✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

फळा

ल — लीलाधर, Sun, 11/06/2011 - 19:20
मी एक फळा... प्रत्येकाच्या आयुष्यात रंगांची ऊधळण करणारा........ रंग माझा काळा नांव माझे फळा, घर माझी शाळा, जीथे पिकतो उद्याच्या सुजाण नागरीकांचा मळा, हेडमास्तर इथले मालक विद्यार्थी त्यांचे बालक, आई वडीलांनंतर हेच आमचे पालक, ह्याच फळ्यावर गीरवतो अनेक विषयांचे धडे, त्याचमुळे जीवनात प्रत्येकाचे पाऊल पडते पुढे.... असा मी असलो जरी काळा तरी जीथे पिकतो उद्याच्या सुजाण नागरीकांचा मळा सुजाण नागरीकांचा मळा.......

प्रतिक्रिया द्या
12956 वाचन

💬 प्रतिसाद (38)

मंग काय! ठोका हो! ठोका हो!!

पाषाणभेद
Mon, 11/07/2011 - 02:15 नवीन
मंग काय! ठोका हो! ठोका हो!! ठोका हो!!! इथंच फळ्यासाठी खिळा!
  • Log in or register to post comments

खिळा

मेघवेडा
Tue, 11/08/2011 - 15:20 नवीन
हा हा.. पाभे, तुम्ही मागं एकदा 'बाई इथंच ठोकू का खिळा' नामक धमाल युगुलगीत लिहिलं होतं ते आठवलं! होऊन जाऊ द्या आणखी एखादं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

छान...आमचा एक मास्तुर्‍या

मदनबाण
Mon, 11/07/2011 - 11:07 नवीन
छान... आमचा एक मास्तुर्‍या डस्टर फेकुनशान मारायचा... त्याची आठवण आली. ;)
  • Log in or register to post comments

नाही म्हटल,

किसन शिंदे
Mon, 11/07/2011 - 11:26 नवीन
शाळा कुठली?? मो.ह. विद्यालय का?? सुर्यवंशी नावाचे आमचे एक सर सुध्दा हाच प्रकार करायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

व्हय...! तू मो.ह. चा का रे ?

मदनबाण
Mon, 11/07/2011 - 11:30 नवीन
व्हय...! तू मो.ह. चा का रे ? इथले बरेच जण मो.ह चे आहेत रे ! :) सुर्यवंशी नावाचे आमचे एक सर सुध्दा हाच प्रकार करायचे. आम्हाला पीटी ला होते रे.., कंची ब्यॅच तुझी ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

पहा मास्तर किती दुरदर्शी होते

यकु
Mon, 11/07/2011 - 23:13 नवीन
पहा मास्तर किती दुरदर्शी होते ते.. घ्या आता एकमेकांची गळाभेट!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

धन्यवाद.....

लीलाधर
Mon, 11/07/2011 - 11:38 नवीन
धन्यवाद..... छान... आमचा एक मास्तुर्‍या डस्टर फेकुनशान मारायचा... त्याची आठवण आली. अरे आता गेले ते दिवस आणि राहील्या त्या फक्त आणि फक्त आठवणी........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

अरे आता गेले ते दिवस आणि

मदनबाण
Mon, 11/07/2011 - 11:55 नवीन
अरे आता गेले ते दिवस आणि राहील्या त्या फक्त आणि फक्त आठवणी........ खरंय...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लीलाधर

राहिल्या त्या आठवणी???!!

गवि
Mon, 11/07/2011 - 12:26 नवीन
आमचे इंग्लिशचे सर तर ऐशा आवेशाने डस्टर मारायचे की तो खरंच टाळक्यात बरोबर जागी बसला असता तर तत्क्षणी "गेल्या त्या आठवणी" अशी फिल्मी कंडिशनही होऊ शकली असती..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

आमचं वर्गमास्तर व्हतं ते.

किसन शिंदे
Mon, 11/07/2011 - 11:34 नवीन
:bigsmile: आमचं वर्गमास्तर व्हतं ते. :) २००० ची बॅच.
  • Log in or register to post comments

आमचं वर्गमास्तर व्हतं ते.

मदनबाण
Mon, 11/07/2011 - 12:06 नवीन
आमचं वर्गमास्तर व्हतं ते. २००० ची बॅच. अच्छा असं हाय काय ! ;) म्या ९७ ला बाहेर पडलो. चोपडे मास्तर होते का रे तुला ? जाम मारायचे !!! आमचा तळ्या ( माझा मित्र तळेगावकरला आम्ही तळ्या याच नावाने हाक मारायचो.) मास्तुर्‍याचं फिक्स गिर्‍हाईक होत. ! लयं मारं खायचा... ;) एकदा मास्तर शिकवत होते... त्यांचा चेहरा फळ्याकडे होता... हा पठ्या बाजुलाच बसलेला होता, मास्तुर्‍याच लक्ष नाय हे पाहताच त्याने टेबलावर ठेवलेल्या पुस्तकाची पाने उलटली... मास्तर थोड्या वेळाने वळले. परत पुस्तकाचे पान त्यांनी त्यांना हवे होते तिथे केले, परत फळ्याकडे चेहरा करुन लिहायला लागले,तळ्या गप्प बसेल कसा ? हळुच आला आणि परत पाने पलटली !... असे २-३ वेळा झाले ! मास्तुर्‍या वैतागला ! पंखा चालु नाही तर पाने पलटतात कशी ? पुन्हा तसेच करताना तळ्या फसला ! मगं काय चांगला बुकलुन काढला त्याला ! ;) गेले ते दिवस...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

चोपडे मास्तर होते का रे तुला

किसन शिंदे
Mon, 11/07/2011 - 12:19 नवीन
चोपडे मास्तर होते का रे तुला ? होते तर!! बीजगणित शिकवायला, पण त्यांच्या तासाला कोणत्याही विद्यार्थ्याने वर्गात अभ्यास केल्याचं स्मरत नाही. एवढा गोंधळ असायचा कि ते काय शिकवायचे हेच आम्हाला कळायचं नाही. मित्राचा किस्सा लय भारीये, पण आमच्या बॅचला त्यांच्याकडून मार असा कोणी खाल्लाच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

होते तर!! बीजगणित शिकवायला,

मदनबाण
Mon, 11/07/2011 - 12:31 नवीन
होते तर!! बीजगणित शिकवायला, पण त्यांच्या तासाला कोणत्याही विद्यार्थ्याने वर्गात अभ्यास केल्याचं स्मरत नाही. एवढा गोंधळ असायचा कि ते काय शिकवायचे हेच आम्हाला कळायचं नाही. हॅहॅहॅ म्हणुनच माझं गणित कच्च राहिल रे. कळ्ळ आता ! ;) गोंधळ घालण्यासाठीच त्यांचा तास होता ! ;) त्यात शाळेच्या मागे मशिद का दफन भूमी आहे,,,,बर्‍याच वेळा त्यांचा तास चालु असताना भोंग्यातुन बांगेचा आवाज यायचा... त्या आवाजाला ठसन देण्यासाठी शिवसेनेच्या शाखेतुन शिवाजी महाराजांचा पोवाडा लावला जायचा ! इकडुन अल्ला ची बांग आणि तर तिकडुन महाराजांनी अफजल खानाचे पोट फाडुन कोथळा बाहेर काढला इ. ;) मग काय मागे ती धमाल आणि वर्गात ही धमाल ! थोडक्यात फुल टु धमाल ! ;) (धाग्याचा खव केल्या बद्धल क्षमा मागत आहे.)
  • Log in or register to post comments

त्यात शाळेच्या मागे मशिद का

किसन शिंदे
Mon, 11/07/2011 - 12:40 नवीन
त्यात शाळेच्या मागे मशिद का दफन भूमी आहे,,,,बर्‍याच वेळा त्यांचा तास चालु असताना भोंग्यातुन बांगेचा आवाज यायचा... त्या आवाजाला ठसन देण्यासाठी शिवसेनेच्या शाखेतुन शिवाजी महाराजांचा पोवाडा लावला जायचा ! इकडुन अल्ला ची बांग आणि तर तिकडुन महाराजांनी अफजल खानाचे पोट फाडुन कोथळा बाहेर काढला इ. मग काय मागे ती धमाल आणि वर्गात ही धमाल ! हा हा हा..हॅहॅहॅ :D :D :D आठवतयं रे, हसून हसून पुरेवाट व्हायची अगदी. :bigsmile: मैदानाच्या मागच्या बाजुला असलेल्या लाकडाच्या वखारीत जोराने टोलवलेला चेंडू जावून पडायचा आणी मग त्या वखारवाल्याचं आणी क्रिकेट खेळणार्‍या पोरांच हे तुफान हुज्जत घालणं चालू व्हायचं ते अगदी मधली सुट्टी संपेपर्यंत. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

फळा ते चेंडुफळी - धाग्याचा

५० फक्त
Mon, 11/07/2011 - 19:08 नवीन
फळा ते चेंडुफळी - धाग्याचा प्रवास छान चालु आहे.
  • Log in or register to post comments

जीथे पिकतो उद्याच्या सुजाण

अत्रुप्त आत्मा
Tue, 11/08/2011 - 11:30 नवीन
जीथे पिकतो उद्याच्या सुजाण नागरीकांचा मळा सुजाण नागरीकांचा मळा...........:-D याच्या नंतर आंम्हाला प्रती वाक्य भळा भळा हसू आले... ;-) या वरुन आंम्हला खडू,डस्टर,ब्लॉक-बस्टर :-p अश्या फसफसुन वहात्या प्रतिभेच्या कविता सुचु लागल्या आहेत...
  • Log in or register to post comments

ओ भटजी,

वपाडाव
Fri, 03/02/2012 - 18:47 नवीन
रंगांची उधळण अरे करतो आहे फळा... का त्यांना बघुन तु आत्म्या काढतो आहेस गळा... वाहते करुयात पाण्याला काढुन तुंबलेला बोळा... नवकव्यांची साथ जरा देत जा तु बाळा... डोंगराला आग लागली पळा पळा पळा... - (आद्यनवविडंबक) वपाडाव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

वप्याच्या अंगी नाना

मोहनराव
Fri, 03/02/2012 - 20:03 नवीन
वप्याच्या अंगी नाना कळा.. आद्यनवविडंबक म्हणुन काढतोय गळा!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

तुमच्या कशास वाहू लागल्या हो

अत्रुप्त आत्मा
Fri, 03/02/2012 - 22:22 नवीन
तुमच्या कशास वाहू लागल्या हो भावना या भळाभळा गरोदर झाले दुसरेच कुणी आणी तुमच्या पोटी उठल्या कळा आंम्ही त्यांनाच चावतो जे,पिकवतात नुसताच शब्दांचा मळा तुंम्ही व्यर्थ यात पडू नका... जा तिकडे लव्-कर पळा :-p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

काय योगायोग आहे!

अन्नू
Fri, 03/02/2012 - 19:12 नवीन
आत्ताच मी शाळा हा चित्रपट पाहीला आणि आत्ताच हा शाळेचा फळा इथे दिसला! :)
  • Log in or register to post comments

चचा, कुठे गेलास रे?अजून एक

प्रचेतस
Mon, 04/09/2012 - 15:57 नवीन
चचा, कुठे गेलास रे? अजून एक कविता येऊ देत.
  • Log in or register to post comments

+१

मोदक
Fri, 04/27/2012 - 08:34 नवीन
+१ :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

शाळा नुकत्याच सुरु झाल्याने

प्रचेतस
Mon, 06/18/2012 - 09:36 नवीन
शाळा नुकत्याच सुरु झाल्याने 'फळा' सारखी वास्तवदर्शी कविता पुन्हा एकदा वर काढत आहोत. :)
  • Log in or register to post comments

व्वा.. झकास रे चचा..

मोदक
गुरुवार, 06/21/2012 - 02:35 नवीन
व्वा.. झकास रे चचा.. :-D
  • Log in or register to post comments

बारसं झालेलं दिसतंय परत एकदा.

प्रचेतस
Wed, 07/04/2012 - 10:50 नवीन
बारसं झालेलं दिसतंय परत एकदा.
  • Log in or register to post comments

घुगर्र्या वाटा हो परत एकदा :)

लीलाधर
Wed, 07/04/2012 - 10:57 नवीन
घुगर्र्या वाटा हो परत एकदा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

बारश्याच्या शुभेच्छा!बाकी ही

प्यारे१
Wed, 07/04/2012 - 11:05 नवीन
बारश्याच्या शुभेच्छा! बाकी ही लीला कोण?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लीलाधर

बाकी ही लीला कोण? >>> ही लीला

अत्रुप्त आत्मा
Wed, 07/04/2012 - 12:58 नवीन
बाकी ही लीला कोण? >>> ही लीला प्रभूची हो प्यारे काका, तुम्ही आध्यात्मिक आहात,आम्च्या सारख्या इहलौकिकांनी या ऊप्पर आणखी काय सांगावे..? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

हा धागा मजकूर व प्रतिसादांसह

सस्नेह
Mon, 12/03/2012 - 10:44 नवीन
हा धागा मजकूर व प्रतिसादांसह वाचण्यास मिळेल का ?
  • Log in or register to post comments

प्रतिसाद वाचण्यास मिळेल का?

मोदक
Mon, 12/03/2012 - 11:43 नवीन
धाग्याचा मजकूर व प्रतिसादांवर तुमचा प्रतिसाद वाचण्यास मिळेल का? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

सेंचुरी बघायला मिळेल का?

अभ्या..
Mon, 12/03/2012 - 12:29 नवीन
मोदकराव आलेत मग आम्हाला सेंचुरी बघायला मिळेल का? ;)
  • Log in or register to post comments

(No subject)

अत्रुप्त आत्मा
Mon, 12/03/2012 - 13:29 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

अरे ही चौथी की पाचवी इनींग सुरू आहे..

मोदक
Tue, 12/04/2012 - 00:18 नवीन
अरे ही चौथी की पाचवी इनींग सुरू आहे.. या फळ्यावर खडू, डस्टर अशी बरीच विडंबने कोरली गेली होती. हे काव्य त्या भळभळत्या जखमा कायम वाहत राहील... :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

फळा आवड्ला..

वात्रट
Mon, 12/03/2012 - 13:40 नवीन
फळा आवड्ला..
  • Log in or register to post comments

फळ्याच्या ‘कळा’ ...

सस्नेह
Mon, 12/03/2012 - 15:40 नवीन
फळ्याच्या ‘कळा’ पाहून हसले भळाभळा असेच धागे ढवळा अन लावा भुइनळा..! काय जमलंय का लीलाधरा ?
  • Log in or register to post comments

.............................

अत्रुप्त आत्मा
Mon, 12/03/2012 - 18:43 नवीन
..........................................Image removed. @असेच धागे ढवळा अन लावा भुइनळा..!>>> Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

मा. बुवा, ढवळायची अन

५० फक्त
Tue, 12/04/2012 - 16:16 नवीन
मा. बुवा, ढवळायची अन भुईनळ्याची स्माईली मिळ्ळी नाय का ओ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

फळा

तिमा
Mon, 08/11/2014 - 13:11 नवीन
ह्या फळ्यामुळेच फुलला काही 'सुजाण' नागरिकांचा मळा आणि त्यांचे भाग्य वाहिले फळफळा.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा