Skip to main content

तुम्ही चंगळ वादी आहात का?

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 30/11/2012 22:19 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्ही चंगळ वादी आहात का? ब्रांडेड कपडे...महागडे आफ्टर शेव्ह ..शूज व अक्सेअसरिज .. उंची हॉटेल मध्ये पार्ट्या ..मोल मध्ये खरेदी ...इत्यादी..इत्यादी .. चंगळ वाद पूर्वी आमच्या लहान पणी पण होता पण स्वरूप निराळे होते .. केळीचे शिकरण व मटार उसळीचा बेत म्हणजे चंगळ ..

वाचने 17726
प्रतिक्रिया 83

प्रतिक्रिया

In reply to by अविनाशकुलकर्णी

अनेक गरीबांच्या मुलांना कॉम्प्युटर वगैरे काही दिसतही नाही, मग ते वापरणे तर दूरच राहो. अशा परिस्थितीत, कॉम्प्युटर/ ल्यॅपटॉप/ नोटबुक/ स्मार्टपॅड/स्मार्टफोन इत्यादी काही वापरून, इंटरनेटला ते जोडून, कुठल्यातरी दूरस्थ सर्व्हरवर असलेल्या ह्या मिसळपाव नामक संकेतस्थळाला भेट देऊन, त्यावर साडेसात ओळींचा का होईना धागा काढणे, इतर काहीबाही वाचणे, प्रतिक्रिया वाचणे, देणे-- हे सगळेही चंगळीचेच म्हणावयास हवे, नाही अविनाश?

In reply to by प्रदीप

इथे लिहीतांना 'चंगळ वादी', 'मोल मध्ये', 'चंगळ वाद', 'लहान पणी', 'बाबत च्या', 'मस्त पैकी' अशा भिकारXX तर्‍हेने विनाकारण अधेमधे २~ २ बायटींचा जागा सर्व्हरवर फुकट घालवणे हाही चंगळीचाच प्रकार. आमच्या लहानपणी मराठीतून 'चंगळवादी', 'मॉलमध्ये', 'चंगळवाद', 'लहानपणी', 'बाबतच्या', 'मस्तपैकी' असे मराठीतून लिहीणे म्हणजेच चंगळ होती!

शेजारच्या घरात नुकतीच डेथ झाली आहे हे माहीत असतानाही हॅपीवाल्या बड्डेचा इव्हेन्ट स्पीकर वरून चालू ठेवणे याला चंगळवाद म्हणता येईल का ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

संयमित प्रतिसादाबद्दल निषेध.

पण चंगळवादाविषयी इतकी चर्चा इतरांनी केली पण त्यावर चर्चा सुरू करणारे अकु यांचे मत काय हे कळलेच नाही :(

मी स्वतः लई चंगळ करते. पण दुसर्‍या कुणी तशीच चंगळ केली तर त्याला मोठ्ठे लेक्चर मारते! ;) -समाजसुधारक माउ

आमी टंगळवादी+मंगळ्वादी हावोत.. फक्त मंगळावर जाऊन टंगळ करावी अशी मनिषा आहे..

आहे चंगळवादी.. काय कराल ? (नागपूरी वाक्ये मनातच ठेवतो.) बाकी गरीबांच्या गरीबीबद्दल न बोललेलेच बरे.. त्यासाठी स्वतः श्रीमंत, एसीधारी विचारजंत व्हावे लागते. अतएव, आमचा पास..