साहित्यः
१) पाव किलो मिरच्या
२) २ चमचे धणे
३) २ चमचे जिरे
४) २ चमचे बडीशेप
५) १ चमचा राई ची डाळ
६) अर्धा चमचा हळद
७) पाऊण वाटी मिठ
८) अर्धी वाटी तेल
९) ३ लिंबू
पाककृती :
१) मिरच्या धुवुन, पुसून घ्याव्यात. एका मिरचीचे तिन तुकडे करुन ते मधून चिरावेत.
२) धणे, जिरे, बडीशेप, राईची डाळ वेगवेगळी थोडी तव्यावर परतून घ्यायची. हे सगळे थंड झाले की एकत्र करून मिक्सरमध्ये पूड करायची.
३) हळद थोड्या तेलावर परतायची.
४) एका ताटात मिक्सरमधून काढलेली पूड, मिठ, हळद एकत्र करून हाताने चांगले एकजीव करून घ्यायचे.
५) त्या एकजीव केलेल्या मिश्रणात लिंबांचा रस, गरम करून थंड केलेले तेल ओतायचे.
६) सगळ्यात शेवटी ह्या मिश्रणात मिरच्या ओतायच्या आणि चमच्याने ढवळून एकत्र करायचे.
हे लोणचे काचेच्या बरणीत भरून ठेवायचे. ५-६ दिवसांनी मुरल्यावर खायला काढायचे.
टिपः
हे लोणचे टिकावू असते. जर वरून तेल कमी वाटले तर अजुन तेल गरम करून ते थंड करुन वाटलीत ओतायचे. लोणचे पुर्ण बुडू द्यायचे त्यामुळे ते जास्त टिकते.
याद्या
7288
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स
छान दिसतय गं जागु. या
छानचं दिसतय जागुताई
भारीच.
चटका लावून गेली जिभेला...
तोंपासू
बस, बस !
आमच्याकडे करतात त्यात धणे,
+१
In reply to आमच्याकडे करतात त्यात धणे, by सूड
+२
In reply to आमच्याकडे करतात त्यात धणे, by सूड
शेवटचा फोटू>>>. ऊफ ऊफ मिर्ची
कोपा कबाना डोळ्यांसमोर आले.
In reply to शेवटचा फोटू>>>. ऊफ ऊफ मिर्ची by अत्रुप्त आत्मा
मस्तच्,तों.पा.सु.
छान
रसरशीत लोणचं बघून तोंडाला
खल्लास !
अहाहा......तो.पा.सु.
अरारा..........जबराट्,जागुताइ
जागु तै..........
जबराट !! नक्की करुन बघणार.
मला आजच घरी फ्रिजमध्ये मी
सगळ्यांचे धन्यवाद.