Skip to main content

़जग माझ्या डोळ्यातून . . .

लेखक हुकुमीएक्का यांनी शुक्रवार, 30/11/2012 00:54 या दिवशी प्रकाशित केले.
a a
लेखनविषय:

वाचने 29868
प्रतिक्रिया 108

प्रतिक्रिया

?

!

वा.. सोलर फ्लेअर दिसते आहे.. मस्तच. ती सोलर फ्लेअरच आहे की ढगांमुळे आलेला स्मज इफेक्ट की आणि काही हे सांगणं अवघड आहे. तुम्ही त्याची खात्री करुनच सांगितलं असेल अर्थात....

In reply to by गवि

ती सोलर फ्लेअरच आहे . . कारण मी एकाच अँगलमधून १० फोटो काढलेत . . त्यातील एकाच फोटोमध्ये हे पहायला मिळाले . .

तुम्ही स्नॅप मारून, कॉर्ड जोडून, पीसीवर घेईपर्यंत, मी हे तयार करतो. (अंदाजे ३ मिनट) निसर्गाला चॅलेंज नाहीच पण तो तसा दिसला तर पाहीजे. ;) S

In reply to by अभ्या..

हे मी दीड मिनिटातही करू शकतो फटू एडीटर मधे . पण वरील फोटो एडीटेड नाहीत. कारण ते माझ्या देखत काढले आहेत. धाग्याचे नाव मात्र साफ चुकले आहे सुर्याची फ्लेअर बाबतीत मात्र " दुसरे काही असू शकेल असे वाटते पण इतके प्रकाशमान ? .

In reply to by चौकटराजा

राजासाब एडीटिंग बद्दल शंका नाहीच मला. वरचे टेक्स्ट फक्त एडीटेड असेल. पण.... मला एवढेच म्हणायचे होते की असे काहीतरी दिसावे फोटोत, जे तयार करता येऊ नये इझीली. (जसे मी तयार केलेले आहे फोटोशॉप मध्ये. ते बेस फाईलवर एडीटेड नाही. ते नवीन ग्राफिक्स आहे) निसर्ग आहेच तेवढा अथांग. तसा जाणवावा वा तसा ऊतरावा त्या फोटोत. एवढेच :)

In reply to by चौकटराजा

'अभिजीत मी नाही' साहेब, वरील फोटो ओरिजनल आहेत. जर आपण ३ मिनीटे "Photoshop" वर घालवण्यापेक्षा १५ मिनीटे कॅमेरावर घालवली तर असा फोटो नक्कीच मिळू शकतो . . .माझ्याकडे अजुन खुप फोटो आहेत. . . लवकरच पाहू आपण . . .

In reply to by हर्शयोग

धन्यवाद . . .

चित्र बघून आणि प्रतिक्रिया वाचून डोळे दिपले.

In reply to by परिकथेतील राजकुमार

हिहिहि. पर्‍या तुझे दिपलेले डोळे पाहुन माझ्या डोळ्यात खुपट रुतले =))

In reply to by जेनी...

पर्‍या तुझे दिपलेले डोळे पाहुन माझ्या डोळ्यात खुपट रुतले
आधीच मोतीबिंदूचा त्रास.. त्यात आता खुपट रुतले.

In reply to by निवेदिता-ताई

धन्यवाद . . . :)

मस्त. खरेच अप्रतिम आहेत. एसराव तुमच्या फोटोग्राफीबद्दल काहीही शंका नाही हो. आता हे असे आम्हाला ३ मिनिटे काय ३० वर्षे घालवली तरी जमणार नाही. आता मात्र हा हुकुमाचा एक्का आला बघा. :) आधीच कशाला दुर्री तिर्री ओ?

In reply to by अभ्या..

अरे बापरे , आमच्या बोलण्याला तुम्ही टोमणा समजलात की काय ?? ... तुम्हाला शंका होती ती दुर करण्याचा प्रयत्न केला हो. . . . पण आपल्याला तुमच्या comments आवडल्या बर का . . . फोटोना तेव्हाच अर्थ येतो जेव्हा त्यावर comments येतात . . . धन्यवाद . . :)

अरे बापरे , आमच्या बोलण्याला तुम्ही टोमणा समजलात की काय ?? ... तुम्हाला शंका होती ती दुर करण्याचा प्रयत्न केला हो. . . . पण आपल्याला तुमच्या comments आवडल्या बर का . . . फोटोना तेव्हाच अर्थ येतो जेव्हा त्यावर comments येतात . . . धन्यवाद . . :)

एसराव तसे काहिही नाही मनात. तुम्ही बिनधास्त सादर करत रहा तुमचे फोटो की जे आम्हाला जमणार नाहीत करायला :) आम्ही आहोतच जे कॅमेर्‍याला जमत नाही ते करायला ;) येऊ द्यात नवीन नवीन कलाकृती. शुभेच्छा. :)

In reply to by हुकुमीएक्का

मोठ्या मनाने माफ करणे कारण मला फोटोग्राफीतले काहीही कळत नाही :( मी आतापर्यंत डीसेलार तर सोडा साध्या मोबाईल कॅमेर्‍याने पण स्नॅप मारलेले नाहीत. :( पण फोटोशॉप येते थोडे थोडे :) बाकी आयडीया देण्याएवढी कला नाही हो माझ्या हातात. :)

In reply to by अभ्या..

आहो फोटोग्राफी बद्दल बोलता येणे तेच जास्त महत्वाचे . . . मी पण स्वत:ला amatuer फोटोग्राफर समजतो. . .मी सुध्धा अजून काहीच नाहीये . . .खुप गोष्टी मलापण जमत नाहीत . . पण मी इतरांकडून tips घेतो . . .आणि improvement करतो . . .

In reply to by हुकुमीएक्का

टिप्स साठी राजासाब आहेत, मदनबाण, जयंतकाका आहेत, स्वॅप्स सारखे फोटोग्राफीतले एकेक एक्के/बादशाहा आहेत इथे. तुम्ही पण लगे रहो. :) शुभेच्छा.

In reply to by हुकुमीएक्का

टाकलय फोटुवरच, पण.. वैयक्तिक मत आहे बॉ ! नाव इतक्या मोठ्या अक्षरात टाकण्याचा हेतु कायेपण ?? फोटोग्राफी अप्रतिम आहे . कुठेहि कसलिहि कमतरता नाहि वाटत. अर्थात फोटोतलं जास्त कळत नाहि पण डोळ्याना जे भावतं ते उत्तम असा माझा एक समज आहे , त्यात तुमचे फोटो पूरेपूर उतरतात . पण तुमचं भलं मोठं लांबलचक नाव तेहि मोठ्या फाँटातलं त्याच डोळ्याना खट्कतय . एवढच . :-/ बाकि काय अडचण नाय बॉ आपल्या डोळ्यांची :)

मी हेच म्हणायला आलो होतो एसराव आता बघा बरे तुमचा फोटो किती छान दिसतो. A पूजा आपण लैच्च सॉलीड्ड आहोत नां? ;)

In reply to by हुकुमीएक्का

नाइ ओ :( मी फार साधी मुलगीये ओ :( मी भलत्या सलत्या विषयावर कध्धी कध्धी नै बोलत :-/ विचारा हवं तर इथल्या संपादकांना :( :-/ सभासदाना विचारु नका हं फक्त :P :D

एस पी मध्ये दम वाटत नाही :( अहो एस पी तुम्हीच आहात ना? आजकाल कॉन्स्टेबलसुध्दा दमदार वाटते. तुम्ही तर एसपी आहात की बाय डिफॉल्ट. ;) विचार कसला करताय ? नाव बदलायचा? ;) ह. घे. बरं का ;)

In reply to by अभ्या..

आहो नावाचा अभिमान आहे मला. . . माझ्या नावात काना, मात्रा, वेलांटी, ऊकार, काहीच नाहीये . . .सरळसोट आहे . . .

In reply to by हुकुमीएक्का

माझ्या नावात काना, मात्रा, वेलांटी, ऊकार, काहीच नाहीये . . .सरळसोट आहे . . .
शरद तळवलकर सारखे ;)

In reply to by अभ्या..

नरेंद्र करमरकर सारखे . . .

In reply to by हुकुमीएक्का

अरेरे पांचट काय त्यात ... तुम्ही म्हनालात तुमच्या नावात काना नैये :) म्हणुन मग मी बीन्कानाचे नाव लिले :) पांचट कुठले :-/

In reply to by जेनी...

हेहेहे . . . मी पण थोडीशी मस्करी केली . . .म्हटले खेचूया थोडी आपण पण . . :) . . चला आता उद्या बोलूया. . .

In reply to by जेनी...

सागरसाहेब तुम्हाला पुढील फोटोग्राफीसाठी शुभेच्छा. आणि पूजा आवडलेत फोटो सगळे. छान आहेत. हा विषय एथेच थांबवूयात.

In reply to by हुकुमीएक्का

आडनावात काना , वेलांटी हे पदार्थ नैयेत असं लिवायला हवं होतं :) तुमी लिवन्यात चुकलात हुक्कु ... तुमी चुकलात म्हणुन आमाला पांचट म्हणायच का?? ही कुठली रीत बै :-/ अर्धशतक पूर्ण . आपला राम राम :)

In reply to by हुकुमीएक्का

निघायची वेळ झाली . . . परत भेट उद्या . . .
ओ हे हो काय... आत्ताशी कुठे दहा वाजलेत. आणखी काही प्रतिसाद टंका ना. वर खूप प्रतिसाद आहेत त्यावर शेवटचा उपप्रतिसाद तुम्ही टंकल्याशिवाय आम्ही नै बोलणार जा.

वा वा वा स्वतःच्या धाग्याचाच खरडफळा केलात हे उत्तम. नाही म्हणजे लोकं दुसर्‍याच्या धाग्याचा खफ करतात त्या मानाने हे बरं. बाकी फटू बद्दल म्या पामराने काय बोलावे. :) लगे रहो.

माझी ही सुचना साधारणतः धुडकावली जाते तरी पुन्हा चिवटपणे करतोय. वॉटरमार्क टाळावेत किंवा किमान हलकेच एखाद्या कोपर्‍यात द्यावेत .. असे ठळक वॉटरमार्क चित्रांचा अस्वाद घेण्यात अडचण करतात एखाद प्रसंगी विद्रुपही करतात

In reply to by ऋषिकेश

असे ठळक वॉटरमार्क चित्रांचा अस्वाद घेण्यात अडचण करतात
लेका ॠ काय तू पण.. मराठी आंतरजालावर येणारी ९०% चित्रे ही आस्वादासाठी नसून, स्वतःच्या टेर्‍या बडवण्यासाठी असतात हे अजून कसे रे तुझ्या लक्षात येत नाही ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

बिनधास्त असतंय कारभार राजकुमाराचा. :)

In reply to by परिकथेतील राजकुमार

'मराठी आंतरजालावर येणारी ९०% चित्रे' ह्या म्याटरवर आक्षेप आहे. सर्वसमावेशकता अपेक्षित आहे. फक्त चित्रांबद्दल का बोलायला बे? ;) बाकी ह्या ह्या ह्या....!

In reply to by हुकुमीएक्का

बहूतेक मि. पा. करांना आमची फोटोग्राफी आवडत नसावी. . .फेसबूक वरच राहणे सोईस्कर ठरेल असे दिसते. . .
तिथे आपल्याला नको असलेले प्रतिसाद उडवून टाकता येतात आणि फक्त खुशमस्कर्‍यांची वाहवा जपता येते. :) काय राव ? जरा कुठे दोन चार नाराजीचे सूर उमटले तर लगेच खटकले होय तुम्हाला ? मिपाकरांनी मात्र तुमचे 'दे मार' फोटोबाँब सहन करत बसायचे होय ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

यानंतर अपलोड केले जाणार नाही . . . परिकथेतील राजकुमार, पूजा पवार यांच्या इच्छेप्रमाणे . . . धन्यवाद . . .

In reply to by हुकुमीएक्का

बरं ..... फेसबूकावर वाहवा आणी खुप सारे लायिक मिळाले कि न्युनगंड निर्माण होतो असं फक्त ऐकुन होते मी. सगर फनसळकर तुम्ही ते प्रूव करुन दाखवल्याबद्दल आभारी आहे :) जाव फेसबूक्पे खुश रवो . फेसबूक आण्णा ना माझाबी नमस्कार सांगा _/\_

In reply to by परिकथेतील राजकुमार

ज्यांना फोटो आवडले त्यांनी आवडले म्हणावे . . .नाही त्यांनी नाही म्हणावे . . . सिंपल . .

In reply to by हुकुमीएक्का

'आवडले' किंवा 'नाही आवडले' असे काही म्हणालो नाही तरी तुम्ही भोकाड पसरुन 'फेसबुकावरतीच रहावे' (म्हणजे मिपा भिकार आहे आणि फेसबुक उत्तम आहे) अशा अर्थाचे रडगाणे गायला लगालात. जर खरा प्रतिसाद दिला तर काय कराल ? मध्ये आमच्या एका 'हेरगिरी प्रेमी' मित्राला एक सल्ल दिला होता. आज तोच तुम्हाला परत देतो आहे :- आंतरजालावरती लिहिणे / डकवणे म्हणजे खिडकीत बसण्यासारखे असते. एकतर खिडकीत बसू नये आणि एकदा बसल्यावरती मग कोणी 'शुक शुक' केले; तर पतिव्रतेचा आव आणून त्रागा करु नये. धन्यवाद.

In reply to by परिकथेतील राजकुमार

आंतरजालावरती लिहिणे / डकवणे म्हणजे खिडकीत बसण्यासारखे असते. एकतर खिडकीत बसू नये आणि एकदा बसल्यावरती मग कोणी 'शुक शुक' केले; तर पतिव्रतेचा आव आणून त्रागा करु नये.
क्या बात ...लाख बोललास परा...!