✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

विदेशी फोन नंबर बाबत

म
मंदार कात्रे यांनी
Sun, 11/11/2012 - 17:32  ·  लेख
लेख
मध्यंतरी सरकारने + २४३, +१२०......,unknown numbers ,blank calls ना प्रत्युत्तर देवू नये ,किंवा ते फोन रिसीव्ह करू नयेत ,असे जाहीर आवाहन केलेले होते. पण यात मेख अशी आहे कि, ज्यांचे आप्त ,नातेवाईक,मित्र परदेशी व विशेषत: गल्फ मध्ये असतात ,अशा लोकांना वर उल्लेख केल्या सारख्या नंबर वरून सतत फोन येतात कारण ते परदेशी असलेले नातेवाईक voip सेवा वापरून call करत असतात . voip call करताना भारतातल्या फोन नंबरवर विचित्र नंबर येणे अगदी स्वाभाविक आहे . काही परदेशी कंपन्यासुद्धा voip चा वापर करून telephonic interview घेतात . यास्तव सगळेच विचित्र नंबर fraud नसतात ,हे लक्ष्यात घ्यावे. धन्यवाद.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5728 वाचन

💬 प्रतिसाद (21)

प्रतिक्रिया

धन्यवाद. माहीती दिल्याबद्दल.

श्री गावसेना प्रमुख
Sun, 11/11/2012 - 17:41 नवीन
धन्यवाद.
माहीती दिल्याबद्दल.
  • Log in or register to post comments

ठीक

चिरोटा
Sun, 11/11/2012 - 17:41 नवीन
आमचे स्वतःचे नंबरच विचित्र,फ्रॉड असल्याने विशेष फरक पडत नाही.
  • Log in or register to post comments

वरील नंबर वरुन आलेल्या मिस कॉल

वेताळ
Sun, 11/11/2012 - 18:16 नवीन
ला परत प्रत्युत्तर देवु नये असे सांगितले आहे.कॉल घ्यायला काही हरकत नाही.मिस कॉल येतो त्यावेळी त्याला परत उत्तर देताना आपल्याला प्रॉब्लेम येतो.
  • Log in or register to post comments

एक शंका

आशु जोग
Sun, 11/11/2012 - 19:39 नवीन
एक शंका कॉल घ्यायला काही हरकत आहे का ?
  • Log in or register to post comments

अजुन एक शंका .

जेनी...
Sun, 11/11/2012 - 19:50 नवीन
अजुन एक शंका . कॉल घेतलाच तर आणि मिस्स कॉल वर पून्हा फोन केला तर काय होतं ?? क्रुपया विस्कटवुन सांगणे . (अनभिज्ञ्न निरागस बालिका ) पूजा :)
  • Log in or register to post comments

फोनवर

चिरोटा
Sun, 11/11/2012 - 19:59 नवीन
कॉलवर मिस आहे की मिस्टर हे ओळखण्यासाठी मिस्स कॉल दिले जातात्.तेव्हा मिस्स कॉलवर पुन्हा फोन करू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

ओह्ह ... मग तर मी मुळीच परत

जेनी...
Sun, 11/11/2012 - 20:09 नवीन
ओह्ह ... मग तर मी मुळीच परत फोन करणार नाहि :-/ थेन्कु चि रो जी राव :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

अवांतर

तुषार काळभोर
Sun, 11/11/2012 - 20:42 नवीन
खोसला का घोसला मध्ये अनुपम खेरच्या थोरल्या पोराचं नाव चिरौंजीलाल होतं..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

धन्यवाद!

दादा कोंडके
Sun, 11/11/2012 - 20:47 नवीन
अत्यंत माहितीपूर्ण धागा आणि अनुरूप प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

सरकारने?

तुषार काळभोर
Sun, 11/11/2012 - 20:47 नवीन
सरकार/दूरसंचार मंत्रालय/ट्राय/बीएसएनएल यांपैकी कोणी असं सांगितलंय काय? मला नाही वाटत असं सरकारने/कोणत्याही सरकारी घटकाने अधिकृतरित्या सांगितले असेल. (स्साला...अमुक नंबरचा फोन रीसिव्ह केल्यावर फोनमध्ये व्हायरस शिरतो नायतर आपल्या नंबरवरून आयएसडी कॉल केले जातात, अशी ढकलपत्रे आता मिपावर यायला लागली!!)
  • Log in or register to post comments

बीएसएनएल.

आनंदी गोपाळ
Sun, 11/11/2012 - 20:52 नवीन
यांच्या ऑफिशियल बल्क मेसेजवरून तो मेसेज आलेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

शंकानिरसनः

आनंदी गोपाळ
Sun, 11/11/2012 - 20:51 नवीन
कॉल घेतलाच तर आणि मिस्स कॉल वर पून्हा फोन केला तर काय होतं ?? क्रुपया विस्कटवुन सांगणे .
पुन्हा फोन केलात तर तुमचा बॅलन्स ५० रुपयांनी घटतो, असे अनुभवी लोकांनी सांगितले आहे. फोन घेतल्यास काही फरक पडत नाही. नुसता फोन घेतल्याने व्हायरस वगैरे येणार नाही, फक्त कॉलदरम्यान # * इ. असलेले नंबर दाबू नयेत.
  • Log in or register to post comments

आमच्या कंपनीने देखील सर्व

मदनबाण
Sun, 11/11/2012 - 21:05 नवीन
आमच्या कंपनीने देखील सर्व कर्मचार्‍यांना मेल पाठवुन या निनावी फोना-फोनी बाबत सतर्क केले होते,तसेच अनेक कर्मचार्‍यांना फोन येत असल्याचे सांगितले होते. मागच्या आठवड्यातुन मला देखील असाच कॉल आला होता,मग कळले की तो फोन सोमालियातुन आला होता. आता कसे कळले की तो फोन सोमालियातुन आला ते ? तर... थँक्स टू ShaPlus Caller Info (India) तुमच्याकडे जर अ‍ॅन्ड्रॉइड फोन असेल तर या अ‍ॅप्लीकेशनचा वापर करता येतो. :)
  • Log in or register to post comments

हम्म.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 11/11/2012 - 22:40 नवीन
च्यायला, मला एका नंबरवरुन एसेमेस येतो. [आता एस्सेमेस आला की इथेच डकवतो लंबर] एस्स्मेस असतो '' हा नंबर कुणाचा आहे'' आणि आणखी एका नंबरवरुन एस्स्मेस येतो '' प्लीज कॉल मी बॅक'' एकदा खर्रच कोणी गरजू असेल असे वाटल्यामुळे कॉल बॅक केल्यावर तुमचं नाव काय ? तुम्ही कुठं राहता अशा हिंदी भाषेतून चौकशी सुरु. पक्का मिपाकर असल्यामुळे माझी काय पर्सनल माहिती त्यांना देतो. दिला फोन कट करुन. पण, माझ्या मागे लागलेली साडेसाती अजून काय जाईना. कोणाकडे यावर काही जालीम उपाय असेल तर खरड करावी. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

नुसते सांगा की मिपाकर आहात म्हणून.

अभ्या..
Mon, 11/12/2012 - 00:21 नवीन
काय हे प्राडॉ. ? उत्तर तुमच्याकडेच होते की? मिपाकर असल्याने खरी माहीती नका हो देऊ. पण सांगा त्या तुमच्या चाहत्याला तुम्ही नुसते मिपाकर नाही तर संपादक पण आहात म्हणून. ;) 'टाकू काय ऊडवून' अशी द्या जरा बत्ती. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मार दिया जाय की छोड दिया

श्री गावसेना प्रमुख
Mon, 11/12/2012 - 09:35 नवीन
Image removed. मार दिया जाय की छोड दिया जाये इंटरनॅशनल आउट्गोईंग बंद करुन द्यावे.कारण ट्राय ने मोबाइल कंपन्यांना असा आदेश दिलेला आहे की.ज्यांना खरच आवश्यकता आहे त्यांनाच ही सुविधा देण्यात यावी,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

असं काय पाहुन घेईन.. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 11/12/2012 - 09:54 नवीन
>>> मिपाकर नाही तर संपादक पण आहात म्हणून. हाहाहा. >>> 'टाकू काय ऊडवून' अशी द्या जरा बत्ती. लगेच उडवला ना एस्सेमेस. :) मनातल्या बाता : च्यायला, या अभिजितचे एक दोन चांगले मन लावून लिहिलेले प्रतिसाद उडवावेच लागतील असे दिसते. ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

च्यायला, या अभिजितचे एक दोन

श्री गावसेना प्रमुख
Mon, 11/12/2012 - 11:46 नवीन
च्यायला, या अभिजितचे एक दोन चांगले मन लावून लिहिलेले प्रतिसाद उडवावेच लागतील तुमच्या संपादक पदाला मानाचा मुजरा.Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आणि मी पण मिपाकरच की प्राडॉ.

अभ्या..
Mon, 11/12/2012 - 11:51 नवीन
मनातल्या बाता : च्यायला, या अभिजितचे एक दोन चांगले मन लावून लिहिलेले प्रतिसाद उडवावेच लागतील असे दिसते.
हिहिहि मी आणि मन लावून प्रतिसाद? कै च्या कै प्राडॉ. :) ऊडवायसाठी पण तुम्हाला मी मन लावून लिहिलेला प्रतिसाद सापडणार नाही ;) हे सगळं अवांतर पण खरे म्हणजे मला पण आले होते ४-५ कॉल आणि मेसेज बाहेरून. एका रिटर्न कॉलसाठी १२ रु. उडले. तरी फक्त सेव्ह असलेलेच नंबर ऊचलणे हा माझा ५ वर्षापासून उपाय आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>> च्यायला, मला एका नंबरवरुन

आशु जोग
Mon, 11/12/2012 - 01:29 नवीन
>> च्यायला, मला एका नंबरवरुन एसेमेस येतो. [आता एस्सेमेस आला की इथेच डकवतो लंबर] एस्स्मेस असतो '' हा नंबर कुणाचा आहे'' जस्ट डायलचा आहे का
  • Log in or register to post comments

नविनच नहिति मिललि

Ganesh267296
Tue, 11/13/2012 - 15:29 नवीन
नविनच नहिति मिललि
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा