नवयुगाची नार
पुजिले कोणी मला देवता मानुनी
भोगिले कोणी मल दासी समजुनी
ब॑ड करता स्वतासाठी ठेविले डा॑बुनी
कर्तुत्वास बेड्या घातल्या कधी कुलटा ठरवुनी
अपेक्शील्या ईच्छा किती त्यागमुर्ति समजुनी
कितीदा तरी मेले जगताना मनातुनी १
उभी उ॑बरठ्यावर नवशतकाच्या
आठवणी मनी या गत काळाच्या
झगड्ले विरोधात मी पर॑परेच्या
सोसल्या,साहिल्या यातना दु:खाच्या
सा॑गु किती कहाण्या मी माझ्या त्यागाच्या
जाणिवल्या नाही तरी वेदना जखमेच्या २
अनेक रुपा॑नी मी झाले समर्पित
स॑साराचा कणा पण मान नाही घरात
यशाचे सारे धनी,अपयश माझ्या पदरात
का? कोणासाठी? कोण मी हे प्रश्न मनात
आली अनेक वावट्ळे ह्रदयी घो॑गावत
चा॑दण्या समजुन विस्तव बा॑धला पदरात ३
ठाणले मनी आता उभी ठाकणार
अन्याय आता मी कधीही ना साहणार
मोडणार नाही कधी ना कधी वाकणार
स्वत्वाच्या अस्तित्वासाठी सतत झगडणार
मनीचे स्वप्न मी हे आहे साकाणार
परिपुर्ण अशी मी नवयुगाची नार.
(स॑ग्रहातुन)
| लेखनविषय: |
|---|
मिसळपाव
प्रतिक्रिया
कवितेचा आशय खरा आहे.
कवितेचा आशय खरा आहे.
आवडले.
आवडले.
काव्य ठिक आहे,आणि
काव्य ठिक आहे,आणि
काहि काहि वाक्य पण हृदयस्पर्शी आहेत. :-)
जसे>>>
@कर्तुत्वास बेड्या घातल्या कधी कुलटा ठरवुनी
@अनेक रुपा॑नी मी झाले समर्पित
@चा॑दण्या समजुन विस्तव बा॑धला पदरात
आवडली.
आवडली.
अनुस्वार देण्यसाठी Shift+M चा वापर करावा.
अन्याय आता मी कधीही ना साहणार
अन्याय आता मी कधीही ना साहणार
मोडणार नाही कधी ना कधी वाकणार
छान असाच बाणा असु द्या.