Skip to main content

प्रकाश आंबेडकर पाकिस्तान धार्जिणे आहेत का ?

लेखक बाबा पाटील यांनी रविवार, 16/12/2012 या दिवशी प्रकाशित केले.
प्रकाश आंबेडकरांनी आज अफजल गुरुला फाशी दिल्यास काश्मीर वेगळा होईल अशी फुटीरतावादी,देशद्रोही भुमिका मांडली आहे (म.टा.च्या सौज्यन्याने-http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/17630720.cms)हे असे करुन अश्या माणसांना नक्की काय साध्य करावयाचे आहे,अशी अतिरेक्यांना साजेशी भुमिका स्विकारुन आणी ती मिडीयापुढे बोलुन हा प्राणी खरच निवडुन येणार आहे का ?अश्या टिप्पणी बद्दल खटला भरता येईल का ?

वाचने 2871
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

अफझल गुरू याच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी झाल्यास आपल्या देशात काय घडू शकते याबाबत बाळासाहेब आंबेडकरांनी जो अंदाज व्यक्त केला आहे तो फारसा चुकीचा वाटत नाही. आता आपल्यापुढे प्रश्न असा आहे की देशद्रोह्यांबरोबर कुठलीही तडजोड नाही या देशभक्तीच्या तत्त्वाचा अंगिकार करायचा की व्यावहारिक तडजोड करून शांततापूर्ण मार्गाने प्रगती करत राहायची. पण दुसऱ्या पर्यायात यश मिळवण्यासाठी अनेक घटक आहेत जे आपल्या नियंत्रणात नाहीत. याबाबतचा निर्णय घेण्यासाठी व तो जनतेस पटवून देण्यासाठी खंबीर राजकीय नेतृत्वाची आवश्यकता आहे ज्याची सध्यातरी वानवाच आहे. एका अवघड मुद्द्यावर अतिशय स्पष्ट बोलल्याबद्दल बाळासाहेब आंबेडकरांचे अनेक आभार. ते कुठल्याही प्रकारे पाकीस्तानधार्जिणे वाटत नाहीत.

"जर आपण लादेन ला मारले तर सारे मुस्लीम जग एकत्र होऊन इस्लामी बोंम्ब बनवेल मग पाकिस्तान आपला मित्र रहाणार नाही. कारण ते जग त्याला लागून आहे. तेंव्हा लादेन जिवंत राहू द्या " असा विचार अमेरिकेने केला असता का ?

In reply to by चौकटराजा

अफझल गुरुला मिळालेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी व ओसामा बीन लादेन याची धडक कमांडो कारवाईत केली गेलेली हत्या यात मूलभूत फरक आहे. लादेनला जिवंतपणे अटक करून रीतसर खटला का चालवणे शक्य असताना तसे का केले गेले नाही या प्रश्नाचे उत्तर शोधल्यास वरचा प्रश्नच गैरलागू होतो. समजा लादेना अटक करून त्यावर अमेरिकेतील न्यायालयात खटला चालवला असता तर त्यास मृत्युदंडाचीच शिक्षा मिळाली असती यात शंकाच नाही. पण तो जिवंतपणे अमेरिकेच्या ताब्यात असणे ही अमेरिकेच्या जगभरातील नागरिकांसाठी किंवा अमेरिकनांसारखे दिसणाऱ्या इतर देशांच्या नागरिकांसाठी फार मोठी आफत होऊन बसली असती. लादेनच्या सुटकेसाठी किती ठिकाणी अपहरणे झाली असती त्याची गणतीच करवत नाही. त्यामुळे त्याचे प्राण घेतल्यावरच या कारवाईबाबतची माहिती सार्वजनिक करण्यात आली. या गोष्टीचा बदला कधी कोणी घेऊ शकणारच नाही असा दावा खुद्द अमेरिकन सरकारही करणार नाही.

लादेन विषयी सांगायचे तर न्यायालयात त्याच्या विरोधात सबळ पुरावा नऊ अकरा च्या विरोधात अजिबात सिद्ध झाला नसता ही गोष्ट खूप कमी जणांना ठाऊक आहे. त्याला पकडून त्यावर खटला भरणे हे अमेरिकेचे कधीच उद्दिष्ट नव्हते. तो जर कोर्टात स्वतःहून हजार झाला असता आणि अमेरिकेने त्याला व त्यांच्या अनेक अरब तरुणांना धर्माच्या नावे ब्रेन वोष करून अफगाणिस्तानात जाण्यास प्रव्रूत केले. व जगातील एक मुस्लिम पिढीच्या डोक्यात रशिया विरुद्ध जिहादी कल्पना भरल्या व पुढे तालिबान ची निर्मिती कशी केली त्यात कोण कोण नेते समाविष्ट होते हे सविस्तर सांगितले असते तर अमेरिकेची जगात फार मोठ्या प्रमाणात नाचक्की झाली असती. अलकायदा च्या हल्ल्यानंतर अमेरिकेत व जगात हिरवा दहशतवाद हि कल्पना पसरली त्या आधी युरोपात तर असेकाही आहे व तालिबान कोण त्यांचे निर्माते कोण व अलकायदा सुरवातीच्या काळात कोणाविरुद्ध लढत होती तिचे निर्माते कोण ह्याविषयी काहीही कल्पना नव्हती व आजही ह्या लोकांना अजिबात कल्पना नाही आहे. त्यामुळे त्याला संपवणे हाच एकमात्र उपाय होता. भारतला अफझल गुरु च्या निमित्ताने काश्मिरातील दहशतवाद जगापुढे मांडता आला. प्रकाश आंबडेकर ह्यांनी एक शक्यता वर्तविली आहे ,अर्थात ती एकदम टोकाची भूमिका झाली.आणि राजकारण चर्चेत राहण्यासाठी अशी वक्तव्ये करण्याची सध्या लाट आली आहे. पण अफजल गुरु च्या फाशीच्या निमित्ताने पाकिस्तानी कट्टर पंथीय काश्मिरात हल्ले करतील व पाकिस्तानी जनता सध्या काश्मीर प्रश्न विसरत चालली आहे त्यांना सुद्धा भडकावणे वैगैरे प्रकार करतील. भारताने अश्या गोष्टीला तोंड देण्याची तयारी करावी व हल्ले होणार हे गृहीत धरून त्याला फाशी द्यावी. मी त्याला फाशी देण्याच्या बाजूने आहे.

प्रकाश आंबेडकरांच्या म्हणण्यात तथ्य आहे. काश्मीर प्रश्न एका दिवसात सुटण्यासारखा नाहिये. काश्मीरी युवकांना भरकटवणारे अनेक लोकं आजही तिथे आहेत. अफ़जल गुरु हा आधी आयएएस परिक्षेचा अभ्यास करत होता म्हणे कधी काळी. अशा तरुणांना माथेफ़िरु बनविणारे तिथे अनेक आहेत. फ़क्त त्यांच्याच अनेक गटतट आहेत आणि प्रत्येकजण नेता आहे. अफ़जल गुरु हा त्यांच्यात एकी करणारा फ़ॅक्टर बनु नये हे बघणं भारत सरकारचं काम आहे. भारत सरकार मात्र ब्रेन वॉशिंग च्या बाबतीत एकदमच मागे आहे. भारतानेही काश्मीरींचे पद्धतशीरपणॆ ब्रेनवॉशिंग केले पाहिजे. त्यासाठी आपल्या यंत्रणा पद्धतशीरपणे राबविल्या पाहिजे. पाकिस्तानही हे सहज करु शकतं भारत का करु शकत नाही? एकदा काश्मीरींचे ब्रेनवॉशिंग झालं तर अफ़जल गुरु सारखी प्रकरणं निकालात काढणं खुप सोपं होईल. सोशल मिडिया आणि एकुणच मिडियाच्या सहाय्याने हवं तसं वातावरण निर्माण करता येतं....भारत सरकारला जर ते येत नसेल तर केजरीवालांकडुन त्यांनी धडे घ्यावेत. संपुर्ण भारत तापवायला टिम अण्णाला काही महिने लागले. भारत सरकारला अजुन काश्मीरमधे वातावरण निर्मीती करता येत नाहीये.

In reply to by शैलेंद्रसिंह

तीव्र असहमत. अण्णांच्या आंदोलनाची आणि अफजल गुरुची तुलना पुर्णपणे चुकीची आहे. अण्णांच्या वेळेस बहुतांश भारतीयांना भ्रष्टाचाराविषयी प्रचंड चिड होती. लोकमत त्यांच्या बाजुने होते. लोकांची सहानुभुती त्यांना होती. इथे काश्मिरी लोकांची सहानुभुती भारताच्या बाजुने कधीच नव्हती, पुढेही असेल असे वाटत नाही. भारताने इतका पैसा ओतलाय तिथे, त्यांना स्पेशल स्टेटस दिलाय, अजुन काय हवं ? पण तरीही त्यांच्या मनात जो द्वेष आहे तो जाणार नाही. त्यामुळे अफजल गुरुला फाशी दिली नाही तर काश्मीरी लोकांना भारताविषयी प्रेम वाटेल असं काही नाही. फाशी द्या/ देऊ नका, ते भारताचा द्वेषच करणार. त्यामुळे अफजलला ताबडतोब फाशी द्यायला हवी. बाकी प्रकाश आंबेडकर खुप संतुलित बोलतात, त्यामुळे त्यांचे हे वक्तव्य वाचुन आश्चर्य आणि खेद वाटला.

In reply to by अमोल खरे

भारताने पैसा ओतलाय वगैरे खरं आहे, पण तो पैसा काश्मिरी राज्यकर्त्यांनी गिळला. भारत सरकारला काश्मिरी राज्यकर्त्यांना बायपास करुन जनतेशी थेट संपर्क साधावा लागेल. तिथे प्रोपागंडा युद्ध खेळावे लागेल जसे पाकिस्तान खेळतोय. जम्मु-काश्मीर मधे महाराष्ट्राइतकेच मुस्लिम राहतात. तिथेही चार-पाच जिल्ह्यांचाच प्रश्न आहे.अफजल गुरुचा भिंद्रनवाले करुन दाखवण्यात राजकिय शहाणपण नाही. अण्णांच्या आंदोलनाची आणि अफजल गुरुची तुलना केलेली नाही. मिडियाला हाताशी धरुन जनमत कसे तापवता येते ह्याचे ते उदाहरण आहे. अमेरिकेसारखे अनेक देश मिडियाला आणि काही ठराविक मंडळींना हाताशी धरुन परराष्ट्रात सत्तांतर घडवुन आणतात, जनमत तापवतात. भारताला मात्र आजवर हे जमलेलं नाही.

हा पळपुटेपणा होईल ? हव तर एक पर्याय म्हणून वापरा. (साप पण मरेल आणि काठी पण नाही तुटणार) पण काहीतरी समन्वय साधून एकदाचा निकाल लावून टाका नाहीतर एखादे कंधहार होइ पर्यंत वाट बघा.

पण हे प्रकाश आंबेडकर आणि अफजलगुरु कोण आहेत ? आणि मुख्य म्हणजे काश्मीर हा भारतापासून वेगळा होईल म्हणजे अजून नक्की नेमके काय होईल ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

प्रकाश आंबेडकर कोण आहेत ?