' एप्रिल फुल ?? '
मित्रांच्या भयानक मस्करीला बळी ठरलो होतो.
संध्याकाळच्या बरोब्बर पाचच्या दरम्यान टाईम स्क्वेअरच्या पायर्यांवर जाऊन आजूबाजूची मस्ती बघत विसावलो होतो . एप्रिल महिन्याची पहिलीच तारीख. अनायसे आलेला शनिवार. शनिवारि आम्हा भारतीयांचा छोटासा मेळावा ज्याला सोप्प्या इंग्रजीत गेट टुगेदर म्हटल जातं. शनिवार खास असायचा आमच्यासाठी .बीअर चे टिन घेऊन संध्याकाळच्या वेळी न्युयॉर्क शहरातल्या भन्नाट गर्दीत ,आजुबाजुच्या झगमगाटात ,त्याच गर्दीचा एक भाग बनायचो आम्ही.मजा यायची .मस्त ग्रुप होता .
सहा वाजत आले, पण कुणाचाच पत्ता नाही. फोनही उचलेनात कुणी. एक सोडला, दुसरा सोडला, 'अरे यार कुणीतरी रीप्लाय करा ! ..साले भांग पिवून पडलेत का? ' असा जोरदार प्रश्न मीच माझ्या मोबाईलला विचारला ,आणि डोक्यात सणक यावी तशी " ओह्ह शिट् ! फस्ट एप्रिल ,एप्रिल फुल?" जबरा कळ येऊन गेली .
मग काय ! झालेला जबरदस्त पोपट ,त्यावर तिथे तरी निदान मीच हसत होतो. स्वत:शीच हसत तिथेच त्या लाल
रंगांच्या पायर्यांवर बसून राहिलो. उंचच्या उंच इमारतींकडे बघत. परत जायचच नव्हतं इतक्यात.
रंगीबिरंगी लाईट्स, जबरदस्त माहोल, सुट्टीचा दिवस त्यामुळे कपल्सचा गोंडस क्राउड, माझं लक्ष गोर्यांच्या देखण्या ललनांवरुन हळूहळू घसरत जात होतं. 'ओझरता कटाक्ष' काय भारी शब्द असतात ना मराठीत. मस्त वाटलं !.
निदान तेवढ्यावेळापुरतं तरी.
त्याच गर्दीत एका चेहेर्याने माझी नजर अलगद खेचून घेतली. गळ्यात कॅनॉनचा डिएसेलार घेऊन लूकलूकत्या डोळ्यानी
आजूबाजूच्या गर्दीचा, त्यातल्या वेगळेपणाचा वेध घेणारा चेहेरा. गोर्या असंख्य चेहेर्यात एक गहूवर्णीय तजेलदार चेहेरा.
तिचे पाठीवर रुळणारे कुरळे केस, चेहेर्यावर येणार्या एखाद्या पेनातल्या स्प्रिंग सारख्या लटा, त्यात तिचं स्वतःशीच स्व:तावर खुश होत हसणं ,लाजणं .. कुणीतरि एकदम २४औन्झ चा मॉन्स्टर एनर्जी ड्रींकचा टीन अख्खा घशात रिकामा करावा असली भन्नाट एनर्जी नसानसात शिरली. बराच वेळ तिची हालचाल पहात होतो मी. मरुन कलरचा लाँग कुर्ता ,त्यावर ब्लॅक कलरची जीन्स ,गळ्यात ग्रे-मरुन कॉम्बिनेशनच्या साधारण मोठ्या बीट्सची लांबलचक माळ, त्याच बीट्सचे ईअरिन्ग्स. एकंदरित हिरवळीत उठून दिसणार्या निशिगंधेसारखी वाटली मला ती त्याक्षणी .
आधी जाऊन डायरेक्ट बोलावं तिच्याशी असं वाटलं, कशी रिअॅक्ट होइल? पण बोलायला काय हरकत आहे? असा विचार करुन मी तिच्यापासून पाच दहा पावलांच्या अंतरावर गेलो. तिने एका उंच इमारतीचा व्ह्यू घेतला होता कॅमेर्यात. म्हटलं.. तिला क्लिक करायला आणि 'क्लिक ' व्हायला जरा वेळ देऊ .
तिथे अनोळखींशी बिन्धास्त बोलायची सवय लागली होती, त्यामुळे हिच्याशी बोलायला जायचं कसलच दडपण येत नव्हतं. मी थोडा तिचा अंदाज घेत होतो ,इतक्यात ..." हाय .हँडसम" अशी तिचीच हाक आली ,आणि मी चाट.
ती लांबुन जेवढी निरागस, सोज्वळ ,मोहक वाटली त्यापेक्षा कितीतरी पटीने बिन्धास्त, चंचल, सुंदर वाटली.
बोलता बोलताच कळलं दोघही भारतातून, एकाच शहरातून आहोत, दोघहि मराठीच आहोत. दोघंहि नोकरीनिमित्त न्युयॉर्क सारख्या रोमँटिक शहरात तात्पुरत्या वास्तव्याला आहोत .
तिच्याशी पहिल्यांदा बोलत होतो मी, पण जुनी ओळख असल्यासारखं. तिच्या आवडीच्या गप्पा मारत होती ती ,पण खुप जवळच्या मित्राशी मारल्यासारख्या .बोलता बोलता डोळ्यावर येणारे कुरळे केस मोठ्या शिताफीने बाजुला सारायची .
डोळ्यात मिश्किल हसणं , शब्द उच्चारताना होणारी ओठांची गडबड, हातांच्या नाजुक बोटांशी त्यांच्या त्यांच्यातच चालणारी मस्ती . सारंच एकदम धुंद पावसात भिजताना येणारा अनुभव .आणि तो अनुभव म्हणजे ती .
त्यानंतर ती मला पुन्हा त्यानंतरच्या शनिवारी पुन्हा एकदा भेटली. वेगळ्या रंगांचे बीट्स चे नेकलेस आणि ईअरिंग्स,
तिच्या पेहेराव्याला उठावदार बनवायचे. मी आजच्या दिवशी तर मित्राना सरळसरळ टांग देऊन आलो होतो. भेटायचा प्लान अक्षरशः वेळ नाही हे कारण देऊन टाळलं, आणि जिच्याशी भेटायचं न ठरवून सुद्धा तिला भेटायला तिथेच आलो होतो. अजब गजबच चाललल होतं सारं. आम्ही बरंच फिरलो. ब्रॉडवे वर इतकी सुंदर सोबत, अन हवाहवासा वाटणारा सहवास बरोबर घेऊन चालण्याची मजाच और. तिला घरी जायची घाई नसायची, कि पटापट चालण्याची घाई नसायची. कॅमेरा मात्र सोबत असायचा .विचारलही तसं कि "हा नेहेमीच सोबत घेऊन फिरतेस का?" त्यावर "कधी कुठला क्षण माणसाच्या आयुष्यात अचानक येईल हे जसं त्याला माहित नसतं ,आणि माणुस तोच शोधत फिरत असतो, तसच काहिसं माझ्या कॅमेर्याचंही आहे " असं म्हणाली होती.
शनिवार टू शनिवार न ठरवता भेटायचो .कुठल्याच शनिवारी जाताना भेटू परत असं न म्हणणारी ती, नेमक्यावेळी, नेमक्या शनिवारच्या संध्याकाळी टाईम स्क्वेअरच्या त्याच पायरीवर बसलेली दिसायची ,ज्या पायरीवर ती मला आधीच्या शनिवारी भेटलेली असायची.
असंच एकदा तिथल्या गर्दीतुन चालता चालता तिने हात पकडला. पण तो केवळ त्या गर्दीत चुकामूक होऊ नये म्हणून.
एकदा आइस्क्रिम खाताना "हा फ्लेवर ट्राय कर" म्हणत उष्टं आइस्क्रिम बिन्धास्त माझ्या तोंडाला लावलं, कदाचित माझ्याजवळ तिचा मोकळेपणा जास्त सुरक्षित असल्याची तिला खात्री होती. निघताना नकळत तिच्या ओठातुन बाहेर
पडलेलं "मिस्स यु " माझ्या कानानी " नक्की हेच म्हणाली का ? " केलेला प्रश्न, सगळंच दुपारच्या उन्हात कुणीतरी थंड सावली द्यावी इतकं शीतल ,म्रुदु आणि सवयीचं होउन बसलं .
मी आठवडाभर शनिवारची वेड्यासारखी वाट बघु लागलो .मित्रांना न भेटण्याची कारणे आणि तिला भेटल्यावर बोलण्याचे बहाणे शोधू लागलो. ती फक्त मलाच भेटायला तिथे येते अशी समजुत करुन घेतली. तो अनुभव अगदी धडधडत्या हृदयात साठवण्यासारखा, तिच्याच विचारात तिला जपण्यासारखा होता. आयुष्यात, जर कुणी पहाट सुंदर आहे असं म्हटलं तर मला फक्त तिचा चेहेरा, तिचा कधीतरी चुकून होणारा स्पर्श, तिच्या ओठांवर उपजत असलेलं हसणं, एवढंच आठवतं .
एकदा रात्रीच्यावेळी आकाशातल्या उंच उडणार्या विमानाकडे बघत खूप हळवी झालेली पाहिली. "इकडे आल्यावर, इकडे राहिल्यावरच त्या विमानानं किती अंतर कापलय हे कळतं !". एका दमात संपवलेल्या तिच्या ह्या वाक्याचा गर्भित अर्थ कळलाच नव्हता तेव्हा, पण हळूहळू मला ती उलगडु लागली. माझ्या नजरेतुन मी तिच्या मनाचा ठाव घ्यायचो .
जितकं ओळखावं तितकी ओढ वाढायची. जितकं जवळ जावं तितकी जास्त तिची सोबत आवडायची.
बहुतेक माझ्या रात्रीच्या झोपेला छानसं स्वप्न मिळालं होतं .
नेहेमी हसताना, न थकता बडबड करताना पाहिलं तिला. माझी प्रत्येक शनिवारची संध्याकाळ तिने स्वतःच्या सहवासाने सजवली. वाट पहाताना, चिडताना, चिडवताना, खळखळुन हसताना, आठवणी जपताना, मनातलं सांडताना. मी पाहिलंय तिला स्वत:च स्वतःच्या विश्वात जगताना.
असच फिरत असताना एकदा पावसाची चाहुल लागली होती . नको म्हणत असतानाहि तिचं भिजणं . तिच्या गालावरुन निथळणार्या प्रत्येक थेंबाचा हेवा वाटला होता तेव्हा .चांदण्या रात्रीत तिला एकदा बिलगणार्या थंडीला
मिठित घेताना पाहिलं .दोन्हि हातानी स्वतहालाच घट्ट मिठित घेऊन बसली होती ." अश्यावेळी आपण नेमके किती
अपूर्ण आहोत ,ह्याची जाणिव होते " तिच्या तोंडुन निघालेलं हे वाक्य ,कदाचित मी कधीच विसरु शकणार नाहि .
आम्हाला भेटून जवळजवळ वर्ष होत आलं होतं. "आपल्यला भेटून वर्ष होइल पुढच्या महिन्यात, वर्ष कसं गेलं कळलंही नाही". त्यावर हसून म्हणाली "काही क्षण अनमोल असतात, जपायचं असतं पापण्यात, त्यांच्या आठवणीनीही, डोळ्यात दु:खाचे अश्रू असले तरीही ओठांवर हसु फुलावं, इतकं बळ मिळवून द्यायचं त्या क्षणाना".
कधी कधी खूप खोलवर नजर लावून असंच काहीतरी खोल खोल बोलायची. मी क्षणभर विचारात पडायचो, पण मग लगेच तिच्या पापण्यांची उघडझाप पहाण्यात दंग होउन जायचो .
ह्या शनिवारी मी तिच्यासाठी दवात भिजलेल्या, अर्धवट उमललेल्या गुलाबांचा गुच्छ घेऊन गेलो. नेहेमी ठरलेल्या पायरीवर आज ती दिसली नाही. म्हटलं भेटल्यापासून पहिलाच शनिवार असेल हा तिच्या उशिरा येण्याचा. मग तिथे वाट पाहिली, अगदि बराच वेळ. ह्या वर्षभरात आम्हाला एकमेकांच्या नावाव्यतिरिक्त आणखी काहीही माहिती नव्हती. मी कधीच तिचा फोन नंबर मागितला नाही कि तिचा पत्ता विचारला नाही. तिच्या कलाने, तिला वाटेल तेव्हा स्वतःहून देइल असाच विचार केला. एप्रिल महिन्यात अगदी एप्रिल फूलच्या दिवशी झालेली आमची भेट. त्यानंतर न ठरवता, नियतीने ठरवल्यासारख्या होणार्या आमच्या भेटी, तिचं मुक्त मोकळं बोलणं, जगण्याच्या उमेदीपासून ते कोमेजलेल्या कळीच्या भावनांपर्यंत चघळलेले विषय, तिचा तोल जाताना मी दिलेला हात, तिनं सहज खांद्यावर ठेवलेला हात, विचारात मग्न असली की गळ्यातल्या मोठ्या बीट्सच्या माळेचे मणी दाताखाली घ्यायची सवय, बोलताना अगदी डोळ्यात डोळे घालून पापण्याही न पडू देता आपलं म्हणणं समोरच्याच्या पार काळजात घुसवण्याचा अट्टाहास हे सगळच इतकं मस्त होतं कि ती समोर नसली तरीही मी फक्त तिच्या विचारातुन तिच्या जवळ पोहोचू लागलो होतो .
पण ,त्या शनिवारी मात्र ती आलीच नाही. मी खूप वाट पाहिली. खूप खूप. एखादं सुंदर स्वप्न मोडून जावं आणि झोपेतून जागं होण्याचा पश्चाताप व्हावा असं वाटून मी शेवटी उठलो. मी नऊ वाजेपर्यंत वाट पाहिली. अख्ख्या ब्रॉडवे वर कितीतरी दिवसांनी मी आज एकटा चाललो, एकटाच. मनात नको नको ते विचार येऊन गेले .शेवटी म्हटलं. काहितरी अडचण असेल. पूढच्या शनिवारी नक्की येईल ती.
मी दर शनिवारी ,मीच माझ्या ठरवलेल्या वेळी टाइम स्क्वेअरला हजर व्हायचो, पण ती यायची नाही. एक गेला, दुसरा गेला ..असे कित्येक गेले ,पण एकाही शनिवारी ती आली नाही. मी मात्र आजही प्रत्येक शनिवारी, जिथे ती माझी वाट बघत बसायची, त्या पायरीवर तिची वाट पाहून येतो. मला तिची सवय लागली होती. तिच्या असण्याची, तिच्या शब्दांची, कोड्यात बोलत, खोल अर्थ असणार्या वाक्यांशी खेळत, तिनेच समजवलेल्या ओळींना संदर्भ लावण्याची.
सहा महिने उलटून गेलेत, ह्या सहा महिन्यात, ती आता येणार नाही असं एकदाही वाटलं नाही. मी पुन्हा मित्रानां भेटू लागलोय. त्यांना भेटण्याचा बहाणा करुन, तीची वाट बघण्याचं कारण शोधू लागलोय. मी खूप बदललोय की मी बदललो होतो, आणि आता मी पुन्हा पूर्वीसारखाच जगतोय? .
हे अख्खं वर्ष माझ्यासाठी एक सुंदर स्वप्न होतं. मला एक सुंदर फूल मिळालं होतं. मी ते झाडावरंच जपलं, आता ते झाडावरुन गळून गेलंय, पण माझ्या आयुष्यात स्वत:चा गंध ठेवून. कधी कधी मात्र मनापासून वाटतं, एप्रिलच्या
फसव्या तारखेला भेटलेली ती एप्रिलच्याच महिन्यात अशी एकाकी लुप्त का झाली असावी? कि मी पुन्हा एकदा 'एप्रिल फुल?'
याद्या
11106
प्रतिक्रिया
86
मिसळपाव
हं!
सुंदर..
नादखुळा..
लई भारी लिहिलंय,
बालिका इज ग्रेट....! स्टेजवर
खूपच आवडले...
वर्ष भरात फोन नम्बर नाहि का
आवो पर शिम्कार्ड बदल्लं अस्लं
In reply to वर्ष भरात फोन नम्बर नाहि का by गुमनाम
असं करतेस का?
खूप छान - सविस्तर प्रतिक्रिया
खुप छान
खुपच भारी
खुपच भारी
(No subject)
छान!
फ्रेश!
+/-
ककक्क्कक्क
In reply to +/- by पिवळा डांबिस
वाईच येक शंका
In reply to +/- by पिवळा डांबिस
(No subject)
In reply to +/- by पिवळा डांबिस
धन्यवाद
In reply to (No subject) by जेनी...
एफोबीबद्दल धन्यवाद बाकी
In reply to धन्यवाद by पिवळा डांबिस
तेच.. आम्हालाही अग्गोबाईवालाच
In reply to एफोबीबद्दल धन्यवाद बाकी by बॅटमॅन
काका अग्गोबाई म्हणजे अग्गोबाई
In reply to तेच.. आम्हालाही अग्गोबाईवालाच by शैलेन्द्र
ह्यात फक्त टाइम्स स्क्वेअर
In reply to +/- by पिवळा डांबिस
:)
In reply to ह्यात फक्त टाइम्स स्क्वेअर by जेनी...
नाहि ओ काका . राग कसला??
In reply to :) by पिवळा डांबिस
काका......(डोळे वटारलेले)
In reply to :) by पिवळा डांबिस
कै च्या कैच ...!!
In reply to काका......(डोळे वटारलेले) by इरसाल
बेटा
In reply to कै च्या कैच ...!! by जेनी...
अवांतर
In reply to +/- by पिवळा डांबिस
पोष्टमार्टेम !
In reply to +/- by पिवळा डांबिस
काकाश्री,
In reply to +/- by पिवळा डांबिस
@प्रभो , ......
In reply to काकाश्री, by प्रभो
एबीसीडी
In reply to +/- by पिवळा डांबिस
या शीर्षकाच्या निमित्ताने
मस्त..
वास्तवापासून दूर...
पण वर्षभरात, म्हणजे अंदाजे ५२
In reply to वास्तवापासून दूर... by प्रभाकर पेठकर
प्रतिसाद ऑफ द डे..
In reply to वास्तवापासून दूर... by प्रभाकर पेठकर
_ _/\_ _ शिरसाष्टांग..
In reply to वास्तवापासून दूर... by प्रभाकर पेठकर
कथा आवडली
>>> बाकी सदर लेखिका या
In reply to कथा आवडली by श्रीरंग_जोशी
@का बरे? लिहु द्या की त्यांना
In reply to >>> बाकी सदर लेखिका या by वपाडाव
अगदी अगदी
प्रपेकाका अाणि नसलेल्या
ते एफबी वर जाऊन अभ्यासाच्या
In reply to प्रपेकाका अाणि नसलेल्या by इनिगोय
आम्चीपण
In reply to ते एफबी वर जाऊन अभ्यासाच्या by जेनी...
मस्त!
सर्व वाचकांचं मनापासुन आभार !
छान लिहिलीय कथा.
>>>आता तिच्या बाजूने सुद्धा
In reply to छान लिहिलीय कथा. by प्रचेतस
मस्त!
गोष्ट आवडली! मुक्याने प्रेम
गोष्ट आवडली! मुक्याने प्रेम
In reply to गोष्ट आवडली! मुक्याने प्रेम by नगरीनिरंजन
मुक्याने प्रेम वगैरे!
In reply to गोष्ट आवडली! मुक्याने प्रेम by नगरीनिरंजन
काय पन सांगायचं?
In reply to मुक्याने प्रेम वगैरे! by बॅटमॅन
विनापन मुक्याचं व्रत घेतात >>
In reply to काय पन सांगायचं? by नगरीनिरंजन
उत्तम!!
उत्तम!!
कथा आवडली.
पोरगा अन पोरगीचे ‘जमणे’ हि
In reply to कथा आवडली. by सस्नेह
कथासार !!!
In reply to कथा आवडली. by सस्नेह
सुटला बिचारा !!
पुजा पवार जी ,कथा चांगली आहे. कथा आवडली.
ज्जे बात है.
शेवट धक्कादायक करणे ही वपुंचि
हो गं लक्षात आलं होतं ,पण इथे
In reply to शेवट धक्कादायक करणे ही वपुंचि by अनिता ठाकूर
निसरडी वाट....
In reply to शेवट धक्कादायक करणे ही वपुंचि by अनिता ठाकूर
पेठकर काका , ही वरची स्त्री
In reply to निसरडी वाट.... by प्रभाकर पेठकर
कमालच आहे.
In reply to पेठकर काका , ही वरची स्त्री by जेनी...
कशाला एकमेकाबद्दल शंका?
अस नाही हो
मी 'अनिता ठाकूर' नावाची खरीच
कळले बरें...!
In reply to मी 'अनिता ठाकूर' नावाची खरीच by अनिता ठाकूर
पू बै, कथा म्हणून छान आहे पण
सुरेख ...
अमेरिकेत एक भारतीय व्यक्ती
बाडीस!!
In reply to अमेरिकेत एक भारतीय व्यक्ती by विश्वनाथ मेहेंदळे
आखातीप्रदेश..
In reply to बाडीस!! by स्पंदना
काका
In reply to आखातीप्रदेश.. by प्रभाकर पेठकर
थोडीशी...
In reply to काका by इरसाल
काय काका... इथे पण द्विरूक्ती?
In reply to थोडीशी... by प्रभाकर पेठकर
मनातले मांडे आहेत ते विमेकाका
In reply to अमेरिकेत एक भारतीय व्यक्ती by विश्वनाथ मेहेंदळे
कथा मस्त झालिये. आवडली.
आवडेश.....