"शिवराय"
लेखनविषय:
काव्यरस
त्रासली गांजली जनता, नाही कोणी वाली |
तारावा हिंदुधर्म, साकडे देवास घाली |
दाही दिशा माजले दैत्य,गिळती महाराष्ट्रासी |
झाली मंदिरे जमीनदोस्त,भग्न केले देवांसी |
लेकी सुनांच्या अब्रूला,नाही राहिले रक्षण |
वतनदारांना तर प्रिय आपलेच वतन |
संत महात्म्यांनी केला देवाचा धावा |
या धरतीला ताराया अवतार घ्यावा |
संतांची गरीब रयतेची, देवास आली दया |
म्हणूनच देवांनी पाठविला शिवराया |
शिवरायांनी ऐसे अघटीत केले |
शून्यातून स्वराज्य उभे राहिले |
अफझलचा कोथळा बाहेर काढीला |
औरंग्याचा तर माजच जिरवला |
आदिलशहा निजामासी जागीच रोखले |
इंग्रजांसी मुंबईच्या वखारीतच कोंडले |
संतांचे देवालयांचे केले रक्षण |
खळ, नि दुर्जांनांचे करुनी निर्दालन |
त्रेतायुगी होते जसे रामाचे रामराज्य |
कलियुगी आमच्या शिवरायांचे शिवराज्य |
जय शिवराय
वाचने
5186
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
अनिल तापकीर साहेब, वा मस्त कविता आहे.
जबर्यादस्त !
In reply to जबर्यादस्त ! by परिकथेतील राजकुमार
+१
निश्,राजकुमार धन्यवाद
एकदम मस्त , खूप छान ..
वा मस्त कविता आहे.
ज्ञानराम,नि पंकज जी धन्यवाद
सुंदर रचना
राजा शिवछत्रपती - कवीराज भुषण यांच्या काव्यातुन
शिवप्रसाद्,आनि बाबा पाटील
शिवछत्रपतींचा विजय असो!!
धन्यवाद्,पाषाण्भेदजी
कोणितरी जाणकार व्यक्तीने
धन्यवाद शिवप्रसाद
छत्रपतींचा विजय असो!!
चिर्कूट आनि शैलेंद्र धन्यवाद,
In reply to चिर्कूट आनि शैलेंद्र धन्यवाद, by अनिल तापकीर
जब्बर्दस्त..
बरे झाले तुमचा प्रतिसाद