मुली आणि आम्ही

वडापाव जनातलं, मनातलं
परवा आमच्या कॉलनीमागल्या मोठ्या रस्त्यावरच्या बसस्टॉपवर मी वाट बघत बसलो होतो. आता, बस स्टॉपवर बसचीच वाट बघता येते, असं नाही. मी कॉलेजवरून लवकर परतलो असल्याने तिथे येऊन बसलो होतो. ज्या मुलीची वाट बघत होतो, ती माझी मैत्रीण तयार व्हायला इतका काही वेळ लावते, की काही विचारू नका. वास्तवीक सकाळी अकराच्या सुमारास मोकळ्या रस्त्यावरून फेरफटका मारायला काय मोठी एवढी तयारी करावी लागते ते तिचे तिला ठाऊक. या मुली नेहमीच एवढा वेळ लावतात. मग त्यांना अगदी शिकवणीला जायचं असलं, तरी त्यांना निदान पाऊण तास आधीपासून तरी तयारी करावी लागते म्हणे. बरं, एवढं करून 'आमच्या क्लासमध्ये चांगला दिसणारा एकही मुलगा नाही', 'आमचे सर सुंदर मुलींच्या बाबतीत जरास्से हेच आहेत, पण काय शिकवतात म्हणून सांगू!' - हे आहेच. आता जर असं असेल, तर अशा क्लासला जाताना तरी नट्टापट्टा करायची काय गरज? बरं, त्यांना तसं विचारून बघा, तर 'छे! मी अजिबात मेकअप करत नाही हा! ती अमूक अमूक करते मेकअप. मी फक्त क्रीम लावते, आय लायनर लावते, काजळ घालते, आणि लिप ग्लॉस लावते - बास्स! एवढंच!' यातली अमूक अमूक म्हणजे या मुलींची नावापुरती असलेली कोणीतरी जीवलग मैत्रीण असते. हे सगळं ऐकलं की, मेकअप म्हणजे नेमकं काय करत असाव्यात या मुली अजून, असा प्रश्न पडतो मला. अर्थात, याबाबतीत माझी जिज्ञासा जास्त तीव्र स्वरूपाची नसल्याने या प्रश्नावर मी जास्त विचार करत बसत नाही. एकदा कॉलेजमधल्या माझ्या एका मैत्रीणीबरोबर ट्रेनमधून घरी परतत असताना तिने मला विचारलं, 'तुम्ही पुरुष मंडळी रोज-रोज दाढी करत बसता, त्यापेक्षा एकदाच गाल वॅक्स का नाही करून टाकत?' आता चेहऱ्याला मेण लावल्याने दाढी उगवणं कायमचं बंद होतं की काय, अशा निरागस कल्पनेनं माझं मन अचंबित झालं होतं; अहो मेण हे फक्त दिवे गेल्यावर उपयोगी पडतं, असा माझा जन्मापासूनच समज होता. माझ्या मेण न लावलेल्या, आणि अर्धवट हिरव्या पडलेल्या त्या चेहऱ्यावर मला झालेला हा नवा साक्षात्कार स्पष्टपणे प्रकट होत होता. मी तरी माझं मेणासंबंधीचं अज्ञान लपवण्याच्या हेतूने म्हटलं, 'छ्‌या बुवा! आपल्याला त्या वॅक्स पेक्षा शेविंग क्रीमच सोयीचं पडतं. फेस आला की कसं, दाढी करायला मजा येते. मेणाला फेस येतो का? नाही. त्यामुळे त्यात मजा नाही.' दुसऱ्याच्या अज्ञानाला हसू नये, ही शीकवण मी नेहमीच पाळत आलोय. अहो मी लोकांच्या अज्ञानाला त्यांच्या पाठीही हसत नसतो. आणि ही बया इतक्या मोठ्याने हसायला लागली म्हणता, मला काही कळेनाच. 'अर्रे!! वॅक्स म्हणजे ते वालं वॅक्स नाही! वॅक्सिंग वॅक्सिंग!!' मी आपलं उगाचच, 'अच्छा अच्छा, वॅक्सिंग होय! मला वाटलं-' तसं मला तोडत ती म्हणाली, 'राहू दे हां विद्वान साहेब, तुला वॅक्सिंग म्हणजे माहित नाही ते ऍड्‌मिट कर. फेस इट, फेस इट!' यातल्या फेस इट वर तिने इतका जोर का दिला, ते मला कळल्यावाचून राहिलं नाही, पण मी माझं अज्ञान मान्य केलं. तसा मी खिलाडूवृत्तीचा आहे. नाही माहिती तर नाही माहिती आपण कशाला लपवा? त्या दिवशी स्त्रियांच्या फक्त डोक्यावरच केस उगवतात, आणि ते फक्त डोक्यावरच उगवत असल्याने ते जास्त असतात, या माझ्या ठाम समजुतीचा अंत झाला. माझ्या ज्ञानात भरपूर भर घालण्यात आली, आणि काही दूरूस्तीची कामे सुद्धा पार पडली. इतकंच नाही, तर मला अजून कोणी गर्लफ्रेंड का मिळाली नाही, यावर मुक्त आणि व्यक्त भाष्य झाले. अर्थात्‌, मगाशी सांगितल्याप्रमाणे, मी अतिशय खिलाडूवृत्तीचा असल्याकारणाने मी ते सर्व मुकाटपणे ऐकून घेतलं. पुरुषांप्रमाणे मुलीसुद्धा दाढीमिशी करतात, हे मला आता समजलेलं आहे. दाढी करण्याला त्यांनी ब्लिचिंग असं नाव ठेवलंय, आणि मिशी काढली, असं म्हणायच्या ऐवजी 'मी अप्पर लिप्स करून आली' असं थर्ड पर्सन सिंग्युलरचं व्याकरण स्वत:साठी लावत त्या रोखठोकपणे सांगतात. मुलींच्या चेहऱ्यावरचे केस त्या ब्लिचिंग करून घालवतात की असं काहीतरी जेव्हा माझ्या कानावर आलं, तेव्हा आमची मोलकरीण जमीन साफ करायला जी ब्लिचिंग पावडर वापरते, तिने चेहरा सुद्धा साफ करता येतो हे मला अजिबात पटेना. वॅक्सिंगच्या एका अनुभवाने मी शहाणा झालो होतो, म्हणून ज्या सुमुखीच्या तोंडून 'मी पार्लरला जात्येय, ब्लिचिंग करायचंय' असं मी ती चेहऱ्याभोवती बोट फिरवून दाखवत असताना ऐकलं, तेव्हा फक्त 'ब्लिचिंग?' एवढंच कपाळावर आठ्या आणत म्हणून मी माझं अज्ञान ग्रेसफुली प्रकट केलं. अर्थात्‌ या अज्ञानाबाबत माझं हसं झालं नाही. या मुली पार्लर मध्ये तासन्‌तास घालवतात. मेसेज करून चौकशी केली, की 'आता झालंय सगळं ऑलमोस्ट, फक्त क्लीन-अप बाकी आहे' असं उत्तर येतं. हे क्लीन अप करणं, म्हणजे सलून मध्ये न्हावी दाढी झाल्यावर तुरटी फिरवतो, त्याला समांतर असावं, असा माझा समज आहे. पण हा समज गैर असो वा नसो, मला या बाबतीतल्या माझ्या संभाव्य अज्ञानातच सूख आहे. या मुली सुंदर दिसण्यासाठी एवढी जोमाने तयारी करतात, याची मला काही वर्षांपूर्वी सूतराम कल्पना नव्हती. त्या मानाने आम्ही पुरुष मंडळी काहीच मेहनत घेत नाही असं म्हणायला हरकत नाही. जिम मध्ये रोज जाऊन चार बैठका मारल्या आणि गाढवासारखी ओझी उचलली, याला मेहनत म्हणायला आता मी तयार नाही. वास्तवीक आम्हां पुरुषांना जास्त मेहनत करण्याची मुळी गरजच नाही हे आता माझ्या लक्षात आलं आहे. आमचं निश (niche) हे बायकांच्या तुलनेत जास्तच असणार, याची मला खात्री आहे. निश म्हणजे एखाद्या जीवाची निसर्गातील इतर घटकांच्या नजरेतील भूमिका, किंवा अवस्था. आम्हां पुरुषांच्या बाबतीत मला अवस्था हा शब्द जास्त सुटेबल वाटतो. असो. हे निश बहुतांशी प्राणी-प्रजातींत पुरुषांमध्ये जास्त चांगलं आढळून येत असावं. उदाहरणार्थ, सिंह-सिंहीण, मोर-लांडोर, चिमणा-चिमणी, कोकिळ-कोकिळा(मी दोघांनाही बघितलंय), कोंबडा-कोंबडी, बोका-भाटी, इ. प्रजातींमध्ये नर हे मादीपेक्षा सुंदर दिसतात. मला विचाराल, तर कुत्रा-कुत्री मध्ये सुद्धा मला कुत्राच जास्त छान वाटतो. इथे, एक नमूद करतो, की लांडोर आपल्याला तेवढी सुंदर वाटली नाही, तरी मोराला तीच सर्वांत सुंदर वाटते, कारण ते सजातीय आहेत. त्याचप्रमाणे, आपल्या पुरुष जातीला जरी स्त्री ही जगातील सर्वांत सुंदर वस्तू वाटत असली(आणि वाटायलाच हवी), तरी निसर्गाच्या दृष्टीतून आम्ही पुरुष मंडळीच जास्त सुंदर ठरत असू. या मला झालेल्या अवलोकनातूनच नट्टापट्टा करण्याची गरज पुरुषांपेक्षा स्त्रियांना जास्त का भासते, ह्या मला सतत भेडसावणारया प्रश्नाचे उत्तर मला कळले.
वर्गीकरण
लेखनप्रकार

147 टिप्पण्या 26,219 दृश्ये

Comments

बॅटमॅन नवीन

रोचक आणि लॉजिकल. पण पाशवी शक्तींच्या ऐन बालेकिल्ल्यावर हल्ला चढवला आहात, तस्मात सुलतानढव्याला बेस्ट लक ;)

मदनबाण नवीन

हॅहॅहॅ स्त्रीया पुरुषांपेक्षा सुंदर असतात आणि इतर प्राण्यात नर सुंदर का असतो ? असा प्रश्न बर्‍याच मुलांना /पुरुष मंडळींना पडतो / पडत असावा हे वरील टंकन कष्टा वरुन दिसुन येते. तरी त्यांना निदान पाऊण तास आधीपासून तरी तयारी करावी लागते आपण सुंदर दिसावे ही भावना स्त्रीयांमधे बहुधा उपजतच असावी ! शिवाय आपल्याला पाहिले जाते, हे त्यांना (पक्षी त्यांच्या मेंदुला) व्यवस्थीत कळलेले असते, त्यामुळे अजुन सुंदर दिसण्याचा प्रयत्न त्यांच्या कडुन केला जात असावा ! तसे नसते तर चेहर्‍यावर फासले जाणारे क्रीम बनणार्‍या कंपन्या कधीच बंद पडल्या असत्या ! ;) 'आमच्या क्लासमध्ये चांगला दिसणारा एकही मुलगा नाही', 'आमचे सर सुंदर मुलींच्या बाबतीत जरास्से हेच आहेत, पण काय शिकवतात म्हणून सांगू!' - हे आहेच. आता जर असं असेल, तर अशा क्लासला जाताना तरी नट्टापट्टा करायची काय गरज? तुम्ही कसे दिसता या पेक्षा तुमचं वागणं किती आक्रमक आहे (मुलींच्या भाषेत सांगायचे झाले तर "डॅशिंग" आहे.)त्यावर अवलंबुन आहे. अभ्यासु/ सरळ स्वभावाची / सभ्य मुले त्यांच्या मता प्रमाणे त्यांना "बावळट" वाटतात, याचे कारण म्हणजे मुलींना अपेक्षित "भाव" आणि "नजर" या मुलांकडुन दिली जात नाही ! जो पर्यंत मुलीचा इंटरेस्ट तुमच्यात आहे,तो पर्यंतच त्या तुमच्याकडे लक्ष देतील्,एकदा का त्यांना समजले की हा काही "कामाचा" नाही,त्या क्षणी त्या इंट्रेस्ट सोडुन देण्याचा शाहणपणा दाखवतात्,जो मुलांना कळत नाही. ;) बरं, त्यांना तसं विचारून बघा, तर 'छे! मी अजिबात मेकअप करत नाही हा! ती अमूक अमूक करते मेकअप. मी फक्त क्रीम लावते, आय लायनर लावते, काजळ घालते, आणि लिप ग्लॉस लावते - बास्स! एवढंच!' यात एक गोष्ट राहिली ती म्हणजे टिकली ! ती सुद्धा या पाखरांना मॅचिंगचीच लागते...आरश्या समोर जाउन कपाळ जरा जास्तच आरश्या जवळ नेवुन योग्य ठिकाणी टिकली स्थानापन्न केल्या शिवाय पाखरांचा "मेकअप" पूर्ण होत नाही. ;) हाच आरशा जुन्या टिकल्यांना चिकटवण्याचे साधन म्हणुन वापरला जातो... ;) ते ऍड्‌मिट कर. फेस इट, फेस इट!' यातल्या फेस इट वर तिने इतका जोर का दिला, ते मला कळल्यावाचून राहिलं नाही, आपल्या बोलण्यात इंग्रजी शब्दाचा सुयोग्य वापर कसा करावा ते यांच्या कडुनच शिकावे ! शब्द आणि शब्दाचे अर्थ आणि त्याचा वापर करण्यात समस्त स्त्री वर्ग लयं हुशार असतो.;)पाखरांची बर्‍याचदा स्वत:ची "कोड" लँग्वेज देखील असते. ;) जाता जाता :--- कोण म्हणतं ही पुरुष प्रधान संस्कॄती आहे ते ? सगळा भाव स्त्रीयांनाच,जाहिराती पासुन मॉडेलिंग पर्यंत सगळीकडे यांचीच मक्तेदारी ! दाग दागिनी /कपडे /साड्या सगळं काही यांनाच मिळत !बरं यांच्या "सर्वच" गोष्टीत "व्हरायटी" दिसेल आणि "डि़झाईन्स" सुद्धा !;) पुरुष बिचारे लाईनी लाईनीचे शर्ट आणि पॅन्ट यातच समाधानी ! * हे माझे विचार आणि मत आहे,ते बरोबरच आहेत की नाही ते मला ठावुक नाही ! पाखरांनाच काय खरं ते ठावुक ! ;)

बॅटमॅन नवीन

In reply to by मदनबाण

ही संस्कृती म्हंजे स्त्रियांनी स्त्रियांसाठी आणि पुरुषांकरवी चालविलेली आहे असे कुठेशीक वाचले होते :)

जेनी... नवीन

In reply to by मदनबाण

अभ्यासु/ सरळ स्वभावाची / सभ्य मुले त्यांच्या मता प्रमाणे त्यांना "बावळट" वाटतात, __________________________________________________________________ सहमत ! फार फार बावळट वाटतात . याचे कारण . _____________ कारण ?? यालाहि कारण असतं का? म्हणजे मुलींना अपेक्षित "भाव" आणि "नजर" या मुलांकडुन दिली जात नाही ! ____________________________________________________________ असहमत !!

जेनी... नवीन

In reply to by मदनबाण

कोण म्हणतं ही पुरुष प्रधान संस्कॄती आहे ते ? सगळा भाव स्त्रीयांनाच,जाहिराती पासुन मॉडेलिंग पर्यंत सगळीकडे यांचीच मक्तेदारी _______________________________________________________________________________ अगदि अगदि सहमत :) तुम(पूरुषां)च्या ईवल्या इवल्या शेविंग क्रीमाची जाहिरात भी आम(स्त्रीयां)च्यावीना पूर्‍या होत नैत ;)

श्री गावसेना प्रमुख नवीन

In reply to by जेनी...

अहो त्यांच्यासाठी स्त्री ही वस्तु असेल(बहुतेक बाहुली विकत असावेत्)तुम्ही कायको रागावतायेत, त्यांची होणारी/झालेली निपटुन घेइल.1

चिगो नवीन

आता रंगणार सामना.. त्या "वॅक्स"वरुन आठवलं.. मी कॉलेजात असतांना, २००३ का २००४ मध्ये, एकदा एका पोरीनं विचारलं, "तुझ्याकडे 'सेल' आहे का?" आता च्यामारी तेव्हा मोबाईल दरडोई नसल्याने मोबाईललाच 'सेल'पण म्हणतात, हे मला काही ठाऊक नव्हतं.. मी म्हटलं," आहेत ना, हॉस्टेलवर.. कुठले हवेत, लहान की मोठे?" ;-) आता पुढं काय झालं ते सांगितलंच पाहीजे का ? :-(

जेनी... नवीन

In reply to by चिगो

पाहिलं ?? म्हणजे ही मुलं किती अज्ञानी असतात ते? :-/ मुली आहेत म्हणुन निदान ज्ञानात थोडी तरी भर पडतेय .:):P नाहितर आहेच " तसा मी खिलाडूवृत्तीचा आहे. नाही माहिती तर नाही माहिती आपण कशाला लपवा? " असं बोलुन आपलं अज्ञान लपवायची भारी हौस . ;)

चिगो नवीन

In reply to by जेनी...

पाहिलं ?? म्हणजे ही मुलं किती अज्ञानी असतात ते?
आता ऽ ऽ.. गरीबाले कुठून समजाचं जी थे सेल न फेल, मनुन झालं बापा तसं..
मुली आहेत म्हणुन निदान ज्ञानात थोडी तरी भर पडतेय .
आगदी बरुबर.. पोरी लै भारी..

इरसाल नवीन

In reply to by चिगो

याचा अर्थ अस्सा पकडावा काय चिगो की तुम्ही सेल द्यायच्या/दाखवायच्या मिशाने पोरीला हॉस्टेल्वर ;) नेउ पहात होतात. :))

चिगो नवीन

In reply to by इरसाल

याचा अर्थ अस्सा पकडावा काय चिगो की तुम्ही सेल द्यायच्या/दाखवायच्या मिशाने पोरीला हॉस्टेल्वर नेउ पहात होतात.
बाबा रे ऽऽ.. मी एक इज्जतदार (सपोजेडली) शादीशूदा (नक्कीच) माणूस आहे.. ;-) असं काय बोलू नये बाबा पब्लीकमदी. मी तिला हॉस्टेलवरुन 'सेल' आणून देणार व्हतो, पाहीजे असल्यास..

बॅटमॅन नवीन

कुठलेही पोकळ सरसकट विधान स्वतःवर ओढून घेऊन त्याचा प्रतिकार करण्याची आणि तशीच सरसकट विधाने पुरुषांबद्दल करण्याची खोड बायकांना असतेच. असे म्हणताक्षणीच "मी नै ब्वॉ त्यातली!!!" असे उद्गार काढून वरील वाक्य सिद्ध करणार्‍या लै बैका पाहिल्यात, मस्त हसू येते :D :D :P

विश्वनाथ मेहेंदळे नवीन

In reply to by बॅटमॅन

>>कुठलेही पोकळ सरसकट विधान स्वतःवर ओढून घेऊन त्याचा प्रतिकार करण्याची आणि तशीच सरसकट विधाने पुरुषांबद्दल करण्याची खोड बायकांना असतेच. आयला, मी तर हे पुणेरी असल्याचे लक्षण समजत होतो ;-)

गणामास्तर नवीन

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

आयला, मी तर हे पुणेरी असल्याचे लक्षण समजत होतो
चला आता या धाग्यावर डब्बल धमाका बघायला मिळणार. ;) धन्स ओ विमेकाका. :)

सूड नवीन

जे ब्बात !! कं लिवलंय कं लिवलंय. सगळ्यात मजा येते या मुलीमुलींची एकमेकींबद्दलची मतं ऐकायला. बटन ऑन करुन आपण फक्त वाजणारी टेप ऐकत बसायचं. निव्वळ करमणूक !!

प्रभाकर पेठकर नवीन

एका ठराविक वयात जगातल्या सर्वच मुली सुंदर, समंजस आणि हुशार वाटतात. वय जरा त्याच्या पुढे गेले की लग्न होऊन फक्त आपली बायकोच सर्वात सुंदर आणि हुशार वाटते. पुढे प्रौढत्वात, आपली सोडून, इतर सर्व बायका सुंदर दिसायला लागतात तर उतार वयात, ''सौंदर्य' कशाला म्हणावं आणि शारीरिक सौंदर्या पेक्षा 'व्यक्तिमत्वाला' आयुष्यात कसं महत्व असतं' अशा विषयांवरील चर्चेत हिरीरीने भाग घेणे एवढेच हाती उरते. सबब, 'सौंदर्याची' व्याख्या वयपरत्वे बदलते. श्री. वडापाव सध्या पहिल्या पायरीवर उभे असल्याचे जाणवते आहे. भावी आयुष्याबद्दल त्यांना अनेकानेक शुभेच्छा..!

तुषार काळभोर नवीन

In reply to by प्रभाकर पेठकर

पटतंय! -(नुकताच दुसर्‍या पायरीवर आलेला) पैलवान

५० फक्त नवीन

आख्खा घाट रस्ता चढुन डोंगराच्या टोकावर येउन खाली पहावं, कसली कसली वळणं फिरुन आलोय, तसं वाटलं वाचुन. मस्त लिहिलंय. पण सध्या समस्त तथाकथित पाशवी सदस्य दिवाळीची तयारी या सदराखाली गेल्या वर्षभरतल्या सुप्त इच्छा तृप्त करुन घेण्याच्या संस्कृतीचं पालनपोषण करण्याचं निरागस व्रतपालन करत असल्याचं लक्षात येतं आहे.

तुषार काळभोर नवीन

एकच पाशवी शक्ती इथे सर्वांना पुरून उरतेय... अजून रथी-महारथी यायचेत!!

श्रीरंग_जोशी नवीन

पाशवी शक्ती हे विशेषण अतिवापराने इतकं मऊ झालंय की त्यात तीळभरही पाशवीपणा शिल्लक राहिलेला नाही. कुणी जरा एखादं भारदस्त विशेषण शोधेल काय?

स्पंदना नवीन

बा ऽ ऽर! काहो वडापाव तुम्हाला कोणी मित्र नाही का हो? सगळ्या मैत्रीणीच? अन त्या सुद्धा एव्हढ मोकळेपणी सगळ तुम्हाला सांगतात? बरेच आपले वाटता तुम्ही त्यांना अस दिसत? बर बर चालु दे! इथे तुमच्या आधी आणखी एकजण होते असेच, बराच इंट्रेस्ट दिसतो मुलींच्या असल्या बाबींमध्ये. पुन्हा त्याचीच पुनरावृत्ती होणार अस दिसतय. चालु दे तुमच. चालु दे!

सस्नेह नवीन

सदर लेखास उत्तर म्हणून, श्रीयुत वडापाव यांना एक महिन्यापर्यंत, रोज साडी नेसून टिकली ते सँडल पर्यंत सर्व काही 'म्याचिंग करून, मुखचंद्र नयनरम्य वाटेल इतपत मेकअप करून, (हे सर्व सुमरे ७ मिनिटात करावे) सॅक, पर्स, मोबाईल इ. सर्व जामानिमा सांभाळून बाईक वरून हापिसात जा-ये करून दाखवण्याचे आव्हान सर्व 'पाशवी शक्तीं'तर्फे देण्यात येत आहे.

सस्नेह नवीन

In reply to by इरसाल

टायपो मिस्टेक मुळीच नाही. यात 'पोळी-भाजीचा डबा बनवून' हे अ‍ॅड केल्यास फार्फार तर ७ वर एक शून्य देण्याची सवलत मिळेल.

श्री गावसेना प्रमुख नवीन

टायपो मिस्टेक आहे का? ७०० मिनिटे च्या ऐवजी

म्हणजे स्त्रीया काय ७०० मिनीट घेतात की काय मग स्वंयपाक कोनी करायचा .

इरसाल नवीन

In reply to by श्री गावसेना प्रमुख

स्नेहांकितानुसार स्रियांना तयार व्हायला ७ मिनिटे लागतात. त्याला म्हटलो मी खरतर तिथे "इन्फिनिटी" असे हवे.

सस्नेह नवीन

In reply to by इरसाल

इन्फिनिटी ? मग सगळे सण- समारंभ अन लग्ने-कार्ये केवळ पुरुषांनाच साजरी करावी लागली असती !

इरसाल नवीन

In reply to by सस्नेह

अक्षरशः नका हो घेवु. पण तुम्हा लोकांना जास्त वेळ लागतो की नाही हे मनातल्या मनात का होईना करा बघु कबुल. बर ते जावु द्या एथे असणार्‍या खर्‍या स्र्यी (लग्न झालेल्या) आयडींनी हे सांगावे की त्यांनी नवर्‍याकडुन किती वेळा हे ऐकले आहे "अगं आटोप लवकर किती वेळ लावशील?" अहो बसा जरा ५ मि......१५ मि. आलेच.:)):)):))

जेनी... नवीन

In reply to by इरसाल

लागतो वेळ ,पण इतका नाहि हं ! :-/ पूरुष आयडींच आपलं काहितरीच . स्त्री आयड्या ना एवढा वेळ लागतो याला कारणहि पूरुष आयडीच असावेत , विचारा हवं तर इथल्या लग्न झालेल्या पूरुष आयड्याना कि ,बाबानो ,कुठे बाहेर जायचं असेल तर घरातली नट्टापट्टा कर्न्याखेरीज ,थोडं फार घर आवरणं ,हि जी काहि प्रक्रिया असते ,ती करण्याला कोण कोण किती हातभार लावतं ? . १) तोंड धुवुन टॉवेल बेड वर टाकायचा .तो बायकानीच उचलुन ठेवायचा . २) बाहेर जाताना पिण्याच्या पाण्याच्या बॉटल्स जवळ असणं गरजेचच असतं ,तेही बायकानीच भरुन घ्यायच्या . ३) " माझे कपडे इस्त्री केलेले आहेत ना गं ?" किंवा मग ,जरा ह शर्ट प्रेस्स करुन देना " एवढी लाडीगोडी लावायची कि बिचारी प्रेमाखातर करुनहि देते .मग तुम्हाला तयार होण्यासाठी लागणार्‍या वस्तु ,रुमाल ,मोजे सारख्या गोष्टी तीनेच काढुन समोर ठेवायच्या . ४)सोबत मुलं असली तर ,त्यांच तर सगळच आवराव लागतं तीला ,त्यांच्या खान्यापिन्यापासुन ,ते कपडे घालुन रेडी करण्यापर्यंत . ५) प्रवास किती अंतराचा आहे ,ह्यावर बॅगेचं ,ईवन मी तर म्हणते पर्स चं सुद्धा वजन अवलंबून असतं . एक्स्ट्रा रुमाल ,टीशुझ ,सॅनिटरायझर ,वॉटर बॉटल ,खाण्याचं काहितरी जवळ असणं ,सगळच त्या कर्तव्यदक्ष स्त्रीला पहावं लागतं . अजुन बरच काहि असतं कि ते केवळ तिलाच जमतं .अक्ख्या घराची भिस्त तिच्या एकटीवर असते ,असं काहि ती आपणहुन वागत असते ,त्यात तिच्या नवर्‍याचहि समाधान दडलेलं आहे अशी तीची निरागस समजुत असते . आता तुमच्या सगळ्यांच्या एवढ्या आयत्या तयार्‍या करुन दिल्यानंतर ती तयारी करायला घेते ,तोवर तुमचं तयार होऊन झालेलं असतं .मग तीला वेळ लागनार नाहि का? तुमचं आटोपलेलं असतं ,म्हणुन तुम्हाला नंतरचा एक मिनिटहि एका तासा सारखा वाटतो ,त्यात तिच्या बिचारीची काय चुक ? आपल्या नवर्‍याच्या इमेजला ,पूझिशनला साजेसं दिसणं ,किंवा त्याचा हव्यास करणं चुकिचं आहे का? साधं शर्ट पँट चढवण्या इतके सोप्पे कपडे स्त्रीयांचे नसतात कधी कधी .साडी असेल तर ती येईपर्यंत जस्शी च्या तस्शी टिकुन राहणं गरजेच नाहि का? :) तरीहि जाता जाता तिचं बरच काहि करायचं राहुन जातं :-/ ,तेहि तुमच्या लोकांच्या " अगं किती वेळ ? आटप लवकर ! ":( ह्या गयावया करणार्‍या विधानाला माण द्यायचा असतो तीला म्हणुन :P असो , तर सांगायचा मुद्दा हाच कि ,स्त्रीयांना वेळ लागतो याला कारण पूरुष असतो . :)

सोत्रि नवीन

In reply to by जेनी...

तर सांगायचा मुद्दा हाच कि, स्त्रीयांना वेळ लागतो याला कारण पूरुष असतो
ह्या मुद्द्याशी एकदम एकदम कारण तयारीला लागणार्‍या त्या वेळेनंतर जे काही समोर येते ते निव्वळ लाजवाब असते आणि तेवढा वेळ वाट बघितल्याचे सार्थक होते. म्हणून स्त्रीयांना वेळ लागावा ही पुरुषांची जरी तक्रार असली तरी ती 'हत्तीचे दात, खायचे वेगळे आणि दाखवायचे वेगळे' अशी अशी असते, निदान माझी तरी ;) - (तक्रार करणारा पुरुष) सोकाजी

जेनी... नवीन

In reply to by सोत्रि

तयारीला लागणार्‍या त्या वेळेनंतर जे काही समोर येते ते निव्वळ लाजवाब असते की आमचे सोकाजी नाना 'च्या'च मागायचे विसरुन जातात:P ;) :P

सुर नवीन

In reply to by जेनी...

'' तुमचं आटोपलेलं असतं ,म्हणुन तुम्हाला नंतरचा एक मिनिटहि एका तासा सारखा वाटतो ,'' त्यात ही तुम्हाला काहीतरी TIMEPASS हवा म्हणुन ''अगं जरा घोटभर चहा देना तेव्हडाच जरा TIMEPASS..'' मग तो रिकामा कप तिथेच ठेवायचा,, तो उचलुन बेसिन मध्ये पण ठेवायचा नाही. तो उचलायचा, धुऊन ठेवायचा कारण नंतर येउन धुवे पर्यंत त्यात चहाचे डागं लागतात. हे एक कारण आणी बेसिन मधली भांडी बघुन सासुच्या कप्पाळावर आलेल्या आठ्या परत आल्यावर कोणी बघाव्यात, म्हणुन निघे निघे पर्यंत घरात जितक आवरण शक्य असतं तितक आवरण्याच्या मधे आमची तय्यारी चाल्लेली असते.

तुमचा शैलेश नवीन

एका ठराविक वयात जगातल्या सर्वच मुली सुंदर, समंजस आणि हुशार वाटतात ......असच काहि आजकाल मनात येते.

जेनी... नवीन

In reply to by तुमचा शैलेश

हे असं वाटणं म्हणजे " तुमचं वय झालं आता " याची निशानी ;) ( ह का काय म्हणतात ते घीउन बसा :) )

चौकटराजा नवीन

धाग्याच्या शीर्षकावरून असं वाटलं की "आम्ही " म्हणजे वडापाव व त्यांची डोळ्याला चाळीशी लागलेली पत्नी व "मुली " म्हणजे त्यांच्या वयात आलेल्या दोन मुली यांच्या मधील जनरेशन गॅपच्या समस्येची उकल करणारा धागा आहे. पहातो तर हे ! आमचा चांगलाच पोपट केलान काय या " व पा " ने !

श्री गावसेना प्रमुख नवीन

पुर्ण लेख आणी प्रतीक्रिया वाचुन झाल्यावर हा निर्णय देण्यात येतो की....मिस पुजा पवार ह्यांनी ( होय पुजा पवारच मला त्याच योग्य वाटतात)पाशवी शक्तींच अध्यक्ष पद स्विकाराव. त्याबद्दल त्यानां कसल्याही प्रकारच मानधन मिळणार नाही. 1

जेनी... नवीन

In reply to by श्री गावसेना प्रमुख

ह्म्म . चला कबूल केलत तेवढं पूरेसं आहे ,कि स्त्री जातीपूढे पूरुष जातीचा काहि निभाव लागत नाहि ;) हेच आमचं मानधन समजतो आम्हि :)

बॅटमॅन नवीन

In reply to by जेनी...

स्त्रीऐवजी पुरुष आणि पुरुषाऐवजी स्त्री हा निव्वळ मूर्खपणा आहे, नसते पुरुष तर घंटा निभाव लागणारे स्त्रियांचा, उग्गी कैतरी ज्युव्हेनाईलपणा करायचं झालं..

गवि नवीन

In reply to by बॅटमॅन

टाकलास हँडग्रेनेड पिन काढून? बॅटम्याना.. आपण शांतताप्रेमी आहोत की नाही? मग तुझ्याकडे शस्त्र कुठून आलं?

प्रियाकूल नवीन

किती पुरुषांना तुम्ही त्यांच्या लहान मुलांच्या ब्यागा आणि मुलं सांभाळताना पाहिलंय?? आणि जॉन,शारूक आजकाल क्रीम अन जेल च्या जाहिराती काय उगीच करतात होय? कुठे बाहेर गेलं कि 'अगं हे दे न माझं' ,'अगं ते आणलास का माझं?तुला टाक म्हणलं होतं नं ब्यागेत' असा कोण म्हणतं??

ज्ञानराम नवीन

"नसते पुरुष तर घंटा निभाव लागणारे स्त्रियांचा, उग्गी कैतरी ज्युव्हेनाईलपणा करायचं झालं.." आणी पुरुषांचा तरी कुठे लागणार आहे निभाव??? स्त्री नसताना ..!! (पाशात येताना विचार न करणारे..म्हणजे ( पाश(शात) वी(सरणारे) कळलं !!! ... आता पाशात फसत कोण याच उदाहरण (मेनकेला भुलणारे विश्वामित्र) ते ही पुरुषच होते ना ..., म्हणजे पुरुष पाशवी असतात हो... स्त्रीया नाही...( किती गोड गॅरसमज आहे तुम्हा पुरुषांचा...)

ज्ञानराम नवीन

"नसते पुरुष तर घंटा निभाव लागणारे स्त्रियांचा, उग्गी कैतरी ज्युव्हेनाईलपणा करायचं झालं.." आणी पुरुषांचा तरी कुठे लागणार आहे निभाव??? स्त्री नसताना ..!! (पाशात येताना विचार न करणारे..म्हणजे ( पाश(शात) वी(सरणारे) कळलं !!! ... आता पाशात फसत कोण याच उदाहरण (मेनकेला भुलणारे विश्वामित्र) ते ही पुरुषच होते ना ..., म्हणजे पुरुष पाशवी असतात हो... स्त्रीया नाही...( किती गोड गॅरसमज आहे तुम्हा पुरुषांचा...)

बॅटमॅन नवीन

In reply to by ज्ञानराम

पूर्ण वाक्यपण न वाचता घे कंप्यूटर आणि बडव कळफलक असे करून अज्ञानरावणागत परतिसाद कशाला देताय???

सूड नवीन

In reply to by ज्ञानराम

जांभूळ आख्यान....द्रौपदी....काही आठवतंय का ज्ञाराजी ?? >>किती गोड गॅरसमज आहे तुम्हा पुरुषांचा.. हो का ? मग रामाच्या नावाने संपणारा आयडी का घेतला म्हणे ? पुरषांबद्दल येवढा तिरस्कार असेल तर आयडी तरी विचार करुन घ्यायचा. अर्थात कोणी काय आयडी घ्यावा हे सांगण्याचा मला अधिकार नाही, मी फक्त निरीक्षण नोंदवलं.

लाल टोपी नवीन

आज कुठ्ली साडी नेसू? यावर कोणतीही नेस कोण पाहणार आहे? असं उत्तर अनुभवी नव-याने चुकुनही देऊ नये असे पुलंनी एका पत्रात लिहील्याचे स्मरते

बॅटमॅन नवीन

In reply to by लाल टोपी

त्यावर उत्तर "नेस कुठलीही, तसाही माझ्यापेक्षा तुझा चॉईस चांगला आहे" असे उत्तर द्यावे पण अधोरेखित वाक्यातील मेख लक्षात येऊ न देता असे म्हणतात पुल ;)

मी_आहे_ना नवीन

इथे एक आठवडा आधीच दिवाळी सुरू झाली म्हणायची. सर्व मिपा शक्तींना दिवाळीच्या (आगाऊ) शुभेच्छा!!!

गवि नवीन

In reply to by मी_आहे_ना

इथे दिवाळीच्या आतिषबाजीचं रुपांतर "शिवकाशीतील फटाक्यांच्या कारखान्याला आग" मधे होऊ नये अशी सदिच्छा.. ;)