पाकिस्तानातील एक पत्रकार, विचारवंत महिला मारवी सरमद ह्यांची ही एक झलक पहा
http://www.youtube.com/watch?v=ZdLvNH_BkRk
अजूनही अनेक उदाहरणे सापडतील.
एकंदरीत पाकिस्तानात मुसलमानांप्रमाणेच हिंदू, ख्रिस्ती, बौद्ध, शिया, अहमदी हे बरोबरीचे नागरिक आहे हा मुद्दा अगदी आक्रमकतेने मांडणारी एक महिला. पाकिस्तानवरचा इस्लामी पगडा कमी करण्याकरता आपल्या परीने निर्भय प्रयत्न करणारी एक महिला विचारवंत. पाकिस्तानाने ज्या द्विराष्ट्रवादाच्या आधारावर देश तोडून आपला देश बनवला तो आता कालबाह्य झाला आहे असे मत ठणकावून सांगणारी एक रणरागिणी.
हिच्यावर भारताची गुप्तहेर असल्याचा, पाकिस्तानची शत्रू असल्याचे कित्येक आरोप झाले आहेत. हिंदू वेष समजला जाणारी साडी, कुंकू वगैरे वापरल्यामुळेही कट्टर धार्मिक लोकांचा तिच्यावर दात आहे.
नुकतेच हिच्यावर कुण्या माथेफिरुने गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने बाईसाहेब त्यातून वाचल्या. त्यांना दीर्घायू लाभो
पाकिस्तानाचे भारताला असणारे उपद्रवमूल्य कमी करायचे असेल तर मारवीबाईंसारख्या शेकडो, हजारो व्यक्ती पाकिस्तानात निर्माण व्हाव्यात अशी इच्छा.
http://www.hindustantimes.com/world-news/Pakistan/Pakistani-activist-Ma…
वाचने
2241
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
अभिनंदन
नितीन जी .....
In reply to अभिनंदन by नितिन थत्ते
का हो म्हणजे?
In reply to नितीन जी ..... by चेतनकुलकर्णी_85
नको तिथे नको तो विषय कशाला?
खरेच वाघीण आहे. पाकड्यांकडून
हा विडो त्या शेरनीचा!http:/
बाबौ!
In reply to हा विडो त्या शेरनीचा!http:/ by सोत्रि