताना ह्याच संस्थळाकडून दूजाभाव का होतो आहे ? मिपाचे बेसीन म्हणून एका विशिष्ठ ब्लॉगला हिणवले गेले होते, पण आता मिपा स्वतःच त्या रस्त्याने जात आहे. विरोधाला विरोध म्हणून त्या संस्थळावरील सदस्यांना विरोध करणारे देखील मिपावरती जागो जागी दिसतात. ह्या लोकांना कोणाचा वरदहस्त आहे ते देखील स्पष्ट दिसतेच. असे असताना तुम्ही स्वतः असे वागून अशा लोकांना पाठबळ देऊ नये अशी विनंती. सदर संस्थळावरती एकदा मिपा विषयी काहीसे तिरकस शब्द दिसले. त्यावर ताबडतोब तशी प्रतिक्रिया दिली असता सदर लेखक श्री घासुगुर्जी ह्यांनी जाहिर माफी मागत लेखनात योग्य ते बदल तर केले पण त्यानंतर तसे लिखाण पुन्हा त्या संस्थळावरती आढळले नाही हे विशेष. अजून काय लिहू ? 'War is young men dying and old men talking. You know this. Ignore the politics.' असे ट्रॉय मध्ये एक छानसे वाक्य आहे. तेच सर्वांनी लक्षात घ्यावे आणि आंतरजाल युद्धापासून लांबच रहावे. तरुण परा

In reply to by परिकथेतील राजकुमार

ज्या कोणी अधिकारी व्यक्तीने माझा वरील प्रतिसाद संपादित केला आहे त्यांना धन्यवाद. जो भाग संक्षीप्त केला आहे, त्या भागात संपादन करण्यासारखे काय होते हे ह्याच ठिकाणी सांगीतल्यास आमच्या ज्ञानात भर पडेल व ह्यापुढे आम्ही तसे शब्द व वाक्ये न वापरण्याची काळजी घेऊ. उत्तर द्यायला तुम्ही बांधील नाही ह्याची माहिती आहेच, मात्र निदान 'प्रश्नाला फाट्यावरती मारले आहे' असे संपादक आयडी कडून सुद्धा लिहिले तरी चालेल. त्यामुळे संपादनानंतर देखील; केलेल्या संपादनावरील प्रश्न निदान वाचले तरी जातात येवढे समाधान आम्हाला लाभेल.

सर तुमच्या प्रश्नावलीतील प्रश्न बघून आपल्या रिसर्चच्या पेपर मधले बद्ध प्रश्नावली प्रकार आठवला.

आम्ही धादांत, धडधडीत खोटे बोलतो. १.कुंपणीमधे अप्रेझलच्या येळेला, २.पत्नीने तिच्या माहेरच्यांविषयी विचारले, ३.मुलांनी टीव्हीवरुन पाहिलेल्या आक्षेपार्ह जाहिरातीविषयी विचारल्यावर, ४.आई-वडिलांनी, बायकोला घेतलेल्या सामानाविषयी, ५.शेजार्‍यांनी सिलेंडरबद्द्ल विचारले असता, ६.संकेत स्थळांवर स्वतःच्या नावाविषयी, ७.मित्रांनी पैसे उधार मागितले, ८.मित्रांबरोबर कट्ट्याला, भटकंतीला जायचे नसल्यास, ९.नवीन लेखक्/लेखिका यांच्या नवजात धाग्यावर.

महाभारतात विदुरनीती या भागात विदुर यांनी समाजातल्या अधिकांश लोकांचे ज्या विधानामुळे भले होणार असेल किंवा रक्षण होणार असेल असे खोटे विधान करणे क्षम्य आहे असे म्हटले आहे.

एका ब्रिटीश माणसाने दुसर्या देशातून आलेल्या पाहुण्यास सांगितले- आम्ही ब्रिटीश लोक कधीहि खोटे बोलत नाही- त्यावर पाहुणा म्हणाला - हे तुझे पहिले असत्य विधान आहे

धर्मगुरू नेहमी मद्यपान करू नये असे शिकवीत असतात त्यावर गालिब म्हणतो --- कहा मैखाने दरवाजा और कहा वाइज ( धर्मगुरू ) लेकिन कल हम जा रहे थे के वो निकले ---- उर्दूमध्ये माझ्या काही चुका झाल्या असतील पण मतितार्थ कळू शकेल असे वाटते.

ही घ्या उत्तरे.! प्रश्न पहिला : आपणास खोटे बोलणे आवडते. ब) नाही. प्रश्न दुसरा : आपण आई-वडिलांशी बोलतांना खोटं बोलता. ब) थोडं थोडं प्रश्न तिसरा : आपण पत्नीशी/ पतीशी खोटं बोलता. अ) कधीतरी प्रश्न चौथा : आपण कामकाजाच्या ठिकाणी खोटं बोलता. ड) कधीकधी प्रश्न पाचवा : मैत्रीणीशी खोटं बोलता ब) नाही. प्रश्न सहावा : आयुष्यात खोटं बोलण्याचं महत्त्व. ड) तडजोडीमुळे प्रश्न सातवा : खोटं बोलण्याचे कारण. ड) आयुष्यातील तड्जोडी. प्रश्न आठवा : सर्वच माणसं आयुष्यात खोटं बोलतात. अ) अगदी खरं आहे. प्रश्न नववा : खोटं बोलणं हा गुण आहे ब) नाही. प्रश्न दहावा : खोटं बोललं पाहिजे. अ) हो तसे पाह्त माणुस खोटे बोलल्या विना जगुच शकत नाही....!

अर्रे हो...! सर्वेक्षणाच्या नादात आमच्या 'अ' ते 'ज्ञ' संकेतस्थळाचा दुवा द्यायचा राहिला होता. कृपया एकेकाने रांगेत येऊन लिंकवर क्लिक करावे, आमच्या फूकटच्या सर्व्हरला इतका लोड झेपणार नाही. [संपादकांनी दुवा काढला तरी हरकत असणार नाही] भविष्यात आम्ही आमच्या संस्थळावर विविध उपक्रम राबविणार आहोत, जसे की महाराष्ट्रातल्या नद्या वर्तुळाकार जोडून सर्व जमिनी ओलिताखाली आणने, शेतकर्‍यांना कमी पाण्यावर अधिक उत्त्पन्न देणारी पिक घ्यायला सुचविणे, शासकीय कर्मचार्‍यांसाठी इन्कमटॅक्स मधून अधिकाधिक सूट कशी मिळवता येईल वगैरे इ. ;) बाकी,तुम्ही खोटं बोलता का ? यासाठी अजून सदस्यांनी आपापली उत्तरं लिहिली पाहिजेत. आलेला विदा अपूरा आहे. आपले शेजारी-पाजारी, नातेवाईक, विद्यार्थी, शिक्षक, कंपनीतील कामगार, आयटीतली मंडळी, गृहिनी, वाचक, वगैरेंना आपलं सर्वेक्षण चालू आहे, असे जरुर कळवा. 'वो कत्ल भी करते हैं तो चर्चा नहीं होती, हम आह भी भरते हैं तो हो जाते हैं बदनाम' -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर्वेक्षणाच्या नादात आमच्या 'अ' ते 'ज्ञ' संकेतस्थळाचा दुवा द्यायचा राहिला होता. कृपया एकेकाने रांगेत येऊन लिंकवर क्लिक करावे, आमच्या फूकटच्या सर्व्हरला इतका लोड झेपणार नाही.
=))

की प्राडॉ.आणि ऋ हे दोघेही वॉलमार्टचे छुपे हस्तक आहेत.या सर्वेक्षणाचा उपयोग वॉलमार्ट मार्केटींग स्टॅटेजी आखण्यासाठी करणार आहे. दुसरी अफवा अशी आहे की हे दोघही स्पीक एशिया सारखी कंपनी चालू करणार आहेत. संहघ्याहेवेसांनलगे

In reply to by रामदास

>>> प्राडॉ.आणि ऋ हे दोघेही वॉलमार्टचे छुपे हस्तक आहेत.... हाहाहा. प्रश्नावलीचं उत्तर मिळालं. :) वॉलमार्टच काय अमेरिकेतील बड्या कंपन्या नेहमीच लॉबींगसाठी मोठा खर्च करत असतात. [पाहा: मटा] पण,एकदा सुद्धा अशा सर्वेक्षणासाठी अमेरिकेतील कंपन्यांनी असा खास खर्चे केल्याचे दिसत नाही. अमेरिकेतील मिपा सदस्यांनी जरा अशा काही सर्वेक्षणावर काही सढळ हाताने खर्च करायला तेथील बड्या कंपन्यांना सांगावे. -दिलीप बिरुटे

पुढचे नका हो विचारु.. बरे तुमचे मतही कळु द्या की जरा....

In reply to by केदार-मिसळपाव

प्रश्न पहिला : आपणास खोटे बोलणे आवडते. ब) नाही. प्रश्न दुसरा : आपण आई-वडिलांशी बोलतांना खोटं बोलता. ब) थोडं थोडं प्रश्न तिसरा : आपण पत्नीशी/ पतीशी खोटं बोलता. ब ) कधीतरी प्रश्न चौथा : आपण कामकाजाच्या ठिकाणी खोटं बोलता. ब) कधीकधी प्रश्न पाचवा : मैत्रीणीशी खोटं बोलता अ) भरपूर प्रश्न सहावा : आयुष्यात खोटं बोलण्याचं महत्त्व. ड) तडजोडीमुळे प्रश्न सातवा : खोटं बोलण्याचे कारण. ड) आयुष्यातील तड्जोडी. प्रश्न आठवा : सर्वच माणसं आयुष्यात खोटं बोलतात. अ) अगदी खरं आहे. प्रश्न नववा : खोटं बोलणं हा गुण आहे क) नैमित्तिक प्रश्न दहावा : खोटं बोललं पाहिजे. ब) नाही. -दिलीप बिरुटे

गीतेवर हात ठेवुन सागंते कि "जे सागेंन खर सागेंन...." प्रश्न पहिला : आपणास खोटे बोलणे आवडते. ब) नाही. प्रश्न दुसरा : आपण आई-वडिलांशी बोलतांना खोटं बोलता. क) प्रसंग पाहून प्रश्न तिसरा : आपण पत्नीशी/ पतीशी खोटं बोलता. अ) कधीच नाही. प्रश्न चौथा : आपण कामकाजाच्या ठिकाणी खोटं बोलता. ड) प्रसंग पाहून प्रश्न पाचवा : मैत्रीणीशी खोटं बोलता ब) नाही. प्रश्न सहावा : आयुष्यात खोटं बोलण्याचं महत्त्व. ड) तडजोडीमुळे प्रश्न सातवा : खोटं बोलण्याचे कारण. ड) आयुष्यातील तड्जोडी. प्रश्न आठवा : सर्वच माणसं आयुष्यात खोटं बोलतात. अ) अगदी खरं आहे. प्रश्न नववा : खोटं बोलणं हा गुण आहे क) नैमित्तिक प्रश्न दहावा : खोटं बोललं पाहिजे. अ) हो

In reply to by इरसाल

>>> म्हन्जे तुमाला मित्रिन हाये तर ? मला मैत्रिणी नाहीत. [मित्र हा पर्याय नसल्यामुळे मैत्रिण] आणि मी कोणासही माझ्याशी मैत्री करता का आणि फेसबूकवर येता का असा व्य.नि. करत नाही. बाकी, आम्हा म्हातार्‍या माणसांना कशाच्या मैत्रिणी बित्रीणी. आजही माझ्या घरा शेजारच्या तरुण म्हैला वर्ग माझ्या आईला म्हणतात 'खरं बै तुमचा दिलीप, एकदा खाली मान घातली की पुन्हा मान वर करुन पाहात नाही' अशी आमची प्रतिमा आहे. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शेजारच्या तरुण म्हैला वर्ग म्हणतात 'ह्यानचा दिलीप म्हणजे अगदी खाल मुंडी आणि पात्तळ धुंडी ' हघ्याहेवेसांनल

In reply to by रामदास

च्यायला, ख-या माणसांचा जमानाच नै राह्यला. :) -दिलीप बिरुटे

आजही माझ्या घरा शेजारच्या तरुण म्हैला वर्ग माझ्या आईला म्हणतात 'खरं बै तुमचा दिलीप, एकदा खाली मान घातली की पुन्हा मान वर करुन पाहात नाही' अशी आमची प्रतिमा आहे. ..... हे आई नाही म्ह्नणत ना ! गल्लीचं थिक पण दिल्लीत (औरंगाबदला) काय करतो हा दिलिप हे काय महित म्हणा.म्हैला वर्गाला.. ह.घ्या हं...!

In reply to by रुमानी

>>> दिल्लीत (औरंगाबदला) काय करतो हा दिलिप हे काय महित म्हणा.म्हैला वर्गाला.. ह.घ्या हं...! औरंगाबादला डिवटी बिवटी सोडून घरोघर फिरुन संत तुकाराम महाराजांसारखे ''देव घ्या कोणी देव घ्या कोणी आइता आला घर पुसोनी '' त्या चालीवर कोणी 'मैत्री करतं का मैत्री' असं म्हणत फिरतो हे खर्रच कोणाला माहिती असणार :) [ह.घे.आ.] पंधराच मिपाकरांनी प्रश्नावलीला उत्तर दिले आहे, अजून कोणी राहीले असेल तर ३१ डिसेंबर पर्यंत आपली प्रश्नांची उत्तरे अनुक्रमे द्यावीत. -दिलीप बिरुटे

प्रश्न पहिला : आपणास खोटे बोलणे आवडते. अ) होय. ड ) नियमित. प्रश्न दुसरा : आपण आई-वडिलांशी बोलतांना खोटं बोलता. इथे नियमित हा पर्याय नसल्याने प्रश्न बाद प्रश्न तिसरा : आपण पत्नीशी/ पतीशी खोटं बोलता. अविवाहित आहोत हा पर्याय नसल्याने प्रश्न बाद. प्रश्न चौथा : आपण कामकाजाच्या ठिकाणी खोटं बोलता. अ) नियमित प्रश्न पाचवा : मैत्रीणीशी खोटं बोलता अ) भरपूर ड) नियमित (आधाशासारखे 'मैत्रिण कोण आहे' वैग्रे प्रश्न कोणीही कृपया विचारायला येऊ नये. घाऊक दरात ठोक अपमान करण्यात येईल. प्रश्न सहावा : आयुष्यात खोटं बोलण्याचं महत्त्व. अ) खूप आहे. ते अनुभवानेच उमजते. असे नुसते सांगून उपयोग नाही. प्रश्न सातवा : खोटं बोलण्याचे कारण. अ) आनंद लोकांना मुर्खात काढल्याचे स्वर्गीय समाधान लाभते. विशेषतः स्वतःला ब्रह्मज्ञानी समजणारे मुर्खात निघतात तेव्हा तर फारच मौज वाटते. प्रश्न आठवा : सर्वच माणसं आयुष्यात खोटं बोलतात. आमचे जग आमच्यापुरतेच मर्यादीत असल्याने इतरांचे कौतुक नाही. प्रश्न नववा : खोटं बोलणं हा गुण आहे अ) हो अत्यंत कष्टाने आणि मेहनतीने तो आत्मसात करावा लागतो. हे येर्‍यागबाळ्याचे काम नोहे ! प्रश्न दहावा : खोटं बोललं पाहिजे. अ) हो पण कुठे आणि कसे बोलाबे ह्याची अक्कल असेल तरच.

प्रश्न पहिला : आपणास खोटे बोलणे आवडते. क) कधीतरी प्रश्न दुसरा : आपण आई-वडिलांशी बोलतांना खोटं बोलता. ब) थोडं थोडं प्रश्न तिसरा : आपण पत्नीशी/ पतीशी खोटं बोलता. क) नियमित प्रश्न चौथा : आपण कामकाजाच्या ठिकाणी खोटं बोलता. क) कधीच नाही. प्रश्न पाचवा : मैत्रीणीशी खोटं बोलता ब) नाही. प्रश्न सहावा : आयुष्यात खोटं बोलण्याचं महत्त्व. अ) खूप आहे. प्रश्न सातवा : खोटं बोलण्याचे कारण. क) फसवाफसवी प्रश्न आठवा : सर्वच माणसं आयुष्यात खोटं बोलतात. अ) अगदी खरं आहे. प्रश्न नववा : खोटं बोलणं हा गुण आहे अ) हो प्रश्न दहावा : खोटं बोललं पाहिजे. अ) हो. (माझ्यासाठी) ब) नाही. (इतरांसठी)

एका विषयासंदर्भात व्यक्तींकडून माहिती मिळविण्यासाठी तयार केलेली प्रश्नांची एक क्रमबद्ध सूची म्हणजे प्रश्नावली....... अधिक तपशिलावर लिहिनच... -दिलीप बिरुटे

प्रश्न पहिला : आपणास खोटे बोलणे आवडते. ब) नाही. प्रश्न दुसरा : आपण आई-वडिलांशी बोलतांना खोटं बोलता. ड) मत मांडू इच्छित नाही. प्रश्न तिसरा : आपण पत्नीशी/ पतीशी खोटं बोलता. ब ) कधीतरी प्रश्न चौथा : आपण कामकाजाच्या ठिकाणी खोटं बोलता. ब) कधीकधी प्रश्न पाचवा : मैत्रीणीशी खोटं बोलता क) कधीतरी प्रश्न सहावा : आयुष्यात खोटं बोलण्याचं महत्त्व. ड) तडजोडीमुळे प्रश्न सातवा : खोटं बोलण्याचे कारण. ब) फायदा ड) आयुष्यातील तड्जोडी. प्रश्न आठवा : सर्वच माणसं आयुष्यात खोटं बोलतात. अ) अगदी खरं आहे. प्रश्न नववा : खोटं बोलणं हा गुण आहे ड ) सांगू शकत नाही. प्रश्न दहावा : खोटं बोललं पाहिजे. ब) नाही.