Skip to main content

मदत करा......

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी बुधवार, 21/11/2012 10:49 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरहो ,एका जवळच्या मित्राचे पुढच्याच आठवड्यात लग्न आहे. उखाणे घेण्याच्या बाबतीत त्याने माझ्याकडे मदत मागितली आहे. मी मिपा शिवाय कोणाकडे मदत मागणार? मुलींचे उखाणे र ला र ,ट ला ट लावून कसेतरी करता येतात. ह्या बाबतीत मुलांची विकेटच पडते. तुमची सगळी कल्पनाशक्ती पणाला लावून काहीतरी वेगळे उखाणे सांगा मुलांसाठी.

वाचने 9665
प्रतिक्रिया 40

प्रतिक्रिया

हा घ्या! आला आला वाघ....खातोय काय? +++++च नाव घ्यायला भितोय काय?

ट ला ट.. ड ..ढ .. रस्त्यावर पान खाउन नका थुंकू.. आणि +++ लावते माझ्या नावाचं कुंकू :P

ए मी पण मी पण इवल्या इवल्या हरणाचे वाकडे तिकडे पाय इवल्या इवल्या हरणाचे वाकडे तिकडे पाय ****** अजुन उठली नै , घोरत पडलिय कि काय ... ;)

१. जर मुलगा Food Industry मधे कामाला असेल तर अस नाव घेऊद्या..... पार्लेची बिस्किटे , बेडेकरचा मसाला. ****** नाव घ्यायला उशीर लाऊ कशाला... २. जर मुलगा NRI असेल तर अस नाव घेऊद्या..... चिनचा कप , अमेरीकेची बशी ***** सोडली तर , बाकी सगळ्या म्हशी ( हे नाव रिस्क पतकरायची असल्यास घेऊ शकतात...) 3. जर मुलगा CA/Accountant असेल तर अस नाव घेऊद्या.... Audit च्या दिवशी भेट आमची झाली ... ******* ला पाहताच balancesheet झाली Tally... 4. जर मुलगा Doctor/Pharmaceutical असेल तर अस नाव घेऊद्या.... धन्वनंतरीच्या आशिर्वादाने , चालूदे जोरात क्लिनीक ... ******* च हास्य म्हणजे , आयुश्यभराच Tonic. 5. जर मुलगा Truck Driver असेल तर अस नाव घेऊद्या.... बुरी नझर वाले , तेरा मूह काला, मि किशोर आणी ****** माझी मधूबाला... ६. जर मुलगा वकिल असेल तर अस नाव घेऊद्या.... गितेवर हात ठेवतो ... खोट कधी बोलणार नाही.. ****** आहे माझी केस , तिला जिंकल्या शिवाय राहणार नाही ७. जर मुलगा लेखक असेल.... शाईचा पेन त्यात.. Camel ची शाई ... ***** ला पाहीलं , आणी केली लग्नाची घाई . ८. जर तो क्रिकेटर असेल तर... cricketchya धावपट्टीवर, शतकं सचीनची घडली ****** शी लग्न झालं , आता विकेट माझी पडली... ..... ९. जर मुलगा politics मधला असेल... आश्वासन देतो आज , खोट कधी बोलणार नाही... घड्याळयाची शपथ , हात ***** सोडणार नाही.... .....

In reply to by ज्ञानराम

गितेवर हात ठेवतो ... खोट कधी बोलणार नाही.. ****** आहे माझी केस , तिला जिंकल्या शिवाय राहणार नाही 1

यापुढे मी कधीच मागणार नाही मदत +++ आली आयुष्यात अन बदलले माझे दैवत

समोरच्या कोनाड्यात उभी हिंदमाता.... ____चं नाव घेतो माझा नंबर पैला.

काळा काळा माठ, माठात चंदनी वाळा... काळा काळा माठ, माठात चंदनी वाळा... आणि क्ष्क्ष चं नाव घेतो, पाणी गाळा आणि नारू टाळा :)

मग नका लाजू . .:;) आमच्या वहिनीच नाव घेऊन टाका चला

१. माठावर माठ बशीवर बशी, माझी ****** सोडुन बाकी सगळ्या म्हशी २. बाटलीवर बाटली खोक्यावर खोका ********** माझी मांजर मी तिचा बोका

चौसोपी वाडा वाड्याच्या मागं ओढा ओढ्यात मासोळ्या सोनेरी निळ्या एक मासोळी गावली हसत हसत म्हणाली "काय तुला देऊ?" म्हणलं,"दिपीका गेलीय दौर्‍यावर आता कुणाकडं पाहू?" -(अगदी खरे)

!!! गणपतीला वाहतो चांदीच्या २१ दूर्वा, ........ चं नाव घेतो पूढचा उखाणा ठरवा !!! :)

अग माझ्या लाडाची ... तुला देतो लॉटरीचा पैसा पैश्याने गोव्याला जायच जाताना दोघ, येताना तिघ..

In reply to by अमितसांगली

लॉटरी किती लाखाची लागलीय नाही म्हणजे वर्षभर रहाव लागेल ना तिथे. दत्तकच घेणार बाळाला कि असतांनाच जाणार गोव्याला

सोन्याची सायकल तिला चांदीची किटली ***** कितीही नटली तरी मला नाही पटली... ;)

मित्राला उखाण्या पुरतीच मदत हवी आहे का ?

त्यांच्या मित्राच लग्न एव्हाना झालही असेल कारण त्यांनी पुढच्या आठवड्यात आहे असे सांगीतले होते ना(मा.पंखा साहेब काय बर नाव घेतलय तुमच्या मित्रान)

मुलींचे उखाणे र ला र ,ट ला ट लावून कसेतरी करता येतात.
हा बघा मग अस्सल मराठी वानवळा फक्त नवरीने असला एखादा उखाना घेतला तरच तुमच्या मित्राला मदत करा नायतर हायेच की ट ला ट. सारवून सुरवून केला पोळा पंचमीनं उघडला डोळा पंचमीची काढते चितरं आली म्हाळाची पितरं म्हाळाची निवडते डाळ आली घटाची माळ घटाचे घेते सोनं पाडव्याने केलं येणं पाडवा घेतो झोंबी शिमगा देतो लोंबी शिमग्याची करते खीर शिंपण्याला नाही धीर दिवाळीची घेते पणती संक्रांत आली नेणती संक्रातीला पुजते करा ---------नांव घेते बेंदरापत्तुर धीर धरा.

आयुष्य खूप सुंदर आहे ते अजून सुंदर बनवणार या पूढचे सगळे उखाणे माझ्यावतीने ------घेणार

तुम्ही तुमच्या परीने मदत केली... मी माझ्याकडून उखाणे लिहून पाठवले... आजच मित्राचे शुभमंगल झाले....आम्ही जेवण चेपले.... पण त्याने उखाणे घ्यायच्या ऐन वेळी माती खाल्ली.... असो.....दैव देते आणि कर्म नेते.....दुसरे काय?