>:) शैक्षणिक संस्थांमध्ये वारंवार होणाऱ्या गोळीबाराच्या घटनांवर उपाय म्हणून शिक्षकांनीच बंदूक घेऊन वर्गात सज्ज राहावे, असा ठराव टेक्सास राज्यातील एका शाळेच्या मंडळाने मंजूर केला आहे.
असा निर्णय घेणारी ही अमेरिकेतील पहिलीच शाळा असून, वर्गात येणाऱ्या कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्यासाठी एकमताने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे, या निर्णयाला पालकांनीही आक्षेप घेतला नाही. ~X(
"हॅरॉल्ड इंडिपेंडंट स्कूल' असे या शाळेचे नाव आहे. शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आल्याचे शाळेचे अधीक्षक डेव्हिड थ्वेट यांनी सांगितले. शाळेत कॅमेरे बसविण्यात आले आहेत, इतर सुरक्षा व्यवस्थाही आहे; मात्र ही सुरक्षा भेदून हल्लेखोर शाळेत आलाच, तर अशा आणीबाणीच्या परिस्थितीचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या शाळेत ११० विद्यार्थी शिकत असून, मोठी रहदारी असणाऱ्या महामार्गाजवळ ही शाळा आहे. त्यामुळे शाळेवर हल्ला करणे सहजशक्य आहे. या सर्व गोष्टींचा विचार करूनच हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अनेक शिक्षणतज्ज्ञांनीही या निर्णयाचे समर्थन केले आहे. :))
शाळेत होणाऱ्या गोळीबाराच्या घटनांमुळे अमेरिकी कॉंग्रेसने देशभरातील शाळांत शस्त्रे नेण्यास बंदी घातली होती; मात्र सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय रद्दबातल ठरवला; मात्र टेक्सास राज्यात आजही शाळेच्या प्रशासनाच्या परवानगीशिवाय शाळेत शस्त्र नेण्यास बंदी आहे. थ्वेट म्हणाले, ""केंद्र सरकारने शाळांचा परिसर शस्त्रास्त्रमुक्त करण्याचे जाहीर केले होते, त्यानंतरच गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. अशा प्रकारे निःशस्त्र लोकांच्या गटाचे संरक्षण कोण करणार?'' या धोरणावर एक वर्षापासून विचार करण्यात येत होता, असेही त्यांनी सांगितले; मात्र शाळेतील किती शिक्षकांकडे शस्त्र असेल, हे सांगण्यास त्यांनी नकार दिला. :$
शिक्षकांना शाळेत बंदूक घेऊन येण्यापूर्वी परवाना घ्यावा लागणार आहे; तसेच या शिक्षकांना आणि शाळेतील अधिकाऱ्यांना आपत्ती निवारणाचे प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.
>:)
वाचने
4315
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
दुसरी घटनादुरुस्ती
घटनादुरुस्ती
In reply to दुसरी घटनादुरुस्ती by वैद्य (verified= न पडताळणी केलेला)
खून
In reply to घटनादुरुस्ती by पिवळा डांबिस
काही
शाळेचा
In reply to काही by भडकमकर मास्तर
हो हे कालच समजले आणि मी हतबुद्ध झालो!
चूक
In reply to हो हे कालच समजले आणि मी हतबुद्ध झालो! by चतुरंग
होय हा अर्थ लावला गेला
In reply to चूक by वैद्य (verified= न पडताळणी केलेला)
.
बिंद्रा
In reply to . by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
अनावश्यक प्रतिसाद