साहित्यः मैदा १५० ग्रॅम, लोणी १०० ग्रॅम्,मिल्कमेड्साठी ( दूध पाऊण ली.+साखर पाऊण वाटी), १ चमचा बेकींग पावडर, अर्धा चमचा खायचा सोडा, कोको पावडर अडीच चमचे, ५/६ चमचे साखर लागल्यास, दूध अर्धा कप, तूप.
क्रुती:पाऊण ली. दूध+पाऊण वाटी साखर मंद आचेवर आटवावे. मिश्रण मिल्कमेड सारखे झाल्यावर गार करावे. मिक्सरला फिरवून एकजीव करून घ्यावे. मैदा, बेकींग पावडर, खायचा सोडा, कोको पावडर चाळणीने तीन वेळा चाळून घ्यावे. यामुळे सोडा,बेकींग पावडर नीट मिक्स होईल. तयार मिल्कमेड आणि लोणी परातीत घेऊन फेसावे.फेसताना अर्धा कप दूध मिश्रणात घालावे. आता चाळलेला मैदा मिश्रणात मिसळावा. मिश्रण एकजीव करावे. ५/६ चमचे साखर मिसळावी. नॉनस्टीक फ्रायपॅनला तूप लावून घ्यावे. साखर घातल्यावर एकजीव झालेले मिश्रण फ्राय पॅनमध्ये ओतावे. मंद गॅसवर १५ मिनिटे ठेवावे. १५ मिनिटानी झाकण काढून सुरीचे टोक घालून पहावे. मिश्रण सुरीला चिकटले नाही म्हणजे केक तयार झाला असे समजावे.
मी हा केक ओव्हन नसल्यामुळे फ्राय पॅनमध्ये करते. त्यामुळे ओव्हनमध्ये किती वेळ लागेल ते मला माहीत नाही. मिपाकरांनी मार्गदर्शन करावे.
काहीना मिल्कमेड्ची गोडी पुरेशी वाटते, त्यानी वरून साखर घालू नये. साधी साखर वरून घातल्यामुळे ती विरघळली की केकला छान जाळी पडते.
केकवर केलेली आयसिंगची फुले लोणी साखरेची आहेत. नेट्वर गुगलून त्याची क्रुती मिळाली.


वाचने
7089
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
एकदम खासच.
मस्त!
कॅलरीना घाबरणं सोडलं की हा
In reply to मस्त! by पैसा
=))
In reply to कॅलरीना घाबरणं सोडलं की हा by ५० फक्त
सही दिसतोय
छानच
आवडला. फ्रायपॅनमुळे कृती साधी
झकास्....एकदम tempting दिसतोय
आम्ची गवताळांची सोय केल्या
सही!!
हो
In reply to सही!! by सानिकास्वप्निल
खुपच सोप्प करुन सांगितलस
अरे ओ सांभा
मस्तच आहे केक. कोणी हा केक
अरे वा.. ओव्हन न वापरता कृती
एक मिनिट एक मिनिट
हो, सोपीच आहे ही क्रुती
In reply to एक मिनिट एक मिनिट by पियुशा
झकास
केक मस्त आहे
हे असल सुंदर सुंदर खायला