श्री. सौरभ वैशंपायन,
इतका सुंदर आणि माहितीपूर्ण लेख लिहिल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन!
पंढरीच्या वारीला जाणारे वारकरी जसे भेटल्यावर परस्परांची गळाभेट घेतात तशीच काहिशी माझ्या मनाची भावना झाली आहे....
प्रसंगी अखंडित वाचत जावे॥
आता समर्थांनी सांगितले ते शिरसावंद्य मानलेच पाहिजे ना?
क्या बात है! संपूर्णपणे सहमत!!
तुम्ही लेख खूपच सविस्तर लिहिला आहे त्यामुळे सगळ्याच पुस्तकांचा परामर्ष इथे प्रतिक्रियेत घेणे शक्य नाही. मला चरित्रं (आत्म वा दुसर्याने लिहिलेली) वाचायला आवडतात. केवळ नेतेच नव्हे तर समाजसुधारक, वैज्ञानिक, लेखक, कवी, चित्रकार, नट, गायक, समाजातील हर अंगात क्रियाशील असलेले लोक. तुमच्या लेखात उल्लेख नाही पण मला तर "आम्ही आणि आमचा बाप" हे पुस्तकही आवडलं.
ना सं इनामदारांच्या कादंबर्यात मंत्रावेगळा आणि शहेनशहा तर आवडलेच पण "झेप" ही त्रिंबकजी डेंगळ्यावरची, एका सामान्य परिस्थीतीतून वर आलेल्या माणसाची कथा ही आवडली.
मृत्यंजय बेजोड आहेच पण युगंधर इतकी नाही आवडली. मृत्युंजयाची सिक्वेल वाटली. इतकी की काही काही ठिकाणी तसेच (शब्दशः) वर्णन वाटले.
विज्ञानकथांमध्ये आपले जयंतराव मस्त आहेतच पण आयझॅक असिमॉव्हला विसरलात का? तो तर सर्व विज्ञानकथा लेखकांचा गुरु आहे की! आणि स्टीफन हॉकिंग? मला वाटतं स्वतः नारळीकरही ही दोन नांवे मान्य करतील!!:)
तुमच्या लेखाचा अजून एक फायदा हा की यातील बरीच पुस्तकं मी अजून वाचलेली नाहीत. तेंव्हा आता काय काय वाचायचं ते मनसुबे करायला सुरुवात केलीय!:)
बाय द वे,
’साद देती हिमशिखरे’ नावाचे चांगले पुस्तक मध्ये वाचनात आले होते पण लेखकाचे नावच लक्षात येत नाहिये.
या पुस्तकाचे अनुवादक आहेत डॉ. रामचंद्र जोशी. मूळ पुस्तक इंग्रजीत आहे, "टोवर्डस द सिल्व्हर क्रेस्टस ऑफ हिमालयाज" मूळ लेखक: जी. के. प्रधान.
अफलातून पुस्तक आहे...
अर्थशास्त्राच्या पुस्तकात दिलेले पानभर आकडे, त्यांच्यातले बदल आणि बदलांची कारणं हे अगदी, "मला हे दत्तगुरु दिसले" या आनंदाने वाचणारी मंडळी या जगात आहेत.
अहो, ते पण मनोरंजक असतं हो! जसं च ची भाषा यायला लागली की त्यातली दुर्बोधता नाहिशी होते तसंच अर्थशास्त्राची भाषा येऊ लागली की त्यात गोडी येते. त्यातले आलेख समजू लागतात. वेगवेगळे निर्देशांक एखाद्या कमनीय स्त्रीच्या मापांप्रमाणे मन वेधून घेतात!! :)
कुठल्याही शास्त्राचं तसंच आहे. सुरवातीला दुर्बोध वाटतं पण एकदा त्यात गम्य आलं की गोडी वाढते.
"ग्रंथ हेच गुरू" हे एकदा ठरल्यानंतर हाडामांसाच्या गुरुंची जरूरी भासत नाही आता...
असो. आपला लेख विस्त्रूत आहे, लिहिण्यासारखे बरेच आहे, पण पुन्हा केंव्हातरी....
असेच लिहीत रहा, आपला ब्लॉग असेल तर पत्ता द्या.
पुढील लेखनासाठी मन:पूर्वक शुभेच्छा!
आपला स्नेहार्थी,
पिवळा डांबिस
व्वा !!! आपले पुस्तक वाचनाचे वेड,आवड आणि काही वाचनीय पुस्तकावरील धावते भाष्य आवडले.
त्याबरोबर काही पुस्तकांची स्वतंत्र परिक्षणे येऊ द्या !!!
-दिलीप बिरुटे
तुझ्या ब्लॉगवर हा लेख वाचला होता, तेव्हाच मी अवाक झाले होते तुझं वाचन पाहून.. बरीच पुस्तकं वाचायची आहेत अजुन.. तुझा लेख, मेघनाचा पुस्तकांचा धागा नक्कीच उपयोगी पडतील..!
लेख आवडला.
अनुभवविश्व समृद्ध होण्याची क्रिया फारच सुंदर.
पुस्तकात वाचलेल्या कथाप्रसंगाचे, स्थळाचे वर्णन एक कृष्णधवल आठवण बनुन मेंदुत रहाते व जेव्हा कधी त्या वर्णन केलेल्या स्थळाला प्रत्यक्ष भेट द्यायचा योग येतो व एकदम ती आठवण रंगीत बनते. फारच सुखद अनुभव!
चांगल्या लेखाबद्दल धन्यवाद!
लेख आवडला. ज्यांनी तुम्हाला इतके दिले आहे त्यांच्याबद्दल तुम्हाला भरभरून लिहावेसे वाटणारच. हा "बर्डस आय व्ह्यू" आवडला. पुष्कळच वाचले आहे तुम्ही ! धावता आढावा छानच झाला आहे ; आता जमेल तसे एकेका पुस्तकाचा कंद उघडून दाखवा की :-)
अवांतर : तुमच्या "ब्याड म्यान" च्या यादीत हिटलर , स्टॅलीन नसल्याबद्दल थोडे आश्चर्य वाटले.
उत्तम लिहिणं जितकं कठिण असतं कदाचित त्याहुन उत्तम वाचणं कठिण असतं
१००% सहमत
बाकी काहि ठिकाणी जरा जास्त बारकावे आहेत.. जसं इतिहासातील व्यक्तींची नावं वगैरे ती लांबण टाळून लेख नेटका करता येईल असं वाटलं
पण विषय क्लास.. अजून येऊ द्या!
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
सौरभशेठ,
अतिशय सुंदर लेख. खूप मोठा आढावा घेतला आहेस. तुझा वाचन-व्यासंग पाहून मला तर स्वत:बद्दल न्यूनगण्डच वाटतो आहे. आपलं काय साला तुझ्याइतकं वाचन नाय बा! :)
असो,
अजूनही असेच उत्तमोत्तम लेख येऊ देत, ही विनंती...
तात्या.
अतिशय सुंदर लेख. खूप मोठा आढावा घेतला आहेस. तुझा वाचन-व्यासंग पाहून मला तर स्वत:बद्दल न्यूनगण्डच वाटतो आहे. आपलं काय साला तुझ्याइतकं वाचन नाय बा
१००% सहमत.
अगदी मनातलं बोललात तात्या !!
राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
सगळ्यांना ले़ आवडला हे बघुन खुप बरं वाटल.
शिवाय मला अजुन काहि नविन पुस्तके मिळाली(म्हणजे लिस्ट).
सध्या तरी मी
वॉल्ट डिस्ने: द अल्टिमेट फेन्टसी .
लोकमान्य ते महात्मा(खंड १) : सदानंद मोरे.
चकवाचांदणः मारुती चित्तमपल्ली.
आणि
हसरे दु:खः भा. द. खेर
हि ४ पुस्तके वाचतोय.
नमस्कार.
"मृत्यंजय बेजोड आहेच पण युगंधर इतकी नाही आवडली. मृत्युंजयाची सिक्वेल वाटली. इतकी की काही काही ठिकाणी तसेच (शब्दशः) वर्णन वाटले."
- हो बरोबर, म्हणुन कोणी सावंत वाचणार असेल तर मी सल्ला देतो - "आधी छावा-युगंधर्-मृत्युंजय या क्रमाने जा चुकुन उलटा क्रम झाला तर वाचन कंटाळ्वाणं बनेल!"
बा़कि, अजुन लेखक दिलेत म्हणुन धन्यवाद.
सौरभ,
काय जबरदस्त वाचन... मीही असाच चुकलेला फकीर... पण इतका मोठा आवाका नाही आणि गेल्या काही वर्षात तर बिलकुल नाही.. पण असंख्य पुस्तकं आणि लेखकांची नावं वाचून विलक्षण आनंद झाला. काही वेगळी पुस्तकं वाचणारं आणि आवडणारं कोणी भेटलं तर कसं वाटतं हे फार काळात अनुभवलं नव्हतं.
मला इतिहास आणि ऐतिहासिक कादंबर्यांचं वेड होतं. गेल्या वर्षी चक्क ऑक्सफर्ड ईंडियन हिस्टरी विकत घेऊन वाचलं.
पण अगदी इतिहास वाचणारे कमीच असतात. तुमचा इतिहासाचा अभ्यास पाहून थक्क झालो.
विजय देवधरांचं डेझर्टर पाहून झकास वाटलं...गुंथर बान्हमन डेझर्टर ... अनेक पारायणं झाली असतील...
एकदा अतिशय अचानकपणे खुद्द विजय देवधर पुण्याच्या आय आय टी एम या हवामान संशोधन संस्थेत भेटले आणि इतका आनंद झाला की त्यांच्याशी काय बोलावं हेच सुचेना... त्यांचं अजून एक चांगलं पुस्तक म्हणजे साहसांच्या जगात.
तसंच शहेनशहा, राऊ आणि पिडा काकांनी उल्लेख केलेली 'झेप' उत्तम आहे. त्रिंबकजीची दुर्दैवी अखेर फार चुटपुट लावून जाते.
दुनियादारी वाचून सुशि खुप वाचले पण दुनियादारी ची सर नाही.पुढे एस पी मध्ये मुद्दाम उदय विहार मध्ये कटिंग चहा साठी जात होतो :)
गोनीदांची पुस्तकं वेड्यासारखी वाचली होती... काही लिहाल का? 'माचीवरला बुधा' हे माझं सर्वात आवडतं .. इतकं लहानसं पुस्तक असं काही मनात घर करून राहतं...
दुसरं एक विशेष आवडलेलं -गंगाधर गाडगीळांचं लोकमान्य टिळकांवरची चरित्रवजा कादंबरी -- 'दुर्दम्य'.
तुमचं वाचन बघून न्यूनगंड नाही वाटला तर उलट काय काय वाचायचं आहे हे समजलं.
तुम्ही अजून लिहा यावर आणि जमल्यास एक एक लेखक घेऊन लिहा... म्हणजे मिपाकरांना त्यांची वैशिष्ट्यं समजतील ... तुमची शैलीही छान आहे.. आम्हाला नवीन आणि वेगवेगळी पुस्तकं कळतील... काही विशेष वाटलं तर एकेका पुस्तकाचं रसग्रहण लिहाल का? हा तुमचा लेख मोठा आहे पण ही तुमच्या पुढच्या लिखाणाची सुरुवात असावी अशी इच्छा.
या मस्त लिखाणासाठी धन्यवाद!
प्रतिक्रिया
सुंदर लेख!
पुस्तक वाचनाचा प्रवास मोठा आहे
तुझ्या
लेख आवडला
लेख आवडला !
सहमत
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
असेच
लेख
सौरभशेठ, अत
अतिशय
धन्यवाद
श्री पिवळा डांबिस
चुकलेला फकीर