Skip to main content

मैत्री

Published on बुधवार, 21/11/2012
"भावना" आणी "नाती" बदलतात का ? जसे ॠतू बदलतात ? जसी माणसे बदलतात .! का ति बदलून हि ह्र्द्यात जस्सीच्या तस्सी राहतात ...? Graduation सम्प्ल्यानन्तर सारेजण आपापल्या रस्त्याने गेले.. एक जण bank manager ,एक जण engineer - अमेरिकेत , एक जण "यशदा " मधे UPSC ची तयारी...! एक जण PSI ! आणी एक जण MPSC ची तयारी ! - अन तयारी करत असताना "गाव कामगार तलाठि" ..! काल सर्वच भेटले..कोलेजात असताना चहा किवा नाश्त्याचे पैसे देताना कधीच दुरावा वाट्ला नाहि..पण काल " Teachers " विकत घेताना जो दुरावा जानवला..तो मनात काहुर माजवनारा ....त्या वेळि सग्ळ्याची लायकि सारखीच होती..आत्ता पगारात लायकि वाटली गेली..! Alcohol शरीरात गेल्यानन्तर जुन्या आठ्वणी...आणि जेव्हा वर्तमानात आलो तेव्हा आपापले Frustrations ! Dy. Collector बनन्याचे स्वप्न बघुन "गाव कामगार तलाठि" .ते पन आयुश्याची ६ वर्श वाया घालवुन..! त्याच्या अश्रुने त्याच्या भावना दाखवल्या..! आणी सरकारला भ्रश्ताचाराबद्दल आणि MPSC त ल्या घोटाळ्याच वाद्ळ ! - तरिहि अजुन एक attempt देनार च आहे , अस हात वर करुन बोलनारा.. (wisky घेउन परवाचा Art of living चा "नाद सन्स्क्रुति " कार्य् क्रमाला हजर राह्ण्यसाठी नगर हून पुण्यामधे ! ) ६ वर्श UPSC त घालवल्या नन्तर आणि junior मागुन IAS/IPS होउनहि काल तो हसत होता ! " झाल तर सोन ..नहितर दगड" - हे त्याचच वाक्य...दिल्ली तून मागच्या सात दीवासा़ खाली पुन्यामधे..!!" २ वेळा UPSC च्या मुलाखती साठी निवड झालेला अन झालो तर collector नहितर काहिच नाहि...ही एकचि जिद्द (? ) अमेरिकेत नोकरि मिळुन हि पुण्यात स्थायिक होण्यासाठी - घर घेण्यासाठी ६० लाखान्चा जुगाड / bank loan (?), "आन्तऱ्जातिय विवाहाला " प्रेम् विवाहा ला घ्ररातुन विरोध ! कसा सोड्वयाचा...?..करेल तर तिच पोरगि ! एवढे शिकूनहि पालक आपला विचार का बद्लत नाहित ? अजुनही समाज आणी जात- पात ..! निराशेने डोक्याला हात लावुन ..!! मनासारख पोलिस Department मध्ये जाउनही corruption आणि pressure मुळे निराश..." - अरे सागरात राहुन प्रवाहाच्या विरुध पोहाता नहि रे येत ! साला तरिहि carrier मधे दहा वेळा suspend होइल आणि दहा वेळा join करेल..! I am non corrupted - bulletproof..छातीवर हात मारुन..!! Bank Manager असुनहि काळा अन जाड असल्याने त्याला पसन्द पड्लेलि पोरिला तो पसन्द पड्त नाहि....( हा फक्र निरशेमधे "विनोदाचा " विशय होता...!!" पण वस्तुस्थिति...! खरच आजचा तरुन बिनधास्त आहे ? रात्रि ३ पर्यन्त सावध बड्बड..! ( घरमालक शेजरिच राह्तो....हाक् लुन देइल म्हनुन ..!! ) अन सकाळि ७ वाजता office ला जान्याची घाई - आयुश्याचि शेवट..!! बहुतेक मानसाला भुतकाळ च नेहमी बरा वाट्तो...कोनत्याहि वेळी ..!!! शेवटी एक चारोळी सुचली... आयुश्य हा एक खेळ आहे.. खेळवतय कोण ..? हेच मोठ्ठ कोड आहे....! आपण मात्र खेळायचा ..आपल्या नियमाने.. बाकिच्यन्च काय ? जग तर वेड आहे...!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचन संख्या 2720
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

'कोड' नव्हे हो... कोडं, कोडं.

In reply to by मी_आहे_ना

अजुन काहि शब्दाचे ट्न्कलेखनाची सवय नाहि ना !

In reply to by ह भ प

पडल? कोण पडल? तेरा वर्षापुर्वीची गोष्ट. मुंबईत रहायचो. घरात गुडघ्याएव्हढ्या उंचीची कन्या. आम्ही तीला गुडघामेंबर म्हणायचो. सारखी पायात पायात घोटाळायची. तर झाल काय...घरात निघाल प्लंबरच काम. कॉलनीत एक गोपी म्हणुन प्लंबर. सारी कॉलनी तशी एकमेकाला ओळखुन असायची. तर आम्ही दोघे गेलो बाजारात . केली चौकशी गोपी कुठे आहे. काय मिळाला नाही लेकाचा. घरात पाइप गळतोय 'टप..टप...टप.' मला आला वैताग. आलो घरी . गोपी काही मिळाला नाही. तसा पिअक्कड होता. मग रागारागात म्हंटल "पडला असेल कुठेतरी पिउन". झाऽऽल. एव्हढ "पडला असेल " हे गुडघा मेम्बरन ऐकल. लगेच भुन्भुन सुरु..."कोन पल्ल?" मी "गोपी" "अलेले. कुत पल्ला?" "पडला गटारात" अर्थात मी." "कशा पल्ला?" "आता पडला. पडु दे." "अलेले. लागल?" आता मी कंटाळुन उत्तर देण बंद केलं. आधिच घरात टप टप सुरु. त्यात हीची भुणभुण! तोवर कुठुनसा गोपी उगवला. हे एक भारी होत. एकदा का बातमी पसरवली कुणी हवय, की निरोप बरोब्बर पोहोचायचा. तर आम्ही अगदी खुष. गोपी आला. गुडघा मेंबर मात्र त्या गोपीच्या भोवती भोवती" अलेले. कुत लागल? अलेले. कश लागल? कुत पल्ल?" बिचार्‍या गोपीला कळेना हे बाळ सारख त्याच्या गुडघ्याला धरुन काय बडबडतय. तो तीला बाजुला करुन पाइप तपासायचा प्रयत्न करतोय. अन ही पठ्ठी त्याला अगदी मायेन ओंजारायच्या तयारीत. आता आम्ही काय साम्गणार आम्ही काय मुक्ताफळ उधळली होती ती. तर अस हे "पडला".