देवाला रिटायर करण शक्य नाही
लेखनविषय:
काव्यरस
कोणी तरी म्हटलं देवाला आता रिटायर करा
मी म्हणालो नस्त्या भानगडी कशाला ?
रिटायर करायला आधी त्याला कामावर कोण ठेविल ?
अन्स्किल्ड लेबर ला अजकाल जॉब नाय भेटत भाउ.
साधे भुकंप आणी वादळ ज्याला थांबवता येत नाहीत.
आपत्ती देवाच्या कोपाने होते हे भाव थोपवता येत नाहीत
त्याच्याविरुद्ध कोणी वागला तर ज्याच्या भावना काबूत रहात नाहीत
असल्या मत्सरी देवाला आपण नाय कामावर ठेवणार
माणुसकीच ग्रॅज्युएशन नापास झालेल्याला कोण दील काम ?
त्यात पास व्हायला आधी तर्काची शाळा पास व्हावी लागते भौ
दोन जमातींचे देव वेगळे असू शकत नाहीत एव्हढही त्याला कळत नाही
काफिर आणी दलितांना जन्म देणारा तो महामूर्ख
स्वतःच्याच हाताने हीन दीन पेगन बनवणारा तर्कदुष्ट
शहाणपणाची बाराखडी येत नसेल तर; शाळेत कोण घील ?
स्वतःच निर्मिलेल्या कफिरांविरुद्ध जिहाद,
हीदनांविरुद्ध क्रुसेड आणी अवर्णांशी धर्मयुद्ध
करण चुकीच आहे हे साध बालवाडी ज्ञान मिळवायला
विश्वाच्या अंतिम दिनापर्यंत थांबाव लागत त्याला
असल्या मतिमंदाला बाराखडी तरी कशी यील.
बाराखडी येण्यासाठी आधी जन्म घ्यावा लागतो भौ
बोला - ज्याचा जन्मच झालेला नाही - त्याला रिटायर कसं करायच ?
वाचने
3025
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
विचार सुंदर आहेत, पण मांडनी
मनोगत.
डॉक्टर्स स्पेशल
In reply to डॉक्टर्स स्पेशल by अत्रुप्त आत्मा
नय बाबुमोशायर नय ....
काय मांडायचंय नक्की?
प्रश्न पडायचे थांबत नाहीत
अरे वा!
राजघराण साहेब, कविता अत्युत्तम पण....
प्रत्येकाचा देव वेगळा कस काय
हा हा . ज्याची त्याची
देवाला
देवाला रिटायर करा म्हणणारे
In reply to देवाला रिटायर करा म्हणणारे by मराठी_माणूस
+१००००००० टक्के सहमत
आवडले
खरय...
अनेकांना मतित अर्थापर्यंतहि
In reply to अनेकांना मतित अर्थापर्यंतहि by अत्रुप्त आत्मा
+११११११
अहो डाक्टर साहेब, देवाच्या