संसदेचे २०१२चे हिवाळी अधिवेशन आज, दिनांक २२ नोव्हेंबर रोजी सुरू होत आहे. त्या सत्रासंबंधीच्या माहितीचे आदान-प्रदान करण्यासाठी, एकूणच संबंधीत राजकारणावर चर्चा करण्यासाठी, मांडलेल्या बिलांवर मिपाकरांची मते समजून घेऊन त्यावर साधकबाधक चर्चा करण्यासाठी हा धागा सुरू करत आहे.
यात शक्य तितके दररोज काल काय झाले आणि आज संसदेपुढे कोणता कार्यक्रम प्रस्तावित आहे याची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहेच. शिवाय यावेळी या धाग्यावर या सत्राच्याशी निगडीत राजकारणावरही चर्चा व्हावी असे वाटते.
जेव्हा एखादे महत्त्वाचे विधेयक सादर होईल तेव्हा त्यावर आपापली मते जरूर द्यावीत अशी विनंतीही करतो
रोजची माहिती त्याच दिवशी देणे, दररोज शक्य होईलच असे नाही मात्र प्रयत्न जरूर करणार आहे. मिपाकरांनीही माहिती भर घालत रहावे ही विनंती
वाचने
11800
प्रतिक्रिया
67
मिसळपाव
प्रतिक्रिया
थोडी पूर्वतयारी
२२ नोव्हेंबर २०१२
२२ नोव्हेंबर २०१२ चा प्रस्तावित कार्यक्रम
राज्यसभा
११:०० सदनाची सुरवात ८ माजी खासदार आणि बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली वाहून केली जाईल त्यानंतर प्रश्नोत्तरांचा तास सुरू होईल. शिवाय काही कार्यालयीन रिपोर्ट्स पटलावर ठेवले जातील ========= विचारार्थ आणि मंजूरीसाठी सादर बिले: पुर्वोत्तर राज्यांची रिअरेंजमेन्ट (सुधारणा) बिल हे विधेयक लोकसभेमध्ये मंजूर झालेले आहे. आता सुशीलकुमार शिंदे हे बिल राज्यसभेत सादर करतील. नंतर त्यावर चर्च होऊन ते मंजूर करण्यासाठी मतदानार्थ ठेवले जाणार आहे आतापर्यंत मणिपूर आनि त्रिपुरा या राज्यांसाठी एकच शासकीय व्यवस्था होती. या सुधारणे द्वारे या राक्यांसाठी वेगळे आयपीएस, आय ए एस, आय एफ एस (फॉरेस्ट सर्विसेस) नियुक्त करता येतील.लोकसभा
११:०० वाजता लोकसभेत सदनाची सुरवात दोन नव्या सदस्यांच्या (माला शहा - टेहरी (उत्तराखंड) आणि अभिजित मुखर्जी - जंगीपूर(प. बंगाल)) यांच्या शपथ ग्रहणाने होईल. त्यानंतर ११ माजी लोकसभा सदस्य आणि बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली वाहिली जाईल. त्यानंतर प्रश्नोत्तरांचा तास सुरू होईल व कार्यालयीन रिपोर्ट्स पटलावर ठेवले जाटील ===== त्यानंतर कलम ३७७ खाली प्रश्न विचारले जातील किंवा पटलावर मांडले जातील कलम ३७७ खाली विचारले जाणारे प्रश्न (शुन्य प्रहर वेगळा). या नियमाखाली विचारल्या जाणार्या प्रश्नांना मंत्र्यांवर तिथल्यातिथे - ताबडतोप उत्तर द्यायचे कायदेशीर बंधन नसते ===== विचारार्थ सादर बिले: श्री जयस्वाल Coal Mines (Conservation and Development) Amendment Bill, 2012 विचारार्थ सादर करतील. त्यावर चर्चा व अम्तदान लगेच होणार नाही. विचारार्थ आणि मंजूरीसाठी सादर बिले: Prevention of Money-Laundering (Amendment) Bill, 2011. हे अत्यंत महत्त्वाचे सुधारणा-विधेयक तत्कालीन अर्थमंत्री श्री प्रणब मुखर्जी यांनी लोकसभेत गेल्या हिवाळी सत्रात मांडले होते. ते स्थायी समितीकडे वर्ग झाले. स्थायी समितीच्या सुचवण्यांना लक्षात घेऊन विधेयक आता श्री पी. चिदंबरम मंजूरीसाठी पुन्हा सादर करतील: मुख्य उद्देशः -- या विधेयकाच्या सुधारणआंद्वारे इतर अनेक देशांप्रमाणे 'करसपाँडिग लॉ' चे तत्त्व अंगिकारले जाईल -- या सुधारणआंद्वारे 'मनी लाँडरिंग' ची व्याख्या अधिक व्यापक करून त्यात लपवणूक (concealment), अभिग्रहण/अर्जन (acquisition), धारणा(possession) and वापर (use) of proceeds of crime चा अंतर्भाव केला जाईल -- २००२ च्या कायद्यात दंडाची रक्कम ५ लाखापर्यंत सिमीत होती. ही सीमा काढून टाकली जाईल. याव्यतिरिक्त इतर अनेक सुधारणा करून हा कायदा अधिक सबळ करण्याचा प्रयत्न प्रथमदर्शनी तरी दिसतो. प्रस्तावित विधेयक इथे बघता येईल. कायदेबाह्य वर्णणूक प्रतिरोध (सुधारणा) विधेयक (Prevention of Money-Laundering (Amendment) Bill, 2011.) हे विधेयक गेल्या हिवआळी अधिवेशनात सादर झाले होते. यातील 'पर्सन' या शब्दाच्या बदललेल्या व्याख्येवरून थोडा गहजब झाला होता. नंतर हे बिल स्थायी समितीकडे सूपूर्त केले होते. आता स्थायी समितीच्या सुचवण्यांना लक्षात घेऊन विधेयक आता श्री सुशीलकुमार शिंदे मंजूरीसाठी पुन्हा सादर करतील. प्रस्तावित विधेयक इथे बघता येईल. स्थायी समितीच्या सुचवण्या इथे (पीडीएफ) वाचता येतीलताजे अपडेट्स
In reply to २२ नोव्हेंबर २०१२ by ऋषिकेश
-
चर्चेसाठी उपलब्ध नियम
दोन्ही सभागृहे दिवसभरासाठी तहकूब झाली
संसदेचे अधिवेशन या वेळे पण
एफडीआयच्या मुद्दयावर संसदेत
किंचित करेक्शनः गुरूवारपर्यंत
In reply to एफडीआयच्या मुद्दयावर संसदेत by अविनाशकुलकर्णी
संसदेच्या सात आणि आठ
संसद चालू आहे का सध्या?
उम्म्म्म
In reply to संसद चालू आहे का सध्या? by नाना चेंगट
>>>ते काय माहिती नाही रे
In reply to उम्म्म्म by परिकथेतील राजकुमार
जागा
In reply to उम्म्म्म by परिकथेतील राजकुमार
अवांतरबद्दल क्षमस्व.
In reply to जागा by ऋषिकेश
२९ नोव्हेंबर २०१२
२९ नोव्हेंबर २०१२ चा प्रस्तावित कार्यक्रम
राज्यसभा
११:०० वाजता कामकाज सुरू होईल आणि प्रश्नोत्तरांचा तास सुरू होईल. शिवाय काही कार्यालयीन रिपोर्ट्स व पेपर्स पटलावर ठेवले जातील ========= विचारार्थ आणि मंजूरीसाठी सादर बिले: ११७ वी घटना दुरुस्ती, २०१२ FDI चे संकट बाजुस सरते न सरते, शासकीय नोकर्यांमधील बढतीमध्ये आरक्षणासाठी आवश्यक ती घटना दुरूस्ती विधेयक उद्या संसदेत मांडले जाईल. बसप या दुरुस्तीची वाट पाहत आहे तर सपाचा या दुरूस्तीला विरोध आहे तेव्हा सपा गोंधळ घालेच असे वाटते. हे बघणे रोचक ठरेल की सपा ने घातलेल्या गोंधळाचे निमित्त करून कामकाज तहकूब होते की हे विधेयक मागे टाकले जाते की चक्क बिलावर काही चर्चा होते आणि मतदान होते. आतापर्यंत माझ्या माहितीनूसार केवळ सपा आणि शिवसेनेने या बिलाला विरोध केला आहे पुर्वोत्तर राज्यांची रिअरेंजमेन्ट (सुधारणा) बिल हे विधेयक लोकसभेमध्ये मंजूर झालेले आहे. आता सुशीलकुमार शिंदे हे बिल राज्यसभेत सादर करतील. नंतर त्यावर चर्च होऊन ते मंजूर करण्यासाठी मतदानार्थ ठेवले जाणार आहे आतापर्यंत मणिपूर आनि त्रिपुरा या राज्यांसाठी एकच शासकीय व्यवस्था होती. या सुधारणे द्वारे या राक्यांसाठी वेगळे आयपीएस, आय ए एस, आय एफ एस (फॉरेस्ट सर्विसेस) नियुक्त करता येतील. नागरीकत्त्व (सुधारणा) विधेयक २०११ गेल्या हिवाळी सत्रात हे बिल राज्यसभेत विचारार्थ सादर झाले होते. या मुळ बिलानूसार भारतीय नागरीकत्त्व १. जन्म २.वंश ३. रजिस्ट्रेशन ४. naturalisation; आणि ५. नव्या समाविष्ठ भुभागातील नागरीक असल्यास मिळवता येते. ही प्रस्तावित सुधारण मंजूर झाल्यास नागरीकत्त्व 'overseas Indian cardholder' या प्रकारच्या लोकांनाही मिळू शकेल. या सुधारणे द्वारे : १. भारतीय नागरीकाच्या पणतु/पणतीस २. दोघांपैकी एक भारतीय नागरीक असणार्या पालकांच्या अल्पवयीन पाल्यास ३. भारतीय नागरीकाच्या पत्नीस (लग्नानंतर दोन वर्षांनी). यात अधिक छोटे बदलही आहेत. संपूर्ण प्रस्तावित बदल इथे वाचता येतीललोकसभा
११:०० वाजता प्रश्नोत्तरांचा तास सुरू होईल व कार्यालयीन रिपोर्ट्स पटलावर ठेवले जाटील === त्यानंतार कलम १९९ खाली सुलतान अहमद आपल्या मंत्रीमंडळातून बाहेर पडण्यासंबंधी निवेदन सादर करतील ===== त्यानंतर कलम ३७७ खाली प्रश्न विचारले जातील किंवा पटलावर मांडले जातील. या नियमाखाली विचारल्या जाणार्या प्रश्नांना मंत्र्यांवर तिथल्यातिथे - ताबडतोप उत्तर द्यायचे कायदेशीर बंधन नसते - लिखित उत्तरे सादर करता येतात. ===== विचारार्थ आणि मंजूरीसाठी सादर बिले: Prevention of Money-Laundering (Amendment) Bill, 2011. हे अत्यंत महत्त्वाचे सुधारणा-विधेयक तत्कालीन अर्थमंत्री श्री प्रणब मुखर्जी यांनी लोकसभेत गेल्या हिवाळी सत्रात मांडले होते. ते स्थायी समितीकडे वर्ग झाले. स्थायी समितीच्या सुचवण्यांना लक्षात घेऊन विधेयक आता श्री पी. चिदंबरम मंजूरीसाठी पुन्हा सादर करतील: मुख्य उद्देशः -- या विधेयकाच्या सुधारणआंद्वारे इतर अनेक देशांप्रमाणे 'करसपाँडिग लॉ' चे तत्त्व अंगिकारले जाईल -- या सुधारणआंद्वारे 'मनी लाँडरिंग' ची व्याख्या अधिक व्यापक करून त्यात लपवणूक (concealment), अभिग्रहण/अर्जन (acquisition), धारणा(possession) and वापर (use) of proceeds of crime चा अंतर्भाव केला जाईल -- २००२ च्या कायद्यात दंडाची रक्कम ५ लाखापर्यंत सिमीत होती. ही सीमा काढून टाकली जाईल. याव्यतिरिक्त इतर अनेक सुधारणा करून हा कायदा अधिक सबळ करण्याचा प्रयत्न प्रथमदर्शनी तरी दिसतो. प्रस्तावित विधेयक इथे बघता येईल. कायदेबाह्य वर्तणूक प्रतिरोध (सुधारणा) विधेयक (Unlawful Activities (Prevention) Amendment Bill, 2011.) हे विधेयक गेल्या हिवाळी अधिवेशनात सादर झाले होते. यातील 'पर्सन' या शब्दाच्या बदललेल्या व्याख्येवरून थोडा गहजब झाला होता. नंतर हे बिल स्थायी समितीकडे सूपूर्त केले होते. आता स्थायी समितीच्या सुचवण्यांना लक्षात घेऊन विधेयक आता श्री सुशीलकुमार शिंदे मंजूरीसाठी पुन्हा सादर करतील. प्रस्तावित विधेयक इथे बघता येईल. स्थायी समितीच्या सुचवण्या इथे (पीडीएफ) वाचता येतील परकीय लाच प्रतिबंधक विधेयक, २०११ (Prevention of Bribery of Foreign Public Officials and Officials of Public International Organisations Bill, 2011.) गेल्यावर्षी मार्च मध्ये सादर झालेले हे विधेयक स्थायी समितीकडे सुपूर्त केले होते. मथळ्यात म्हटल्याप्रमाणे परकीय 'पब्लिक' संस्था आणि परकीय संस्थ्यांच्या पदाधिकार्यांना अथवा कडून लाच देण्या/घेण्याला प्रतिबंध करणारे हे विधेयक आहे. या विधेयकाचा मसुदा इथे वाचता येईललोकसभा
In reply to २९ नोव्हेंबर २०१२ by ऋषिकेश
राज्यसभा
In reply to २९ नोव्हेंबर २०१२ by ऋषिकेश
अधिवेशन संपे पर्यंत
३० नोव्हेंबर २०११
सबसिडाईज्ड सिलेंडर्स
In reply to ३० नोव्हेंबर २०११ by ऋषिकेश
खरंय
In reply to सबसिडाईज्ड सिलेंडर्स by पैसा
०३ डिसेंबर २०१२
०३ डिसेंबर २०१२ चा प्रस्तावित कार्यक्रम
राज्यसभा
११:०० वाजता श्री गुजराल यांना श्रद्धांजली वाहून कामकाज सुरू होईल आणि प्रश्नोत्तरांचा तास सुरू होईल. शिवाय काही कार्यालयीन रिपोर्ट्स व सुचना पटलावर ठेवले जातील ========= विचारार्थ आणि मंजूरीसाठी सादर बिले: बालमजूरी रोखण्यासाठी व नियमन (सुधारणा) विधेयक बालमजूरीला रोखण्यासाठी सध्या असलेल्या या कायद्यातील दुरुस्ती करणारे हे सुधारणा विधेयक श्री मल्ल्लिकार्जून खारगे मांडतील.या सुधारणेची अधिक माहिती शोधतो आहे. मिळताच इथे देईन ११७ वी घटना दुरुस्ती, २०१२ FDI चे संकट बाजुस सरते न सरते, शासकीय नोकर्यांमधील बढतीमध्ये आरक्षणासाठी आवश्यक ती घटना दुरूस्ती विधेयक उद्या संसदेत मांडले जाईल. बसप या दुरुस्तीची वाट पाहत आहे तर सपाचा या दुरूस्तीला विरोध आहे. तेव्हा सपा गोंधळ घालेच असे वाटते. हे बघणे रोचक ठरेल की सपा ने घातलेल्या गोंधळाचे निमित्त करून कामकाज तहकूब होते की हे विधेयक मागे टाकले जाते की चक्क बिलावर काही चर्चा होते आणि मतदान होते. आतापर्यंत माझ्या माहितीनूसार केवळ सपा आणि शिवसेनेने या बिलाला विरोध केला आहे पुर्वोत्तर राज्यांची रिअरेंजमेन्ट (सुधारणा) बिल हे विधेयक लोकसभेमध्ये मंजूर झालेले आहे. आता सुशीलकुमार शिंदे हे बिल राज्यसभेत सादर करतील. नंतर त्यावर चर्च होऊन ते मंजूर करण्यासाठी मतदानार्थ ठेवले जाणार आहे आतापर्यंत मणिपूर आनि त्रिपुरा या राज्यांसाठी एकच शासकीय व्यवस्था होती. या सुधारणे द्वारे या राक्यांसाठी वेगळे आयपीएस, आय ए एस, आय एफ एस (फॉरेस्ट सर्विसेस) नियुक्त करता येतील. नागरीकत्त्व (सुधारणा) विधेयक २०११ गेल्या हिवाळी सत्रात हे बिल राज्यसभेत विचारार्थ सादर झाले होते. या मुळ बिलानूसार भारतीय नागरीकत्त्व १. जन्म २.वंश ३. रजिस्ट्रेशन ४. naturalisation; आणि ५. नव्या समाविष्ठ भुभागातील नागरीक असल्यास मिळवता येते. ही प्रस्तावित सुधारण मंजूर झाल्यास नागरीकत्त्व 'overseas Indian cardholder' या प्रकारच्या लोकांनाही मिळू शकेल. या सुधारणे द्वारे : १. भारतीय नागरीकाच्या पणतु/पणतीस २. दोघांपैकी एक भारतीय नागरीक असणार्या पालकांच्या अल्पवयीन पाल्यास ३. भारतीय नागरीकाच्या पत्नीस (लग्नानंतर दोन वर्षांनी). यात अधिक छोटे बदलही आहेत. संपूर्ण प्रस्तावित बदल इथे वाचता येतीललोकसभा
११:०० वाजता श्री गुजराल यांना श्रद्धांजली वाहून कामकाज सुरू होईल आणि प्रश्नोत्तरांचा तास सुरू होईल. शिवाय काही कार्यालयीन रिपोर्ट्स व सुचना पटलावर ठेवले जातील ===== त्यानंतर कलम ३७७ खाली प्रश्न विचारले जातील किंवा पटलावर मांडले जातील. या नियमाखाली विचारल्या जाणार्या प्रश्नांना मंत्र्यांवर तिथल्यातिथे - ताबडतोप उत्तर द्यायचे कायदेशीर बंधन नसते - लिखित उत्तरे सादर करता येतात. ===== विचारार्थ आणि मंजूरीसाठी सादर बिले: Criminal Law (Amendment) Bill, 2012. इंडियन पीनल कोड मध्ये बदल करण्यासाठी क्रिमिनल लॉमध्ये आवश्यक ते बदल श्री. सुशीलकुमार शिंदे सदनापुढे चर्चा व मंजूरीसाठी मांडतील. अधिक माहिती शोधुन इथेच देतो परकीय लाच प्रतिबंधक विधेयक, २०११ (Prevention of Bribery of Foreign Public Officials and Officials of Public International Organisations Bill, 2011.) गेल्यावर्षी मार्च मध्ये सादर झालेले हे विधेयक स्थायी समितीकडे सुपूर्त केले होते. मथळ्यात म्हटल्याप्रमाणे परकीय 'पब्लिक' संस्था आणि परकीय संस्थ्यांच्या पदाधिकार्यांना अथवा कडून लाच देण्या/घेण्याला प्रतिबंध करणारे हे विधेयक आहे. या विधेयकाचा मसुदा इथे वाचता येईल National Accreditation Regulatory Authority for Higher Educational Institutions Bill, 2010. सश्री सिब्बल यांनी हे विधेयक मांडले होते. त्यावर आता पुढील चर्चा होऊन श्री पल्लम राजु हे विधेयक मांडतील. या विधेयकात सर्व उच्चशिक्षण देणार्या संस्थांना एक 'अॅक्रेडिशन एजन्सी' असणे बंधनकारक असणार आहे ही समितीच सर्व कोर्सेसचे अॅक्रेडिशन करेल. सर्व संस्थांना ३ वर्षात अशी समिती स्थापावी लागेल. या समितीवर देखरेख ठेवण्यासाठी सरकार रेग्युलेटरी बोर्डाची स्थापना करेल. या विधेयकाचा मसुदा इथे वाचता येईल Constitution (Scheduled Castes) Order (Amendment) Bill, 2012. कुमारी शैलजा हे सुधारणा विधेयक मांडतील व मतदानासाठी ठेवतील. बिलाचा मसुदा इथे वाचता येईल०४ डिसेंबर २०१२
०४ डिसेंबर २०१२ चा प्रस्तावित कार्यक्रम
राज्यसभा
११:०० वाजता कामकाज सुरू होईल आणि प्रश्नोत्तरांचा तास सुरू होईल. शिवाय काही कार्यालयीन रिपोर्ट्स व सुचना पटलावर ठेवले जातील ========= विचारार्थ सादर बिले: बालमजूरी रोखण्यासाठी व नियमन (सुधारणा) विधेयक बालमजूरीला रोखण्यासाठी सध्या असलेल्या या कायद्यातील दुरुस्ती करणारे हे सुधारणा विधेयक श्री मल्ल्लिकार्जून खारगे मांडतील. यावर या सत्रात चर्चा/मतदान होणार नाही. या सुधारणेची अधिक माहिती शोधतो आहे. मिळताच इथे देईन विचारार्थ आणि मंजूरीसाठी सादर बिले: ११७ वी घटना दुरुस्ती, २०१२ FDI चे संकट बाजुस सरते न सरते, शासकीय नोकर्यांमधील बढतीमध्ये आरक्षणासाठी आवश्यक ती घटना दुरूस्ती विधेयक उद्या संसदेत मांडले जाईल. बसप या दुरुस्तीची वाट पाहत आहे तर सपाचा या दुरूस्तीला विरोध आहे. तेव्हा सपा गोंधळ घालेच असे वाटते. हे बघणे रोचक ठरेल की सपा ने घातलेल्या गोंधळाचे निमित्त करून कामकाज तहकूब होते की हे विधेयक मागे टाकले जाते की चक्क बिलावर काही चर्चा होते आणि मतदान होते. आतापर्यंत माझ्या माहितीनूसार केवळ सपा आणि शिवसेनेने या बिलाला विरोध केला आहे पुर्वोत्तर राज्यांची रिअरेंजमेन्ट (सुधारणा) बिल हे विधेयक लोकसभेमध्ये मंजूर झालेले आहे. आता सुशीलकुमार शिंदे हे बिल राज्यसभेत सादर करतील. नंतर त्यावर चर्च होऊन ते मंजूर करण्यासाठी मतदानार्थ ठेवले जाणार आहे आतापर्यंत मणिपूर आनि त्रिपुरा या राज्यांसाठी एकच शासकीय व्यवस्था होती. या सुधारणे द्वारे या राक्यांसाठी वेगळे आयपीएस, आय ए एस, आय एफ एस (फॉरेस्ट सर्विसेस) नियुक्त करता येतील. नागरीकत्त्व (सुधारणा) विधेयक २०११ गेल्या हिवाळी सत्रात हे बिल राज्यसभेत विचारार्थ सादर झाले होते. या मुळ बिलानूसार भारतीय नागरीकत्त्व १. जन्म २.वंश ३. रजिस्ट्रेशन ४. naturalisation; आणि ५. नव्या समाविष्ठ भुभागातील नागरीक असल्यास मिळवता येते. ही प्रस्तावित सुधारण मंजूर झाल्यास नागरीकत्त्व 'overseas Indian cardholder' या प्रकारच्या लोकांनाही मिळू शकेल. या सुधारणे द्वारे : १. भारतीय नागरीकाच्या पणतु/पणतीस २. दोघांपैकी एक भारतीय नागरीक असणार्या पालकांच्या अल्पवयीन पाल्यास ३. भारतीय नागरीकाच्या पत्नीस (लग्नानंतर दोन वर्षांनी). यात अधिक छोटे बदलही आहेत. संपूर्ण प्रस्तावित बदल इथे वाचता येतीललोकसभा
११:०० वाजता कामकाज सुरू होईल आणि प्रश्नोत्तरांचा तास सुरू होईल. शिवाय काही कार्यालयीन रिपोर्ट्स व सुचना पटलावर ठेवले जातील ===== त्यानंतर कलम ३७७ खाली प्रश्न विचारले जातील किंवा पटलावर मांडले जातील. या नियमाखाली विचारल्या जाणार्या प्रश्नांना मंत्र्यांवर तिथल्यातिथे - ताबडतोप उत्तर द्यायचे कायदेशीर बंधन नसते - लिखित उत्तरे सादर करता येतात. ===== विचारार्थ सादर बिले: Constitution (Scheduled Castes) Order (Amendment) Bill, 2012. कुमारी शैलजा हे सुधारणा विधेयक मांडतील व मतदानासाठी ठेवतील. बिलाचा मसुदा इथे वाचता येईल. विचारार्थ आणि मंजूरीसाठी सादर बिले: National Accreditation Regulatory Authority for Higher Educational Institutions Bill, 2010. सश्री सिब्बल यांनी हे विधेयक मांडले होते. त्यावर आता पुढील चर्चा होऊन श्री पल्लम राजु हे विधेयक मांडतील. या विधेयकात सर्व उच्चशिक्षण देणार्या संस्थांना एक 'अॅक्रेडिशन एजन्सी' असणे बंधनकारक असणार आहे ही समितीच सर्व कोर्सेसचे अॅक्रेडिशन करेल. सर्व संस्थांना ३ वर्षात अशी समिती स्थापावी लागेल. या समितीवर देखरेख ठेवण्यासाठी सरकार रेग्युलेटरी बोर्डाची स्थापना करेल. या विधेयकाचा मसुदा इथे वाचता येईल. Criminal Law (Amendment) Bill, 2012. इंडियन पीनल कोड मध्ये बदल करण्यासाठी क्रिमिनल लॉमध्ये आवश्यक ते बदल श्री. सुशीलकुमार शिंदे सदनापुढे मांडतील. चर्चा व मंजुरी या सत्रात होणार नाही. अधिक माहिती शोधुन इथेच देतो. परकीय लाच प्रतिबंधक विधेयक, २०११ (Prevention of Bribery of Foreign Public Officials and Officials of Public International Organisations Bill, 2011.) गेल्यावर्षी मार्च मध्ये सादर झालेले हे विधेयक स्थायी समितीकडे सुपूर्त केले होते. मथळ्यात म्हटल्याप्रमाणे परकीय 'पब्लिक' संस्था आणि परकीय संस्थ्यांच्या पदाधिकार्यांना अथवा कडून लाच देण्या/घेण्याला प्रतिबंध करणारे हे विधेयक आहे. या विधेयकाचा मसुदा इथे वाचता येईल. ======== *कलम १८४ खालील सुचना* श्रीमती सुषमा स्वराज पुढील सुचना मांडतीलः "This House recommends to the Government to immediately withdraw its decision to allow 51% Foreign Direct Investment in multi-brand retail trade." या व्यतिरिक्त TMC व इतर पक्षांच्या सुचनासुद्धा एकत्रितपणे याच चर्चेत समाविष्ट केल्या जातील. सदर चर्चा दुपारी २ वाजता सुरू होईलदुरुस्ती
In reply to ०४ डिसेंबर २०१२ by ऋषिकेश
सुषमा स्वराज यांचे FDI वरील भाषण
सहमत
In reply to सुषमा स्वराज यांचे FDI वरील भाषण by ऋषिकेश
लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या
सुषमा स्वराज यांचा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे..
हम्म
In reply to सुषमा स्वराज यांचा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे.. by सव्यसाची
तारिफ करावं असंच वकृत्त्व..
In reply to हम्म by पैसा
राज्य सभेत मतदान होणार ना?
राज्यसभेमध्ये मतदान होणार आहे
In reply to राज्य सभेत मतदान होणार ना? by अविनाशकुलकर्णी
राज्य सभेत मतदान होणार ना?
आत्ता राज्यसभेत अरूण जेटली
मायावतींनी पत्ते उघड केले
जय मिपा
(No subject)
FDI झिंदाबाद ....
२:३० पर्यन्त राज्यसभा स्थगित..
०७ डिसेंबर २०१२
माझ्या माहितीप्रमाणे हे
In reply to ०७ डिसेंबर २०१२ by ऋषिकेश
होय तुमची माहिती बरोबर आहे.
In reply to माझ्या माहितीप्रमाणे हे by सव्यसाची
सरकार जिंकले; लोकसभा हरली!
हौस
च्यायला...
१० डिसेंबर २०१२
१० डिसेंबर २०१२ चा प्रस्तावित कार्यक्रम
राज्यसभा
११:०० वाजता कामकाज सुरू होईल आणि प्रश्नोत्तरांचा तास सुरू होईल. शिवाय काही कार्यालयीन रिपोर्ट्स व सुचना पटलावर ठेवले जातील ========= विचारार्थ आणि मंजूरीसाठी सादर बिले: ११७ वी घटना दुरुस्ती, २०१२ FDI चे संकट बाजुस सरते न सरते, शासकीय नोकर्यांमधील बढतीमध्ये आरक्षणासाठी आवश्यक ती घटना दुरूस्ती विधेयक आज राज्यसभेत मांडले जाईल. बसपने या विधेयकासाठी कोणत्याही स्तरावर आपण जाऊ शकतो हे FDI च्या मतदानादरम्यान दाखवले आहेच बसप या दुरुस्तीची वाट पाहत आहे तर सपाचा या दुरूस्तीला विरोध आहे. तेव्हा सपा गोंधळ घालेच असे वाटते. हे बघणे रोचक ठरेल की सपा ने घातलेल्या गोंधळाचे निमित्त करून कामकाज तहकूब होते की हे विधेयक मागे टाकले जाते की चक्क बिलावर काही चर्चा होते आणि मतदान होते. आतापर्यंत माझ्या माहितीनूसार केवळ सपा आणि शिवसेनेने या बिलाला विरोध केला आहे Prevention of Money-Laundering (Amendment) Bill, 2011. हे अत्यंत महत्त्वाचे सुधारणा-विधेयक तत्कालीन अर्थमंत्री श्री प्रणब मुखर्जी यांनी लोकसभेत गेल्या हिवाळी सत्रात मांडले होते. ते स्थायी समितीकडे वर्ग झाले. स्थायी समितीच्या सुचवण्यांना लक्षात घेऊन विधेयक आता श्री. पी.चिदंबरम मंजूरीसाठी लोकसभेत मांडले होते. याच सत्रात ते लोकसभेत मंजूर झाल्याचे आपण आधी पाहिलेच. आता श्री चिदंबरम हे बिल राज्यसभेत सादर करतील: मुख्य उद्देशः -- या विधेयकाच्या सुधारणआंद्वारे इतर अनेक देशांप्रमाणे 'करसपाँडिग लॉ' चे तत्त्व अंगिकारले जाईल -- या सुधारणआंद्वारे 'मनी लाँडरिंग' ची व्याख्या अधिक व्यापक करून त्यात लपवणूक (concealment), अभिग्रहण/अर्जन (acquisition), धारणा(possession) and वापर (use) of proceeds of crime चा अंतर्भाव केला जाईल -- २००२ च्या कायद्यात दंडाची रक्कम ५ लाखापर्यंत सिमीत होती. ही सीमा काढून टाकली जाईल. याव्यतिरिक्त इतर अनेक सुधारणा करून हा कायदा अधिक सबळ करण्याचा प्रयत्न प्रथमदर्शनी तरी दिसतो. प्रस्तावित विधेयक इथे बघता येईल. पुर्वोत्तर राज्यांची रिअरेंजमेन्ट (सुधारणा) बिल हे विधेयक लोकसभेमध्ये मंजूर झालेले आहे. आता सुशीलकुमार शिंदे हे बिल राज्यसभेत सादर करतील. नंतर त्यावर चर्च होऊन ते मंजूर करण्यासाठी मतदानार्थ ठेवले जाणार आहे आतापर्यंत मणिपूर आनि त्रिपुरा या राज्यांसाठी एकच शासकीय व्यवस्था होती. या सुधारणे द्वारे या राक्यांसाठी वेगळे आयपीएस, आय ए एस, आय एफ एस (फॉरेस्ट सर्विसेस) नियुक्त करता येतील. नागरीकत्त्व (सुधारणा) विधेयक २०११ गेल्या हिवाळी सत्रात हे बिल राज्यसभेत विचारार्थ सादर झाले होते. या मुळ बिलानूसार भारतीय नागरीकत्त्व १. जन्म २.वंश ३. रजिस्ट्रेशन ४. naturalisation; आणि ५. नव्या समाविष्ठ भुभागातील नागरीक असल्यास मिळवता येते. ही प्रस्तावित सुधारण मंजूर झाल्यास नागरीकत्त्व 'overseas Indian cardholder' या प्रकारच्या लोकांनाही मिळू शकेल. या सुधारणे द्वारे : १. भारतीय नागरीकाच्या पणतु/पणतीस २. दोघांपैकी एक भारतीय नागरीक असणार्या पालकांच्या अल्पवयीन पाल्यास ३. भारतीय नागरीकाच्या पत्नीस (लग्नानंतर दोन वर्षांनी). यात अधिक छोटे बदलही आहेत. संपूर्ण प्रस्तावित बदल इथे वाचता येतील कायदेबाह्य वर्तणूक प्रतिरोध (सुधारणा) विधेयक (Unlawful Activities (Prevention) Amendment Bill, 2011.) हे विधेयक गेल्या हिवाळी अधिवेशनात सादर झाले होते. यातील 'पर्सन' या शब्दाच्या बदललेल्या व्याख्येवरून थोडा गहजब झाला होता. नंतर हे बिल स्थायी समितीकडे सूपूर्त केले होते. आता स्थायी समितीच्या सुचवण्यांना लक्षात घेऊन विधेयक आता श्री सुशीलकुमार शिंदे मंजूरीसाठी लोकसभेत सादर केले होते. ते लोकसभेने मंजूर केल्यानंतर आता श्री शिंदे हे विधेयक राज्यसभेत मंजूरीसाठी सादर करतील. प्रस्तावित विधेयक इथे बघता येईल. स्थायी समितीच्या सुचवण्या इथे (पीडीएफ) वाचता येतीललोकसभा
११:०० वाजता कामकाज सुरू होईल आणि प्रश्नोत्तरांचा तास सुरू होईल. शिवाय काही कार्यालयीन रिपोर्ट्स व सुचना पटलावर ठेवले जातील ===== विचारार्थ सादर बिले: Governors (Emoluments, Allowances and Privileges) Amendment Bill, 2012. राज्यपालांच्या मिळकतीच्या बदलासाठीचे विधेयक श्री. सुशीलकुमार शिंदे सदनापुढे मांडतील. चर्चा व मंजुरी या सत्रात होणार नाही. Competition (Amendment) Bill, 2012. श्री सचिन पायलट हे विधेयक मांडतील. चर्चा व मंजुरी या सत्रात होणार नाही. ===== त्यानंतर कलम ३७७ खाली प्रश्न विचारले जातील किंवा पटलावर मांडले जातील. या नियमाखाली विचारल्या जाणार्या प्रश्नांना मंत्र्यांवर तिथल्यातिथे - ताबडतोप उत्तर द्यायचे कायदेशीर बंधन नसते - लिखित उत्तरे सादर करता येतात. ==== विचारार्थ आणि मंजूरीसाठी सादर बिले: Enforcement of Security Interest and Recovery of Debts Laws (Amendment) Bill, 2011. आणि Banking Laws (Amendment) Bill, 2011. ही दोन्ही बिले श्री चिदंबरम सदनापुढे चर्चा आणि मंजूरीसाठी मांडतील. वेळ मिळाल्यावर अधिक तपशील देतो. Constitution (Scheduled Castes) Order (Amendment) Bill, 2012. कुमारी शैलजा हे सुधारणा विधेयक मांडतील व मतदानासाठी ठेवतील. बिलाचा मसुदा इथे वाचता येईल. परकीय लाच प्रतिबंधक विधेयक, २०११ (Prevention of Bribery of Foreign Public Officials and Officials of Public International Organisations Bill, 2011.) गेल्यावर्षी मार्च मध्ये सादर झालेले हे विधेयक स्थायी समितीकडे सुपूर्त केले होते. मथळ्यात म्हटल्याप्रमाणे परकीय 'पब्लिक' संस्था आणि परकीय संस्थ्यांच्या पदाधिकार्यांना अथवा कडून लाच देण्या/घेण्याला प्रतिबंध करणारे हे विधेयक आहे. या विधेयकाचा मसुदा इथे वाचता येईल.कामकाज
In reply to १० डिसेंबर २०१२ by ऋषिकेश
राज्यसभा
सदनाची सुरवात 'जागतिक मानवाधिकार दिना'निमित्त सभापतींच्या संदेशाने झाली. यानिमित्ताने भारताने अश्या अधिकारांप्रती आपला सहनिश्चय प्रकट केला. त्यानंतर प्रश्नोत्तरे झाली. प्रश्नोत्तरे: तामिळनाडूतील भारनियमनावरील प्रश्नाच्या उत्तरात श्री फारूख अब्दुल्ला यांनी पवनौर्जेच्या प्रोजेक्टबद्दल माहिती दिली हे प्रोजेक्ट भारतातील इतर ४ स्थळांबरोबरच कोकण आणि महाराष्ट्रात इतरत्रही चालु होणार आहे. याव्यतिरिक्त जगातील नदीस्थित सर्वात मोठे बेट 'माजुली' च्या संरक्षणासंबंधी श्री पाठक यांना, तर Vigilance Monitoring Committee च्या मिटिंग्ज न होण्याबद्दल शी जयराम रमेश यांना विरोधकांनी चांगलेच सतावले. इतरही २-३ प्रश्नांवर चर्चा झाली त्यानंतर काही शॉर्ट नोटीस प्रश्न झाले आनि रिपोर्टस पटलावर ठेवले गेले. त्यानंतर १२ वाजल्यापासून वॉलमार्ट प्रश्नावर सरकारला विरोधकांनी घेरले व कोणतेही कामकाज झाले नाही.लोकसभा:
प्रश्नोत्तरांनी सत्राला सुरवात झाली. जहाज बांधणी व्यवसाय, इन्फ्रास्ट्रक्चर (शहर विकास), सोमाली चाचे, ठेका मजूर याविषयांशी निगडीत प्रश्नांवर चर्चा झाली. श्रीमती सुषमा स्वराज यांनी २००५ मध्ये श्रीलंकन नेव्हीने भारतीय कोळ्यांना मारले होते त्यावर दोन देशांनी मिळून एक संशोधन समिती नेमली होती, त्याचे पुढे काय झाले? मिटिग्ज झाल्या का? परिणाम काय आला? असा प्रश्न मांडला त्याच्या थातूरमातूर उत्तरानंतर याच वर्षी चार मिटिंग नंतरही पुन्हा अशी घटना घडली आहे त्याचे काय? हा सप्लीमेंटरी प्रशन विचारला. सरकार पक्षातर्फे परराष्ट्र मंत्री वैयक्तीकरित्या लक्ष घालतील अशी हमी मिळवली. संसदीय प्रश्नोत्तरांचा वापर करून सरकारला उघडे पाडण्यात विरोधकांनी यावेळी कसर सोडलेली दिसत नाहिये. त्यानंतर सभापतींनी 'जागतिक मानवाधिकार दिना'निमित्त लोकसभेच्या भावना मांडल्या. त्यानंतर कार्यालयीन पेपर्स मांडले गेले त्यानंतर पुढील लक्षवेधी सुचनेवर चर्चा झाली याचर्चेत पुन्हा सरकार आणि विरोधकांनी आपापली बाजु स्पष्ट केली. सरकारने ८ कलमी कार्यक्रम असल्याचे संगितले. मात्र सरकारच्या अपुर्या योजनेबद्दल विरोधकांनी सरकारला धारेवर धरल्याचेच चित्र होते. नंतर टी आर बालू आणि अन्य सदस्यांनी सरकारच्या अपुर्या योजनेच्या निषेधात सभात्याग केला. त्यानंतर COMPETITION (AMENDMENT) BILL आणि GOVERNORS (EMOLUMENTS, ALLOWANCES AND PRIVILEGES)AMENDMENT BILL सादर केले गेले त्यानंतर शुन्य प्रहर चालु झाला. विविध प्रश्न मांडले गेले. उल्लेखनीय असा श्री यशवंत सिन्हा यांनी मानवाधिकार दिवसाच्या निमित्ताने मांडलेला तिबेटी जनतेचा प्रश्न होता. तर बाबुसाहेब आचार्य यांनी काश्मिरमधील मुस्लिम महिलांवरील अत्याचाराच्या प्रश्नावर आपले मत मांडले. शिवाय त्यांनी असा आरोप केला की त्यांच्या लोकसभा क्षेत्रातून ३५ नागरीकांना नोकरीच्या अमिषाने मुंबईत नेले गेले. मात्र ते अल्पसंख्य असल्याने त्यांना बांगलादेशी म्हणून अट्क करण्यात आली, दोन महिने तुरूंगात ठेवले गेले. दुपारी दोन वाजता आधी ३७७ खाली १४ प्रश्न मांडले गेले त्यानंतर ENFORCEMENT OF SECURITY INTEREST AND RECOVERY OF DEBTS LAWS (AMENDMENT) BILL (ऋण वसूली कायदा (सुधारणा) विधेयक) वर गेल्या सत्रात राहिलेली चर्चा पुढे सुरू झाली. हे विधेयक स्थायी समितीकडे सुपूर्त न करता थेट मतदानासाठी ठेवल्याबद्दल यशवंत सिन्हा व अन्य काही सदस्यांनी सभात्याग केला. त्यानंतर प्रत्येक बदलावर आवाजी मतदान झाले. शेवटी संपूर्ण सुधारणा विधेयकावर आवाजी मतदान झाले व सदर सुधारणा विधेयक लोकसभेने संमत केले THE BANKING LAWS (AMENDMENT) BILL (बँकिंग कायदा -सुधारणा-विधेयक) श्री चिदंबरम यांनी या कायद्यातील सुधारणा मांडण्याअधीच हे विधेयक स्थायी समितीकडे सुपूर्त करावे या मागणीसाठी विरोधी पक्ष अडून बसले व त्या गोंधळात कामकाज दिवसभरासाठी तहकूब झाले११ डिसेंबर २०१२
११ डिसेंबर २०१२ चा प्रस्तावित कार्यक्रम
राज्यसभा
माजी खासदार श्री स्वामीनाथन यांना श्रद्धांजली वाहून सकाळी ११:०० वाजता कामकाज सुरू होईल आणि प्रश्नोत्तरांचा तास सुरू होईल. शिवाय काही कार्यालयीन रिपोर्ट्स व सुचना पटलावर ठेवले जातील ========= विचारार्थ आणि मंजूरीसाठी सादर बिले: ११७ वी घटना दुरुस्ती, २०१२ शासकीय नोकर्यांमधील बढतीमध्ये आरक्षणासाठी आवश्यक ती घटना दुरूस्ती विधेयक आज राज्यसभेत मांडले जाईल. बसपने या विधेयकासाठी कोणत्याही स्तरावर आपण जाऊ शकतो हे FDI च्या मतदानादरम्यान दाखवले आहेच बसप या दुरुस्तीची वाट पाहत आहे तर सपाचा या दुरूस्तीला विरोध आहे. तेव्हा सपा गोंधळ घालेच असे वाटते. आतापर्यंत माझ्या माहितीनूसार केवळ सपा आणि शिवसेनेने या बिलाला विरोध केला आहे. बहुदा कालसारखेच आजही या विधेयकावर चर्चा होणे दुरापास्त दिसते. Prevention of Money-Laundering (Amendment) Bill, 2011. हे अत्यंत महत्त्वाचे सुधारणा-विधेयक तत्कालीन अर्थमंत्री श्री प्रणब मुखर्जी यांनी लोकसभेत गेल्या हिवाळी सत्रात मांडले होते. ते स्थायी समितीकडे वर्ग झाले. स्थायी समितीच्या सुचवण्यांना लक्षात घेऊन विधेयक आता श्री. पी.चिदंबरम मंजूरीसाठी लोकसभेत मांडले होते. याच सत्रात ते लोकसभेत मंजूर झाल्याचे आपण आधी पाहिलेच. आता श्री चिदंबरम हे बिल राज्यसभेत सादर करतील: मुख्य उद्देशः -- या विधेयकाच्या सुधारणआंद्वारे इतर अनेक देशांप्रमाणे 'करसपाँडिग लॉ' चे तत्त्व अंगिकारले जाईल -- या सुधारणआंद्वारे 'मनी लाँडरिंग' ची व्याख्या अधिक व्यापक करून त्यात लपवणूक (concealment), अभिग्रहण/अर्जन (acquisition), धारणा(possession) and वापर (use) of proceeds of crime चा अंतर्भाव केला जाईल -- २००२ च्या कायद्यात दंडाची रक्कम ५ लाखापर्यंत सिमीत होती. ही सीमा काढून टाकली जाईल. याव्यतिरिक्त इतर अनेक सुधारणा करून हा कायदा अधिक सबळ करण्याचा प्रयत्न प्रथमदर्शनी तरी दिसतो. प्रस्तावित विधेयक इथे बघता येईल. पुर्वोत्तर राज्यांची रिअरेंजमेन्ट (सुधारणा) बिल हे विधेयक लोकसभेमध्ये मंजूर झालेले आहे. आता सुशीलकुमार शिंदे हे बिल राज्यसभेत सादर करतील. नंतर त्यावर चर्च होऊन ते मंजूर करण्यासाठी मतदानार्थ ठेवले जाणार आहे आतापर्यंत मणिपूर आनि त्रिपुरा या राज्यांसाठी एकच शासकीय व्यवस्था होती. या सुधारणे द्वारे या राक्यांसाठी वेगळे आयपीएस, आय ए एस, आय एफ एस (फॉरेस्ट सर्विसेस) नियुक्त करता येतील. नागरीकत्त्व (सुधारणा) विधेयक २०११ गेल्या हिवाळी सत्रात हे बिल राज्यसभेत विचारार्थ सादर झाले होते. या मुळ बिलानूसार भारतीय नागरीकत्त्व १. जन्म २.वंश ३. रजिस्ट्रेशन ४. naturalisation; आणि ५. नव्या समाविष्ठ भुभागातील नागरीक असल्यास मिळवता येते. ही प्रस्तावित सुधारण मंजूर झाल्यास नागरीकत्त्व 'overseas Indian cardholder' या प्रकारच्या लोकांनाही मिळू शकेल. या सुधारणे द्वारे : १. भारतीय नागरीकाच्या पणतु/पणतीस २. दोघांपैकी एक भारतीय नागरीक असणार्या पालकांच्या अल्पवयीन पाल्यास ३. भारतीय नागरीकाच्या पत्नीस (लग्नानंतर दोन वर्षांनी). यात अधिक छोटे बदलही आहेत. संपूर्ण प्रस्तावित बदल इथे वाचता येतील कायदेबाह्य वर्तणूक प्रतिरोध (सुधारणा) विधेयक (Unlawful Activities (Prevention) Amendment Bill, 2011.) हे विधेयक गेल्या हिवाळी अधिवेशनात सादर झाले होते. यातील 'पर्सन' या शब्दाच्या बदललेल्या व्याख्येवरून थोडा गहजब झाला होता. नंतर हे बिल स्थायी समितीकडे सूपूर्त केले होते. आता स्थायी समितीच्या सुचवण्यांना लक्षात घेऊन विधेयक आता श्री सुशीलकुमार शिंदे मंजूरीसाठी लोकसभेत सादर केले होते. ते लोकसभेने मंजूर केल्यानंतर आता श्री शिंदे हे विधेयक राज्यसभेत मंजूरीसाठी सादर करतील. प्रस्तावित विधेयक इथे बघता येईल. स्थायी समितीच्या सुचवण्या इथे (पीडीएफ) वाचता येतीललोकसभा
११:०० वाजता कामकाज सुरू होईल आणि प्रश्नोत्तरांचा तास सुरू होईल. शिवाय काही कार्यालयीन रिपोर्ट्स व सुचना पटलावर ठेवले जातील ===== त्यानंतर कलम ३७७ खाली प्रश्न विचारले जातील किंवा पटलावर मांडले जातील. या नियमाखाली विचारल्या जाणार्या प्रश्नांना मंत्र्यांवर तिथल्या तिथे - ताबडतोप उत्तर द्यायचे कायदेशीर बंधन नसते - लिखित उत्तरे सादर करता येतात. ===== विचारार्थ आणि मंजूरीसाठी सादर बिले: Banking Laws (Amendment) Bill, 2011. आणि % Appropriation (No. 4) Bill,2012 ही दोन्ही बिले श्री चिदंबरम सदनापुढे चर्चा आणि मंजूरीसाठी मांडतील. ही दोन्ही विधेयके स्थायी समितीकडे गेलेली नाहित. आर्थिक बिलांच्या बाबतीत सरकार पक्ष किती घाईने पावले उचलत आहे हे पाहणे रोचक आहे :) Constitution (Scheduled Castes) Order (Amendment) Bill, 2012. कुमारी शैलजा हे सुधारणा विधेयक मांडतील व मतदानासाठी ठेवतील. बिलाचा मसुदा इथे वाचता येईल. परकीय लाच प्रतिबंधक विधेयक, २०११ (Prevention of Bribery of Foreign Public Officials and Officials of Public International Organisations Bill, 2011.) गेल्यावर्षी मार्च मध्ये सादर झालेले हे विधेयक स्थायी समितीकडे सुपूर्त केले होते. मथळ्यात म्हटल्याप्रमाणे परकीय 'पब्लिक' संस्था आणि परकीय संस्थ्यांच्या पदाधिकार्यांना अथवा कडून लाच देण्या/घेण्याला प्रतिबंध करणारे हे विधेयक आहे. या विधेयकाचा मसुदा इथे वाचता येईल.Banking Laws (Amendment) Bill, 2011.
In reply to ११ डिसेंबर २०१२ by ऋषिकेश
+१ घिसडघाई हा अचूक शब्द
In reply to Banking Laws (Amendment) Bill, 2011. by पैसा
सूक्ष्म खुस्पटः घिसडघाई नै
In reply to +१ घिसडघाई हा अचूक शब्द by ऋषिकेश
घाई
In reply to Banking Laws (Amendment) Bill, 2011. by पैसा
प्रत्यक्ष कामकाज
In reply to ११ डिसेंबर २०१२ by ऋषिकेश
१२ डिसेंबर २०१२
१३ डिसेंबर २०१२
१३ डिसेंबर २०१२
In reply to १३ डिसेंबर २०१२ by ऋषिकेश
राज्यसभा:
संसदेवरील हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहून सत्र सूरू झाले. प्रश्नोत्तरांमध्ये पहिलाच प्रश्न 'सायबर क्राईम' आणि त्यात यावर्षी लोकांचे बुडलेले ६.७ कोटि रुपयांचा होता. 'फिशिंग' वर आळा घालण्यासाठी काय योजना आहेत, कायद्यात बदल करणार का वगैरे प्रश्नांवर श्री चि९दंबरम यांना नीट उत्तरे देता आली नाहीत. त्यांनी मी अधिक माहिती मिळवून योग्य ती पावले उचलण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर प्रश्नोत्तरे झाली त्यानंतर 'शॉर्ट नोटीस क्वेश्चन' द्वारे श्री जावडेकर यांनी सरकारने हल्लीच घोषित केलेल्या 'गेम चेन्जर' म्ह्टल्या गेलेल्या "डायरेक्ट सबसिटी ट्रान्सफर" योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्न उपस्थित केले. त्यावर एक अत्यंत चांगली चर्चा झाली. सगळ्या प्रश्नांची उत्तरे समाधानकारक नसली तरी ही चर्चा वाचनीय आह. ती चर्चा इथे पान क्र. ७ ते १९ मध्ये वाचता येईल. त्यानंतर कु. मायावती यांनी सभापती व उपराष्ट्रपतींच्यावर काल आरोप करण्याचा हेतू नसून हे सदन चालावे व SC/ST बिल मंजूर व्हावे - किमान त्यावर चर्चा व्हावी म्हणून सदनातील सर्वपक्षीय नेत्यांना शांततेचे अपील केले. त्याला पंतप्रधान मनमोहन सिंग, श्री अरूण जेटली व इतर सर्वपक्षीय नेत्यांनी अनुमोदन दिले. ११७वी घटनादुरूस्ती त्यानंतर पदोन्नतीमध्ये SC/ST रिझर्वेशन आणण्यासाठी गरजेची घटनादुरूस्ती करणारे विधेयक मआंडण्याआधी बराच गोंधळ झाला. समाजवादी पक्षाचे श्री अरविन्द कुमार सिंह यांना २५५ नियमांतर्गत दिवसभरासाठी निष्कासित केले गेले. त्याचा निषेध म्हणून समाजवादी पक्षाच्या खासदारांनी सभात्याग केला. गोंधळ संपल्यार श्री नारायणस्वामी यांनी या घटनासुरूस्ती विधेयकावर चर्चा सुरू केली आहे. त्यांचे भाषण माहितीपूर्ण होते मात्र परिपूर्ण वाटले नाही. त्यांच्याच भाषणातील उद्धृत द्यायचे तर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार पैकी भारतात क्लास A अधिकार्यांमध्ये एकाही SC/ST व्यक्तीला 'सेक्रेटरी ऑफ गव्हर्नमेन्ट ऑफ इंडिया' व त्या श्रेणीच्या पदावर संधी मिळालेली नाही. या युक्तीवादाने केवळ the inadequacy of representation चा पुरावा मिळतो असे समजले तरी उर्वरीत दोन गोष्टींबाबत सरकारकडे (किमान मंत्रीमहोदयांकडे) योग्य उत्तर दिसले नाहि व गोल गोल युक्तीवाद केला गेला. विरोधी पक्षनेते श्री अरूण जेटली यांनी एकेक शब्दावर चर्चा करत त्याचे महत्त्व सांगत अत्यंत रोचक मुद्दे मांडले. प्रस्तावित बदलांनंतर मूळच्या"Nothing in article" या वाक्यरचनेतील Nothing जर तसाच ठेवला तर संभाव्य धोके त्यआंनी नजरेला आणून दिले आनि त्यामुळे efficiency कशी बाधित होते हे सोदाहरण स्पष्ट केले. यामुळे पुन्हा हा बदल सुप्रीम कोर्टात कसा टिकणार नाही हेही विषद केले. बाकी दोन बदल / परिणाम १. SC\ST ना आरक्षण आणि २. आरणक्षाला एक कॅप (त्या राज्याच्या % इतकेच आरक्षण) असण्याला भाजपने पाठिंबा दिला आहे. तर वर म्हटलेल्या वाक्यरचनेत बदल सुचविले आहेत.जर सरकार हे बदल करायला तयार नसेल तर भाजपा बहुतेक अमेन्डमेन्ट प्रस्तावित करेलभाजपाने यावर अमेंडमेन्ट प्रस्तावित केली आहे आणि ती सरकारने मान्य केली आहे डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी बिलाला सपोर्ट तर केलाच आणि ५०% ची कॅप का असावा? असा प्रश्नार्थक विचार मांडला. (की पुढील बदलांचे सुतोवाच केले?) त्यानंतर श्री मायावरी यांनी काँग्रेस सरकारला इतका उशीर केल्याबद्दल दोष देत व हे विधेयक आणण्याचे श्रेय स्वतःकडे घेत या विधेयकाला समर्थन घोषित केलेच शिवाय यानंतर OBC तसेच उच्चवर्णीयांतील EBCना आरक्षणाला पाथिंबा जाहिर केला त्यानंतर अनेक पक्षआंनी या विधेयकाचे सर्थन केले. केवळ शिवसेनेने या विधेयकाला विरोध केला आहे. चर्चा पूर्ण झाली नाहि. उर्वरीत चर्चा व मतदान सोमवारी होईल (शुक्रवार प्रायवेट मेम्बर बिलांचा असतो)लोकसभा
संसदेवरील हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहून सत्र सूरू झाले. त्यानंतर गोंधळात प्रश्नोत्तरांचा तास झाला. त्यानंतर ३७७ खालील सुचना मांडल्या गेल्या व गोंधळात शुन्य प्रहर तहकूब केला गेला. त्यानंतर संपूर्ण दुपार अधिक फंडाच्या मागणीवर धुवाधार चर्चा झाली. संध्याकाळी ६ वाजता पुन्हा शुन्य प्रहर घेतला गेला आनि दिवसभराचे कामकाज संपले. काल लोकसभेत कोणत्याही विधेयकावर चर्चा झाली नाही१७ डिसेंबर २०१२
१८ डिसेंबर २०१२ चे प्रत्यक्ष कामकाजः
राज्यसभा:
सकाळी ११ वाजता फिलिपाइन्सच्या मृतांना श्रद्धांजली वाहून, प्रश्नोत्तरांचा तास रहित करून दोन तास दिल्लीत घडणेल्या बलात्कारावर सभापतींचय परवानगीने चर्चा झाली. विरोधी पक्षांनी सरकारच्या नाकर्तेपणावर बोट ठेवलेच मात्र यात नागरीकांनी सतर्क रहाणेही गरजेचे आहे असेही मत दिले. यात सर्वपक्षीय खासदारांनी आपाप्ली मते, उद्वेग मांडला. महिला खासदारांचा या चर्चेतील सहभाग लक्षणीय होता. या चर्चेच्या शेवटी भारताचे गृहमंत्री श्री सुशीलकुमार शिंदे यांनी सदनात सरकारपक्ष मांडला आणि यात जातीने लक्ष देण्याचे आश्वासन दिले. दुपारच्या सत्रात The Appropriation (NO.4) Bill, 2012 सादर झाले. आत्ता भाषांतर करण्यात पक्ष दवडत नाही. मात्र सरकार पक्षाने मांडलेला गोषवारा इथे इंग्रजीत देतो: यावर विविध पक्षाच्या सदस्यांनी आपापली मते मांडली. चर्चा अजून चालु आहे, आज (१९ डिसेंबर) यावर पुढे चर्चा होऊन मतदान होईल.लोकसभा
सकाळी ११ वाजता प्रश्नोत्तरांचा तास होता. काल कृषीक्षेत्राशी निगडीत प्रश्नांचा दिवस होता. श्री शरद पवार यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली. गव्हाच्या कमी किंमतीवरून, अर्थात CACPचे रेकमेन्डेशन न स्वीकारण्यावरून बहुतांश पक्षांनी बरेच प्रश्न विचारले. त्यानंतर श्री मनीष तिवारी यांना मिडीयावर ठेवावाठेवण्यासाठी काय प्रयत्न सरकार करणार आहे या प्रश्नावर श्री मनिष तिवारी यांनी उत्तर दिले. इलेक्ट्रॉनिक मिडीयानेही स्वयंनियोजन व स्वयंनियंत्रण करावे असे त्यांचे मत होते. त्यानंतर १२ वाजता शून्य प्रहरात दिल्लीतील बलात्काराच्या घटनेवर श्रीमती सुषमा स्वराज यांनी हा विषय मांडला व इतर काही सदस्यांनी आपला उद्वेग व्यक्त केला. श्री कमलनाथ यांनी योग्य ती पावले उचलन्याचे सरकारपक्षाकडून आश्वासन दिले. या चर्चेतील श्रीमती गिरिजा व्यास यांचे भाषणही चांगले झाले. त्या काँग्रेसच्या नेत्या असूनही त्यांनी एकूणच देशातीलआणि विशेषतः दिल्लीतील सुरक्षाव्यवस्थेतील तृटिंवर नेमके बोट ठेवले, गेल्या २ वर्षात ढासळत्या व्यवस्थेविषयी सार्थ संताप व्यक्त केला. त्यानंतर शुन्य प्रहरातच श्री मुलायमसिंह यादव सच्चर समितीच्या शिफारसिंविषयी (अर्थात मुसलमान व्यक्तींच्या आरक्षणाविषयी) प्रश्न उपस्थित केला. सच्चर समितीच्या रिपोर्टमधील आकडेवारी सांगते की अनेक प्रदेशांत मुसलमानांची परिस्थिती अनुसुचित जाती-जमातींपेक्षाही खालावलेली आहे. त्याव्यतिरिक्त इतर अनेक विषयांना वाचा फोडण्यात आली. त्यानंतरच्या सत्रात BANKING LAWS (AMENDMENT) BILL वर उर्वरीत चर्चा झाली, मात्र हे बिल स्थायी समितीकडे न गेल्याने झालेल्या गोंधळात सदन दोन वेळा तहकूब करावे लागले. शेवटी सरकारने आढी पुढील बिल घ्यायचे ठरवले.CONSTITUTION (ONE-HUNDRED AND EIGHTEENTH AMENDMENT) BILL (Insertion of New Article 371j) यावर चर्चा झाली. गुलबर्गा, बिडार, रायचूर, कोप्पल, यादगीर या जिल्ह्याना विशेष घटनात्मक दर्जा देण्यासंबंधी हे बिल होते. यामुळे या मागासलेल्या भागाला अधिक मदत करणे केंद्र व राज्य सरकारला शक्य होईल. (आधी अशी सवलत विदर्भ, मराठवाडा आणि तेलंगणा या प्रांतातील जिल्ह्यांनाच होती)या द्वारे जुन्या निजाम साम्राज्यातील सर्व भागाला हा दर्जा मिळणार आहे. गेले चाळीस वर्षे यासाठी अनेक आंदोलने झाली होती. सदर बिल एकमताने मंजूर करण्यात आले. त्यानंतर पुन्हा BANKING LAWS (AMENDMENT) BILL मांडले गेले. यावेळी सरकारने विरोधीपक्षांशी समांतर चर्चा केल्याने विरोध मावळला होता. त्यानंतर अनेक सदस्यांनी त्यावर मते व्यक्त केली व वित्त मंत्र्यांच्या भाषणानंतर सदर बिल मंजूर करण्यात आलेदुदैवी
In reply to १८ डिसेंबर २०१२ चे प्रत्यक्ष कामकाजः by ऋषिकेश
याबद्दल काहीच वाचायला जमलेले
In reply to दुदैवी by पैसा
दुवा देते.
In reply to याबद्दल काहीच वाचायला जमलेले by ऋषिकेश
ओक्के मला जितके समजले या
In reply to दुवा देते. by पैसा
१९ डिसेंबर २०१२
राज्यसभा
११ वाजता सुरू झालेल्या प्रश्नोत्तरात श्री हुसेन दलवाई यांनी चीनच्या तुलनेत बहरतीय उत्पादन क्षेत्रच्या पिछेहाट होण्याअर चिंता व्यक्त करून चीनी बनावटींच्या उत्पादनांचे आक्रमण थोपवण्यासाठी सरकार काय पावले उचलत आहे? अशी विचारणा केली आपल्या प्रश्नात त्यांनी आता तर गणपतीच्या मूर्तीही चीनमधून आयात होऊ लागल्या आहेत अशी टिपणी केली. याच्या उत्तरात श्रीमती पुरंदेश्वरी यांनी अपेक्षेप्रमाणे खापर जागतीक परिस्थितीवर फोडले. श्री दलवाई यांच्या ही परिस्थिती फक्त भारतालाच कशी मारक ठरते आहे चीनला कशी नाही. त्यांच्याकडून आपल्याकडे होणारी आयात भारतीय लघूद्योगाला मारक ठरतो आहे याचा सरकार विचार करेल काय असा उपप्रश्न केल्यावर पहिलेच उत्तर वेगळ्या शब्दांत मिळाले. मात्र यावेळी अश्या काही केसेसचा अभ्यास सरकारने सुरू केला आहे आणि लवकरच याबाबतीत योग्य ती पावले उचलली जातील असे आश्वासन मिळाले. त्यावर सदस्यांचे समाधान न झाल्याने WTO मध्ये चीन विर्रुद्ध यात दाद मागता येते का याची चाचपणी करण्याचे आश्वासन विरोधकांनी सरकार कडून मिळवले. यासंबंधीची प्रश्नोत्तरे-चर्चा अत्यंत रोचक होती. कोणाला दुवा हवा असल्यास देता येईल. याव्यतिरिक्त इतर प्रश्नांसोबत JNNURM च्या अपयशावरही विरोधकांनी सरकारचे वाभाडे काढले. सरकारतर्फे श्री अजय माकन यातील पहिल्या फेजमध्ये काही तृटि असणे मान्य केले आणि दुसर्या टप्प्यात त्या दूर केल्या असण्याचा दावाही केला. त्यानंतरच्या शून्य प्रहरात काही महत्त्वाचे मुद्दे चर्चिले गेले -- दिल्लीतील बलात्कारावर दिलेल्या बातमीत श्री शिंदे यांनी सांगितले की The Criminal Procedure (Amendment) Bill जे लोकसभेपुढे आहे, त्यात बलात्काराला मृत्यूदंडही दिला जाऊ शकतो अशी तरतूद आहे. -- श्री अरूण जेटली यांनी लोकपालच्या सिलेक्ट कमिटीच्या रिपोर्टवर पुढे कसे जावे याबद्दल नियमासहीत स्पष्टीकरण दिलेच आनि सरकार या रिपोर्टला स्थायी समितीच्या रिपोर्टसारखे ट्रीट करत असल्याबद्दल ताशेरे ओढले. उपसभापतींनी याबाबतील लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर हिमाचलचे खासदार श्री. जगत नंदा यांनी मांडलेल्या IOA च्या सस्पेन्शनवरच्या लक्षवेधी सुचनेद्वारे सदनात चर्चा झाली. सरकारतर्फे श्री जितेन्द्र सिंग यांनी या प्रश्नावर ६ टप्प्यांची उपाययोजना सुरू केल्याचे सांगितले. त्यावरील चर्चेत श्री जेटली, श्री मणिशंकर अय्यर यांच्यासहित १५ खासदारांनी भाग घेतला. (महाराष्ट्रातून श्री अजय संचेती यांनी चार-सहा ओळीत आपले मत मांडले) दुपारच्या सत्रात THE UNLAWFUL ACTIVITIES (PREVENTION) AMENDMENT BILL, 2012 यावर श्री सुशील कुमार शिंदे यांनी चर्चा सुरू केली. हे बिल लोकसभेत मंजूर झालेले आहे. त्यावरील चर्चेत भाजपची बाजु मुख्तार अब्बास नकी यांनी मांडली. पोटा रद्द करून बर्याच तरतुदी इथे आणण्याबद्दल सरकारला बोल सुनावत त्यांनी चांगले(जरा रेंगाळलेले आणि पुनरुक्तीने भरलेले) भाषण केले आणि भाजपाचा या विधेयकाला पाठिंबा घोषित केला. ही चर्चा मध्ये थांबवून लोकसभेने मंजूर केलेले घटनादुरूस्ती विधेयक (काहि जिल्ह्याना विशेष दर्जा देणारे) राज्यसभेनेही एकमताने मंजूर केले त्यानंतर THE UNLAWFUL ACTIVITIES (PREVENTION) AMENDMENT BILL, 2012 बिलावर उर्वरीत चर्चा झाली. मात्र ती पूर्ण होऊ शकली नाही. आज त्यावर उर्वरीत चर्चा होऊन मतदान होईल.लोकसभा
प्रश्नोत्तरे, ३७७ वरील सुचना आणि कार्यालयीन रीपोर्ट नंतर ११७वी घटनादूरुस्ती विधेयक सादर होताना झालेल्या गोंधळात कामकाज तहकूब झालेमाहितीपुर्ण धागा....
२० डिसेंबर २०१२ - अंतीम दिवस
राज्यसभा
११ वाजता प्रश्नोत्तरे झाली. क्रिडामंत्रालय आणि वित्तमंत्रालयासंबंधी विविध प्रश्न विचारले गेले. त्यानंतर रिपोर्ट पटालावर ठेवले गेले. त्यानंतर पुन्हा काल बुधवारी विचारार्थ घेतलेल्या UNLAWFUL ACTIVITIES (PREVENTION) AMENDMENT BILL, 2012 वरच चर्चा सुरू झाली. अत्यंत व्यापक चर्चा झाली आणि बर्याच सदस्यांनी चर्चेत भाग घेतला. अनेक सदस्यांना हे बदल POTAच्या जवळ जाणारे वाटले. महाराष्ट्रातील श्री हुसेन दलवाई, श्री संजय राऊत आणि डॉ. योगेन्द्र त्रिवेदी यांनी चर्चेत भाग घेतला. मतदानाची वेळ येताच श्री रामविलास पासवान, राजद यांनी हा बदल मुसलमान विरोधी असल्याने सांगत सभात्याग केला. त्यानंतर या विधेयकावर सदस्यांनी सुचवलेल्या अमेंडमेन्टसच्या मतदानाची वेळ होती. #क्लॉज नं २ पहिली अमेन्डमेन्ट श्री वीपी सिंग बडनोरे यांची होती त्यांना हा कायदा NGO साठी लागू करायचा होता. परंतू सरकारच्या स्पष्टीकरणानंटर त्यांनी ही अमेंडमेंट विड्रॉ केली. दुसरी अमेन्डमेन्ट श्री पी. राजीवी यांची होती ज्यांना "association of persons”, नंतर “except trade unions" हा शब्द घालून ट्रेड युनियन्सना या कायद्याबाहेर ठेवायचे होते. ते या अमेन्डमेन्टवर कायम राहिले व हे अमेन्डमेन्ट मतदानाला ठेवले गेले. सदर अमेन्डमेन्ट २८ वि. ७९ मतांनी नाकारले गेले. यानंतर डाव्यापक्षांनी हे विधेयक कामगार विरोधी असल्याचे सांगत सभात्याग केला बाकी दोन अमेन्डमेट्स मुव्ह करणारे श्री पी राजीवजी (ज्यांनी सभात्याग केला) आणि श्री प्रकाश जावडेकर अनुपस्थित असल्याने त्या अमेन्डमेट्स मांडल्या गेल्या नाहीत. आणि हे UNLAWFUL ACTIVITIES (PREVENTION) AMENDMENT BILL, 2012 विधेयक उर्वरीत सभागृहाने मंजूर केले त्यानंतरच्या 'स्पेशल मेन्शन्स' पैकी अंबिकापूर-बारवाडी रेल्वेबद्दल महाराष्ट्रातील श्री अविना पान्डे यांनी सरकारला सुचना देऊन लक्ष वेधले. यावय्तिरिक्त महाराष्ट्रातून श्री पियुष गोयल यांनी ऐष्णिक वीजकेंद्राना पुरेसा कोळसा पुरवठा करण्याची मागणी करणारी सुचना मांडली. इतरही अनेक सदयांनी आपल्या सुचना मांडल्या त्यानंतर THE BANKING LAWS (AMENDMENT) BILL, 2012 आणि THE ENFORCEMENT OF SECURITY INTEREST AND RECOVERY OF DEBTS LAWS (AMENDMENT) BILL, 2012 या बिलांवर एकत्र चर्चा सुरू केली गेली. भाजपाच्या श्री पियुश गोयल यांनी सरकाच्या घाईवर टिका करत अंमलबजावणीवर अनेक प्रश्न उपस्थित केले. मात्र बिलाला पाथिंबा दर्शवला. त्यानंतर श्री भालचंद्र मुणगेकरांनीही (नॉमिनेटेड सदस्य) काही शंका व्यक्त करून पाठिंबा देणारे भाशण केले. श्री तपन कुमार सेन यांनी मात्र बिलाल विरोध केला आनि त्यांचा पक्ष या बिलाच्या विरोधात असल्याचे स्पष्ट केले. सुखेन्दु शेखर रॉय यांनी देखील बिलाला विरोध केला. त्यानंतर इतर सदस्यांनी पाठिंबा दिल्यावर दोन्ही बिले मतदानाला घेतली गेली. Banking Laws (Amendment) Bill, 2012 क्लॉज २ मंजूर झाला, क्लॉज ३ ला श्री तपन कुमार सेन यांनी अमेन्डमेन्ट दाखल केली होती ती सभागृहाने आवाजी मतदानाने नामंजूर केली आणि क्लॉज ३ मंजूर झाला. क्लूज ४ ते १३ वर कोणतीही अमेन्डमेन्ट नव्हती. क्लॉज १४ वरची अमेन्डमेन्ट श्री चिदंबरम यांनी RBI ला को-ऑपरेटिव्ह बँकांना अधिक सुरक्षा देण्याविषयी सभागृहाचे मत कळवण्याचे आश्वासन दिल्यावर विड्रॉ केली क्लॉज १५, १६ ची श्री सेन यांची अमेन्डमेन्ट आवाजी मतदानाने नामंजूर केली गेली. त्यानंतर डाव्यापक्षांनी या विधेयकाचा विरोध करत सभात्याग केला. त्यानंतर Banking Laws (Amendment) Bill, 2012 राज्यसभेत मंजूर झाले. नंतर Security Interest and Recovery of Debts Laws (Amendment) Bill, 2012 सुद्धा राज्यसभेत मंजूर झाले. त्यानंतर हे हिवाळी अधिवेशन संपल्याची घोषणा करण्यात आली.लोकसभा
प्रश्नोत्तरे आणि कार्यालयीन रीपोर्ट्स व्यतिरिक्त ११७वी घटनादूरुस्ती विधेयकावर चर्चा होताना चाललेल्या गोंधळात कामकाज अनेकदा तहकूब झाले. शेवटी लोकसभा या अधिवेशनासाठी तहकूब केली गेली आणि हिवाळी अधिवेशन संपले.आभार आणि गोषवारा!
राज्यसभेत या सत्रात काय झाले?
-- २१ नव्या मंत्र्याची ओळख, राज्यसभेच्या नव्या सेक्रेटरी जनरलचे स्वागत -- २० सत्र झाली त्यात कामकाजासाठी राखलेल्यापैकी एकूण ४० तास चर्चेविना वाया गेले -- केवळ ८ दिवशी प्रश्नोत्तरांचा तास झाला -- सदनाने दोन घटनादुरूस्ती विधेयके मंजूर केली. -- सदनाने रीटेल क्षेत्रात FDI मंजूर करण्यावर चर्चा केली आणि विरोधकांनी सादर केलेला प्रस्ताव नाकारला -- दोन नवी बिले सादर झाली आणि ८ विधेयके सदनाने मंजूर केली -- ३५ प्रायवेटमेम्बर बिले सादर झाली, त्यापैकी आयटी क्षेत्राशी संबंधित कायद्यातील बदल करण्याशी संबंधीत बिलावर चर्चा झाली तसेच ज्युडिशिअरीमध्ये इम्पिचमेन्टचा लु असताना न्यायाधिशांना घायालच्या निर्बंधांवर तसेच निवडणूक प्रक्रीयेतील आवश्यक बदलांवर चर्चा झाली -- IOA च्या तहकुबीवर एका लक्ष्यवेधी सुचनेद्वारे चर्चा झाली -- १०८ विशेष उल्लेख सादर झाले तर ३० विविध विषयांना शुन्य प्रहरात सभापतींच्या परवानगीने उठवले गेले.लोकसभेत या सत्रात काय झाले?
-- सदनाने २० दिवसांत एकूण ६१.४५ तास काम केले. -- विविध कायदे, मुद्दे, प्रश्न यावर चर्चा झाली. विधेयकांपैकी Appropriation Bill च्या निमित्ताने Supplementary Demands for Grants (General) for 2012-13 यावर सलग ४ तास ३९ मिनिटे चर्चा झाली -- या सदनात ७ नवी विधेयके मांडली गेली आणि ७ विधेयके मंजूर केली गेली ज्यात एक घटना दुरूस्ती विधेयक होते. -- कलम १८४ खाली रिटेल क्षेत्रातील FDI वर सदनाने चर्चा केली आणि विरोधकांचा प्रस्ताव नाकारला -- या सत्रात ४०० तारांकीत प्रश्न विचारले गेले त्यापैकी ४९ प्रश्नांवर तोंडी चर्चा शक्य झाली. उर्वरीत तारांकीत प्रश्नांना तसेच ४५९९ अ-तारांकीत प्रश्नांना लेखी उत्तरे दिली गेली. -- शुन्य प्रहराचा वापर करून सदस्यांनी विविध विषयांवरचे १३५ प्रश्न सदनापुढे मांडले -- स्थायी समितीने ३७ रिपोर्ट्स सदनापुढे मांडले -- कलम १९३खाली देशात युनिफॉर्म शिक्षण प्रणाली असण्याबाबत सदनाने चर्चा केली जी अजूनही पूर्ण होणे बाकी आहे -- यावय्तिरिक्त ३ लक्षवेधी सुचनांद्वारे सदस्यांनी डेगु आणि चिकनगुनियामुळे निर्माण परिस्थिती, तामिळनाडूतील नारळाच्या शेतकर्यांचे प्रश्न आणि Jute Packaging Materials (Compulsory Use) Act, 1987 ची तीव्रता कमी केल्याने उद्भवलेल्या परिस्थितीवर सदनाने चर्चा केली -- याव्यतिरिक्त इतर महत्त्वाच्या प्रश्नावर ३५ विशेष उल्लेख सादर झाले -- ४८ नवी प्रायवेट मेम्बर बिले सादर झाली. चेटक्याविरोधी बिल नाकारले गेले तर सिनियर सिटिझन्सना विशेष सुविधा देणारे विधेयक चर्चेत आहे.तसेच action plan to rehabilitate persons displaced for Pakistan या विषयावरील चर्चाही अपूर्ण राहिली -- सदनाने प्रस्तावित वेळे पैकी ५९ तास ७ मिनिटे वाया घालवली तर प्रस्तावित वेळेच्यापेक्षा अधिक थांबून त्यातील ११तास २७ मिनिटे भरून काढली.