Skip to main content

एगलेस चॉकलेट केक

लेखक अनन्न्या यांनी बुधवार, 05/12/2012 18:13 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः मैदा १५० ग्रॅम, लोणी १०० ग्रॅम्,मिल्कमेड्साठी ( दूध पाऊण ली.+साखर पाऊण वाटी), १ चमचा बेकींग पावडर, अर्धा चमचा खायचा सोडा, कोको पावडर अडीच चमचे, ५/६ चमचे साखर लागल्यास, दूध अर्धा कप, तूप. क्रुती:पाऊण ली. दूध+पाऊण वाटी साखर मंद आचेवर आटवावे. मिश्रण मिल्कमेड सारखे झाल्यावर गार करावे. मिक्सरला फिरवून एकजीव करून घ्यावे. मैदा, बेकींग पावडर, खायचा सोडा, कोको पावडर चाळणीने तीन वेळा चाळून घ्यावे. यामुळे सोडा,बेकींग पावडर नीट मिक्स होईल. तयार मिल्कमेड आणि लोणी परातीत घेऊन फेसावे.फेसताना अर्धा कप दूध मिश्रणात घालावे. आता चाळलेला मैदा मिश्रणात मिसळावा. मिश्रण एकजीव करावे. ५/६ चमचे साखर मिसळावी. नॉनस्टीक फ्रायपॅनला तूप लावून घ्यावे. साखर घातल्यावर एकजीव झालेले मिश्रण फ्राय पॅनमध्ये ओतावे. मंद गॅसवर १५ मिनिटे ठेवावे. १५ मिनिटानी झाकण काढून सुरीचे टोक घालून पहावे. मिश्रण सुरीला चिकटले नाही म्हणजे केक तयार झाला असे समजावे. मी हा केक ओव्हन नसल्यामुळे फ्राय पॅनमध्ये करते. त्यामुळे ओव्हनमध्ये किती वेळ लागेल ते मला माहीत नाही. मिपाकरांनी मार्गदर्शन करावे. काहीना मिल्कमेड्ची गोडी पुरेशी वाटते, त्यानी वरून साखर घालू नये. साधी साखर वरून घातल्यामुळे ती विरघळली की केकला छान जाळी पडते. केकवर केलेली आयसिंगची फुले लोणी साखरेची आहेत. नेट्वर गुगलून त्याची क्रुती मिळाली. a

वाचने 7089
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

सध्या कॅलरीजना घाबरत असल्यामुळे फक्त बघून छान म्हणण्यात येत आहे.

In reply to by पैसा

कॅलरीना घाबरणं सोडलं की हा केक करा आणि मला खायला बोलवा, जोपर्यंत घाबरताय तोपर्यंत मी आमंत्रण देत जाइन तुम्हाला.

अंडं आणि ओव्हन न वापरता केकची पाकृ मस्तच आहे. माझ्या आईसारख्या लोकांकरता फारच उपयोगी!

केक खूपचं छान आहे आणी कृती तर एकदम सोपी. करुन बघायला नक्की आवडेल. मिल्कमेड तयार करण्याऐवजी डायरेक्ट कंडेन्सड मिल्क वापरले तर चालेल का?? केकवर नाव ही छान आहे ;)

In reply to by सानिकास्वप्निल

हो, २५० ग्रॅम कंडेन्सड मिल्क वापरा.

एक मिनिट एक मिनिट अनन्न्या नॉनस्टीक फ्रायपॅनला तूप लावून घ्यावे. साखर घातल्यावर एकजीव झालेले मिश्रण फ्राय पॅनमध्ये ओतावे. मंद गॅसवर १५ मिनिटे ठेवावे. १५ मिनिटानी मी याधी कुकरमध्ये केक बनवला आहे पण तो तळाला एक वाटी जाड मिठ पसरवुन मग एका भांड्यात ते मिश्रण ओतुन २५ मिनिट मंद आचेवर शिट्टी न लावता बेक केला होता मस्त झाला होता तो पण ह्यात डायरेक्ट फ्राय पॅनमध्ये मिश्रण ओतायचे का ? केक जळ्नार नाही का ? प्लिज कन्फ्युजन दुर कर कारण ही फारच सोप्पी पद्धत दिसतेय तुझी ,तेव्ह्डेच माझे कुकरमध्ये केक बनवण्याचे कष्ट वाचतील :)

In reply to by पियुशा

खोलगट नॉनस्टीक फ्रायपॅन येतो ना तो मी डायरेक्ट्च वापरते केक अजिबात जळत नाही.गॅस मात्र मंदच ठेवावा. रव्याचा केक पण मी असाच करते. आधी मी पण वाळू तव्यावर पसरून त्यावर केक भाजत असे. हा फोटो आहे तो केक फ्रायपॅन मध्येच केलाय. नक्की करून पहा.

केकावली आवडली.

हे असल सुंदर सुंदर खायला मनाई आहे ग.. काय करू. कित्ती छान सजवलायस तो केक खाण्याचा मोहच होतो. सध्या.....भूपातल्या मध्यमासारखा वर्ज्य ग बाई....