Skip to main content

झटपट चॉकलेट मफिन्स

लेखक खादाड अमिता यांनी गुरुवार, 29/11/2012 17:13 या दिवशी प्रकाशित केले.
Chocolate muffins पुन्हा एकदा पाक्रु कडे वळायचे ठरवले आहे. आता आधी सारखे वरचेवर पोस्ट करता येण अवघड दिसतंय पण प्रयत्न प्रामाणिक असेल. अवघड का? अहो, ११ महिन्याचा आमचा 'राजस' काही वेळ देईल तर नं! असो. आता पटकन मफिन्स करून बघा पाहू. Raajas Kelkar सामग्री: १ १/४ कप मैदा १/२ कप पिठी साखर १ अंड ५० ग्राम वितळलेलं लोणी (मी अमूल बटर वापरलं ) १/४ कप दूध १ टी स्पून बेकिंग पावडर १/२ टी स्पून व्हेनिला इसेन्स ३ मोठे चमचे चॉकलेट सिरप (हर्शीस) कृती: - ओव्हन १८० डिग्री सेल्सिअस ला प्री-हिट करून घ्या. - एका माफीन ट्रे मधे पेपर लायनर ठेऊन घ्या. - एका मोठ्या भांड्यात, मैदा, साखर, बेकिंग पावडर एकत्र करून घ्या. दुसऱ्या एका छोट्या भांड्यात अंड, दूध, बटर, चॉकलेट सिरप आणि इसेन्स फेटून घ्या. मग हे ओलं मिश्रण त्या कोरड्या मैद्याच्या मिश्रणात घालून त्याला एकजीव करा. खूप वेळ फेतात बसू नका, नाहीतर मफिन्स कोरडे होतील. - मिश्रण ट्रे मधल्या पेपर कप मध्ये घालून (थोडी जागा बाकी ठेवावी, कारण मफिन्स फुगतात) ओव्हन मध्ये २० मिनिट बेक करा. गार झाल्यावर, हव असल्यास आयसिंग करा. muffins आयसिंग साठी: २ मोठे चमचे जाडी साय ३ मोठे चमचे न्युटेला चॉकलेट स्प्रेड १ टी स्पून दूध ५ मोठे चमचे आयसिंग शुगर (पिठी साखर वापरली तरी चालते, फक्त त्याने आयसिंग छान स्मूथ होणार नाही) - आयसिंग च्या सर्व सामग्रीला नीट कालवून फेटून घ्या, गुठळ्या राहायला नकोत. मफिन्स तयार होऊन, गार झाल्यावर त्यावर हे आयसिंग लावावे.

वाचने 5683
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

आहा.. क्या बात है.. खादाडताई परत आल्या म्हणजे आता मिपावरच्या मेजवान्यांत आणखीनच वाढ.... :) वेलकम ब्याक... !!!

तुम्हाला पोस्ट न करायला 'गोड' कारण मिळालेले आहे. :-) मफिन आयसिंगशिवायही छान लागतील असे वाटते.

मफिन्स आवडले, स्वाती

मफिन्स आणि राजस दोन्ही गोड आहेत!

पाकृ आवडली आणी राजस ही :)

मस्त आहे राजस न मफिन्स दोन्ही :)

डोरा केक (पहिला फोटो वरुन तसा दिसतोय म्हणुन)

सगळ्यांचे खूप आभार :)