परवा आमच्या कॉलनीमागल्या मोठ्या रस्त्यावरच्या बसस्टॉपवर मी वाट बघत बसलो होतो. आता, बस स्टॉपवर बसचीच वाट बघता येते, असं नाही. मी कॉलेजवरून लवकर परतलो असल्याने तिथे येऊन बसलो होतो. ज्या मुलीची वाट बघत होतो, ती माझी मैत्रीण तयार व्हायला इतका काही वेळ लावते, की काही विचारू नका. वास्तवीक सकाळी अकराच्या सुमारास मोकळ्या रस्त्यावरून फेरफटका मारायला काय मोठी एवढी तयारी करावी लागते ते तिचे तिला ठाऊक. या मुली नेहमीच एवढा वेळ लावतात. मग त्यांना अगदी शिकवणीला जायचं असलं, तरी त्यांना निदान पाऊण तास आधीपासून तरी तयारी करावी लागते म्हणे. बरं, एवढं करून 'आमच्या क्लासमध्ये चांगला दिसणारा एकही मुलगा नाही', 'आमचे सर सुंदर मुलींच्या बाबतीत जरास्से हेच आहेत, पण काय शिकवतात म्हणून सांगू!' - हे आहेच. आता जर असं असेल, तर अशा क्लासला जाताना तरी नट्टापट्टा करायची काय गरज? बरं, त्यांना तसं विचारून बघा, तर 'छे! मी अजिबात मेकअप करत नाही हा! ती अमूक अमूक करते मेकअप. मी फक्त क्रीम लावते, आय लायनर लावते, काजळ घालते, आणि लिप ग्लॉस लावते - बास्स! एवढंच!' यातली अमूक अमूक म्हणजे या मुलींची नावापुरती असलेली कोणीतरी जीवलग मैत्रीण असते. हे सगळं ऐकलं की, मेकअप म्हणजे नेमकं काय करत असाव्यात या मुली अजून, असा प्रश्न पडतो मला. अर्थात, याबाबतीत माझी जिज्ञासा जास्त तीव्र स्वरूपाची नसल्याने या प्रश्नावर मी जास्त विचार करत बसत नाही. एकदा कॉलेजमधल्या माझ्या एका मैत्रीणीबरोबर ट्रेनमधून घरी परतत असताना तिने मला विचारलं, 'तुम्ही पुरुष मंडळी रोज-रोज दाढी करत बसता, त्यापेक्षा एकदाच गाल वॅक्स का नाही करून टाकत?' आता चेहऱ्याला मेण लावल्याने दाढी उगवणं कायमचं बंद होतं की काय, अशा निरागस कल्पनेनं माझं मन अचंबित झालं होतं; अहो मेण हे फक्त दिवे गेल्यावर उपयोगी पडतं, असा माझा जन्मापासूनच समज होता. माझ्या मेण न लावलेल्या, आणि अर्धवट हिरव्या पडलेल्या त्या चेहऱ्यावर मला झालेला हा नवा साक्षात्कार स्पष्टपणे प्रकट होत होता. मी तरी माझं मेणासंबंधीचं अज्ञान लपवण्याच्या हेतूने म्हटलं, 'छ्या बुवा! आपल्याला त्या वॅक्स पेक्षा शेविंग क्रीमच सोयीचं पडतं. फेस आला की कसं, दाढी करायला मजा येते. मेणाला फेस येतो का? नाही. त्यामुळे त्यात मजा नाही.' दुसऱ्याच्या अज्ञानाला हसू नये, ही शीकवण मी नेहमीच पाळत आलोय. अहो मी लोकांच्या अज्ञानाला त्यांच्या पाठीही हसत नसतो. आणि ही बया इतक्या मोठ्याने हसायला लागली म्हणता, मला काही कळेनाच. 'अर्रे!! वॅक्स म्हणजे ते वालं वॅक्स नाही! वॅक्सिंग वॅक्सिंग!!' मी आपलं उगाचच, 'अच्छा अच्छा, वॅक्सिंग होय! मला वाटलं-' तसं मला तोडत ती म्हणाली, 'राहू दे हां विद्वान साहेब, तुला वॅक्सिंग म्हणजे माहित नाही ते ऍड्मिट कर. फेस इट, फेस इट!' यातल्या फेस इट वर तिने इतका जोर का दिला, ते मला कळल्यावाचून राहिलं नाही, पण मी माझं अज्ञान मान्य केलं. तसा मी खिलाडूवृत्तीचा आहे. नाही माहिती तर नाही माहिती आपण कशाला लपवा? त्या दिवशी स्त्रियांच्या फक्त डोक्यावरच केस उगवतात, आणि ते फक्त डोक्यावरच उगवत असल्याने ते जास्त असतात, या माझ्या ठाम समजुतीचा अंत झाला. माझ्या ज्ञानात भरपूर भर घालण्यात आली, आणि काही दूरूस्तीची कामे सुद्धा पार पडली. इतकंच नाही, तर मला अजून कोणी गर्लफ्रेंड का मिळाली नाही, यावर मुक्त आणि व्यक्त भाष्य झाले. अर्थात्, मगाशी सांगितल्याप्रमाणे, मी अतिशय खिलाडूवृत्तीचा असल्याकारणाने मी ते सर्व मुकाटपणे ऐकून घेतलं. पुरुषांप्रमाणे मुलीसुद्धा दाढीमिशी करतात, हे मला आता समजलेलं आहे. दाढी करण्याला त्यांनी ब्लिचिंग असं नाव ठेवलंय, आणि मिशी काढली, असं म्हणायच्या ऐवजी 'मी अप्पर लिप्स करून आली' असं थर्ड पर्सन सिंग्युलरचं व्याकरण स्वत:साठी लावत त्या रोखठोकपणे सांगतात. मुलींच्या चेहऱ्यावरचे केस त्या ब्लिचिंग करून घालवतात की असं काहीतरी जेव्हा माझ्या कानावर आलं, तेव्हा आमची मोलकरीण जमीन साफ करायला जी ब्लिचिंग पावडर वापरते, तिने चेहरा सुद्धा साफ करता येतो हे मला अजिबात पटेना. वॅक्सिंगच्या एका अनुभवाने मी शहाणा झालो होतो, म्हणून ज्या सुमुखीच्या तोंडून 'मी पार्लरला जात्येय, ब्लिचिंग करायचंय' असं मी ती चेहऱ्याभोवती बोट फिरवून दाखवत असताना ऐकलं, तेव्हा फक्त 'ब्लिचिंग?' एवढंच कपाळावर आठ्या आणत म्हणून मी माझं अज्ञान ग्रेसफुली प्रकट केलं. अर्थात् या अज्ञानाबाबत माझं हसं झालं नाही. या मुली पार्लर मध्ये तासन्तास घालवतात. मेसेज करून चौकशी केली, की 'आता झालंय सगळं ऑलमोस्ट, फक्त क्लीन-अप बाकी आहे' असं उत्तर येतं. हे क्लीन अप करणं, म्हणजे सलून मध्ये न्हावी दाढी झाल्यावर तुरटी फिरवतो, त्याला समांतर असावं, असा माझा समज आहे. पण हा समज गैर असो वा नसो, मला या बाबतीतल्या माझ्या संभाव्य अज्ञानातच सूख आहे. या मुली सुंदर दिसण्यासाठी एवढी जोमाने तयारी करतात, याची मला काही वर्षांपूर्वी सूतराम कल्पना नव्हती. त्या मानाने आम्ही पुरुष मंडळी काहीच मेहनत घेत नाही असं म्हणायला हरकत नाही. जिम मध्ये रोज जाऊन चार बैठका मारल्या आणि गाढवासारखी ओझी उचलली, याला मेहनत म्हणायला आता मी तयार नाही. वास्तवीक आम्हां पुरुषांना जास्त मेहनत करण्याची मुळी गरजच नाही हे आता माझ्या लक्षात आलं आहे. आमचं निश (niche) हे बायकांच्या तुलनेत जास्तच असणार, याची मला खात्री आहे. निश म्हणजे एखाद्या जीवाची निसर्गातील इतर घटकांच्या नजरेतील भूमिका, किंवा अवस्था. आम्हां पुरुषांच्या बाबतीत मला अवस्था हा शब्द जास्त सुटेबल वाटतो. असो. हे निश बहुतांशी प्राणी-प्रजातींत पुरुषांमध्ये जास्त चांगलं आढळून येत असावं. उदाहरणार्थ, सिंह-सिंहीण, मोर-लांडोर, चिमणा-चिमणी, कोकिळ-कोकिळा(मी दोघांनाही बघितलंय), कोंबडा-कोंबडी, बोका-भाटी, इ. प्रजातींमध्ये नर हे मादीपेक्षा सुंदर दिसतात. मला विचाराल, तर कुत्रा-कुत्री मध्ये सुद्धा मला कुत्राच जास्त छान वाटतो. इथे, एक नमूद करतो, की लांडोर आपल्याला तेवढी सुंदर वाटली नाही, तरी मोराला तीच सर्वांत सुंदर वाटते, कारण ते सजातीय आहेत. त्याचप्रमाणे, आपल्या पुरुष जातीला जरी स्त्री ही जगातील सर्वांत सुंदर वस्तू वाटत असली(आणि वाटायलाच हवी), तरी निसर्गाच्या दृष्टीतून आम्ही पुरुष मंडळीच जास्त सुंदर ठरत असू. या मला झालेल्या अवलोकनातूनच नट्टापट्टा करण्याची गरज पुरुषांपेक्षा स्त्रियांना जास्त का भासते, ह्या मला सतत भेडसावणारया प्रश्नाचे उत्तर मला कळले.
वाचने
26257
प्रतिक्रिया
147
मिसळपाव
प्रतिक्रिया
रोचक आणि लॉजिकल. पण पाशवी
लढ बप्पू
शतकी धाग्यासाठी शुभेच्छा...!
हॅहॅहॅ स्त्रीया पुरुषांपेक्षा
ही संस्कृती म्हंजे
In reply to हॅहॅहॅ स्त्रीया पुरुषांपेक्षा by मदनबाण
@असे कुठेशीक वाचले होते >>>
In reply to ही संस्कृती म्हंजे by बॅटमॅन
अभ्यासु/ सरळ स्वभावाची / सभ्य
In reply to हॅहॅहॅ स्त्रीया पुरुषांपेक्षा by मदनबाण
कोण म्हणतं ही पुरुष प्रधान
In reply to हॅहॅहॅ स्त्रीया पुरुषांपेक्षा by मदनबाण
समस्त
In reply to हॅहॅहॅ स्त्रीया पुरुषांपेक्षा by मदनबाण
आता काही खरं नाही बाबा तुझं!
ओह्ह्ह
In reply to आता काही खरं नाही बाबा तुझं! by रेवती
स्त्री ही जगातील सर्वांत
और ये लगा पाशवी सिक्सर!!!!
In reply to स्त्री ही जगातील सर्वांत by जेनी...
उत्तुंग षटकार!!
In reply to और ये लगा पाशवी सिक्सर!!!! by बॅटमॅन
अहो त्यांच्यासाठी स्त्री ही
In reply to स्त्री ही जगातील सर्वांत by जेनी...
युद्ध आमुचे सुरु..
पाहिलं ?? म्हणजे ही मुलं किती
In reply to युद्ध आमुचे सुरु.. by चिगो
आक्शी बरुबर..
In reply to पाहिलं ?? म्हणजे ही मुलं किती by जेनी...
पोरी लै भारी..
In reply to आक्शी बरुबर.. by चिगो
म्हणजेच
In reply to युद्ध आमुचे सुरु.. by चिगो
बाबा रे ऽऽ
In reply to म्हणजेच by इरसाल
ते नीट पहा बरं का चिगोशेठ..
In reply to युद्ध आमुचे सुरु.. by चिगो
आई गं..
In reply to ते नीट पहा बरं का चिगोशेठ.. by गवि
वाचवा वाचवा वाचवा
In reply to आई गं.. by चिगो
कुठलेही पोकळ सरसकट विधान
>>कुठलेही पोकळ सरसकट विधान
In reply to कुठलेही पोकळ सरसकट विधान by बॅटमॅन
हॉर्नेटच्या नेस्टला स्टर
In reply to >>कुठलेही पोकळ सरसकट विधान by विश्वनाथ मेहेंदळे
आयला, मी तर हे पुणेरी
In reply to >>कुठलेही पोकळ सरसकट विधान by विश्वनाथ मेहेंदळे
मेकप चा मोह मुलांनाहि आवरत
जे ब्बात !! कं लिवलंय कं
शुभेच्छा..!
केवळ अप्रतिम
In reply to शुभेच्छा..! by प्रभाकर पेठकर
असेच म्हणते....
In reply to केवळ अप्रतिम by श्रीरंग_जोशी
पटतंय!
In reply to शुभेच्छा..! by प्रभाकर पेठकर
तोडलंत!!!
In reply to शुभेच्छा..! by प्रभाकर पेठकर
आख्खा घाट रस्ता चढुन
एकच पाशवी शक्ती
पाशवी शक्ती?
अश्लिल लेख.
(No subject)
In reply to अश्लिल लेख. by गणामास्तर
श्री. वडापाव सध्या पहिल्या
बा ऽ ऽर!
इनो इनो इनो इनो!!!!
In reply to बा ऽ ऽर! by स्पंदना
सदर लेखास उत्तर म्हणून,
७ मिनिटात
In reply to सदर लेखास उत्तर म्हणून, by सस्नेह
अगदी अगदी. हेच म्हण्णार होतो.
In reply to ७ मिनिटात by इरसाल
टायपो मिस्टेक
In reply to ७ मिनिटात by इरसाल
@स्नेहा . एकदम पर्फेक्ट पोश्ट
In reply to सदर लेखास उत्तर म्हणून, by सस्नेह
टायपो मिस्टेक आहे का? ७००
टायपो मिस्टेक आहे का? ७०० मिनिटे च्या ऐवजी
म्हणजे स्त्रीया काय ७०० मिनीट घेतात की काय मग स्वंयपाक कोनी करायचा .कसचं काय ?
In reply to टायपो मिस्टेक आहे का? ७०० by श्री गावसेना प्रमुख
इन्फिनिटी ?
In reply to कसचं काय ? by इरसाल
ओ हो
In reply to इन्फिनिटी ? by सस्नेह
लागतो वेळ ,पण इतका नाहि हं ! :-/
In reply to ओ हो by इरसाल
बरं बाई, तुझंच खोटं!!! खुश?
In reply to लागतो वेळ ,पण इतका नाहि हं ! :-/ by जेनी...
(No subject)
In reply to बरं बाई, तुझंच खोटं!!! खुश? by बॅटमॅन
पूबै, एवढा अण्भव आलाय???
In reply to (No subject) by जेनी...
हो आलाय न. प्रास बूवा
In reply to पूबै, एवढा अण्भव आलाय??? by प्रास
बाकी काहीपण असो पण
In reply to लागतो वेळ ,पण इतका नाहि हं ! :-/ by जेनी...
शोलीड.लैच सहमत.पण अजून बराच
In reply to लागतो वेळ ,पण इतका नाहि हं ! :-/ by जेनी...
तर सांगायचा मुद्दा हाच कि,
In reply to लागतो वेळ ,पण इतका नाहि हं ! :-/ by जेनी...
तयारीला लागणार्या त्या
In reply to तर सांगायचा मुद्दा हाच कि, by सोत्रि
सोत्री काकू मिपा वाचतात इतकेच
In reply to तर सांगायचा मुद्दा हाच कि, by सोत्रि
'' तुमचं आटोपलेलं असतं
In reply to लागतो वेळ ,पण इतका नाहि हं ! :-/ by जेनी...
कित्ती बोलतात या बायका !!
In reply to '' तुमचं आटोपलेलं असतं by सुर
एका ठराविक वयात जगातल्या सर्वच मुली सुंदर, समंजस आणि हुशार वाटता
हे असं वाटणं म्हणजे " तुमचं
In reply to एका ठराविक वयात जगातल्या सर्वच मुली सुंदर, समंजस आणि हुशार वाटता by तुमचा शैलेश
सध्या ईतकेच !
हे अस्सं हाय काय ?
या प्रश्नांच्या उत्तरासाठी
पुर्ण लेख आणी प्रतीक्रिया