फक्त धडाडीच्या गुंतवणूकदारांकारिता ! ( केबीआयएल : एक खिडकी ५ दारे )
दोस्तांनो ,
श्री.सदानंद ठाकूर ह्यांच्या एका धाग्यावर मी दिवीस लॅब ची शिफारस केली होती. ( विमेनी त्याला झकास बुच मारले , त्याचा बदला घेण्याचे प्लान सुरु आहेत ) आज दिवीस लॅब १०५० पर्यन पोहोचला आहे . १० % परतावा १ महिन्यात मिळतो आहे. ह्या मध्ये अजुन दम आहेच पण त्याबरोबर एक नवी शिफारस आपल्याला करतो.
टायटल मध्येच डिस्लेमर आहे .
एक्सिट क्र. १ : धडाडी असेल तरच पुढे वाचा अन्यथा नको.
रू .२५० ई.पि.एस. असलेली कंपनी रू. ८०० मध्ये मिळत असेल तर ? ज्यांना बाजाराची अगदी जुजबी माहिती आहे ते ही म्हणतील , अकला कुबलच्या भावात मधुरी ?
किर्लोस्कर ब्रदर्स इन्वेस्टमेंट लि. (533297 KBIL ) हया कंपनीची शिफारस फक्त आणि फक्त मिपा करता करतो आहे.
गुंतवणूक कशी कराल ?
एक्सिट क्र. २ : धडाडी बरोबर चिकाटी आहे ना ? नसेल तर पुढे वाचूही नका.
कें.बी.आय.एल. चा आत्ता भाव रू ८०० आहे. आत्ता लगेच - आजच १/४ रक्कम गुंतवा. प्रवर्तकांचे भाग-भांडवल ६५ % आहे आणि खुल्या मार्केटात समभाग फक्त २०% . म्हणून उलाढाल कमी आहे. हाच भाव काही दिवसात रु. ७०० येण्याची शक्यता खूप आहे . त्यावेळी एक्सिट क्र. २ वर आपण होकार भरला आहे हे ध्यानात ठेवा व न भिता अजून १/४ रक्कम गुंतवा. असाच आता भाव रू.६०० आला तर अजून गुंतवा. जर २००८ प्रमाणे प्रचंड मंदी आली तरच , खरोखर पैशाची गरज असेल तरच रू.६०० खाली विका. ( हे केवळ प्रथेप्रमाणे सांगतो , मी म्हणेन अजून खरेदी करा )
एक्सिट क्र. ३ : भाव ऑक्टोबर ला रू.१००० मिळाला तर - दिवाळी साजरी करा. आपली धडाडी कामी आली .३ महिन्यात २० % मिळाले किंवा अजून १/४ रक्कम गुंतवा.
एक्सिट क्र. ४ : २०१२ च्या शेवटी भाव ११०० -१२०० पर्यंत असेत तर मस्त मज्जा करा किंवा अजून १/४ रक्कम गुंतवा.
एक्सिट क्र. ५ : एक्सिट क्र. ३ व ४ न घेता वाट पहा २ वर्षात रू२००० भाव मिळेल .
काही +काही -
+ : किर्लोस्कर ही एक चांगली व्यवस्थापन असलेली कंपनी आहे.
+ /- :ही होल्डिंग कंपनी आहे. हया कंपनीचा नफा इतर ग्रुप कंपनी वर अवलंबून आहे.
+ : चांगला डीविडट / बोनस देणारी कंपनी आहे .
- : प्रचंड मंदीत प्रचंड तोटा ( प्रती समभाग : रू५०० पर्यंत ) होवू शकतो.
+ : नशीब जबरी असेल आणि किर्लोकारानी एक जरी मोठा फंड घुसवला तर भाव कुठच्या कुठे जाईल. (जॅकपॉट आहे हा ! )
मिपा वर अनेक जाणकार आहेत. सगळ्या बाजुनी साधक बाधक विचार/ चर्चा होईल.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मिपा वर धडाडीचा अभाव ?
कुणाला कसा परतावा मिळत आहे
कुछ
धडाडीच्या गुंतवणूकदारांकारिता!
सावध : सुधीर
बाकी सगळे
शिफारस केल्या प्रमाणे
४ पट धमका ! भाव रू ४००० !!!
अजून आहेत का अशा काही शिफारशी
व्हय