Skip to main content

रांगोळी प्रदर्शन २०१२

लेखक मदनबाण यांनी बुधवार, 21/11/2012 13:25 या दिवशी प्रकाशित केले.
R1 R2 R3 R4 R5 R6 R7 R8 R9 R10 R11 R12 R13 R14 R15 R16 R17 R18 R19 R20 R21 R22 R23 R24 R25 R26 R27 R28 (हौशी फोटुग्राफर) :) मदनबाण..... एचक्यु रांगोळ्या इथे पाहता येतील. कॅमेरा :---निकॉन डी-५१०० रॉ प्रोसेसिंग करुन इमेज रिसाईझ केल्या आहेत. * इमेज रिसाईझ केल्याने कलरशेड मधे फरक पडतो.

वाचने 10738
प्रतिक्रिया 42

प्रतिक्रिया

पहिला फोटो आत्ता पहिला.. मला पण रांगोळी काढायला आवडतं पण इतक्या सुंदर..सात जन्म घालवले तरी आपल्याचानं जमणार नाय..

अरे बाप रे सगळ्या कलाकारांच्या हातात जादुये :) भारी रे मामु :)

सर्वच रांगोळ्या एक-एक मास्टरपिस आहेत. अप्रतिम! या कलेचा आस्वाद घेण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद :)

सुन्दर,.. देव पण काय कला देतो एकेकाच्या हातात...अप्रतिम.. @ (हौशी फोटुग्राफर) मदनबाण..... खुप खुप धन्यवाद

सुंदर रांगोळ्या - रांगोळ्या कसल्या? रांगोळी माध्यमातली पेंटिंग्ज आहेत. खोताची वाडी तर एक जलरंगातले चित्रच वाटले. सर्वच कलाकारांचे अभिनंदन आणि धागाकर्त्याला धन्यवाद.

क्लास! सुंदर रांगोळ्या आहेत...अप्रतिम

कॅप्टन लक्ष्मीच्या भुवया, निळूभौ भुजबळांचे (पहिले चांद्रवीर) नावाप्रमाणेच निळसर डोळे, युव्राज शिंग, दाराशिंग अन चोपडा़सायेबांचे चेहरे अन काय काय अन काय काय, कळायचं बंद झालं बगून, पार जिकलायसा सगळे तुमी. _/\_ लै भारी.

सगळ्या रांगोळ्या बेस्टच आहेत, शाळा आणि पोस्टल तिकीट मस्तच जमल्या आहेत. मदनबाण तुमचे विशेष धन्यवाद :-)

बाणा रांगोळ्या आमच्या पर्यंत पोहचवल्याबद्दल धन्स. जब्रा रांगोळ्या आहेत. -दिलीप बिरुटे

इतके डिटेल्स आणि रांगोळीत काढायचे म्हणजे ग्रेटच हो. मस्त.

मस्त! मला आधी वाटलं तू ठाण्यातल्या प्रदर्शनातील फोटो टाकले असावेत. माझ्याकडे आहेत ते, टाकतो इथे.

मी स्वता:अशा रंगावली काढल्या आहेत. बक्षिसे ही मिळविली आहेत. यातील व्यक्तिचित्रण ही कला मला फारशी जमली नाही. कारण ओळख पटणे हे फार जिकिरीचे काम असते. या कलाकृतीत ते उत्तम आले आहे. @ मदनबाण राव, हे प्रदर्शन गिरगाव व्ही पी रोडवर सिक्कानगर समोर भरले होते काय ? असे असेल तर आश्चर्य नाही कारण मी लहानपणी तिथे अशी प्रदर्शने पाहिली आहेत.

In reply to by चौकटराजा

गिरगाव व्ही पी रोडवर सिक्कानगर समोर भरले होते काय भिमाबाई राणे या शाळेत हे प्रदर्शन भरले होते. सेंट्रल सिनेमाच्या समोर. http://www.girgaonrangavaligroup.com/Venue.html

कस्ले जबरी कलाकार आहेत. कस्सं काय जमतं यांना इतकं भन्नाट काढायला, वेग्रे. अचमबीत !! मस्त !!!

अत्यंत सुंदर.. दारासिंग, नील, युवी, शाळा, खोताची वाडी, खारुताई.. सगळ्याच रांगोळ्या अप्रतिम. स्साला, इथं माणसाला साधी सरळ रेघ नाही मारता येत रांगोळीची, आणि हे लोक्स काय काय करतात बाप्पा ! सलाम...