आमचे वार्ताहराकडुन
शनीवार श्रावण कृष्ण सप्तमी शके १९३० पुण्यपत्तन
मोडकी बातमी ( ब्रेकिंग न्यूज) आज वडगाव धायरी येथे एक भव्य मिपा सदस्यांचे जंक्षन फ़ंक्षन झाले त्यावेळी काही सदस्यांस उत्खनन करताना एक दूर्मीळ हस्तलिखीत सापडले. हे हस्त लिखीत पोथी स्वरुपात असुन त्यात आष्चर्य म्हणजे मिपा सदस्यांच्या मेळाव्याचे वर्णने चक्षुर्वैही सत्यांशासह वर्णीले आहे, मूळमजकूर अर्धमागधीत आहे.
या शोधाबद्दल सर्वत्र मिपा सदस्यांत तसेच पुणपतनातात एकच कौतुहल निर्माण झाले आहे. इतके पुरातन असुनसुद्धा त्यात अर्वाचीन मजकुर कसा हाच औत्सुक्याचा विषय आहे.
सर्वत्र हीच चर्चा आहे
प्रस्तुत पोथीतील चित्रे स्वाती राजेश या सदस्यानी अधीक संशोधनासाठी पास्चात्य देशात नेली आहेत. काही चित्रे भिंगात बंद करुन ज्येष्ठ संशोधक सेतुप्रभाकरराव पेठकर ( गडकरी) याणि नेली आहेत . ( हे फ़ोटो स्वच्छ धुवोनी देतात अशी एका बखरीत नोंद आहे) उपलब्धेतेनुसार ते प्रकाशीत करण्यात येतील
विजुभाऊ हे त्या मजकूर पूर्णमागधीत रूपांतरीत करीत आहेत.
वानगी दाखल उपलब्ध हस्तिलिखीतातला काही मजकूर येथे देत आहे. जाणकाराना यात अधुनमधुन अनुष्टुभ छंद दिसतो.
येथ दास म्हणे. वर्णीतो सात्वीक कट्टा पुणे
मानुनी घ्या संपूर्ण नसे येथ काही उणे
कट्टा ठरला येता स्वाती राजेशच्या मनी
ठरविला दिवस शेखरे श्रावण सप्तमी
पाचारण केले सर्वांस धमाल मुलाने
इन्या अंद्या धम्या सवे सखाराम गटणे
विजुभौ, दाढे, पेठकरा काका श्री व सौ आणि घाटपांडे
पाहुन चित्तर ,मन आणि छत्रपती वदले आनंदे
अभीर येतो आहे यमी सांगे
शेखरु ऋचा आणि स्वाती संगे
परीने लाविली टांग ऐसे विजुभौ सर्वाना सांगे
गटणे विचारी पुन्हा पुन्हा जैसा हा विजुभौचा गुन्हा
वास्तपुस्त मृगनयनीने पुसली, फ़ोनवर पण परी रुसली
पुणे अभिरुची बाग
मिपा कट्टा जाहला अहो भाग.
येक येक चमत्कार घडे जमता जाल सौंगडे
खेळ गप्पां सुरु होती चहा आल्याचा कुणा हाती
विजुभौ येता सोबत आणती छोट्याडॊन्या संगती.
नामे घेता खरी खोटी खुलासा होई प्रत्यक्ष भेटी
पाहोन मस्त कठपुतळीयांचे खेळु अणि सदस्यांचा मेळु
मोद सर्वांस झाला आणि भेटता गळोगळु
खेळ जादुचे सुरु जाहले. चेंडु चित्रे आत्तर पुसले
येथ विजुभौ म्हणे चला धमाल मुला
झोपाळा खेळु आन्द्या आणि धमाल बाळु
धमी पाही सोहळा नेत्र भरौन
आणि धम्यास दटावे आडुन आडुन.
बेत जेवण्या़चा खाषा होता.पक्वानांचा ताफ़ा होता.
पोळी भाकरी ज्वारी नाचणी
कढीचा भुरका होता मसाले भाता संगे
ताट सजले उसळी अळुच्या भाजी रंगे
इनोबा सांगे आवडे त्यास चटणी वांगे
श्रीखंड खीर आणि कसल्या चटण्या होत्या
पाहौन ताट असे बंद झाल्या बोलत्या
सदस्य दंग झाले चाखण्यात गप्पा पडल्या बंद
येथ घेता थोडा ब्रेक डॊ दाढे आले अचानक
घाई लवकर जाण्याची त्याना चंट. म्हणे वाट पहाती पेशंट
विजुभौ म्हणे थांबरे पान खावोनी जारे
असौन वैद्य दंत; मसाला पान खाती पंत
वाजवी बासरी विजुभौ संत ;मान डोलवी वैद्य दंत
येथ फ़ोनवरी भेटीस आला ब्रीटीश टिंग्या
मदनबाण सहाये करीत अनेक दंग्या
सदस्य काही पांगले काही गप्पांत रंगले
जे रंगले ;सायंपर्यन्त ते दंगले
कुम्हारकाम पाहौन संतुष्ट जाले
मातीतुनी सृष्टी निर्मिली देवा कुंभाराने
येथ पुन्हा चहा झाला आईस्क्रीम येकेक
पाय निघो म्हणेना थांबतो प्रत्येक
निरोप घेउनी बाळे हलली
आणि कट्ट्याच्या स्मतीत फ़ुलली
येथ म्हणे विजुभौ लेखकु
शेखरु आखकु. धमाल आयोजकु
संतोष पावले कट्ट्यावरी.
उतु नको मातु नये घेतला वसा टाकु नये
कट्ट्यास नाही म्हणो नये.
!! गावो गावी कट्टा व्हावा. मिसळधर्म तो वाढवावा.!!
वाचने
8685
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
!! गावो गावी
विजूभाऊ,
In reply to !! गावो गावी by विसोबा खेचर
असेच म्हणतो.
In reply to विजूभाऊ, by अवलिया
+१
In reply to असेच म्हणतो. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
!! गावो गावी
मिसळधर्म तो वाढवावा.!!
अंमळ जबरा
In reply to मिसळधर्म तो वाढवावा.!! by वरद
खॅ खॅ खॅ खीक्क्क्क्क्क्क
In reply to अंमळ जबरा by टारझन
५ वर्षे दीड महिना ....
In reply to खॅ खॅ खॅ खीक्क्क्क्क्क्क by विजुभाऊ
सही है
छान
वा..
ब्येष्ट....
छान
जबरा !!!!!!!!
विजुभौ
मस्त... विजु भाय...
अजब..
खुपच छान..
खल्लास....
विजूभाऊ: अफलातून वल्ली
मान गये
मिपाचा
काय माणुस
धन्यवाद
मारा आमची ...
In reply to धन्यवाद by विजुभाऊ
खि खि खी
In reply to मारा आमची ... by छोटा डॉन
भन्नाट!
वाहवा