Skip to main content

ह्या गाण्याची माहिती हवी आहे

लेखक हुप्प्या यांनी बुधवार, 28/11/2012 07:53 या दिवशी प्रकाशित केले.
गायिका कोण? गीतकार व संगीतकार कोण? चित्रपटगीत असल्यास कुठला चित्रपट? http://www.dhingana.com/rusala-kanha-song-lata-majhi-aavadti-gaani-1-ma… आठवणीतील गाणी वगैरे नेहमीची स्थळे शोधली पण काही माहिती मिळाली नाही. ह्या आल्बममधे सगळी गाणी लता मंगेशकरांनी गायली असल्याचे म्हटले आहे पण ते साफ चूक आहे. हा संग्रह म्हणजे लताबाईंची आवडती गाणी आहेत असे त्याच्य नावावरून वाटते. (हे खरे का खोटे तो मंगेशच जाणे! असो.)

वाचने 3296
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

गायिका ओळखता येत नाही. पण याच धर्तीचे एक हिंदी गाणे आठवले. देवर चित्रपटातले 'रूठे सैंया,हमारे सैंया क्यूं रूठे' हे ते गाणे. हे मात्र लता मंगेशकर यांनीच गायले आहे. अंदाजपंचे मध्ये ज्योत्स्ना भोळे,सरस्वती राणे,शांता आपटे, सुंदराबाई जाधव वगैरेंचा समावेश करता येईल.पण सुंदराबाईंना बहुतेक बाद करता येईल. रमला कुठे ग कान्हा असेही एक गीत आहे. कारकीर्दीच्या अगदी सुरुवातीला माणिक वर्मांची गाण्याची ढब आणि आवाजही थोडासा असाच होता.

ह्या गाण्याच्या गायिका वत्सला कुमठेकर आहेत.

हा संग्रह म्हणजे लताबाईंची आवडती गाणी आहेत असे त्याच्य नावावरून वाटते. (हे खरे का खोटे तो मंगेशच जाणे! असो.)
ख्ररे आहे. "माझी आवडती गाणि" अशी रेकॉर्ड (हल्लीच्या भाषेत "अलबम") आहे. त्यात लताबाईंच्या आवडीची गाणी आहेत. सगळी त्यांनी गायलेली नाहीत.