Skip to main content

बाळासाहेबांना श्रध्दांजली....

लेखक नीलकांत यांनी शनिवार, 17/11/2012 17:20 या दिवशी प्रकाशित केले.
मा. बाळासाहेब ठाकरेंना मिसळपाव परिवारातर्फे विनम्र श्रध्दांजली....

वाचने 23916
प्रतिक्रिया 117

प्रतिक्रिया

उषाकाळ होता होता काळरात्र झाली....... मराठी माणसाचा आधारस्तंभ उन्मळून पडला....... आता फक्त देवच मराठी माणसाला वाचवेल ........ तुमच्या नुसत्या असण्याचा सुद्धा किती आधार होता.... पण तुम्ही चेतवलेल्या ठिणगीचा वणवा होईल याची काळजी आम्ही घेऊ.... साहेब......साहेब.........

श्रद्धांजली :-(

मराठी माणसाला मुंबईत मानान, ताठ मानेन उभा करणारा आधारस्तंभ हरवला. अरे ये मराठी है। असे सरकास्टीक बोल ऐकणारे आम्ही शिवसैनिकांच्या जोरावर खरच स्वत:ला स्वाभिमानान अश्यावेळी हा! क्यू रे महाराष्ट्रा मे मराठी नाही तो कौन मिलेगा रे? असा उलट विचारू शकत होतो. नोर्थीज ना शिवाजी अकेले ही थे जीन्होने मोगालोका विरोध किया ! इसलिये शिवसेना हमे प्रिय है । हे ही सांगु शकलो ते या वाघाच्या डरकाळीच्या जोरावर. बाळासाहेब जातील पण त्यांनी निर्माण केलेली ही जी स्वभिमानाची जाणिव आहे ती नाही जाणार.

Is this a sheer coincidence ?? or Destiny has something to say - - Bala Saheb (9 word) - Thackeray (9 word) - Matoshree (9 word) - Sena chief (9) - Time 3:33 (3+3+3) - funeral start : 9 am - today date : 18th (1+8 ) - birth year: 1926 (1+9+2+6=18, 1+8=9) ~ अचंबीत वाहीदा

In reply to by वाहीदा

जरा तपशीलात घोळ आहे word नव्हे Letters !!! ह्या निमित्ताने एक सोप्पा प्रश्न ( न गुगल करता) सांगता येतेय का सांगा) बाळा साहेबानच पूर्ण नाव काय ? ...... बाळ हे त्यांच नाव नव्हत बर का

In reply to by किसन शिंदे

माझ्या माहिती नुसार त्यांच खर नाव श्यामकांत केशव ठाकरे बाळ - हे त्यांनी धारण केलेल नाव आहे

In reply to by श्री गावसेना प्रमुख

ठाकरेंना जवळून ओळखणारे माहिती आहेत , ते बोलताना श्यामकांत (बाळा साहेब) आणि श्रीकांत (बाळा साहेबांचे बंधू) असा उल्लेख करायचे , त्यामुळे गुगल वर ही माहिती मिळणार नाही. धाग्याचा गुंता करण्या आधी थांबतो

बाळासाहेबांची भाषणे,म्हणजे सर्वसामान्य मराठी माणसाच्या मनातले पण मुखात न येणारे बोल होते. जसे आपण पडद्यावर, बच्चनने खलनायकाची केलेली धुलाई पाहिल्यावर आनंदी होउन टाळ्या पिटतो, तसे काहीतरी काळजास भिडणारे ( पण श्रोत्यांकडून कृतीत न उतरणारे) त्यांचे भाषण असे. त्यांच्या परखड विचारांना आपण सर्वांनी कृतीची जोड द्यावयास हवी होती, ही खंत वाटत राहील.

राज्यसभेवर त्यांनी प्रीतीश नंदी, राम जेठमलानी, चंद्रिका केनिया, संजय निरुपम अशा अनेक अमराठी लोकांना संधी दिली. मराठीच काय तर अमराठी लोकांनाही सामावून घेणारे त्यांचे सर्वसमावेशक नेतॄत्व होते. खूप आठवणी सांगता येतील...

balasaheb

साहेबांच्या सभेला नेहमीच खच्चून गर्दी होत आली आहे पण सर्वात जास्त गर्दी त्यांनी शेवटच्या सभेला खेचली. ते पण एक शब्दही न बोलता. :) झाले बहू.. होतील बहू.. परि या सम हा... पु.लं. गेले तेंव्हा असे हळवे क्षण आयुष्यात आले होते. आज ते पुन्हा अनुभवले.

कोट्यावधी लोकांप्रमाणेच मीदेखील बाळासाहेबांच्या विचारांपासून प्रेरित होतो, आहे व नेहमीच राहीन. त्यांच्या विचारातील स्पष्टपणा, एकदा घेतलेल्या भूमिकेवर ठाम राहण्याची वृत्ती व जीवाला जीव देणारी माणसे घडवण्याची त्यांची हातोटी या गोष्टी आजच्या काळात विरळाच. त्यांच्याबद्दलची भावलेली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतर प्रत्येक ठिकाणी महत्त्वाची ठरणारी माणसाची जात त्यांच्या पक्षात नगण्य होती; माणसाच्या जातीपेक्षा त्याची योग्यता, कार्यावरील निष्ठा व परिश्रम हेच त्याच्या प्रगतीचा आलेख उंचावू शकत. रालोआच्या सत्ताकाळात इतर प्रादेशिक पक्ष स्वतःच्या राज्याच्या हितसंबंधांसाठी केंद्रसरकारला वेठीस धरत असताना महाराष्ट्राने नेहमीच त्यागाची भूमिका घेत मोठ्या भावाचे कर्तव्य पार पाडले शेवटी कुणीतरी देशहिताचा विचार केल्याशिवाय राष्ट्राचे गाडे पुढे कसे सरकेल? बाळासाहेबांच्या खंबीर नेतृत्वामुळेच हे शक्य होऊ शकले. बाळासाहेबांना त्यांच्या सभेत प्रत्यक्ष ऐकण्याच्या अनेक संधी गमावल्याबद्दल मला आजही वैषम्य वाटते. पण १२ वर्षांपूर्वी सेनेचे अधिवेशन आमच्या शहरात झाले होते त्यावेळी त्यांच्या गाड्यांचा ताफा विश्रामगृहाकडे निघालेला असताना रस्त्याच्या कडेने त्यांना बघू शकलो. सकाळची वेळ असल्याने फारशी गर्दी नव्हती पण तरीही त्यांचे हात लोकांसाठी जोडलेलेच होते. त्यांच्या प्रसिद्ध काँन्टेन्सा गाडीमध्ये शेजारी उद्धव बसले होते. त्या क्षणाकरिता मी स्वतःला भाग्यवान समजतो. समाजासाठी व देशासाठी असलेले त्यांचे बहुमोल योगदान न बघता त्यांच्या कारकीर्दीतील केवळ काही घटनांचा एकांगी विचार मांडत काही तथाकथित विचारवंत (दुर्दैवाने त्यात बरेच मराठीही आहेत) त्यांच्या मृत्यूदिवशीही त्यांच्याबद्दल वाईट बोलतात हे पाहून मनापासून वाईट वाटते. मराठी माणसाचा आवाज ताकदीने मांडणारा आज कुणीही नाही हे गोष्ट मनाला चटका लावून जाते. झाले बहु, होतीलही बहु, परंतु यासम हाच.

बाळासाहेब तुम्हाला मानाचा त्रिवार मुजरा व पुन्हा जन्म घ्या. मुळात थोर लोक आपल्यातुन देहाने जरी गेले तरी ते विचार रुपाने आपल्यात जिवंतच असतात. शिवाजी महाराजाना जाउन ३ शतक लोटली. तरि ते आपल्यात आजही जिवंत आहेत. शिवाजी महाराज की जय अस म्हणताच आपल्या अंगात जस नवचैतन्य येत उत्साह येतो, अंगावर रोमांच ऊभे राहतात. अगदी तसच बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो असे म्ह्टल्यावर आपल्याला ह्यापुढेही होईल. बाळासाहेब हे आपल्यात जिवंत होते आहेत व राहतीलच.

मा.बाळासाहेब ठाकरेंना भावपूर्ण श्रध्दांजली... _/\_

__/\__ लोकनेता कसा असावा याचाच वस्तुपाठ (उपस्थित सर्व नेत्यांना) कालच्या अंतीम प्रवासाने दिला... बहुदा इंदिरा गांधींनंतर अंत्ययात्रेला एवढा जनसागर लोटल्याचा हा पहीलाच प्रसंग असावा...

एकमेव हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे साहेबांना विनम्र श्रद्धांजली!

जय महाराष्ट्र !!!!!!!

गेली मराठीची ती शान , गेला हि़ंदुत्वाचा तो ज्वलंत अभिमान ! आता उरली आहे ती फक्त आठवण , आठवण आणिक आठवण !!!!!!!

.

शिवसैनिकांच्या आणि अंत्यसंस्कारांसाठी जमलेल्या लाखो लोकांच्या भावना यांचा विचार करुन शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कारांना परवानगी दिली हे समजू शकतो. पण तिरंगी झेंड्यात गुंडाळले ते पाहून डोके चक्रावून गेले.

प्रबोधनकारांच्या सल्ल्याने आणि मार्गदर्शनाखाली 'शिवसेना' जन्मास आली तेंव्हा मी १३-१४ वर्षांचा असेन. 'राजकारणात कधीच उतरणार नाही' असे म्हणणारी शिवसेना राजकारणात पोहण्याचे पहिले हात मारताना पाहिलेलं आहे. 'मराठी माणूस' हा पत्ता जोरदार चालला. सुरुवातीचा विरोध दाक्षिणात्यांना आणि आधाराचा हात मराठी तरूणाला होता. शिवसेनेच्या जोरावर अनेक मराठी तरूणांना नोकर्‍या मिळाल्या. मी त्यातलाच एक होतो. बाळासाहेबांच्या सडेतोड आणि कोणाचाही मुलाहिजा न राखता केलेल्या विरश्रीयुक्त भाषणांनी स्फुरण चढायचं आणि मनगटात बळ संचारायचं. 'लुंगी हटाव' घोषणेने जोर धरला. पुढे दंगल उसळली त्यात दादरच्या 'विसावा'चा बळी गेला.'शिवसेना पुरस्कृत बटाटावडा' ह्या चळवळीने अनेक मराठी तरूणांना उद्योग धंद्यात उतरवलं. 'हा आवाज कोणाचा.. शिवसेनेचा' वगैरे घोषणा शिवसेनेला भक्कम करण्यात सार्थ ठरल्या. तो काळ आणि बाळासाहेबांची किमया विलक्षण होती. 'मीही व्यवसाय करू शकतो' ह्या विचारांच बीज मराठी तरूणाच्या मनांत रुजलं. पुढे पुढे राजकारणातील सामान्यमाणसाला अनाकलनिय आणि अस्विकारार्ह तडजोडी, सत्तेसाठी बिजेपीशी हातमिळवणी, स्थानिक राजकारण सोडून केंद्रातील धडपड..... शिवसेना मराठी माणसापासून दूर होत गेली. असो. काहिही असले तरी शिवसेनेचे, बाळासाहेबांचे मराठी तरूणावर खुप उपकार आहेत्.त्याला स्मरुन.....विनम्र श्रद्धांजली.