गायिका कोण?
गीतकार व संगीतकार कोण?
चित्रपटगीत असल्यास कुठला चित्रपट?
https://www.dhingana.com/rusala-kanha-song-lata-majhi-aavadti-gaani-1-m…
आठवणीतील गाणी वगैरे नेहमीची स्थळे शोधली पण काही माहिती मिळाली नाही.
ह्या आल्बममधे सगळी गाणी लता मंगेशकरांनी गायली असल्याचे म्हटले आहे पण ते साफ चूक आहे.
हा संग्रह म्हणजे लताबाईंची आवडती गाणी आहेत असे त्याच्य नावावरून वाटते. (हे खरे का खोटे तो मंगेशच जाणे! असो.)
वाचने
3318
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
आवाज लता मंगेशकर यांचा वाटला
आवाज लता मंगेशकर यांचा वाटला नाही.
फार जुने असावे
शांता आपटे किंवा शांता हुबळीकर असाव्यात बहुतेक.
?
गायिका ओळखता येत नाही. पण याच धर्तीचे एक हिंदी गाणे आठवले. देवर चित्रपटातले 'रूठे सैंया,हमारे सैंया क्यूं रूठे' हे ते गाणे. हे मात्र लता मंगेशकर यांनीच गायले आहे.
अंदाजपंचे मध्ये ज्योत्स्ना भोळे,सरस्वती राणे,शांता आपटे, सुंदराबाई जाधव वगैरेंचा समावेश करता येईल.पण सुंदराबाईंना बहुतेक बाद करता येईल.
रमला कुठे ग कान्हा असेही एक गीत आहे.
कारकीर्दीच्या अगदी सुरुवातीला माणिक वर्मांची गाण्याची ढब आणि आवाजही थोडासा असाच होता.
स्व संपादन
स्वसंपादनाची सुविधा कधी मिळणार?
हा चंपुताईंचा आवाज आहे.
हा चंपुताईंचा आवाज आहे. म्हणजे हिराबाई बडोदेकर.
यक्दम्म बरोबर!!!!
In reply to हा चंपुताईंचा आवाज आहे. by गौरीबाई गोवेकर
हिराबाइन्चाच अवाज आहे हा!!
कै च्य कै !
ह्या गाण्याच्या गायिका वत्सला कुमठेकर आहेत.
माझी आवडती गाणि - भाग एक
ख्ररे आहे. "माझी आवडती गाणि" अशी रेकॉर्ड (हल्लीच्या भाषेत "अलबम") आहे. त्यात लताबाईंच्या आवडीची गाणी आहेत. सगळी त्यांनी गायलेली नाहीत.