Skip to main content

बॉम्बे टाईम्स बद्दल आपले काय मत आहे?

लेखक हिरवळ यांनी रविवार, 16/12/2012 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मीपाकर.. मी मीपाची निस्सीम चाहती..जवळ जवळ गेली ४ वर्षे मी जमेल तेव्हा मीपाच्या कट्यावर हजेरी लावत होते, पण कधी अधिक्रुत सदस्य व्हायचा योग येतच नव्हता... आता तो जुळुन आलाय.. बिल्डीन्गीन्च्या जगता मध्ये आणि आपल्या धकधकीचा आयुष्यामध्ये खर्‍या अर्थाने दिसणारा वा अनुभावायला मिळणारा हिरवा रंग आपल्या मनाला ताजेतवाने करुन जातो.. या हिरवाईची मनोमन आवड असणारी मी, म्हणुन माझे नाव "हिरवळ".. खालील सदराद्वारे मी मीपावर लिहीण्याचा पहिलाच प्रयत्न करत आहे, त्यामुळे काही चुकभुल झाली असल्यास माफी असावी.. आपल्या सर्वान्च्या घरी Times of india येत असेलच.... त्या बरोबर bombay टाईम्स नावाची जी पुरवणी येते त्या बद्द्ल आपले काय मत आहे? अतीशय उत्तान आणि ऊन्मादक असे फोटो असतात त्या मध्ये... घरी थोरा लहाना समोर पेपर वाचणे सोडा,तो उघड्णे देखील अतीशय embarrassing होउन जाते.. हा पेपर सर्वान्च्या घरोघरी पोहचतो, आणि तो सर्व जण वाचतात याचे थोडे तरी भान या सम्पादक मन्डलीन्नी ठेवले पाहिजे... बरे Times of india चि मेन आव्रुत्ति घेवुन त्याचि हि पुरवणी न घेण्याची काही स्कीम हे आपणास देत नाहित.. म्हणुनच क्रुपया अश्या प्रकारचे अश्लील फोटो तशाच घणेरड्या हेड्लाईन सह फ्र्ण्ट पेज ला देणे टाळावे, आथवा अशी पुरवणी न घेण्याची काही स्कीम तरी काढावी अशी Times of india च्या सम्पादक मन्डलीन्ना नम्र विनन्ती....

वाचने 4551
प्रतिक्रिया 28

प्रतिक्रिया

आपल्या सर्वान्च्या घरी Times of india येत असेलच.... त्या बरोबर bombay टाईम्स नावाची जी पुरवणी येते त्या बद्द्ल आपले काय मत आहे?
माझ्याकडे मुख्य अंका बरोबर बँगलोर टाईम्स येतो. आल्या आल्या पहिल्या पानावरची हिरवळींची चित्रं डोळे भरून बघतो. नंतर गारफील्ड आणि The Wizard of Id, टी शर्ट कोट वगैरे वाचून झालं की मग तिसर्‍या पानावरची माहित नसलेल्या लोकांची पार्टीची चित्र बघतो. मग मुख्य अंका कडे वळतो. कधी कधी जमलच तर स्वामिनॉमिक्स किंवा द स्पिकींग ट्री नावाची फुटकळ सदरं पण वाचायचा प्रयत्न करतो.

माझ्या घरी टाइम्स यतो, पण मी चेन्नैत असल्याने चेन्नै टाइम्स असतो इथे. त्याबद्दलचे मत सांगितले तर चालेल काय? -(मद्रासी) सोकाजी

मुंबई टाइम्स येतो की बॉम्बे टाईम्स ? नाय, तिकडे मद्रास टाइम्स न येता चेन्नै टाइम्स येतो असं सोकाजीराव म्हणतायत. मग हिकडे बॉम्बे टाइम्स येत असेल तर निषेध !!!

In reply to by नितिन थत्ते

मुंबई विभागात महाराष्ट्र टाईम्स सोबत मुंबई टाईम्स येतो आणि टाईम्स ऑफ इंडिया सोबत बॉम्बे टाईम्स येतो.

In reply to by रुस्तम

टाइम्स ऑफ इंडिया बरोबर पण मुंबई टाइम्सच यायला हवा. (ना)राज

माझ्याकडे येतच नसल्यामुळे प्रश्नच नाही. तुमची लिहायची पहिलीच वेळ म्हणल्यावर चुका होणारच टायपिंग करताना सुरवातीला गुगल ट्रांसलेशन मधे करा म्हणजे सोपे जाते

एकदा एकजण, टिव्हीवरचा बे-वॉच कार्यक्रम अगदी मिटक्या मारत पाहात असतो. तेवढ्यात अचानक त्याचा अल्पवयीन मुलगा तिथे येतो. हा ओशाळतो आणि सारवासारवी करायला म्हणतो,' अरे! ह्या मुली गरीब आहेत. पूर्ण कपडे खरेदी करायला त्यांच्याकडे पैसेही नाहीत.' मुलगा शांतपणे म्हणतो,'बाबा!ह्यांच्यापेक्षाही गरीब मुली पाहायच्या असतील तर माझ्याजवळ डिव्हिडी आहे.'

बॉम्बे टाईम्स नावाची जी पुरवणी ही अतिशय टुकार प्रकार आहे खालील उपाय करून बघा १. आल्या आल्या हा पेपर लहान मुलांना योग्य कामासाठी द्या २. हा पेपर नकळत जेष्ठ नागरिकांच्या कट्यावर पोहोचावा तेवढीच थोडी हिरवळ ३, हा पेपर पाण्यात भिजवून त्याला मोल्ड करून वेग-वेगळी भांडी बनवा , त्यातली अंगभूत चित्र तशीच राहिली तर मॉडर्न आर्टच्या नावाखाली खपवता येतील बर कशी विल्हेवाट लावली ते व्यवस्थित धागा काढून सांगा (पहिला उपाय सोडून)

जगात कुठलीच गोष्ट टाकाऊ नसते. मुंबई टाईम्सने देखील शोध पत्रकारिता करुन काही प्रकरणे धसास लावली आहेत.त्यांत सगळ्याच प्रकारचा मालमसाला असतो. ज्याला जे हवे ते त्याने वाचावे. उत्तान फोटोंबद्दल म्हणाल तर ते कुठे नसतात? हल्लीच्या पिढीला त्याचेही काही वाटत नाही.

उत्तान आणि ऊन्मादक
काही लोकांना ते कलात्मक वाटत असतील तर ? शेवटी उत्तान आणि ऊन्मादक ह्याची व्याख्या प्रत्येकासाठी वेगळी असणार ना.

हे टिओआयचं संपादक मंडळ नाही हो. इथल्या लोकांनी तुमच्याशी संमती दर्शवली तरी काय उपयोग? एक तर हा निरोप त्यांना लिहा नाय तर पेपर बंद करा. इथे पोस्ट टाकून काही होणार नाही.

बॉम्बे टाईम्स बद्दल आपले काय मत आहे?
काहीच नाही.. कारण कधी वाचलेला नाही. पण आता तुम्ही इतकं लिहीलं आहे, तर वाचून बघीन म्हणते.

खालील सदराद्वारे मी मीपावर लिहीण्याचा पहिलाच प्रयत्न करत आहे, त्यामुळे काही चुकभुल झाली असल्यास माफी असावी..
हे खाली जे काही लिहिलंय ते सदर आहे ?
आपल्या सर्वान्च्या घरी Times of india येत असेलच.... त्या बरोबर bombay टाईम्स नावाची जी पुरवणी येते त्या बद्द्ल आपले काय मत आहे? अतीशय उत्तान आणि ऊन्मादक असे फोटो असतात त्या मध्ये... घरी थोरा लहाना समोर पेपर वाचणे सोडा,तो उघड्णे देखील अतीशय embarrassing होउन जाते.. हा पेपर सर्वान्च्या घरोघरी पोहचतो, आणि तो सर्व जण वाचतात याचे थोडे तरी भान या सम्पादक मन्डलीन्नी ठेवले पाहिजे... बरे Times of india चि मेन आव्रुत्ति घेवुन त्याचि हि पुरवणी न घेण्याची काही स्कीम हे आपणास देत नाहित.. म्हणुनच क्रुपया अश्या प्रकारचे अश्लील फोटो तशाच घणेरड्या हेड्लाईन सह फ्र्ण्ट पेज ला देणे टाळावे, आथवा अशी पुरवणी न घेण्याची काही स्कीम तरी काढावी अशी Times of india च्या सम्पादक मन्डलीन्ना नम्र विनन्ती....
हे वर जे काही लिहिलंय ते सदर आहे ?

बॉम्बे टाईम्स येतो, पण त्याचा उपयोग मला आज कोणकोणते पिक्चर कोणत्या चॅनेल्स वर आहेत ते बघायला होतो. आणि उत्तान फोटो म्हणाल तर ते फोटो आपल्याला उत्तान वाटतात हे दुस-यांना सांगितल्यावर ते हसतात, म्हणुन असं बोलायचं नाही बरं. थोडक्यात सांगायचं तर बॉम्बे टाईम्स मध्ये ज्यांचे फोटो येतात ती एक वेगळी दुनिया आहे. त्यांचे प्रश्न आणि उत्तरे पण वेगळी असतात.

बाँबे टाईम्स मला (कॉलेजात असल्यापासून, जेव्हा तो प्रथम निघाला होता) "सेलेब्रेटी टाईम्स" वाटतो. मुंबैत बर्‍याच आर्थिक स्तरातली माणसं राहतात. समाजातल्या एका विशिष्ट स्तराचं प्रतिनिधित्व करणारी ती पुरवणी (आणि काही वेळा मूळ वर्तमानपत्रही) आहे आणि त्या वर्गातला मी नसल्याने त्या पुरवणीत मला यत्किंचितही रस नसतो त्यामुळे मी ती कधीच उघडून पाहत नाही. मूळ वर्तमानपत्रही "काही वेळा" एकांगी आहे असं मला "वाटतं". याला काही कारणं आहेत. कालेजात असताना आम्ही मित्रमंडळी विंग्रजी शब्दसंग्रह वाढावा म्हणून हे वर्तमानपत्र वाचायचो. (त्यावेळी दुसरा सहज उपलब्ध होणारा पर्याय दिसला नाही). एकांगी आहे असं वाटायचं एक कारण असं, ज्यावेळी मराठी वर्तमानपत्रे दहीहंडी नंतरच्या दुसर्‍या दिवशी, सण (सण हा इव्हेंट होण्यापूर्वीची गोष्ट आहे) उत्साहात साजरा, अशी सचित्र बातमी द्यायचे. त्या वेळेला ह्या वर्तमानपत्रात किती जखमी झाले अशी सत्य पण फक्त दुसरी बाजूच छापून यायची. त्यामुळे ह्या वर्तमानपत्राबद्दल तितकासा जिव्हाळा नाही. बर्‍याचवेळा मला हे वर्तमानपत्र इतर वर्तमान पत्रांपेक्षा जलद माहिती देताना दिसतं (स्कूप). कसाबची बातमी असो, बाळासाहेबांना कुठे अग्नी देणार, नाहीतर सिंचनाची श्वेतपत्रिका. कदाचित त्यांचे पत्रकार फारच हुशार आणि मेहनती असावेत, कदाचित"तलाश" या चित्रपटामध्ये दाखवल्यासारखी परिस्थितीही असू शकते. असो पण हे वर्तमान पत्र सखोल माहिती देते आणि ह्या वर्तमानपत्राची विश्वासार्हता अधिक आहे.

In reply to by सुधीर

जलद आणि विश्वासार्ह माहिती आणि मराठी भाषा,संस्कृती,समाज या विषयी आकस ही टीओआय ची खासियत आहे.महाराष्ट्राविषयीचे लेखन हे नेहमी 'सोबो'चश्म्यातून लिहिलेले दिसते. नोबेल पारितोषिक मिळावे असे बाबा आमटे गेले तेव्हा अर्धा कॉलम बातमी आणि त्याच पानावर अमिताभ बच्चनच्या कुठल्याश्या आजारपणाची अथवा इस्पितळातून घरी आल्याची कवरस्टोरी. असा संताप झाला होता.. पण याचे कारण इंग्रजी उत्तम लिहिणारे-बोलणारे-वाचणारे मराठी पत्रकार उपलब्ध नसावेत हे बहुधा असावे.

माझा जुना मेनेजर Times of India चा उचार Timepass of India असा करायचा...

TOIचे मालक अस्सल धंदेवाईक होते आणि अजूनही आहेत्.गेल्या वीस वर्षात लोकांच्या वाचण्याच्या आवडी बदलल्या आहेत. 'कसारा घाटात दोन ठार तीन जखमी', 'अमूक तमूक टी.व्ही.तारकेचे क्रिकेटपटूबरोबर लफडे". कुठली बातमी वाचक आधी वाचतील? उत्तर उघड आहे. बर्‍याचशा बातम्या ह्या पैसे घेवून छापलेल्या असतात. चित्रकार्,पेंटर्,गायक्,गायिका,वादक,फॅशनवाले,उदयोन्मुख सिनेतारका/ग्रह ह्या मंडळींना बॉम्बे/चेन्नई/बेंगळूर टाईम्सचा उपयोग होतो.

पण मुंबईला मुंबईच म्हणायचं असतं ना?? बॉम्बे म्हणून कसं चालेल?

एकाद्यावेळी ट्रेकींगला जाताना अथवा लांबपल्ल्याच्या रेल्वेप्रवासात आरक्षण नसल्यास उपयोगी पडतो कधी कधी, टाईम्स ऑफ इंडीया.

एक आयडीया आहे . रोज बॉम्बे टाईम्स परत करायचा. उरलेलाच पेपर फक्त घ्यायचा