स्वप्नातली फुले ती, सत्यात कां न दिसली?
मज जाग जरा येता, ती रात कां हरवली?
रात्रीत प्यायले होते, मी अश्रु यक्षीणीचे
विरही व्यथेत ओले, मृदुगंध पापणीचे
येता रवी उदयास, ती आसवेही सुकली
मज जाग जरा येता, ती रात का हरवली?
होता मनात माझ्या, कोपरा उजळला एक
कवडसे नृत्य करीत, लयबद्धसे सुरेख
ती उजळताच प्राची, सावली अंतरी धरली
मज जाग जरा येता, ती रात का हरवली?
मज सूर गवसला जो, कोठे हवेत विरला?
ती साद ऐकू ये ना, स्वप्नील भाव सरला
जाणीव करूनी सुन्न, जाणीव कां परतली?
मज जाग जरा येता, ती रात का हरवली?
पाहीले रुप सुंदर, तव नयनी मी बुडालो
मी गमविले स्वतःला, माझाच मी न उरलो
अस्तीत्व कां मिळाले? कां झोप ती उघडली?
मज जाग जरा येता, ती रात का हरवली?
स्वप्नामधील सत्य, गवसेल कधी कोणां?
कधी बंद होई वेडा, जागेपणाचा बहाणा?
झोपेत जगूनी नंतर, ती धुंदी कां उडाली?
मज जाग जरा येता, ती रात का हरवली?
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3853
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर कविता.
धन्यवाद
In reply to सुंदर कविता. by रामदास
सुंदर
धन्यवाद
In reply to सुंदर by श्रीकृष्ण सामंत
सुंदर काव्य रचना
स्वप्नामध
सुरेख..
अरुणजी
चित्रदर्शी
+१ हेच म्हणतो
In reply to चित्रदर्शी by बेसनलाडू
पाहीले रुप सुंदर
झकास!!
सुन्दर
सुरेख