हल्ली संध्यकाळी मस्त गार वारे सुटतायत. असच अचानक त्या दिवशी ते सूर पुन्हा मनात घुमू लागले. आतल्या आवाजामुळे त्या संध्येचे रंग अजून खुलू लागले. मला संगीतातलं शास्त्र खरच कळत नाही पण हि सुरावट माझ्या मनात एकदम पक्कं घर करून राहिलिये. शाळा-कॉलेज च्या वयात असताना फिल्मी गाणी, खास करून हिंदी ऐकायची खूप सवय पण फार तर फार समजले तर शब्द कळणार. आणखी गाण्यात काय ऐकण्यासारखं असत? असं मला वाटायचं . आता एक-दोन वर्षापूर्वी थोडी थोडी मराठी गाणी ऐकायला लागलो .
मराठी वाहिनीवर आलेल्या एका प्रसिद्ध स्पर्धेत तर अजून बरीच गाणी ऐकायला मिळाली. त्यातूनच ऐकायची सवय लागली, आणि प्रश्न पडू लागले का लोकं मधेच गाण्याला दाद देतात? वाहवा आणि मधेच टाळया का पडतात ?
ह्या प्रश्नांमुळे गाणी अजूनच बारकाईने ऐकू लागलो . हळू-हळू रोजची सवयच पडली आणि उगाचच कधीही न उघडलेले pc मधले फोल्डर उघडू लागलो. भक्ती संगीत , नाट्य संगीत प्रकार ऐकू लागलो . लहानपणी भीमसेन जींचे बरेच अभंग ऐकलेले होते. पण फक्त ते आवाज कानावर पडायचे त्यातून न भक्ती न अर्थ काहीच कळायच नाही. पण तेव्हा ऐकलेले असल्यामुळे आता पुन्हा ऐकताना वेगळच जाणवू लागल.
भीमसेनजींचे दोन अभंग मला फारच आवडले. एक "अधिक देखणे तरी" आणि दुसरा "नामाचा गजर गर्जे भीमातीर". पुन्हा पुन्हा ऐकून असं जाणवू लागलं कि ह्या दोन अभंगांमध्ये काहीतरी साम्य आहे, पण ते काय आहे ते लक्ष्यात येत नव्हत. मग विचार आला कि आंतरजालाचा वापर करून बघूया आणि ह्या दोन अभंगांची माहिती मिळते का ते पाहिलं . एका संकेत स्थळावर माहिती भेटली ती म्हणजे अशी कि त्यांच्यात एक साम्य आहे -- राग . हा राग आहे "यमन "(आपल्यापैकी बर्याच जणांना माहित असलेच ) . अजून माहिती घेतली कि, हा राग म्हणजे काय प्रकार असतो. पुन्हा पुन्हा youtube वरचे video बघितले . आणि हळू हळू फक्त तेवढेच सूर मनात पक्के होत गेले. आणखी शोध घेत गेलो आणि लक्षात आल कि जवळपास बऱ्याचश्या प्रसिद्ध गाण्यांमध्ये यमन भरून राहिला आहे!!!
शास्त्रीय संगीतात बर्याचदा पहिला राग यमनच शिकवतात आणि योगायोगाने मी ऐकलेला (मला कळलेला असं म्हणणार नाही)राग यमनच आहे हे समजल्यावर फारच आनंद झाला .
शास्त्रीय माहितीतून काही थोड्याफार गोष्टी समजल्या.
यमन हा फार जुना राग आहे किती ते माहित नाही.
काही ठिकाणी ह्याला राग कल्याणी असाही ओळखलं जात.
यमन एक थाट राग आहे म्हणजे ह्यात सर्व सूर असतात.
आरोह : नि रे ग म ध नि सा
अवरोह : सा नि ध प म ग रे सा
संध्याकाळीच हा राग का आठवतो त्याचंसुद्धा कारण कळलं, त्याचा प्रहर संध्याकाळचा आहे!!!
मला या रागात आवडलेलं नाट्यसंगीत म्हणजे भीमसेनजींनी गायलेलं "राधाधरमधुमिलिंद जयजय "(खाली दुवा देत आहे )
http://www.youtube.com/watch?v=OMoJck-Gcdw
तसच संजीव अभ्यंकर यांच्या आवाजतली बंदिश "एरी आरी पिया बिन "
http://www.youtube.com/watch?v=TmKMG0F2V-I
या रागाबद्दलच्या सोप्प्या माहितीसाठी - video (http://www.youtube.com/watch?v=cENz3lPRcPU)
आणखी सुद्धा दुसरे राग ऐकायचा नि समजायचा प्रयत्न केला पण जितका सहज यमन मनात बसला आहे तितका सहज दुसरा कोणता राग कळतच नाही!!! मी ह्या रागाबद्दल लिहिण म्हणजे लहान तोंडी मोठा घास आहे पण गाण्यातल काहीतरी मला कळलं आणि ते आपल्यासोबत share करायच होत. वरील लिखाणात काही शास्त्रीय चुका असतील तर क्षमा करून जाणकारांनी त्या सुधारून द्याव्या अशी विनंती आणि आपल्या सुद्धा यमन रागाबद्दल काही अश्याच आठवणी असतील तर नक्की टंका .....
:) :) :)
वाचने
9775
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
राधाधरमधुमिलिंद जयजय
यमन हा थाट ?
In reply to राधाधरमधुमिलिंद जयजय by चेतन माने
चांगला प्रयत्न आहे
माहिती खातर .... गंमतीखातर
कुछ नयाँ
आवडले लेखन
तात्याची आठवण आली.
धन्यवाद
In reply to तात्याची आठवण आली. by कलंत्री
सुधीर फडके
सुधीर फडके यांनी यमन वापरलाच आहे
In reply to सुधीर फडके by रमेश आठवले
निर्णायक मत
In reply to सुधीर फडके यांनी यमन वापरलाच आहे by स्वानंद वागळे
यमन
अजुन १
मेहदी हसन
यमन विषयी सर्व काही
छान
सर्वच प्रतिसादांबद्दल धन्यवाद
लेख आणि लेखविषय आवडला
हा घ्या
In reply to लेख आणि लेखविषय आवडला by बहुगुणी
एक सुधारणा
यमन ऐकायचा असेल तर
यमन रागातल मला सगळ्यात जास्त
यमन
वेचक यमन
कौतुकास्पद !!
सुरेख.
यमन - आठवणीतली गाणी