पुन्हा एकदा पाक्रु कडे वळायचे ठरवले आहे. आता आधी सारखे वरचेवर पोस्ट करता येण अवघड दिसतंय पण प्रयत्न प्रामाणिक असेल. अवघड का? अहो, ११ महिन्याचा आमचा 'राजस' काही वेळ देईल तर नं! असो. आता पटकन मफिन्स करून बघा पाहू.
सामग्री:
१ १/४ कप मैदा
१/२ कप पिठी साखर
१ अंड
५० ग्राम वितळलेलं लोणी (मी अमूल बटर वापरलं )
१/४ कप दूध
१ टी स्पून बेकिंग पावडर
१/२ टी स्पून व्हेनिला इसेन्स
३ मोठे चमचे चॉकलेट सिरप (हर्शीस)
कृती:
- ओव्हन १८० डिग्री सेल्सिअस ला प्री-हिट करून घ्या.
- एका माफीन ट्रे मधे पेपर लायनर ठेऊन घ्या.
- एका मोठ्या भांड्यात, मैदा, साखर, बेकिंग पावडर एकत्र करून घ्या. दुसऱ्या एका छोट्या भांड्यात अंड, दूध, बटर, चॉकलेट सिरप आणि इसेन्स फेटून घ्या. मग हे ओलं मिश्रण त्या कोरड्या मैद्याच्या मिश्रणात घालून त्याला एकजीव करा. खूप वेळ फेतात बसू नका, नाहीतर मफिन्स कोरडे होतील.
- मिश्रण ट्रे मधल्या पेपर कप मध्ये घालून (थोडी जागा बाकी ठेवावी, कारण मफिन्स फुगतात) ओव्हन मध्ये २० मिनिट बेक करा. गार झाल्यावर, हव असल्यास आयसिंग करा.
आयसिंग साठी:
२ मोठे चमचे जाडी साय
३ मोठे चमचे न्युटेला चॉकलेट स्प्रेड
१ टी स्पून दूध
५ मोठे चमचे आयसिंग शुगर (पिठी साखर वापरली तरी चालते, फक्त त्याने आयसिंग छान स्मूथ होणार नाही)
- आयसिंग च्या सर्व सामग्रीला नीट कालवून फेटून घ्या, गुठळ्या राहायला नकोत. मफिन्स तयार होऊन, गार झाल्यावर त्यावर हे आयसिंग लावावे.
वाचने
5683
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
तरीच म्हटलं कुठं गायबला होतात
आहा.. क्या बात है.. खादाडताई
फोटो फारच गोड आहेत.
ओह्हो! किती गोड! तुमचा मुलगा
छान
अहा........एकदम सोप्पी कृती
छान!
मस्तच!
पाकृ आवडली
पाकृ आणि पिल्लु दोन्ही मस्त.
वरुन दुसर्या फोटोतला मफिन
मस्तच
दुसर्या फोटोतला मफिन गोजिरा
मस्त , पण ज्यांच्याकडे ओव्हन
पियुशा,
In reply to मस्त , पण ज्यांच्याकडे ओव्हन by पियुशा
उम्म्म्म
वाह्ह ! (चॉकलेट प्रेमी)
मफिन्स लै झ्याक दिसायलीत...
धन्यु