सुटला पहाट वारा
अंतरात सळसळ
मन सुगंधी सुगंधी
पसरला दरवळ
नको स्वप्नातून जाग
नको जाग इतक्यात
नीज हलके हलके
पुन्हा आली पापण्यात
कसा मुजोर हा वारा
रेंगाळला खिडकीशी
पावा मंजुळ मंजुळ
जणु कृष्णाचा कानाशी
मन सैरभैर झाले
वेडावले, खुळावले
कृष्ण रंगाने रंगाने
चिंब चिंब भिजवले
रेशमाच्या सोनसरी
आला सोबती घेऊन
ओला पाऊस पाऊस
ढगातून उतरून
सतरंगी झाले नभ
धरा पाचूने नटली
ऊन कोवळे कोवळे
पसरली गोड लाली
आज सृष्टी देते हाळी
ऐक नाविन्याची साद
सुख दारात दारात
दे तयाला प्रतिसाद.
जयश्री
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1999
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुरेख. सुंदर कविता.
सुरेख.
सुंदर कविता.
चांगली
चांगली कविता मिपावर
द्यावा प्रतिसाद्,प्रतिसाद|
सुन्दर, सुरेख...
सुन्दर, सुरेख...
मस्त येकदम
मस्त येकदम :-)
सुंदर !
सुंदर ! :)
सुंदर
मस्त जमलीय...
परेड मुड बदलेंगे, मुड बदल.
परेड मुड बदलेंगे, मुड बदल.
खूप खूप धन्यवाद
खूप खूप धन्यवाद :)
मस्त...
मस्त...
छान कविता. खूप आवडली.
छान कविता. खूप आवडली.
धन्यवाद
धन्यवाद :)
सुंदर काव्य
सुंदर काव्य