✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मदत करा......

म
माम्लेदारचा पन्खा यांनी
Wed, 11/21/2012 - 10:49  ·  लेख
लेख
मिपाकरहो ,एका जवळच्या मित्राचे पुढच्याच आठवड्यात लग्न आहे. उखाणे घेण्याच्या बाबतीत त्याने माझ्याकडे मदत मागितली आहे. मी मिपा शिवाय कोणाकडे मदत मागणार? मुलींचे उखाणे र ला र ,ट ला ट लावून कसेतरी करता येतात. ह्या बाबतीत मुलांची विकेटच पडते. तुमची सगळी कल्पनाशक्ती पणाला लावून काहीतरी वेगळे उखाणे सांगा मुलांसाठी.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9644 वाचन

💬 प्रतिसाद (40)

प्रतिक्रिया

उखाणे

श्री गावसेना प्रमुख
Wed, 11/21/2012 - 10:58 नवीन
उखाणे उखाणे हे चालतील का?
  • Log in or register to post comments

हा घ्या!

स्पंदना
Wed, 11/21/2012 - 17:13 नवीन
हा घ्या! आला आला वाघ....खातोय काय? +++++च नाव घ्यायला भितोय काय?
  • Log in or register to post comments

उखाणे

कपिलमुनी
गुरुवार, 11/22/2012 - 18:16 नवीन
ट ला ट.. ड ..ढ .. रस्त्यावर पान खाउन नका थुंकू.. आणि +++ लावते माझ्या नावाचं कुंकू :P
  • Log in or register to post comments

बगतूस काय माकडा रागानं

काळा पहाड
Fri, 11/23/2012 - 00:12 नवीन
बगतूस काय माकडा रागानं *** बरूबर लगीन केलया वागानं
  • Log in or register to post comments

काही लिंका आहेतच पण हे माझे

सुहास..
Fri, 11/23/2012 - 00:20 नवीन
काही लिंका आहेतच पण हे माझे दोन पैसै ! ( पण लई कामाचा आहे .) नावाची काय बिषाद आणि ** माझ्या खिशात ;)
  • Log in or register to post comments

ए मी पण मी पण

जेनी...
Fri, 11/23/2012 - 00:31 नवीन
ए मी पण मी पण इवल्या इवल्या हरणाचे वाकडे तिकडे पाय इवल्या इवल्या हरणाचे वाकडे तिकडे पाय ****** अजुन उठली नै , घोरत पडलिय कि काय ... ;)
  • Log in or register to post comments

१ लंबर

काळा पहाड
Fri, 11/23/2012 - 07:21 नवीन
१ लंबर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

(No subject)

श्री गावसेना प्रमुख
Fri, 11/23/2012 - 08:35 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

पहिली गंगू दुसरी पारू तिसरी

काळा पहाड
Fri, 11/23/2012 - 07:17 नवीन
पहिली गंगू दुसरी पारू तिसरी मनी सोडल्या तिघी नी झालो +++ चा धनी
  • Log in or register to post comments

गच्चीवर गच्ची सिमेंटची गच्ची,

काळा पहाड
Fri, 11/23/2012 - 07:24 नवीन
गच्चीवर गच्ची सिमेंटची गच्ची, +++ आहे मोठी लुच्ची
  • Log in or register to post comments

काही नावे अशीही......

ज्ञानराम
Fri, 11/23/2012 - 10:32 नवीन
१. जर मुलगा Food Industry मधे कामाला असेल तर अस नाव घेऊद्या..... पार्लेची बिस्किटे , बेडेकरचा मसाला. ****** नाव घ्यायला उशीर लाऊ कशाला... २. जर मुलगा NRI असेल तर अस नाव घेऊद्या..... चिनचा कप , अमेरीकेची बशी ***** सोडली तर , बाकी सगळ्या म्हशी ( हे नाव रिस्क पतकरायची असल्यास घेऊ शकतात...) 3. जर मुलगा CA/Accountant असेल तर अस नाव घेऊद्या.... Audit च्या दिवशी भेट आमची झाली ... ******* ला पाहताच balancesheet झाली Tally... 4. जर मुलगा Doctor/Pharmaceutical असेल तर अस नाव घेऊद्या.... धन्वनंतरीच्या आशिर्वादाने , चालूदे जोरात क्लिनीक ... ******* च हास्य म्हणजे , आयुश्यभराच Tonic. 5. जर मुलगा Truck Driver असेल तर अस नाव घेऊद्या.... बुरी नझर वाले , तेरा मूह काला, मि किशोर आणी ****** माझी मधूबाला... ६. जर मुलगा वकिल असेल तर अस नाव घेऊद्या.... गितेवर हात ठेवतो ... खोट कधी बोलणार नाही.. ****** आहे माझी केस , तिला जिंकल्या शिवाय राहणार नाही ७. जर मुलगा लेखक असेल.... शाईचा पेन त्यात.. Camel ची शाई ... ***** ला पाहीलं , आणी केली लग्नाची घाई . ८. जर तो क्रिकेटर असेल तर... cricketchya धावपट्टीवर, शतकं सचीनची घडली ****** शी लग्न झालं , आता विकेट माझी पडली... ..... ९. जर मुलगा politics मधला असेल... आश्वासन देतो आज , खोट कधी बोलणार नाही... घड्याळयाची शपथ , हात ***** सोडणार नाही.... .....
  • Log in or register to post comments

गितेवर हात ठेवतो ... खोट कधी

श्री गावसेना प्रमुख
Fri, 11/23/2012 - 10:37 नवीन
गितेवर हात ठेवतो ... खोट कधी बोलणार नाही.. ****** आहे माझी केस , तिला जिंकल्या शिवाय राहणार नाही Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानराम

आयला एक नंबर उखाणे!!!!

बॅटमॅन
Fri, 11/23/2012 - 12:14 नवीन
आयला एक नंबर उखाणे!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानराम

मदत हवी......

अमोल केळकर
Fri, 11/23/2012 - 11:04 नवीन
यापुढे मी कधीच मागणार नाही मदत +++ आली आयुष्यात अन बदलले माझे दैवत
  • Log in or register to post comments

झक्कास

RUPALI POYEKAR
Fri, 11/23/2012 - 12:11 नवीन
झक्कास
  • Log in or register to post comments

आयला एक नंबर उखाणे!!!! . ....

ज्ञानराम
Fri, 11/23/2012 - 12:21 नवीन
आयला एक नंबर उखाणे!!!! . .....,?>>>>>> धन्यवाद :)
  • Log in or register to post comments

आई तुझं लेकरू, येडं ग कोकरू

खटासि खट
Fri, 11/23/2012 - 12:22 नवीन
आई तुझं लेकरू, येडं ग कोकरू लग्नात हसतंय, क्षक्षक्षला फसलंय सांग मी काय करू ?
  • Log in or register to post comments

हम्म...

दादा कोंडके
Fri, 11/23/2012 - 13:50 नवीन
समोरच्या कोनाड्यात उभी हिंदमाता.... ____चं नाव घेतो माझा नंबर पैला.
  • Log in or register to post comments

हा हा हा.....!!!

विजय मुठेकर
Mon, 11/26/2012 - 10:25 नवीन
ग्रेट पुलं......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

डॉक्टर मुलासाठी :

इष्टुर फाकडा
Fri, 11/23/2012 - 14:24 नवीन
काळा काळा माठ, माठात चंदनी वाळा... काळा काळा माठ, माठात चंदनी वाळा... आणि क्ष्क्ष चं नाव घेतो, पाणी गाळा आणि नारू टाळा :)
  • Log in or register to post comments

देवगडचा अंबा,गोव्याचा काजू

अत्रुप्त आत्मा
Fri, 11/23/2012 - 14:47 नवीन
देवगडचा अंबा,गोव्याचा काजू ------चं नाव घ्यायला मी कशाला लाजू...? ;-)
  • Log in or register to post comments

देवगडचा 'अंबा' ?

सूड
Fri, 11/23/2012 - 14:53 नवीन
देवगडचा 'अंबा' ? आंबा म्हणायचंय का गुर्जी? बाकी लाजू नका. चांगला मोठ्यांदा घ्या उखाणा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

मग नका लाजू . .

ज्ञानराम
Fri, 11/23/2012 - 14:48 नवीन
मग नका लाजू . .;)
  • Log in or register to post comments

मग नका लाजू . .:

ज्ञानराम
Fri, 11/23/2012 - 14:49 नवीन
मग नका लाजू . .:;) आमच्या वहिनीच नाव घेऊन टाका चला
  • Log in or register to post comments

१.

मृत्युन्जय
Fri, 11/23/2012 - 14:54 नवीन
१. माठावर माठ बशीवर बशी, माझी ****** सोडुन बाकी सगळ्या म्हशी २. बाटलीवर बाटली खोक्यावर खोका ********** माझी मांजर मी तिचा बोका
  • Log in or register to post comments

सोडुन बाकी सगळ्या म्हशी

श्री गावसेना प्रमुख
Fri, 11/23/2012 - 15:00 नवीन
सोडुन बाकी सगळ्या म्हशी माझी मांजर मी तिचा बोका Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

देवगडचा रवा,गोव्याचा खवा

श्री गावसेना प्रमुख
Fri, 11/23/2012 - 14:56 नवीन
देवगडचा रवा,गोव्याचा खवा नाव नाय घ्यायच आता तुम्ही जावा
  • Log in or register to post comments

चौसोपी वाडा

सूड
Fri, 11/23/2012 - 15:03 नवीन
चौसोपी वाडा वाड्याच्या मागं ओढा ओढ्यात मासोळ्या सोनेरी निळ्या एक मासोळी गावली हसत हसत म्हणाली "काय तुला देऊ?" म्हणलं,"दिपीका गेलीय दौर्‍यावर आता कुणाकडं पाहू?" -(अगदी खरे)
  • Log in or register to post comments

मस्तच...

ज्ञानराम
Fri, 11/23/2012 - 16:17 नवीन
मस्तच...
  • Log in or register to post comments

हा घ्या अजून १

लीलाधर
Mon, 11/26/2012 - 09:37 नवीन
!!! गणपतीला वाहतो चांदीच्या २१ दूर्वा, ........ चं नाव घेतो पूढचा उखाणा ठरवा !!! :)
  • Log in or register to post comments

अजून एक..

अमितसांगली
Mon, 11/26/2012 - 10:45 नवीन
अग माझ्या लाडाची ... तुला देतो लॉटरीचा पैसा पैश्याने गोव्याला जायच जाताना दोघ, येताना तिघ..
  • Log in or register to post comments

लॉटरी किती लाखाची लागलीय नाही

श्री गावसेना प्रमुख
Mon, 11/26/2012 - 12:49 नवीन
लॉटरी किती लाखाची लागलीय नाही म्हणजे वर्षभर रहाव लागेल ना तिथे. दत्तकच घेणार बाळाला कि असतांनाच जाणार गोव्याला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितसांगली

सोन्याची सायकल

भिकापाटील
Mon, 11/26/2012 - 11:11 नवीन
सोन्याची सायकल तिला चांदीची किटली ***** कितीही नटली तरी मला नाही पटली... ;)
  • Log in or register to post comments

दिवसोंदीवस वाढत चाल्लीये

शैलेन्द्र
Mon, 11/26/2012 - 18:04 नवीन
दिवसोंदीवस वाढत चाल्लीये महागाई; __ ल म्हणाव, संसार नीट कर बाई..
  • Log in or register to post comments

मिसळी बरोबर खावा नेहमी पाव

सुकामेवा
Wed, 11/28/2012 - 14:55 नवीन
मिसळी बरोबर खावा नेहमी पाव, **** चे नाव घ्यायला लाजू कशाला राव.......................
  • Log in or register to post comments

??

परिकथेतील राजकुमार
Wed, 11/28/2012 - 15:10 नवीन
मित्राला उखाण्या पुरतीच मदत हवी आहे का ?
  • Log in or register to post comments

त्यांच्या मित्राच लग्न

श्री गावसेना प्रमुख
Wed, 11/28/2012 - 15:10 नवीन
त्यांच्या मित्राच लग्न एव्हाना झालही असेल कारण त्यांनी पुढच्या आठवड्यात आहे असे सांगीतले होते ना(मा.पंखा साहेब काय बर नाव घेतलय तुमच्या मित्रान)
  • Log in or register to post comments

अस्सल मराठी

अभ्या..
गुरुवार, 11/29/2012 - 01:43 नवीन
मुलींचे उखाणे र ला र ,ट ला ट लावून कसेतरी करता येतात.
हा बघा मग अस्सल मराठी वानवळा फक्त नवरीने असला एखादा उखाना घेतला तरच तुमच्या मित्राला मदत करा नायतर हायेच की ट ला ट. सारवून सुरवून केला पोळा पंचमीनं उघडला डोळा पंचमीची काढते चितरं आली म्हाळाची पितरं म्हाळाची निवडते डाळ आली घटाची माळ घटाचे घेते सोनं पाडव्याने केलं येणं पाडवा घेतो झोंबी शिमगा देतो लोंबी शिमग्याची करते खीर शिंपण्याला नाही धीर दिवाळीची घेते पणती संक्रांत आली नेणती संक्रातीला पुजते करा ---------नांव घेते बेंदरापत्तुर धीर धरा.
  • Log in or register to post comments

हा घ्या

तिरकीट
गुरुवार, 11/29/2012 - 01:54 नवीन
आयुष्य खूप सुंदर आहे ते अजून सुंदर बनवणार या पूढचे सगळे उखाणे माझ्यावतीने ------घेणार
  • Log in or register to post comments

सगळ्यांना उत्तम प्रतिसादाबद्दल धन्स

माम्लेदारचा पन्खा
गुरुवार, 11/29/2012 - 21:05 नवीन
तुम्ही तुमच्या परीने मदत केली... मी माझ्याकडून उखाणे लिहून पाठवले... आजच मित्राचे शुभमंगल झाले....आम्ही जेवण चेपले.... पण त्याने उखाणे घ्यायच्या ऐन वेळी माती खाल्ली.... असो.....दैव देते आणि कर्म नेते.....दुसरे काय?
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा