Skip to main content

अलख

अलख

Published on रवीवार, 11/11/2012
हा अलख कुणा जोग्याचा ही गहन कुणाची वाणी प्राणांच्या कंठी रुजली संध्यापर्वाची गाणी झाकोळुन नभ गंगेच्या पाण्यात उतरले थोडे क्षितिजाच्या पार निघाले अन् सूर्यरथाचे घोडे या मूक उदास जलावर धूसर वलये वाटोळी रेखाटत बसली कुठल्या कवितेच्या अनवट ओळी? ज्या सांद्र वनातुन घुमले अस्वस्थ क्षणांचे पावे ते वन सोडून निघाले अज्ञात दिशेला रावे ढळत्या सांजेच्या पदरी अस्फुटसा लुकलुक तारा परतून चालला जोगी अन् अलख घुमवितो वारा footer

याद्या 2729
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

वल्लीदादांना सहमत. खरोखर खूप छान शब्दसौंदर्य.

पण इथे थांबू नको अशी विनंती करते. मिपावर तुझ्या कविता येत राहू देत!

क्रांतीतै , कविता अप्रतीम नव्या घटनेनं आणखी पार्श्वभुमी गुढ झाली