Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by विकास on Tue, 11/20/2012 - 20:12
गेल्या आठवड्यात भाउबीजेच्या मागे-पुढे जेंव्हा बाळासाहेबांच्या प्रकृतीबद्दल शेवटची काळजी वाटणे चालू झाले तेंव्हा (केवळ माध्यमात वाचल्यावरूनच, जास्त कल्पना नाही) थोडेफार बंदसदृश प्रकाराचे केलेले समर्थन आणि काल-परवा पालघरला घडलेला प्रसंग सोडल्यास जे काही शिस्तीत पार पडले ती काही सामान्य बाब नव्हती. आता हे सर्वशृत झाले आहे की मुंबईच्या इतिहासात लोकमान्य टिळकांच्या नंतर सार्वजनिक ठिकाणि अंत्यसंस्कार झालेले बाळासाहेब हे दुसरे व्यक्तीमत्व ठरले. अर्थातच दोन्हींच्या संदर्भात तसे होण्याचे कारण एकच होते, प्रचंड जनस्मुदाय असलेली ही अंत्ययात्रा. कालच्या रविवारी मुंबईत केवळ या अंत्ययात्रेत भाग घेण्यास वीस लाखांचा समुदाय सामील झाला. या संदर्भात अमिताभचे ट्वीटरवरील खालील वक्तव्य वाचण्यासारखे होते:
Mumbai was never, ever, in my 45 years here, been as quiet, disciplined and peaceful, as today !! The silence from the 2 million gathered at Shivaji Park during the last rites, demonstrated two things - the respect for Bala Saheb Thackeray and secondly the deep ingrained culture of the Maharashtrian ... 'sanskaar' !!!
गेले दोन-चार दिवस बरेव काही माध्यमांमधून वाचले, पण एक भाईंदरची दुर्दैवी आणि अयोग्य घटना आणि त्यावर पोलीस कसे चुकले हे छापल्याचे सोडल्यास एकाही माध्यमाला पोलीसांची, राज्यकर्त्यांची, शिवसेनेच्या नेतृत्वाची आणि २० लाखाच्या घरात जमलेल्या तमाम जनते बद्दल काहीच (किमान ठळकपणे) लिहावेसे वाटले नाही याचा खेद वाटला. अमिताभने पोलीसांचे आणि जनतेचे/शिवसैनिकांचे कौतुक केले आहेच. पण ते वाचताना येथे देखील त्याचा पुनरुच्चार करावासा वाटला. त्याच संदर्भात मला वाटले, यातील प्रत्येक जबबदारी असलेल्या व्यक्तीकडून सर्व बरोबर/परफेक्ट अथवा प्रोफेशनली झाले असेल असे माझे म्हणणे अथवा दावा नाही. किंबहूना प्रकृती गंभीर असताना शिवसेनेच्या जबाब्दार व्यक्तींकडून जनतेशी सातत्याने योग्य संवाद साधायला हवा होता असे वाटते खरे, पण... आज लक्षात रहाताना काय राहीले?
  1. निधनसमयी ठाकरे कुटूंबिय आणि शिवसेना नेतृत्वाने दाखवलेला संयम... (उद्धव यांच्यावर पण गेल्या १-२ आठवड्यातच कधीतरी अँजिओप्लास्टी झाल्याचे ऐकले होते)
  2. जे काही वाचले, निरीक्षले त्यावरून दिसले ते वैचारीक दृष्ट्या विरोधी सरकारशी आणि त्या सरकारने या विरोधकांशी केलेले संयामाने प्लॅनिंग
  3. दिवाळीच्या वेळचा आलेला भावनेचा पूर ओसरल्यावर शिवसैनिकांनी दाखवलेला संयम
  4. तमाम राजकीय पक्षांच्या नेत्यांनी (दिग्विजय सिंग यांनी आधी घातलेला गोंधळ सोडल्यास) केलेले संयमीत शोकसंदेश
  5. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पोलीस आणि आपत्काल स्थितीत लागणार्‍या यंत्रणांनी हा विशेष ताण ज्या पद्धतीने सहन करत सर्व सुखरूप पाडले त्या या कायदा-सुव्यवस्थेचा संयम!
हे काही सोपे काम नव्हते. बाळासाहेबांबद्दल ज्यांना आत्मियता वाटत होती त्यांचे सोडून द्या, पण ते न आवडणार्‍यांना पण, एका युगाचा अंत झाला आहे हे मान्य करावे लागत होते. यात भावना, संवेदना, वेदना, राजकीय आणि वैचारीक या सर्व संबधातील सर्वच परस्परविरोधाने भरलेले ठासून भरलेले होते. म्हणून याचे अधिक महत्व. पण तरी देखील सर्वच बाजूने संयम पाळला गेला. त्याबद्दल समाजाच्या सर्वच घटकांना सलाम आणि हा संयम ही नवीन युगाची नांदी ठरोत ही शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
  • 11949 views

प्रतिक्रिया

Submitted by श्री गावसेना प्रमुख on गुरुवार, 11/22/2012 - 16:15

In reply to असे धागे by तिमा

Permalink

संयम ठेवा हो (हे सुद्धा

संयम ठेवा हो (हे सुद्धा तिरशिंगरावांनी सांगावे का)
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on गुरुवार, 11/22/2012 - 16:00

Permalink

हेच खरं

तुम्ही त्यांचा द्वेष करु शकता किंवा प्रेम (आदर) करु शकता पण त्यांना टाळू (वगळू ) शकत नाही ईतके मान्य केले हिच माफक अपेक्शा...
  • Log in or register to post comments

Submitted by अभिज्ञ on Fri, 11/23/2012 - 01:13

Permalink

लेखातील सर्वच मतांशी पुर्णत:

लेखातील सर्वच मतांशी पुर्णत: सहमत आहे. सर्वसाक्षी ह्यांनी दिलेला प्रतिसाद सुध्दा आवडला. एखादी प्रसिध्द व लोकप्रिय व्यक्ती निधन पावल्यानंतर तिच्या प्रशंसकांनी व समर्थकांनी गोंधळ घालणे हि घटना भारताला नवी नाहीच. अशा घटना घडल्यानंतर शोकाकुल जमावाची प्रतिक्रिया काय असु शकते ह्याबद्दल काहिहि अंदाज बांधणे कठीण असते. जालावर फ़ेरफ़टका मारताना हा धागा वाचनात आला. http://m.firstpost.com/bollywood/indiaterrible-place-for-celebrities-to-die-in-92230.html?page=2 प्रसिध्द कन्नड अभिनेते व सर्व कन्नडिगांना आपले तारणहार वाटणारे श्री.डो.राजकुमार ह्यांच्या निधनाने बंगळुरात काय परिस्थिती निर्माण झाली होती? जाळपोळ, दंगली, लाठीमार, २३ जणांचा बळी ..वगैरे वगैरे हे सर्व अंत्यसंस्काराच्या दरम्यान घडले होते. डो.राजकुमार हे तर फ़क्त अभिनेते होते व राजकारणाशी संबधित नव्हते. तरी देखील ही अवस्था. ह्या उपर विख्यात तमिळ अभिनेते/ नेते MGR ह्यांचे निधन झाल्यावर चेन्नईत अभुतपुर्व परिस्थिती निर्माण झाली होती, ह्या लेखात ह्याचे वर्णन असे आहे.. But nothing could match the 'grief' when Tamil Nadu's filmstar-turned-politician MG Ramachandran died --- of natural causes. Says Puratchithalaivar.org "His death sparked off an inexplicable frenzy of looting and rioting all over the state of Tamil Nadu. Shops, movie theaters, buses and other public and private property became the target of wanton violence let loose all over the state. The situation became so hopeless that the police had to resort issuing shoot-at-sight orders, something seldom seen or heard of in democratic India. सर्व पार्श्वभुमीवर मुंबईत बाळासाहेबांच्या अंत्यसंस्कारा दरम्यान महाराष्टियन जनतेने दाखवलेला संयम, पोलिसांनी हाताळलेली परिस्थिती, निश्चितच कौतुकास पात्र आहेत. महत्वाचे म्हणजे इतर वेळा बाळासाहेबांवर सतत भुंकत राहणा-या हिंदी मिडियाने बाळगलेला संयम जास्त महत्वाचा. हिंदी माध्यमांच्या बालिश व भडकावू विधानाने २० लक्ष लोकांच्या उपस्थितीत मुंबैत देखील अभुतपुर्व परिस्थिती निर्माण झाली असती. सुदैवाने तसे काहि घडले नाही हिच समाधानाची बाब म्हणावी लागेल.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com