लोणी भापकरची मध्ययुगीन मंदिरे पाहून परत फिरलो ते पांडेश्वरचे असेच शिल्पसमृद्ध मंदिर पाहण्यासाठी.
वाटेत मोरगावच्या मयुरेश्वराचे दर्शन करण्यासाठी थांबलो पण महादरवाजाच्याही पुढे आलेली प्रचंड गर्दी पाहून तसेच परत फिरलो. मोरगाव-जेजुरी रस्त्यावर मोरगावपासून ५/६ किमी अंतरावर मावडी गावातून उजवीकडे पांडेश्वरला जाणारा फाटा आहे. खडबडीत रस्त्यावरून १५/२० मिनिटातच पूर्ण कोरड्या असलेल्या कर्हेवरचा पूल पार करून पांडेश्वर गावात पोहोचलो.
गाव बहुत प्राचीन, तशी साक्ष देणारे अवशेष या गावात भरपूर आहेत.
मंदिराच्या वाटेवरच एक वीरगळ आणि त्याशेजारीच नागाची प्रतिमा कोरलेला एक दगड आहे. समोरच एका भग्न मंदिराचे अवशेष विखुरलेले आहेत. अवशेषांवरून हे मूळचे शिवमंदिर असावे असे वाटते.
१. पांडेश्वर मंदिराच्या अलीकडे असलेला वीरगळ आणि नागप्रतिमा
ते बघूनच पांडेश्वरच्या मंदिरात प्रवेश केला. ह्या मूळच्या हेमाडपंथी मंदिराचा मूर्तीभंजकांचा तडाख्यात सापडल्यामुळे शिवकाळात पुन्हा जीर्णोद्धार झालेला दिसतो.
पांडेश्वर मंदिर हे पांडवांनी बांधले अशी दंतकथा. इथल्या मंदिराच्या आवारात कुंती, धर्म, भीम, नकुल आणि सहदेव अशी लहान लहान मंदिरे बांधली आहेत. मूर्तींच्या जागी शेंदूर फासलेले दगड आहेत. अर्जुनाचे मंदिर मात्र येथे नाही. ते येथून जवळच असलेल्या जवळार्जुन नावाच्या गावात आहे अशी माहिती तेथे मिळाली. मात्र आवारात एका धनुर्धारी वीराची मूर्ती असलेला दगड कोरलेला आहे तिलाच अर्जुनाची मूर्ती असे स्थानिक लोक मानतात. मंदिर अर्धे हेमांडपंती शैलीचे तर वरचा अर्धा भाग नंतरच्या काळात नागरी शैलीत जिर्णोद्धारीत केलेला आहे.
मुख्य मंदिराच्या पुढ्यातच भव्य असा नंदीमंडप असून त्यात नंदीची देखणी मूर्ती कोरलेली आहे. कर्हेपठाराच्या ह्या भागातील इथल्या बहुतेक सर्व प्राचीन शिवमंदिरांच्या पुढ्यातले नंदीमंडप शैलीच्या दृष्टीने अगदी सारखे आहेत. नक्षीदार कलाकुसर केलेले हेमाडपंती शैलीतील खांब, नकसकाम केलेले छत आणि स्तंभांच्या मधोमध नंदीची देखणी मूर्ती अशी यांची रचना.
नंदीमंडपाच्या मागच्या बाजूला एक निमुळता स्तंभ बांधलेला असून त्यावर जाण्यासाठी आतूनच अरूंद पायर्या बांधलेल्या आहेत. स्तंभावर काही मूर्ती कोरलेल्या आहेत. ही बांधणी शिवकाळातली दिसते. ह्या स्तंभाच्या समोरच कर्हेचे आता ऐन पावसाळ्यातही कोरडेठाक असलेले पात्र आहे. मंदिराच्या आसपासच्या नदीच्या पात्राला लांबरूंद, प्रशस्त दगडी घाटाने बंदिस्त केले आहे. ह्या देखण्या घाटामुळे पूर्वीच्या काळी कर्हा भरभरून वाहात असावी असे वाटते.
२. धनुर्धारी वीराची मूर्ती
३ मंदिराच्या पुढ्यातील स्तंभ
४. स्तंभाच्या आतमधून वर जाण्यासाठी आतील बाजूस कोरलेल्या पायर्या
५. मंडपातला नंदी
स्तंभ बघून पांडेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी आलो. मंदिराचे देखणेपण सामावले आहे ते याच प्रवेशद्वारात. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना विष्णूच्या 'जय', 'विजय' द्वारपालांसारखे द्वारपाल कोरलेले आहेत. अतिशय सुंदर दिसत असलेले हे दोन भव्य द्वारपाल मूर्तिभंजकांच्या तडाख्यामुळे विद्रूप झाले असले तरी त्यांचे मूळचे देखणेपण अजिबात लपत नाही. पायात तोडे, कटीवस्त्र, मेखला, कमरपट्टा, गळ्यात नक्षीदार माळ, छातीवर रूळणारे पदक, बाहूंना बाजूबंद, कानात कुंडले, मस्तकी नक्षीदार दाक्षिणात्य शैलीचा निमुळता मुकूट, त्यापाठीमागे चक्र आणि मुकुटावर सावली धरलेले दगडी छत्र अशी यांची रचना.
मंदिराच्या समोरीला बाजूस ह्या दोन्ही द्वारपालांच्या बाजूंना जाळीदार गवाक्षे, फुलाफुलांची नक्षी कोरलेली आहे. भिंतीत जागोजागी कोनाडे आहेत. एक दोन कोनाड्यांतील देखण्या मूर्ती शाबूत असून बाकी सर्व कोनाडे रिकामेच आहेत.
समोरील बाजू बघून मंदिराच्या अंतर्भागात प्रवेश केला. आतमध्ये चालुक्य शैलीतील ऩक्षीदार स्तंभ आहेत. स्तंभांच्या शिरोभागी फणा काढलेले नाग कोरलेले आहेत तसेच स्तंभांच्या मध्यभागी व्यालमुख, तसेच वेलबुट्टीदार नक्षी कोरलेली आहे. मूळच्या मंदिराच्या गाभारा बहुधा उद्ध्वस्त झाला असावा. हल्लीचा गाभारा नागरी शैलीत बनवलेला असून त्यातच अतिभव्य अशी शिवपिंडी विराजमान आहे. इतकी भली मोठी पिंडी फार क्वचितच पाहावयास मिळते. पाटेश्वर इथल्या काही शिवपिंडी इतक्या मोठ्या आकाराच्या आहेत.
६. मंदिराचे देखणे प्रवेशद्वार
७. देखणे द्वारपाल
८. द्वारपाल
९. जाळीदार गवाक्ष
१०. कोनाड्यातील मूर्ती
११. मंदिराचा अंतर्भाग
१२. भव्य शिवलिंग
पांडेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन बाहेर आलो. मंदिराला नदीच्या बाजूने घाटाबरोबरच एक प्रशस्त तटसुद्धा बांधून काढलेला आहे. तटाच्या आतल्या बाजूच्या भिंतीवर विविध मूर्ती कोरलेल्या आहेत. तटात खालच्या बाजूला इस्लामिक शैलीत बांधलेली कमानीकमानीची रचना असलेली प्रशस्त ओसरी असून तटावर जायला दोन ठिकाणांहून जिने खोदले आहेत. तटाचे हे बांधकाम बहुधा आदिलशाही सरदार मुरार जगदेवाच्या काळात झालेले असावे. तट चांगला रूंद असून सभोवतालचा परिसर मोठा सुरेख दिसतो. तटाच्या वरतून बघत असता तटाच्या बाहेर बाभळीच्या काट्यांत एक वृंदावन दिसले. तट उतरून मंदिराच्या बाहेर पडून समाधीपाशी गेलो. रूंद दगडी चौथरा आणि त्यावर देखणे वृंदावन अशी याची रचना. इकडील रहाळात इतकी चांगली समाधी दुसरी दिसली नाही यावरून ही एका नामांकित सरदाराची असावी हे उघड आहे.
समाधीपासून तसेच पुढे जाता आता पूर्ण भग्नावस्थेत असलेले अजून एक लहानसे शिवमंदिर आहे, नव्हे उद्ध्वस्त दगडांच्या ढिगार्यात असलेले शिवलिंगच ते.
१३. मंदिरासभोवती असलेली तटबंदी
१४. मंदिराच्या आसपासची पांडवांची मंदिरे
१५. इस्लामिक स्थापत्यशैलीतील कमानदार रचना
१६. तटाच्या भिंतीत कोरलेल्या मूर्ती
१७ तटाच्या भिंतीत कोरलेल्या मूर्ती
१८. जवळच असलेले देखणे समाधी वृंदावन
हे बघूनच परत पांडेश्वरापाशी येऊन बाहेर पडू लागलो तर मंदिराच्या नदीकाठावरील असलेल्या दरवाजापाशी दोन वीरगळ दृष्टिस पडले. एक वीरगळ नेहमीसारखाच युद्धाचा प्रसंग असलेला, घोडेस्वारांशी एकट्यानेच भाल्याचा उपयोग करून लढत असलेल्या वीराचा तर दुसरा वीरगळ मात्र अगदी वेगळा वाटला. ह्या वीरगळावर वीर चक्क वाघाशी झुंज देतांना दाखवला आहे. उघड आहे ह्या वीराचा मृत्यु वाघाशी झुंज देतांना झालेला असावा.
१९. मंदिर पायर्यांपाशी असलेले वीरगळ
२०. वाघाशी लढताना झालेल्या मृत्युशी संबंधित वीरगळ
हे वीरगळ बघून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. सासवडला जाण्यासाठी पांडेश्वर गावातून नाझरे मार्ग धरला. वाटेत अनेक जुनी मंदिरे दिसली, अचानक कोथळे गावानजीक एका लहानश्या टेकाडावर एक लहानसे शिवमंदिर व पुढ्यातच एक वीरगळ दिसला. हे मंदिरही पांडेश्वराइतकेच जुने असावे. तशाच प्रकारच्या पुढ्यातला नंदीमंडप, नक्षीदार स्तंभांचा अंतर्भाग असलेले. मंदिराच्या आवारात ३/४ वीरगळ तसेच वीरगळ कोरण्यासाठी आयताकारात कापलेल्या कित्येक शिळा आहेत. नंदीमंडपाच्या बाजूलाच काही मूर्ती कोरलेल्या आहेत. शेजारीच एक सतीशिळा आहे. वरच्या बाजूला चंद्र सूर्य, खालच्या बाजूला कैलासवासी झालेले पती पत्नी शिवलिंगाची पूजा करताना दाखवले असून मधल्या भागात संपूर्ण शिळा भारून टाकलेला आशीर्वादपर मुद्रेतील सतीचा हात अशी याची रचना.
२१. कोथळे शिवमंदिर
२२. नंदीमंडप
२३. मंदिराच्या आवारातील वीरगळ
२४. मंदिराच्या आवारातील अजून एक वीरगळ
२५. आवारातील काही मूर्ती
२६. सतीशिळा
हे मंदिर बघूनच पुढे निघालो. सासवड गाठून आता भुलेश्वरच्या मार्गाला लागलो. भुलेश्वराचे दर्शन झाले. अर्थात ह्या अतिशय देखण्या मंदिरावर आधीही येथे लिखाण झालेले असल्याने परत त्यावर लिहिणार नाही. भुलेश्वराचा घाट उतरल्यावर एका रोचक ठिकाणाला भेट दिली त्यावर अत्रुप्त आत्मा लवकरच लिहितील.

वाचने
29171
प्रतिक्रिया
63
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुझे भटकंतीचे धागे पहाणे
अगदी
In reply to तुझे भटकंतीचे धागे पहाणे by गणपा
वीरगळांवर आख्खा धागा लिहिलाय
In reply to अगदी by तुषार काळभोर
धन्स रे. बहुतेक मी रजेवर
In reply to वीरगळांवर आख्खा धागा लिहिलाय by प्रचेतस
काय हे?
In reply to वीरगळांवर आख्खा धागा लिहिलाय by प्रचेतस
आग्रह नाही.
In reply to काय हे? by सौरभ२१११
पण
In reply to आग्रह नाही. by प्रचेतस
>>वीरगळांवर आख्खा धागा
In reply to पण by सौरभ२१११
वल्लीशेठ लिखते रहो.
In reply to तुझे भटकंतीचे धागे पहाणे by गणपा
छानच
अगदी अगदी!
In reply to छानच by कपिलमुनी
मस्त
सुंदर
@भुलेश्वराचा घाट उतरल्यावर
रात्रीचं लिवायलाच बसवलाय नं,
In reply to @भुलेश्वराचा घाट उतरल्यावर by अत्रुप्त आत्मा
कठीण आहे.
In reply to रात्रीचं लिवायलाच बसवलाय नं, by प्रास
शॉल्लेट!!
bharich re valli
???
छान
लै भारी रे वल्ली
नेहमीप्रमाणेच मस्त !
काय जबरी फटू हो तुमचं ते!!!!!
In reply to नेहमीप्रमाणेच मस्त ! by मदनबाण
बैदवे ते ध्यानलिंग उज्जैनच्या
In reply to काय जबरी फटू हो तुमचं ते!!!!! by बॅटमॅन
बैदवे ते ध्यानलिंग उज्जैनच्या सिद्धाश्रमातच हाय का अजुन कुन्कडं????विकी दुवा :--- http://en.wikipedia.org/wiki/Dhyanalinga या मंदिराचे फोटो spiritualindia.org या साईटच्या फोरमवर पाहता येतील. बर्याच जणांना शिवलिंगा बद्धल माहिती हवी असते,तर काही जणांकडे चुकीची माहिती असते ! या बद्धल अधिक माहिती इथे मिळेल :--- Shiva Lingam – Meaning and the mythsबहुत धन्यवाद मदनबाणजी
In reply to बैदवे ते ध्यानलिंग उज्जैनच्या by मदनबाण
मदनबाणाने शिवलिंगाची माहिती
In reply to बहुत धन्यवाद मदनबाणजी by बॅटमॅन
म्हणून मदनाचे बाण झालात तर
In reply to मदनबाणाने शिवलिंगाची माहिती by मदनबाण
दुव्यांबद्दल धन्स रे बाणा.
In reply to मदनबाणाने शिवलिंगाची माहिती by मदनबाण
उत्तम
In reply to दुव्यांबद्दल धन्स रे बाणा. by प्रचेतस
पुण्यातल्या
In reply to नेहमीप्रमाणेच मस्त ! by मदनबाण
सोन्स्क्रूत चा अर्थः
In reply to नेहमीप्रमाणेच मस्त ! by मदनबाण
फोटोंवरून मंदिर मोठ्या
सही
अप्रतिम
लिंक टाका..
द्या न राव कुणीतरी..
In reply to लिंक टाका.. by ह भ प
लिंक दिली असती हो पण सध्या
In reply to द्या न राव कुणीतरी.. by ह भ प
इथल्या धाग्यांचं काय भविष्य
In reply to द्या न राव कुणीतरी.. by ह भ प
वल्ली साहेब, फारच सुंदर नक्कीच ह्या ठिकाणी जाउन येईन.
मस्त !!
वल्ली जोन्स म्हंजे नादच खुळा
नेहमीप्रमाणेच सुंदर!!
श्रीक्षेत्र पांडेश्वर
लई भारी आणि बुवांच्या वुईथ
@बुवांच्या वुईथ व्हिडो
In reply to लई भारी आणि बुवांच्या वुईथ by ५० फक्त
आणी हे २ फोटू....
In reply to @बुवांच्या वुईथ व्हिडो by अत्रुप्त आत्मा
नेहमीप्रमाणेच
वल्ली द स्पेशलिस्ट!
+१
In reply to वल्ली द स्पेशलिस्ट! by प्यारे१
वल्ली ष्टाईल
आता मी आणि काय लिहु वल्ली.
वाह वाह
वाह वाह
In reply to वाह वाह by अन्या दातार
वाह वाह*२
In reply to वाह वाह by किसन शिंदे
वल्लीच्या
साधारण किती जुने आहे मंदिर ?
कमीत कमी १००० वर्ष तरी जुने
In reply to साधारण किती जुने आहे मंदिर ? by मालोजीराव
जबरदस्त रे वल्ली....
मस्त!
टिपीकल वल्ली स्टाईल !!
मस्त.
अजून काही माहिती या मंदिरा
वल्ली, वर्णन आणि फोटोंमुळे