रात्र चांदणी
ही रात्र चांदणी वाटे कधी संपूच नाही
कोडे मिठीतले वाटे कधी सुटूच नाही
शब्द तुझे ऐकण्यास अधीर कान झाले
बोलण्याचे शब्द मात्र मुके कसे झाले?
मुक्या शब्दांचे गीत कधी झाले
ऐकतांना कळले नाही
आकाशी चंद्र असूनी चांदण्याही आहे
सागरास भेटण्या सरीता अतूर वाहे
वेगळी नव्हेत दोघे एकरूप झाली
कुठे ते कळले नाही
प्रीतीच्या फुलांनी आसमंत धूंद झाला
वार्यासही आवडूनी तो वाहवत गेला
तुझ्या असण्यात माझी मी तूझी झाले
कधी कळले नाही
- पाषाणभेद
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5378
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
कविता आवडली.
@शब्द तुझे ऐकण्यास अधीर कान
छान भावमग्न कविता.
खूप छान.
भावमग्न कविता.
छान,,
छान कविता!
या कवितेच्या ..
सर्वप्रथम वाचकांचे अन
प्रतिसाद संपादन न करता
In reply to सर्वप्रथम वाचकांचे अन by पाषाणभेद
नको
In reply to प्रतिसाद संपादन न करता by पाषाणभेद
नाइस .
दफोराव लगे रहो !
कविता आवडली ! ! !
खुप सुंदर