✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

महाराष्ट्राचे मद्यर्षी!

ह
हुप्प्या यांनी
Tue, 11/06/2012 - 11:40  ·  लेख
लेख
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/17093036.cms शिवाजीमहाराजांच्या नंतर जाणता राजा ह्या पदवीवर हक्क सांगणारे आपले अत्यंत लाडके, कर्तृत्ववान, तळागाळातील लोकांचे नेते हे महाराष्ट्राचे मद्यर्षी आहेत असे दिसते आहे. महाराष्ट्राचा मद्यराष्ट्र बनवायची महत्त्वाकांक्षी योजना ह्या राजाने अत्यंत विचारपूर्वक आखली आणि लोकांना, विशेषतः तरूणांना अंमलाखाली आणून अमलात आणली. वाईन अर्थात वारूणी हा एक प्रकारच फळांचा रस आहे अशी रसभरित वर्णने करुन हे पेय लोकांच्या गळी उतरवले जाते असा समाजसेवक डॉ. अभय बंग यांचा दावा आहे. अशा प्रचारामुळे आजकाल तरुणांत रेव्ह पार्ट्या वगैरे प्रकार बोकाळले आहेत. एकंदरीत लोकांना दारू सहज मिळते म्हणून लोक खूष, दारूवर भक्कम पैसा मिळतो म्हणून जाणता राजा आणि त्याचे भालदार चोपदार खूष आणि सगळाच आनंदी आनंद अशी ही गंमतीची योजना आहे.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
12808 वाचन

💬 प्रतिसाद (66)

प्रतिक्रिया

दारु बंदी कशी होईल हो,सरकारचे

श्री गावसेना प्रमुख
गुरुवार, 11/08/2012 - 14:00 नवीन
दारु बंदी कशी होईल हो,सरकारचे उत्पन्न कसे वाढणार,अभय बंग काय म्हणतात बघा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

चाचा भले शाबास

निनाद मुक्काम …
Tue, 11/06/2012 - 21:40 नवीन
चाचा भले शाबास
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

दारू प्यायल्याने (कमी किंवा

रेवती
Tue, 11/06/2012 - 19:49 नवीन
दारू प्यायल्याने (कमी किंवा जास्त हा मुद्दा नाही) होणार्‍या दुष्परिणामांबाबत काही बोलत नाही पण बरेच दिवसांपूर्वी एक यादी दिली होती (कुठे ते आठवत नाही) त्यातल्या म्हणे सगळ्या राजकारण्यांकडे लायसेन्स होतं, मद्य बनवण्याचं आणि लोकांनी आरडाओरडा केल्यावर राजकारण्यांचे ओळखीचे पण नातेवाईक नसलेल्या चार दोन लोकांना लायसेन्स देऊन "बघा, बघा सामान्य लोकांनाही हे परवाने दिले जातात." हा पुरावा सादर केला होता. लोकांना वेडेही समजत नाहीत तर फक्त गप्प करण्याचे उपाय शोधून आपलं काम चालू ठेवणं एवढाच उद्देश. कमी पिणारे खरच कमी पीतही असतील (तब्येतीला ती कमी दारू तरी किती चांगली हे सांगायला नको) पण त्यांची मुलं मात्र बरेचदा तुडुंब पिणारी असतात याची उदाहरणं इतकी डोळ्यासमोर आहेत की त्याबद्दल सांगून मलाच वाईट वाटत राहतं म्हणून काही बोलत नाही, जाऊ दे, पिणार्‍यांना त्यांच्या मुलांची काळजी नसेल तर दुसर्‍यांना ती का म्हणून असावी?
  • Log in or register to post comments

+१

दादा कोंडके
Tue, 11/06/2012 - 20:27 नवीन
सहमत! दारुडी लोकं दारूचं समर्थन करण्यासाठी 'बिअर म्हणजे दारू नव्हे', किंवा कै च्या कै उदाहरणं देउन 'व्यसन मग ते चहाचं जरी असलं तरी वाईट' असं छाती बडवून सांगत रहाणं काही नवं नव्हे. असो, प्रत्येक गोष्ट शास्त्रिय किंवा वैद्द्यकीय दृष्ट्या सिद्ध केलीच पाहिजे असं नाही. थोडसं आजुबाजूला बघून, सामाजिक परिणाम पाहून कोणताही संवेदनशील माणूस दारूपिण्याचं उदात्तीकरण करणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

सोकाजी नानांच्या

गणपा
Tue, 11/06/2012 - 20:22 नवीन
सोकाजी नानांच्या चावडीवरच्या मंडळींची* या बाबतीतली मतं जाणून घ्यायला आवडेल. :) * तीच ती टपरी वरचा 'चा' पिणारी. (कधी तरीच घेणारा, मग तो चा असो वा मद्य ) गणा
  • Log in or register to post comments

सहमत

पिवळा डांबिस
Tue, 11/06/2012 - 22:41 नवीन
>>सोकाजी नानांच्या चावडीवरच्या मंडळींची* या बाबतीतली मतं जाणून घ्यायला आवडेल. आम्हाला देखील सोकाजीनानांच्या चावडीवरच्या मंडळींची मतं जाणून घ्यायला आवडतील!! च्यायला, आजकाल आम्हाला नानांची चावडी ह्या तात्याच्या चावडीपेक्षा जास्त आवडायला लागल्येय की काय!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

मिपा

चिरोटा
Tue, 11/06/2012 - 22:33 नवीन
मिपाकरांना मराठी नेत्यांची प्रगती पाहवत नाही हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
  • Log in or register to post comments

एक शंका

हुप्प्या
Tue, 11/06/2012 - 22:52 नवीन
अफू, गांजा, चरस वगैरे मादक पदार्थांवर भारत सरकार बंदी घालते. ते विकणे, फुकणे वा अन्य प्रकारे सेवन करणे ह्यावर बंदी आहे कारण (म्हणे) ते घातक आहेत. मग दारूच्या बाबतीत मुक्त धोरण का? दारुचेही व्यसन लागू शकते, दारू जास्त प्यायल्यावर स्वतःवरील नियंत्रण हरवू शकतो, अतीसेवनाने जीवघेणे विकार होऊ शकतात. पण तिथे प्रगल्भ माणसाने विचार करून आपल्या हिताचे, आवडीचे असेल तसे वागावे अशी मुभा आहे. मग हीच मुभा अन्य मादक पदार्थांकरता का नाही? हा दुटप्पीपणा नाही का? ह्या दोन प्रकारातील सीमारेषा नक्की कोणती?
  • Log in or register to post comments

उत्तर

सुनील
Tue, 11/06/2012 - 23:01 नवीन
यात भारत सरकार काही जगावेगळे करत आहे, असे वाटत नाही!!! जगातील बहुसंख्य देशांचे हेच धोरण आहे. असो, चरस सेवन केल्यावर गोड पदार्थ (विशेषतः जिलब्या) चांगल्या लागतात म्हणे!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या

जगातील बहुसंख्य देशांचे हेच

मदनबाण
Wed, 11/07/2012 - 21:52 नवीन
जगातील बहुसंख्य देशांचे हेच धोरण आहे. अमेरिकेने सध्या हे धोरण बदलले दिसते आहे ! ;)कोलोरॅडो आणि वॉश्‍गिंटन या राज्यामधून गांजा आता कायदेशीर झाला आहे ! ;) गांजा बहाद्दरांच्या मते गांजा मुळे कॅन्सर, ट्यूमर यासारखे असाध्य आजार बरे होतात असा युक्तिवाद केला जातो आहे. अधिक इथे:- अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी मतपत्रिकेवर गांजा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

पुलोत्सवातील अभय बंग यांच्या

फास्टरफेणे
Wed, 11/07/2012 - 19:28 नवीन
पुलोत्सवातील अभय बंग यांच्या भाषणाचा व्हिडीओ मिळेल काय?
  • Log in or register to post comments

अल्कोहोलचे दारू

आनंदी गोपाळ
Wed, 11/07/2012 - 23:38 नवीन
अल्कोहोलचे दारू बनविण्याव्यतिरिक्त इतर काही उपयोग असतात का हो? (आपल्या देशात जवळजवळ सगळीच 'विदेशी' दारू अ‍ॅब्सोल्यूट अल्कोहोल व पाणी यांच्या मिश्रणास फ्लेवर देऊन बनवितात)
  • Log in or register to post comments

हो, असतात ना!

तिमा
Sat, 11/10/2012 - 13:32 नवीन
ईथाइल अल्कोहोल हे अनेक प्रकारची औषधे, सुवासिक रसायने, सॉल्व्हंट, जंतुनाशक म्हणून वापरले जाते. रसायनशास्त्रात त्याचे असंख्य उपयोग आहेत. कुठलेही रसायन वाईट नसते, ते वापरणारा चांगला वा वाईट असतो. सल्फ्युरिक अ‍ॅसिड हे अत्यंत उपयोगी रसायन आहे. पण ते कुणाच्या तोंडावर फेकले तर ती व्यक्ती आयुष्यातून उठते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

अल्कोहोल तोंडावर फेकले,

आनंदी गोपाळ
Sun, 11/11/2012 - 00:22 नवीन
तर माणूस मरतो का? किंवा आयुष्यातून उठतो का? धान्यापासून 'अल्कोहोल' निर्मितीचे परवाने आहेत. 'दारू'चे नाहीत. शिवाय जगातली प्रत्येक दारू, जी माणसाने आदीम काळी शोधली, ती धान्य वा इतर खाद्यान्नापासूनच बनते. व आदीम काळापासून प्राशन केली जाते. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

चावडीवारच्या गप्पाना आता हाच

किणकिनाट
गुरुवार, 11/08/2012 - 12:52 नवीन
चावडीवारच्या गप्पाना आता हाच प्रतिसाद दिला आहे. "विषय आणि आशय तसेच प्रतिसाद जुळत नाहित असे वाटतेय. बारामती, मद्यसम्राट, परमिटे, भ्रष्टाचार, धान्यापासून माद्य बनविणे, महाराष्ट्र आणि मद्य्र्राष्ट्र हे मुद्दे आणि मद्यप्राशनातील पारिमाणे, योग्यायोग्यता ह्या वेगवेगळ्या गोष्टी असाव्यात असे मझ्या अल्पबुद्धीस वाट्ते आहे. ब॑गना यापेक्शा जास्त ट्यार्पी नक्कीच योग्य आहे. " किणकिनाट प्रस॑ग आणि सोबत पाहुन मी घ॑टा वा ग्लास बनतो पण प्रसन्न आणि मन्जुळ किणकिनाट हवाच..........
  • Log in or register to post comments

अभय बंग यांचा मद्यबंदीकरता लढा सुरु!

हुप्प्या
Sun, 11/11/2012 - 02:34 नवीन
http://www.loksatta.com/maharashtra-news/dr-abhay-bang-will-fight-for-alcohol-prohibition-7286/ अभय बंग हे मिसळपाव वाचत नाहीत हे उघड आहे. नाहीतर दारु कशी चांगली आहे हे त्यांना तात्काळ पटले असते. आता बघू आपले मद्यर्षी, जाणते राजे काय प्रत्युत्तर देतात ते.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा