Skip to main content

पाकी शेरनी!

लेखक हुप्प्या यांनी शनिवार, 03/11/2012 या दिवशी प्रकाशित केले.
पाकिस्तानातील एक पत्रकार, विचारवंत महिला मारवी सरमद ह्यांची ही एक झलक पहा http://www.youtube.com/watch?v=ZdLvNH_BkRk अजूनही अनेक उदाहरणे सापडतील. एकंदरीत पाकिस्तानात मुसलमानांप्रमाणेच हिंदू, ख्रिस्ती, बौद्ध, शिया, अहमदी हे बरोबरीचे नागरिक आहे हा मुद्दा अगदी आक्रमकतेने मांडणारी एक महिला. पाकिस्तानवरचा इस्लामी पगडा कमी करण्याकरता आपल्या परीने निर्भय प्रयत्न करणारी एक महिला विचारवंत. पाकिस्तानाने ज्या द्विराष्ट्रवादाच्या आधारावर देश तोडून आपला देश बनवला तो आता कालबाह्य झाला आहे असे मत ठणकावून सांगणारी एक रणरागिणी. हिच्यावर भारताची गुप्तहेर असल्याचा, पाकिस्तानची शत्रू असल्याचे कित्येक आरोप झाले आहेत. हिंदू वेष समजला जाणारी साडी, कुंकू वगैरे वापरल्यामुळेही कट्टर धार्मिक लोकांचा तिच्यावर दात आहे. नुकतेच हिच्यावर कुण्या माथेफिरुने गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने बाईसाहेब त्यातून वाचल्या. त्यांना दीर्घायू लाभो पाकिस्तानाचे भारताला असणारे उपद्रवमूल्य कमी करायचे असेल तर मारवीबाईंसारख्या शेकडो, हजारो व्यक्ती पाकिस्तानात निर्माण व्हाव्यात अशी इच्छा. http://www.hindustantimes.com/world-news/Pakistan/Pakistani-activist-Ma…

वाचने 2241
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

प्रतिभा पाटिल हा विषय नसलेला धागा काढल्याबद्दल अभिनंदन.

In reply to by नितिन थत्ते

तुम्ही मिसळ पाव वरील दिग्विजय सिंह आहात काय हो???

ज्या विषयावर काथ्याकूट काढला आहे त्यावर बोला. आणि अभिनंदन करायचेच असेल तर आपल्या आवडत्या राष्ट्रपतीबाईंचे करा कारण आपल्या लांच्छनास्पद कारकीर्दीतील एक नवे काळेकुट्ट पान उघडकीस येऊ दिले नाही. आणि आपल्या नावडत्या माहिती आयोगाचे आभार माना की एक दिवस विश्रांती घेतली. बाकी मिसळपाववर कोंबडे झाकले म्हणून सूर्य उगवायचा थांबत नाही हे आपणासारख्या सुज्ञास ठाऊक आहेच! असो.