उषाकाळ होता होता काळरात्र झाली.......
मराठी माणसाचा आधारस्तंभ उन्मळून पडला.......
आता फक्त देवच मराठी माणसाला वाचवेल ........
तुमच्या नुसत्या असण्याचा सुद्धा किती आधार होता....
पण तुम्ही चेतवलेल्या ठिणगीचा वणवा होईल याची काळजी आम्ही घेऊ....
साहेब......साहेब.........
मराठी माणसाला मुंबईत मानान, ताठ मानेन उभा करणारा आधारस्तंभ हरवला. अरे ये मराठी है। असे सरकास्टीक बोल ऐकणारे आम्ही शिवसैनिकांच्या जोरावर खरच स्वत:ला स्वाभिमानान अश्यावेळी हा! क्यू रे महाराष्ट्रा मे मराठी नाही तो कौन मिलेगा रे? असा उलट विचारू शकत होतो. नोर्थीज ना शिवाजी अकेले ही थे जीन्होने मोगालोका विरोध किया ! इसलिये शिवसेना हमे प्रिय है । हे ही सांगु शकलो ते या वाघाच्या डरकाळीच्या जोरावर. बाळासाहेब जातील पण त्यांनी निर्माण केलेली ही जी स्वभिमानाची जाणिव आहे ती नाही जाणार.
जरा तपशीलात घोळ आहे
word नव्हे Letters !!!
ह्या निमित्ताने एक सोप्पा प्रश्न ( न गुगल करता) सांगता येतेय का सांगा)
बाळा साहेबानच पूर्ण नाव काय ? ...... बाळ हे त्यांच नाव नव्हत बर का
ठाकरेंना जवळून ओळखणारे माहिती आहेत , ते बोलताना श्यामकांत (बाळा साहेब) आणि श्रीकांत (बाळा साहेबांचे बंधू) असा उल्लेख करायचे , त्यामुळे गुगल वर ही माहिती मिळणार नाही. धाग्याचा गुंता करण्या आधी थांबतो
बाळासाहेबांची भाषणे,म्हणजे सर्वसामान्य मराठी माणसाच्या मनातले पण मुखात न येणारे बोल होते.
जसे आपण पडद्यावर, बच्चनने खलनायकाची केलेली धुलाई पाहिल्यावर आनंदी होउन टाळ्या पिटतो, तसे काहीतरी काळजास
भिडणारे ( पण श्रोत्यांकडून कृतीत न उतरणारे) त्यांचे भाषण असे.
त्यांच्या परखड विचारांना आपण सर्वांनी कृतीची जोड द्यावयास हवी होती, ही खंत वाटत राहील.
राज्यसभेवर त्यांनी
प्रीतीश नंदी, राम जेठमलानी, चंद्रिका केनिया,
संजय निरुपम अशा अनेक अमराठी लोकांना संधी दिली.
मराठीच काय तर अमराठी लोकांनाही सामावून घेणारे त्यांचे सर्वसमावेशक नेतॄत्व होते.
खूप आठवणी सांगता येतील...
साहेबांच्या सभेला नेहमीच खच्चून गर्दी होत आली आहे पण सर्वात जास्त गर्दी त्यांनी शेवटच्या सभेला खेचली. ते पण एक शब्दही न बोलता. :)
झाले बहू.. होतील बहू.. परि या सम हा... पु.लं. गेले तेंव्हा असे हळवे क्षण आयुष्यात आले होते. आज ते पुन्हा अनुभवले.
कोट्यावधी लोकांप्रमाणेच मीदेखील बाळासाहेबांच्या विचारांपासून प्रेरित होतो, आहे व नेहमीच राहीन. त्यांच्या विचारातील स्पष्टपणा, एकदा घेतलेल्या भूमिकेवर ठाम राहण्याची वृत्ती व जीवाला जीव देणारी माणसे घडवण्याची त्यांची हातोटी या गोष्टी आजच्या काळात विरळाच.
त्यांच्याबद्दलची भावलेली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतर प्रत्येक ठिकाणी महत्त्वाची ठरणारी माणसाची जात त्यांच्या पक्षात नगण्य होती; माणसाच्या जातीपेक्षा त्याची योग्यता, कार्यावरील निष्ठा व परिश्रम हेच त्याच्या प्रगतीचा आलेख उंचावू शकत.
रालोआच्या सत्ताकाळात इतर प्रादेशिक पक्ष स्वतःच्या राज्याच्या हितसंबंधांसाठी केंद्रसरकारला वेठीस धरत असताना महाराष्ट्राने नेहमीच त्यागाची भूमिका घेत मोठ्या भावाचे कर्तव्य पार पाडले शेवटी कुणीतरी देशहिताचा विचार केल्याशिवाय राष्ट्राचे गाडे पुढे कसे सरकेल? बाळासाहेबांच्या खंबीर नेतृत्वामुळेच हे शक्य होऊ शकले.
बाळासाहेबांना त्यांच्या सभेत प्रत्यक्ष ऐकण्याच्या अनेक संधी गमावल्याबद्दल मला आजही वैषम्य वाटते. पण १२ वर्षांपूर्वी सेनेचे अधिवेशन आमच्या शहरात झाले होते त्यावेळी त्यांच्या गाड्यांचा ताफा विश्रामगृहाकडे निघालेला असताना रस्त्याच्या कडेने त्यांना बघू शकलो. सकाळची वेळ असल्याने फारशी गर्दी नव्हती पण तरीही त्यांचे हात लोकांसाठी जोडलेलेच होते. त्यांच्या प्रसिद्ध काँन्टेन्सा गाडीमध्ये शेजारी उद्धव बसले होते. त्या क्षणाकरिता मी स्वतःला भाग्यवान समजतो.
समाजासाठी व देशासाठी असलेले त्यांचे बहुमोल योगदान न बघता त्यांच्या कारकीर्दीतील केवळ काही घटनांचा एकांगी विचार मांडत काही तथाकथित विचारवंत (दुर्दैवाने त्यात बरेच मराठीही आहेत) त्यांच्या मृत्यूदिवशीही त्यांच्याबद्दल वाईट बोलतात हे पाहून मनापासून वाईट वाटते. मराठी माणसाचा आवाज ताकदीने मांडणारा आज कुणीही नाही हे गोष्ट मनाला चटका लावून जाते.
झाले बहु, होतीलही बहु, परंतु यासम हाच.
बाळासाहेब तुम्हाला मानाचा त्रिवार मुजरा व पुन्हा जन्म घ्या.
मुळात थोर लोक आपल्यातुन देहाने जरी गेले तरी ते विचार रुपाने आपल्यात जिवंतच असतात.
शिवाजी महाराजाना जाउन ३ शतक लोटली. तरि ते आपल्यात आजही जिवंत आहेत. शिवाजी महाराज की जय अस म्हणताच आपल्या अंगात जस नवचैतन्य येत उत्साह येतो, अंगावर रोमांच ऊभे राहतात. अगदी तसच बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो असे म्ह्टल्यावर आपल्याला ह्यापुढेही होईल. बाळासाहेब हे आपल्यात जिवंत होते आहेत व राहतीलच.
शिवसैनिकांच्या आणि अंत्यसंस्कारांसाठी जमलेल्या लाखो लोकांच्या भावना यांचा विचार करुन शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कारांना परवानगी दिली हे समजू शकतो.
पण तिरंगी झेंड्यात गुंडाळले ते पाहून डोके चक्रावून गेले.
प्रबोधनकारांच्या सल्ल्याने आणि मार्गदर्शनाखाली 'शिवसेना' जन्मास आली तेंव्हा मी १३-१४ वर्षांचा असेन. 'राजकारणात कधीच उतरणार नाही' असे म्हणणारी शिवसेना राजकारणात पोहण्याचे पहिले हात मारताना पाहिलेलं आहे. 'मराठी माणूस' हा पत्ता जोरदार चालला. सुरुवातीचा विरोध दाक्षिणात्यांना आणि आधाराचा हात मराठी तरूणाला होता. शिवसेनेच्या जोरावर अनेक मराठी तरूणांना नोकर्या मिळाल्या. मी त्यातलाच एक होतो. बाळासाहेबांच्या सडेतोड आणि कोणाचाही मुलाहिजा न राखता केलेल्या विरश्रीयुक्त भाषणांनी स्फुरण चढायचं आणि मनगटात बळ संचारायचं. 'लुंगी हटाव' घोषणेने जोर धरला. पुढे दंगल उसळली त्यात दादरच्या 'विसावा'चा बळी गेला.'शिवसेना पुरस्कृत बटाटावडा' ह्या चळवळीने अनेक मराठी तरूणांना उद्योग धंद्यात उतरवलं. 'हा आवाज कोणाचा.. शिवसेनेचा' वगैरे घोषणा शिवसेनेला भक्कम करण्यात सार्थ ठरल्या. तो काळ आणि बाळासाहेबांची किमया विलक्षण होती. 'मीही व्यवसाय करू शकतो' ह्या विचारांच बीज मराठी तरूणाच्या मनांत रुजलं.
पुढे पुढे राजकारणातील सामान्यमाणसाला अनाकलनिय आणि अस्विकारार्ह तडजोडी, सत्तेसाठी बिजेपीशी हातमिळवणी, स्थानिक राजकारण सोडून केंद्रातील धडपड..... शिवसेना मराठी माणसापासून दूर होत गेली. असो.
काहिही असले तरी शिवसेनेचे, बाळासाहेबांचे मराठी तरूणावर खुप उपकार आहेत्.त्याला स्मरुन.....विनम्र श्रद्धांजली.
प्रतिक्रिया
साहेब......साहेब.........
श्रध्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली !
मौत, जिंदगी की सबसे बडी सच्चाई !
-^-
मराठी माणसाला मुंबईत मानान,
विनम्र श्रध्दांजली....
नियतीला काही म्हणायचे आहे का ?
जरा तपशीलात घोळ आहे
In reply to नियतीला काही म्हणायचे आहे का ? by वाहीदा
बाळकेशव हे बाळासाहेबांचं खरं नाव.
In reply to जरा तपशीलात घोळ आहे by माझीही शॅम्पेन
नाही , मी बरेच वेळा हेच ऐकतो
In reply to बाळकेशव हे बाळासाहेबांचं खरं नाव. by अर्धवटराव
बाळ आहे त्यांच नाव,बाळकेशव
In reply to बाळकेशव हे बाळासाहेबांचं खरं नाव. by अर्धवटराव
संपुर्ण नाव.
In reply to बाळ आहे त्यांच नाव,बाळकेशव by श्री गावसेना प्रमुख
त्यांनी बाळकेशव लिहीले,म्हणुन
In reply to संपुर्ण नाव. by किसन शिंदे
माझ्या माहिती नुसार त्यांच खर
In reply to संपुर्ण नाव. by किसन शिंदे
कसे काय बरे....काही लिखीत
In reply to माझ्या माहिती नुसार त्यांच खर by माझीही शॅम्पेन
ठाकरेंना जवळून ओळखणारे माहिती
In reply to कसे काय बरे....काही लिखीत by श्री गावसेना प्रमुख
ठीक आहे,बघुया नंतर
In reply to ठाकरेंना जवळून ओळखणारे माहिती by माझीही शॅम्पेन
अखेरचा हा तुम्हाला दंडवत
अखेरचा हा तुला दंडवत...--^--
विनम्र श्रद्धांजली
राज्यसभेवर त्यांनी
.
बाळासाहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली
विनम्र आदरांजली...
विनम्र श्रद्धांजली ..
विनम्र श्रद्धांजली ..
भावपूर्ण श्रद्धांजली
-----/\---- अखेरचा हा तुला
श्रद्धांजली...
विनम्र श्रद्धांजली.
विनम्र आदरांजली
बाळासाहेब तुम्हाला मानाचा त्रिवार मुजरा व पुन्हा जन्म घ्या
_/\_
विनम्र श्रद्धांजली.
श्रद्धांजंली
विनम्र श्रद्धांजली!
_/\_
साहेब तूम्ही परत या !
जय महाराष्ट्र !!!!!!!!!!
.
शब्द नाहित .
शिवसैनिकांच्या आणि
त्यात काय चक्रावायचे?
ह्यान्ना काय कळनार
ह्यान्ना काय कळनार +१००
शिवसेना...