Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by अविनाशकुलकर्णी on Fri, 11/30/2012 - 22:19
तुम्ही चंगळ वादी आहात का? ब्रांडेड कपडे...महागडे आफ्टर शेव्ह ..शूज व अक्सेअसरिज .. उंची हॉटेल मध्ये पार्ट्या ..मोल मध्ये खरेदी ...इत्यादी..इत्यादी .. चंगळ वाद पूर्वी आमच्या लहान पणी पण होता पण स्वरूप निराळे होते .. केळीचे शिकरण व मटार उसळीचा बेत म्हणजे चंगळ ..
  • Log in or register to post comments
  • 17669 views

प्रतिक्रिया

Submitted by श्री गावसेना प्रमुख on Tue, 12/04/2012 - 10:04

In reply to घंटा! by आनंदी गोपाळ

Permalink

गरीबांच्या गरीबीसाठी मी

गरीबांच्या गरीबीसाठी मी जबाबदार नाही. मी त्यांना गरीब केलेले नाही.
मी कुठे म्हनतोय की तुम्ही जबाबदार आहात
त्याला इमोशनली न घेता, नीट समजून घ्या
इथे भावनेचा काही एक संबध नाहीये, मुंबैतले गरीब म्हनजेच सगळे गरीब नाही होत महाराष्ट्रात २/३ गरीब जनता राहते,जी की १००००/२०००० हजाराच्या कर्जा मुळे आत्महत्या करते (आता राहीले मुंबैतले गरीब त्यांना उद्याची चिंता असते का?)त्यांच्या बद्दल सरकारला काहीही सहानभुती नाहीये,ते लोक ४०/५० रुपये रोजाने काम करतात त्यांच सांगतोय मी ,नाही की मुंबइ मधले गरीब्,तुम्ही गरीबीच्या व्याख्येत महाराष्ट्रातल्या ग्रामिण भागातले गरीब ही आणा ही विंनती
माझ्या सर्व कर्मचार्‍यांना १ पगार बोनस, २ किलो फराळाचे पदार्थ व सुमारे २०० रुपये किमतीचे फटाके, जे होलसेल मधून आणल्यामुळे स्वस्त मिळाले, व सगळ्या स्टाफची मुले ५-१० वयोगटातली असल्याने भरपूर झाले होते
आमच्या ग्रामिण गरीबांना चंगळ परवडत नाहीहो कशाच फराळ कशाचे फटाके एक करंजी मोलाचीहीच त्यांची दिवाळी त्यांच्याकडे बघन आपल कर्तव्य नाही का जाता जाता हे ही बघा आणी तुम्हाला माझा प्रतीसाद पटत नसल्यास जाउद्या.
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदी गोपाळ on Sun, 12/09/2012 - 12:07

In reply to गरीबांच्या गरीबीसाठी मी by श्री गावसेना प्रमुख

Permalink

जाऊ दिले आहे.

जाऊ दिले आहे. कारण तुम्ही झोडग्याचे "ग्रामिण" दिसता. समजावून सांगून समजले नाही. करंजा गोळा करून इकडची टोपी तिकडे घालण्यापेक्षा स्वतःच्या खिशातून मी काय केले, ते लिहिले आहे तिथे.
  • Log in or register to post comments

Submitted by श्री गावसेना प्रमुख on Sun, 12/09/2012 - 15:52

In reply to जाऊ दिले आहे. by आनंदी गोपाळ

Permalink

स्वताच्या हाताखालच्या लोकांना

स्वताच्या हाताखालच्या लोकांना दोन घास दिले म्हनजे फार मोठे उपकार केल्याच्या थाटात बोलु नका,ते तर प्रत्येक मालक करतो (करणार नाही तर काय करतील कामगार पळुन नाही का जाणार)एक तर ते लोक तुमच काम करतात म्हणुन दुसर्याच करुन दाखवा म्हणजे मिळवल. आणी एक लक्षात ठेवा वैयक्तीक पातळीवर नका उतरु, कोणी ग्रामीण असला तर तो गावंढळ आणीक शहरातले हुशार हे तुमच तत्वज्ञान तुमच्याकडेच ठेवा फायदा होईल ( तुमच तत्वज्ञान हे रिकाम्या खोक्यासारख आहे ) Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Sat, 12/01/2012 - 09:36

Permalink

अ कू कडून अपेक्षित धागा

अ कू कडून अपेक्षित धागा योग्य ठिकाणी मारलेले आहेच असो
  • Log in or register to post comments

Submitted by इरसाल on Sat, 12/01/2012 - 09:50

Permalink

चंगळवादाची

व्याख्या व्यक्तिसापेक्ष आहे. १० पैश्याची लिम्लेट्ची गोळी ही अत्युच्च खरेदीची परमावधी असणार्‍या मुलाला कॅडबरी चॉकलेट ही चंगळ खाटीकाकडुन हमेशा "पोटला" खरेदी करणार्‍याला वाहनाच्या धडकेने मेलेला बकरा/कोंबडी ही चंगळ ३००० रु. पगार असताना रस्त्यावर हातगाडीवर बर्गर खाणे व तोच बर्गर मॅक्डीमधे खाणे ही चंगळ रोज घरी भांडी घासणार्‍याला बायकोने म्हणणे "राहु द्या आज...थंड पाण्याने नको, पाणी गरम करुन देते आज " ही चंगळ. हॅच्बॅक वाल्याला सेडान, सेडान वाल्याला एस्युव्ही चंगळ.... आहे अजुन बरेच मग बघु
  • Log in or register to post comments

Submitted by खबो जाप on Mon, 12/03/2012 - 16:12

In reply to चंगळवादाची by इरसाल

Permalink

रोज घरी भांडी घासणार्‍याला

रोज घरी भांडी घासणार्‍याला बायकोने म्हणणे "राहु द्या आज...थंड पाण्याने नको, पाणी गरम करुन देते आज " ही चंगळ. आगागा .... जबराट ....एकदम इरसाल खटक्यावर बोट जाग्यावर पलटी ........ शून्य ठार झिरो जखमी
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Sat, 12/01/2012 - 10:42

Permalink

ह्या ह्या ह्या!

आपल्यासाठी तर बुवा अकुंचे धागे आणि त्यावरच्या प्रतिक्रिया वाचणे ही चंगळ आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by तिमा on Sat, 12/01/2012 - 10:43

Permalink

चंगळवादी?

आम्ही चंगळवादी नसून मंगळवादी आहोत. उद्या मंगळावर वसाहती झाल्या तर जाऊन रहायचा बेत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Sat, 12/01/2012 - 11:04

Permalink

च्यायला !

अविनाशकाकांनी चक्क चक्क पाचोळी धागा काढला आहे. चंगळ आहे बॉ मिपाकरांची.
  • Log in or register to post comments

Submitted by अविनाशकुलकर्णी on Sat, 12/01/2012 - 12:58

Permalink

हे पण वाचा,,,,,,,,,,,,,,,

हे पण वाचा,,,,,,,,,,,,,,, http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=252815:2012-09-28-20-34-07&catid=104:2009-08-05-07-53-42&Itemid=117
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Sun, 12/02/2012 - 14:19

Permalink

रोजगार

चंगळवादाचे प्रतीक असलेली मॉल संस्कृती शहरांत फोफावल्यामुळे बर्‍याच अकुशल लोकांना तेथे कामे मिळत आहेत. उदाहरणार्थ मॉलमध्ये झाडू मारण्याचे दिवसाला २०० रु मिळतात असे ऐकले आहे. ही अतिशय चांगली गोष्ट झालेली आहे. (घरोघरी कामाला किंवा छोट्या कारखान्यांमध्ये काम करायला माणसे मिळत नाहीत* अशी ओरड ऐकू येत आहे त्या अर्थी तिथे चांगले पैसे मिळतात हे खरे असावे). *माणसे मिळत नाहीत याचा अर्थ ५० रु रोजावर मिळत नाहीत असा आहे. कामगारांना चांगले पैसे मिळणे ही चांगलीच गोष्ट आहे. चंगळवाद झिंदाबाद.
  • Log in or register to post comments

Submitted by दादा कोंडके on Sun, 12/02/2012 - 15:47

In reply to रोजगार by नितिन थत्ते

Permalink

-१

*माणसे मिळत नाहीत याचा अर्थ ५० रु रोजावर मिळत नाहीत असा आहे. कामगारांना चांगले पैसे मिळणे ही चांगलीच गोष्ट आहे.
हे सरसकट खरं नाही. उलटपक्षी आपल्याकडे श्रमप्रतिष्ठा कमी (झाली) आहे. लोकांना कमी श्रमात पैसे (इझी मनी) मिळवून छान-छौकीत उडवावेसे वाटतात. -आमच्या घरी काम करायला *(मदत करायला)येणार्‍या बाईचा मुलगा जास्त श्रमाचं काम असेल तर घरी येउन काम करायचा. नंतर तो येइनासा झाला कारण दोन तास काम करण्यापेक्षा निवडणुक/मोर्चे वगैरेत भाग घेउन त्याला जास्त पैसे मिळू लागले. वर पुडी-बाटलीची 'सोय' वेगळीच. -गावाकडे मजूर मिळेनात कारण तरूण मंडळींना नाक्या-नाक्यावर दिवसभर पडीक रहायचं असतं आणि बाकिच्या लोकांना 'नरेगा'वर जाउन फक्त एक सही करून मुकादमाचं कमिशन देण परवडतं. *त्यांना 'कामवाली' किंवा 'मोलकरीण' म्हणावसं वाटत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Mon, 12/03/2012 - 17:17

In reply to -१ by दादा कोंडके

Permalink

-२ सहमत.

-२ सहमत. पण येवढा विचार कोनी करायचा नसतो. कोकणासारख्या ग्रामीण भागातही प्रत्येकाला घरबसल्या किंवा ऑफिसात पंख्याखाली बसून काम करायला हवे श्रमाचे काम करायला नको.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Mon, 12/03/2012 - 17:29

In reply to -२ सहमत. by llपुण्याचे पेशवेll

Permalink

पण येवढा विचार कोनी करायचा

पण येवढा विचार कोनी करायचा नसतो. कोकणासारख्या ग्रामीण भागातही प्रत्येकाला घरबसल्या किंवा ऑफिसात पंख्याखाली बसून काम करायला हवे श्रमाचे काम करायला नको.
एसीत, छान छान ,गुबगुबीत खुर्चीवर बसुन अशा प्रतिक्रिया द्यायला लाज कशी वाटत नाही ? आज एक मिपाकर म्हणून अशी प्रतिक्रिया पाहून शरम वाटली. संतप्त आणि शरमिंदा परा भयंकर
  • Log in or register to post comments

Submitted by पुण्याचे वटवाघूळ on गुरुवार, 12/06/2012 - 09:26

In reply to रोजगार by नितिन थत्ते

Permalink

गर्व से कहो हम चंगळवादी है

चंगळवाद झिंदाबाद.
गर्व से कहो हम चंगळवादी है :)
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Sun, 12/02/2012 - 17:22

Permalink

एखादुयाची गरज ही माझी चंगळ असु

एखाद्याची गरज ही माझी चंगळ असु शकते. त्याच्या लेखी मी चंगळवादी. तद्वत माझी गरज ही तिसर्‍या कुणाची चंगळ असु शकते. त्या दृष्टीनं मी गरजु. Image removed. सर्व चित्रे जालावरुन साभार.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Sun, 12/02/2012 - 17:59

In reply to एखादुयाची गरज ही माझी चंगळ असु by गणपा

Permalink

धन्यु रे गंपा

तुझ्या प्रतिसादामुळे ह्याच विषयाशी संबधीत असा श्री. उत्तम कांबळे ह्यांचा 'पायासूप' हा लेख आठवला. नक्की वाचावा असाच हा लेख आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by टिवटिव on Sun, 12/02/2012 - 20:17

In reply to धन्यु रे गंपा by परिकथेतील राजकुमार

Permalink

धन्यवाद परा...

सुंदर लेख...
  • Log in or register to post comments

Submitted by किसन शिंदे on Sun, 12/02/2012 - 17:41

Permalink

अकु काका, कुठे गेला होतात

अकु काका, कुठे गेला होतात इतके दिवस??
  • Log in or register to post comments

Submitted by अविनाशकुलकर्णी on Sun, 12/02/2012 - 18:56

Permalink

वस्तुंच्या बाबत च्या चंगळ

वस्तुंच्या बाबत च्या चंगळ वादाचा विचार तर झालाच.... पण वैचारिक चंगळ पण मस्त पैकी फोफावला आहेच.. तोरेंत वरून डाऊन लोड केलेले एके काळी अश्लील व असभ्य वाटणे सिनेमे व पोर्ण क्लिपा...व साईट्स तसेच पिवळे साहित्य ...व्यक्ती स्वातंत्र्य व अभिव्यक्ती स्वातंत्र्य बद्दलची मते .. हा प्रकार पण चंगळ वादात मोडतो का?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रदीप on Sun, 12/02/2012 - 20:58

In reply to वस्तुंच्या बाबत च्या चंगळ by अविनाशकुलकर्णी

Permalink

इतरही काही

अनेक गरीबांच्या मुलांना कॉम्प्युटर वगैरे काही दिसतही नाही, मग ते वापरणे तर दूरच राहो. अशा परिस्थितीत, कॉम्प्युटर/ ल्यॅपटॉप/ नोटबुक/ स्मार्टपॅड/स्मार्टफोन इत्यादी काही वापरून, इंटरनेटला ते जोडून, कुठल्यातरी दूरस्थ सर्व्हरवर असलेल्या ह्या मिसळपाव नामक संकेतस्थळाला भेट देऊन, त्यावर साडेसात ओळींचा का होईना धागा काढणे, इतर काहीबाही वाचणे, प्रतिक्रिया वाचणे, देणे-- हे सगळेही चंगळीचेच म्हणावयास हवे, नाही अविनाश?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रदीप on Sun, 12/02/2012 - 21:07

In reply to इतरही काही by प्रदीप

Permalink

आणि ..

इथे लिहीतांना 'चंगळ वादी', 'मोल मध्ये', 'चंगळ वाद', 'लहान पणी', 'बाबत च्या', 'मस्त पैकी' अशा भिकारXX तर्‍हेने विनाकारण अधेमधे २~ २ बायटींचा जागा सर्व्हरवर फुकट घालवणे हाही चंगळीचाच प्रकार. आमच्या लहानपणी मराठीतून 'चंगळवादी', 'मॉलमध्ये', 'चंगळवाद', 'लहानपणी', 'बाबतच्या', 'मस्तपैकी' असे मराठीतून लिहीणे म्हणजेच चंगळ होती!
  • Log in or register to post comments

Submitted by अविनाशकुलकर्णी on Sun, 12/02/2012 - 18:57

Permalink

वाटणे=वाटणारे

वाटणे=वाटणारे
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Mon, 12/03/2012 - 08:17

Permalink

@तुम्ही चंगळ वादी आहात का?>>>

@तुम्ही चंगळ वादी आहात का?>>> नाय, आंम्ही चंबळवादि आहोत. :-b =))
  • Log in or register to post comments

Submitted by खटासि खट on Mon, 12/03/2012 - 08:56

Permalink

शेजारच्या घरात नुकतीच डेथ

शेजारच्या घरात नुकतीच डेथ झाली आहे हे माहीत असतानाही हॅपीवाल्या बड्डेचा इव्हेन्ट स्पीकर वरून चालू ठेवणे याला चंगळवाद म्हणता येईल का ?
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Mon, 12/03/2012 - 10:28

In reply to शेजारच्या घरात नुकतीच डेथ by खटासि खट

Permalink

नाही.

त्याला भिकारचोटपणा असे म्हणतात.
  • Log in or register to post comments

Submitted by खटासि खट on Mon, 12/03/2012 - 19:35

In reply to नाही. by परिकथेतील राजकुमार

Permalink

आपल्याबद्दलचा आदर वाढीस लागला

आपल्याबद्दलचा आदर वाढीस लागला आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by आदिजोशी on Tue, 12/04/2012 - 14:08

In reply to नाही. by परिकथेतील राजकुमार

Permalink

.

संयमित प्रतिसादाबद्दल निषेध.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Tue, 12/04/2012 - 11:14

Permalink

हौ, हम है चंगलवादी.....तो???

हौ, हम है चंगलवादी.....तो??? का *&^ना है??
  • Log in or register to post comments

Submitted by पुण्याचे वटवाघूळ on गुरुवार, 12/06/2012 - 09:24

Permalink

अकुंचे मत काय?

पण चंगळवादाविषयी इतकी चर्चा इतरांनी केली पण त्यावर चर्चा सुरू करणारे अकु यांचे मत काय हे कळलेच नाही :(
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on गुरुवार, 12/06/2012 - 14:23

Permalink

मी स्वतः लई चंगळ करते. पण

मी स्वतः लई चंगळ करते. पण दुसर्‍या कुणी तशीच चंगळ केली तर त्याला मोठ्ठे लेक्चर मारते! ;) -समाजसुधारक माउ
  • Log in or register to post comments

Submitted by ह भ प on गुरुवार, 12/06/2012 - 14:35

Permalink

आमी..

आमी टंगळवादी+मंगळ्वादी हावोत.. फक्त मंगळावर जाऊन टंगळ करावी अशी मनिषा आहे..
  • Log in or register to post comments

Submitted by चिगो on गुरुवार, 12/06/2012 - 16:34

Permalink

आहे चंगळवादी..

आहे चंगळवादी.. काय कराल ? (नागपूरी वाक्ये मनातच ठेवतो.) बाकी गरीबांच्या गरीबीबद्दल न बोललेलेच बरे.. त्यासाठी स्वतः श्रीमंत, एसीधारी विचारजंत व्हावे लागते. अतएव, आमचा पास..
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com