मंदी आली का हो !
लेखनप्रकार (Writing Type)
परवाची गोष्ट. आमचा एक मित्र आहे. नुकतेच त्याचे कॉलेज संपले. नोकरीच्या शोधात आहे. म्हणून त्याचा बायो डेटा
एका परीचिताकडे पाठवला.
हा परीचित एका बँकींग क्षेत्रासाठी आय टी सर्व्हिस देणार्या कंपनीत काम करतो.
म्हणाला 'अहो चूकीच्या वेळेला आलात."
मागील आठवड्यातच आमच्याकडे काही शे लोकांना नारळ दिला. आम्हालाही नोटीस मिळालीये.
निरोप समारंभ ३ महिन्यांनी होणार आहे.
म्हणून तो बायोडेटा घेऊन गेलो दुसर्या मित्राकडे.
त्याचे कम्पनी जागतिक, त्यामुळे बेंचही जागतिक. मला म्हणाला अहो आता कशाला बायोडेटा आणलात.
आम्हीच राहतोय का नाही ते माहीत नाही.
आमच्या इथेच स्थिती अवघड बनत चाललीये.
पूर्वी आमच्या कंपनीत बर्याच फॅसिलिटीज होत्या. प्लॅस्टीकचे युज अँड थ्रो कप्स असायचे कॉफी प्यायला.
आता युज अँड थ्रो कप्स फेकून दिलेत. प्रिंट आऊटस वरही मर्यादा आलीये.
पण याला कॉस्ट कटींग नाही म्हणायचे. ही आहे पर्यावरणाबाबत जागरूकता. प्लॅस्टीकने पर्यावरणाची खूप हानी होते.
आणि प्रिंटींगच्या कागदासाठीही बरीच जंगलतोड करावी लागते. म्हणून हे टाळायचे असा संदेश आला होता सी इ ओ चा.
अलिकडे बाहेर जाणार्या प्रत्येक मेलच्या शेवटी पर्यावरणाबाबत एक हिरवा मेसेज जोडला जातो.
तात्पर्य :- तुमचे काम इथे होणे नाही.
मग गेलो तिसर्याकडे. याची कंपनी थोर. टेलिकॉमच्या क्षेत्रात झाडू मारण्याचं काम करणारी. सॉरी चुकलो.
टेलिकॉमच्या क्षेत्रात फार उच्च दर्जाचे काम करणारी.तिथल्या मित्राला म्हटले बघ बाबा काहीतरी.
तर म्हणतो कसा...
आय टी मधे राहीलय काय. अहो इथे काही हजार लोक आम्ही हाकलणार आहोत.
त्याहून अधिक लोक सध्या बस कम्पनी मधे आहेत म्हणजे बिनकामाचे बसून आहेत.
त्याला म्हटले 'अरे मग हे लोक दिवसभर करतात काय ?'
तर म्हणाला 'दोन पंच एक लंच' .
तर काय तिथेही काम झाले नाही.
म्हणून प्रश्न पडला मंदी आली की काय !
बिल्डींग कन्स्ट्रक्शनबाबतही हाच अनुभव--
कुठल्याही नव्या साइटवर जा. लोक मागेच लागतात.
आमचा एक मित्र २ आठवड्यापूर्वी एका पूर्ण बाधलेल्या साइटवर गेला. साइट ऑफिसमधे जाऊन चौकशी केली.
म्हणाले ' सग्गळे सग्गळे फ्लॅट संपले. फक्त दोनच शिल्लक. ५ व्या मजल्यावरचा ३ रा
आणि २ र्या मजल्यावरचा कॉर्नरचा फक्त शिल्लक आहेत.
तेही जातील. आमचे रेप्युटेशनच आहे.तसं '
मित्र घरी आला. काही दिवसांनी या लोकांचा फोन. साहेब घेताय ना फ्लॅट.
हा नाही म्हणाला तरी पिच्छा पुरवतायत.
आणखी एक अनुभव. एका मित्राबरोबर गेलो होतो एक स्कीम पहायला.
ठीक वाटले. आय टी पार्क जवळच आहे.
भाव विचारला. त्यांनी एकूण किम्मत सांगितली. बरीच महाग वाटली. म्हणून मित्राने तो फ्लॅट घेण्याचा विचार सोडून दिला.
त्यानंतर गम्मत म्हणजे या बिल्डरच्या ऑफिसमधल्या लोकांनी पुन्हा फोन केला.
येऊन जा एकदा. बसू बोलू. म्हणून हा परत गेला बिल्डरच्या ऑफिसमधे. तर तिथला माणूस याला म्हणाला.
साहेब तुम्ही फ्लॅट घेणार आहात का, नक्की घेणार आहात का. सांगा. आपण तुमच्यासाठी किम्मत कमी करू.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याने नव्याने सांगितलेली किम्मत ६.५० लाखाने कमी होती.
त्याला सहज शंका म्हणून विचारले, 'तुम्हाला गिर्हाइकांची काय कमी, एवढे लोक गर्दी करतात ना ऑफीसमधे
गिर्हाइक कमी दिसत नाहीये.'
तर म्हणाला 'अहो हे सगळे आय टी वाले लोक. फ्लॅट पहायला येतात, गर्दी करतात.
शनिवारी, रविवारी तर इथे जत्रा भरते.पहायला येणारे खूप पण घेणारा मात्र कुणीच नाही.'
गाड्या बनवणारी एक कंपनी -
पूर्वी त्यांच्या ३ प्लांटस मधे गाड्यांचे प्रॉडक्शन होत असे.प्रत्येकात १००० चे टारगेट दिलेले होते.
तीन शिफ्टमधे काम चाले.
आणि आज आठवड्याचे काही दिवस कमी केलेत. काही शिफ्टही कमी केल्यात.
म्हणे आता गाड्यांना मागणी नाही.
--
परवा एक बॅकेचा एजंट भेटला. म्हणाला पर्सनल लोन घ्या. मी म्हटले नको.
म्हणाला मग होमलोन घ्या. मी म्हटले आधीच घेतलेले आहे.
तर मग मागेच लागला. म्हणाला "तुम्ही लोन घेतलेले असेल, तर आमच्या बँकेकडे ट्रान्सफर करा.
तुमचाही फायदा. आमचेही टारगेट पूरे होऊन जाइल."
पण आता लोन घेता का लोन म्हणून बँका मागे लागू लागल्या आहेत ग्राहकांच्या.
हे कस काय झालं ! मंदी आली की काय !
एकूण ग्राहक पुन्हा राजा होइल.
पूर्वी ग्राहकाचा जिथे किमान शब्दात कमाल अपमान होत असे. तिथे आता कमाल शब्दात किमान अपमान होइल
अशी अपेक्षा आहे.
या मंदीची संधी कशी करून घ्यावी बरे !
प्रतिक्रिया
संपादका
यात निगेटीव्हीटी काय आहे हे
ईनोद
आयला ! नक्कीच म्हातारा झालो
च्यायला या नानाच्या.
छे हो....
गप रे ! आपल्या मित्राला
या मंदीची संधी कशी करून घ्यावी बरे !
सग्गळे सग्गळे फ्लॅट संपले.
आता अश्या विचाराची सवय लावुन घ्यायला हवी.
वाढणारी लोकसंख्या हा जरी
विनोदी लेख!!! कॉस्ट कटींग भाग
ममो, असं सेल्फ-हेल्प छाप
चिंता
सगळे बुडणे शक्य नाही. काही
समजा आयटी कन्सल्टन्सीच्या
ऑप्शन
समजा आयटी कन्सल्टन्सीच्या
लार्सन टूब्रोने आपल्या १४०००
http://globalmarathi.com/2012
कारण
तेजी मंदी दोन्ही अर्थिक
ओबामा ह्यांनी आपल्या मनमोहन
एक रोचक लेख
पर्नल आणि सहज यान्चे दुवे
मंदी आली का हो !
गोट्या
पण सध्या मकानवाल्यांची बूच
इमारत बांधणी क्षेत्रात पुन्हा
महिंद्राचे उत्पादन मंदीमुळे
ऑटोमोबाइल क्षेत्रात मंदी
आणि
एम. बी. ए च्य त्याहुन जास्त....
तुम्ही मास्तर आहात का हो?
ठ्ठो:!!!
:)
बहुतेक झेड्पीत दिसतात.
काय दादा होतात कुटं ?... बरेच
मंदी आयी है आयी है मंदी आयी
एके काळचे बिगेस्ट