Skip to main content

ढोकळ्याचा अगदी काही मिनीटात होणारा प्रकार.

लेखक गौरीबाई गोवेकर यांनी शुक्रवार, 30/11/2012 20:00 या दिवशी प्रकाशित केले.
ढोकळ्याचा अगदी काही मिनीटात होणारा प्रकार. साहित्य: १ वाटी दही (अमुलचे तयार दही असल्यास उत्तम), १ वाटी दुध, १ वाटी रवा (नेहमीचा गव्हाचा रवा. आपण सांजा/शि-यासाठी वापरतो तो.), ईनो फ़्रुट सॉल्ट्चा १ पाउच (१ ते दीड चमचा) , अर्धा ईंच आल्याची पेस्ट, १ चमचा हिरव्या मिरचीची पेस्ट. मीठ. फ़ोडणीचे साहित्य. सर्वप्रथम ढोकळा वाफ़वण्यासाठी कुकर मधे पाण्याला उकळी येउ देणे. ज्या पात्रात ढोकळा वाफ़वायचा असेल त्याला आतून तेलाचा हात लावून तयारे ठेवणे व नंतर उर्वरीत कृति करावयास घ्यावी. एका दुस-या भांड्यात रवा घ्यावा. दही छान मोडुन घ्यावे पाणी घालू नये. त्या रव्यात हे मोडलेले दही घालून मिश्रण एकजीव होईपर्यंत घोटावे आता त्यात दुध घालावे आल व मिर्चीची पेस्ट व मिठ घालून पुन्हा थोडे घोटावे. आता ईनो फ़्रूट सॉल्टचा पाउच कापून एका हातात तयार ठेवावा. वरील मिश्रणात तो घालून लगेच हलवावे. सॉल्ट घालताच मिश्रण फ़सफ़सेल. तसेच ते लगेच वाफ़वावयास ठेवावे. सॉल्ट मिश्रणात घातल्यापासून काही सेकंदातच वाफ़ेला पडले पाहिजे उशीर होऊन चालत नाही. तसेच मिश्रणात पाणी आजीबात घालू नये. पंधरा ते वीस मिनीटे शिटी न लावता वाफ़ द्यावी. हा ढोकळा अगदी स्पंजासारखा फ़ुगून येतो. थोडे थंड होताच वड्या कापाव्या. वरून हिंग मोहरीची फ़ोडणी द्यावी. गरमच सर्व्ह करावा. या बरोबर चिंचेची आंबटगोड चटणी द्यावी.

वाचने 19419
प्रतिक्रिया 36

प्रतिक्रिया

फक्त ते टायमिंग साधणं महत्वाचं असावं (ते वेळेत वाफवायला ठेवलं नाही तर काय घडेल ते सांगितलं नाहीत? (प्रयोग फसल्यावर आपोआप कळेलच म्हणा! :-)) धन्यवाद!

In reply to by बहुगुणी

आगो ते सांगायचे काय. वेळेत वाफ़वायला ठेवल नाही तर गाताना सम चुकली तर जशी गाणा-याची फ़जिती होते ना तशी होईल हो. बरोबर आहे ग. ते टायमिंग अगदी महत्वाचे.

सफेत ढोकळा! तांदुळाच्या रव्याचा माहित होता. हा पण चांगला लागेल. दिसतोय छान!

In reply to by कुसुमिता१

दही मोडायचे म्हणजे रवीने थोडे घुसळायचे पण अगदी ताक नाही करायच. दह्याच्या कवड्या मोडल्या पाहिजेत.

In reply to by गौरीबाई गोवेकर

चांगली आहे. करुन बघायला पाहिजे. पण अहो, ज्यांना दही मोडायचे माहित नाही त्यांना दह्याच्या 'कवड्या' कशा माहित असणार ? 'अदमोरं वगैरे शब्द कसे कळणार ? तिरशिंग आजोबा

In reply to by तिमा

नसेल कळत, तर मोवळं दही घ्या जरासं..

मावशी हळद घातल्यास नेहमीच्या ढोकळ्यासारखाच दिसेल काय? हा पण मस्त आहे. ज्याना बेसन चालत नाही, लो क्यालरी हवा त्याना तर बेस्टच!!

In reply to by प्रचेतस

माझाही असाच ऑ झाला पिंगूचा प्रतिसाद वाचून :O :O :O अस्स्सा पण बहुतेक त्याने सामान ह्या शब्दावर श्लेष शाधला असावा ;) - (काहीही झटपट न करणारा) सोकाजी

In reply to by परिकथेतील राजकुमार

दुसर्‍या कोणी कशाला जमवायला पाहिजे. तुझं सामान तू जमव्....तेही शोधून! नाहीतर माझ्या ववसूमं मध्ये नाव नोंदव. तुझ्यासारखा शेलीब्रिटी आहे म्हटल्यावर लगेच लग्ने जमतील्.....बाकीच्यांची! ;)

In reply to by रेवती

आम्ही ज्यांना गुळाची पोळी आणि ढोकळा बनवता येतो अशाच काकुंच्या ववसूमं नाव नोंदवायचे नक्की केले आहे.

बहुधा खमण आणि ढोकळा असे दोन प्रकार असावेत. किंवा एक खमण ढोकळा आणि एक नुसताच ढोकळा असे असावे. आपल्याकडच्या पोळ्या आणि पुरण पोळ्यांप्रमाणे. चण्याच्या पिठाचा तो खमण (हाच कुसकरून त्यावर बारीक शेव घातली की ते अमीरी खमण)आणि तांदुळाचा तो ढोकळा असे असावे.चूभूदेघे.

In reply to by राही

ही स्वातीताईची कृती. http://www.misalpav.com/node/21980 तांदळाचा जेंव्हा (थोडी उडदाची डाळ) दही घालून उबदार हवेत ठेवून ढोकळा करतात त्याला खट्टा ढोकळा म्हणताना ऐकले आहे.

In reply to by गणपा

Just to clarify: मी केवळ गोवेकरांच्या धाग्याच्या विषयाला दृष्य मदत व्हावी या सद्हेतूने त्यांनीच दिलेला image source code इथे धाग्यात फक्त embed केला आहे इतकंच. त्यांनी स्वतः ते चित्र कुठून घेतलं त्याची मला अर्थातच कल्पना नाही. (कुणास ठाऊक, कदाचित स्पॅन फूड्सवाल्यांनी गोवेकरांच्या पांढर्‍या ढोकळ्याचा फोटो घेतला असेल :-) - गोवेकर काकू: गंमत करतो आहे, हलकेच घ्या ही विनंती!)

In reply to by बहुगुणी

हा हा हा. काका तुम्ही केली तशी मदत मी ही करणार होतो.(धाग्यातच तो फोटु चढवून.) पण थोडं गुगलल्यावर कळलं की हा फटु जालावरुन उचललेला आहे. (आता त्या स्पॅन फूड्सवाल्यांनी गोवेकरांच्या पांढर्‍या ढोकळ्याचा फोटो उचलला असल्यास आम्ही आमचे विधान मागे घेतो. (म्हणुन स्वत:च्या कला कृतीवर एखादा हलकासा वॉटरमार्क टाकावा.) ) असो आज्जीबै खुलासा करतीलच.

In reply to by गणपा

अहो, त्यांणा फटू येत नाहीत काढता ना चढवता. ढोकळा कसा दिसतो यासाठी त्यांच्या नातीने दिलं असेल एकादं जालावरचं चित्रं! तुम्हीपण ना! कित्ति पोटदुखी ;)

In reply to by आनंदी गोपाळ

पोटदुखी? असो. ज्याचं क्रेडीट त्याला मिळावं येवढंच म्हणण होतं. त्यास आमची पोटदुखी समजायचे असेल तर समजा. :)

In reply to by गणपा

आजकाल उपहासाचा बी उपास घडाया लागलाय. अहो ते र्‍हेटोरिक लिव्लं होतं म्या!

खांसाहेब तालीम अगदी खायकीच्या अंगाने घ्यायचे. खमण आणि अमीरी खमण हा फरक अगदी भैरव आणि अहीर भैरवातला फरक समजावून सांगावा तसे सांगायचे. दही मोडून घेणे म्हणजे अगदी दह्याची आणि रवीची थोडीशी नोमथोम. अगदी अशाच काही शब्दात सांगीतलं असतं. असो .खांसाहेबांच्या आठवणी बर्‍याच आहेत. एकेक करून सांगीनच.

झकास

विजय चव्हाणनं म्हणे 'मोरुची मावशी' नाटकामध्ये 'स्त्रीपार्टी' फारच सुंदर वठवली. नंतर आलेल्या बर्‍याच नाटक चित्रपटांमध्ये त्यानं स्त्री भूमिका केली..... पण मोरुच्या मावशीला जे यश मिळालं ते इतरांना नाही मिळालं. असो. ढोकळा चांगला वठलाय. :)

फोटोबद्द्लचा खुलासा: नात म्हणाली 'आजी आपण करतो अगदी तस्साच दिसणारा फोटो देउ का ग? मी म्हणाले पाह? ... तो पाहिला. अर्थात तो दुस-या कुणी केलेल्याचाच आहे पण अगदी हुबेहुब ह्या पाककृति प्रमाणे केल्यावर जसा होतो तस्साच होता. म्हंणून म्हणाले दे. ईतकेच. नाहितरी ज्योति म्हणाली होतीच की 'पा. कृ चा अंदाज येण्यासाठी फोटो हवा' ह्या फोटोने तो अंदाज येतो आहे. आणि एवढा काथ्याकूट करण्यापेक्षा करून पहा ना एकदा... साहित्य घरी असणारेच आहे. मुद्द्दाम काही जमवाजमव करायला नको. पण 'केला. चांगला होतो' अस मात्र लिहीणार कुणि नाही.

आज घरी मुलांची बँड प्रॅक्टीस आहे. काहीतरी खायला करायचं पण तळकट नको म्हणून म्हटलं ही रेसीपी ट्राय करुन बघते. आत्ताज ताजा ताजा तयार झालाय. एकदम झक्कास झालाय. माझ्याकडे ऑरेंज इनो होतं त्यामुळे त्याचाही एक मस्त फ्लेवर आला. मी मिश्रणात मिर्ची पेस्ट ऐवजी मिर्चीचे अगदी पातळ काप घातले. गौराबाई ....या झटपट रेसीपीसाठी मनापासून धन्यवाद :)

In reply to by जयवी

धन्यवाद मा़झ्यावर विश्वास ठेउन ही रेसीपी ट्राय केल्याबद्दल. अभिनंदन. ती झकास झाल्याबद्दल.

फोटु कुठाय ?