मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हरिकेन सँडीच्या संदर्भात.. अमेरिकेतल्या मिपाकरांसाठी..

गवि · · साधे पान
भारतात ज्या बातम्या मिळत आहेत त्यानुसार पूर्व अमेरिकेच्या किनार्‍यावर सँडी महावादळाने फार मोठ्या प्रमाणावर थैमान घालायला सुरुवात केली आहे. न्यू-यॉर्क ते कॅनडा अशा मार्गावरचे काही कोटी लोक याच्या तडाख्यात अडकण्याची शक्यता आहे. आत्ताच काही शहरांत पूरसदृश स्थिती झालीदेखील आहे. अर्थातच अमेरिका हा देश अशा संकटांना तोंड देण्याबाबत अधिक जागरुक आणि तंत्रसमृद्ध आहे. प्रत्यक्ष वादळाच्या आगमनापूर्वीच घेतलेल्या खबरदार्‍यांमुळे पुढे होणारी मालमत्तेची नसली तरी मनुष्यजीवांची हानी तरी निश्चित कमीतकमी व्हावी अशी आशा आहे. आपले असंख्य मिपाकर या वादळाच्या आसपासच्या भागात राहात असतील. त्यांची परिस्थिती इतर मिपाकरांना थेट कळण्याचा मार्ग नाही. प्रत्यक्ष वादळग्रस्त भागात आंतरजाल किंवा अन्य संपर्काच्या सोयींपैकी कोणकोणत्या उपलब्ध आहेत हे आपल्याला माहीत नाही. नुकत्याच वाचलेल्या बातमीनुसार किमान साठ लाख लोक आत्ता विजेशिवाय आहेत. अर्थातच त्यांच्याकडून आंतरजालीय संपर्काची शक्यता कमीच आहे. एकमेकांशी झालेला स्थानिक संपर्क किंवा अन्य काही ज्ञात अज्ञात मार्गाने सर्व मिपाकरांना आपल्या पूर्व अमेरिकावासी / कॅनडावासी मिपाकर मित्रांची खुशाली कळावी, सर्वांना संपर्कासाठी एक धागा मिळावा म्हणून हा धागा तयार करतो आहे. ज्या सदस्यांना कोणत्याही मिपाकरांकडून, नातेवाईकांकडून इतरांची खुशाली कळली असेल त्यांनी इथे सर्वांना अपडेट करावं ही विनंती. तिथल्या सर्व मित्रांचे संपर्क सर्वांकडे असणं शक्य नाही पण केवळ आंतरजालीय मित्र या नात्याने आपल्या परदेशातल्या मित्रांसाठी काही पृच्छा / निरोप असेल तरी इथे देता येईल. याचा कितपत "उपयोग" होईल,मला माहीत नाही, पण आपल्या सर्वांच्या सदिच्छा त्यांच्या पाठीशी आहेत हे कळेल. आपले सर्व मित्र सुखरुप असू देत आणि लवकरात लवकर या निसर्गप्रकोपातून बाहेर येऊन पुन्हा सर्व सुरळीत चालू होऊ दे अशी सदिच्छा व्यक्त करतो.

वाचने 9287 वाचनखूण प्रतिक्रिया 75

सँडीचा तडाखा जोरदारच होता असे बातमीतून दिसते आहे, अशावेळी मिपाकर मित्रपरिवाराची काळजी असतेच. सर्वांच्याच सुखरुपतेसाठी सदिच्छा आणि प्रार्थना. -दिलीप बिरुटे

दादा कोंडके Tue, 10/30/2012 - 19:21
स्वगतः पण च्यामायला या फेसबूकच्या आंखोदेखा हालच्या स्टेट्सनी लई काव आणलाय राव. हिरव्यादेशातल्यांना प्रथमच बाकीच्यांचा "टेक केअर" वगैरेंचा रिप्लाय मिळण्याची संधी मिळाली आहे. मी एका स्टेटसला लाइक केलं. ;)

जेनी... Tue, 10/30/2012 - 21:00
आम्हि सगळे सुखरुप आहोत . मी शनिवारीच माझ्या बहिणीकडे डेलावेअर मध्ये आले होते .आम्हि सगळे सुखरुप आहोत . पाऊस काल संध्याकाळी १० वाजल्यापासुन बंद झाला पण फारच विंडी होतं . रात्री ११ वाजता दहा मिनिटांसाठी विजप्रवाह खंडीत होता .पण नंतर सगळं पूर्ववत झालं . बाकि इथे अमेरिकेत रहाणार्‍या सर्व मिपाकर व भारतिय तसेच अमेरिकन जनता ,सगळेच ह्या सँडीपासुन सुखरुप राहोत हि सदिच्छा .

सुनील Tue, 10/30/2012 - 22:41
आमच्याकडे धोका नाही. पण पूर्व किनारपट्टीवरील मिपाकरदेखिल सुखरूप आहेत, हे वाचून बरे वाटले. टीवीवर दाखवली जाणारी दृष्ये भयंकरच आहेत.

मराठे Tue, 10/30/2012 - 23:17
आज आमच्या इथे (मिशिगन) सुद्ध ताशी ७० च्या वेगाने वारे वाहात होते. त्यावरून ह्या वादळाची व्याप्ती लक्षात येईल. काही ठीकाणी झाडं पडून थोडी वित्तहानी झाली. पूर्वकिनार्‍यावर मात्र २६ जण मृत्युमुखी पडल्याचं बातम्यांत वाचलं. सगळं वाहतूक, विजपुरवठा पूर्ववत व्हायला अजून काही आठवडे जावे लागतील असं दिसतंय.

निशदे Tue, 10/30/2012 - 23:49
सगळे मित्रगण सुखरूप असल्याचे समजले. इथे सुद्धा सर्वांची खुशाली कळल्याने बरे वाटले. आज ओहायोमध्ये सँडीने तुफान हिमवृष्टी केली आहे. पण न्युयॉर्क, न्युजर्सीच्या तुलनेत इथे काहीच नाही असे म्हणण्यासारखी स्थिती आहे. सर्वांनी काळजी घ्या

संदीप चित्रे Wed, 10/31/2012 - 09:27
सुदैवाने आम्ही सुखरूप आहोत. माझे चेपुवरचे स्टेटस इथे दिल्याबद्दल 'गणपा'चे आभार. मी साऊथ ब्रुन्सविक, न्यू जर्सी इथे राहतो. आमच्या घरी इलेक्ट्रिसिटी वगैरे पुन्हा आली आहे पण गावातली काही घरे अजूनही अंधारात आहेत.

इरसाल Wed, 10/31/2012 - 09:44
सगळे सुखरुप आहेत हे वाचुन आनंद झाला. तरीही आवश्यक ती काळजी घ्यावी.

मी_आहे_ना Wed, 10/31/2012 - 10:15
सगळे सुखरुप आहेत हे वाचुन आनंद झाला. मदतकार्य तर नक्कीच सर्व शक्तीने चालू असणार. अवांतर - ही बातमी वाचून तर अमेरिकेबद्दल आदर वाटलाच आणि आपल्या महापौरांबद्दल शरम. (१ ऑग्स्टला जंगली महारज रस्त्यावर झालेल्या साखळी स्फोटांनंतर प्रतिक्रिया देताना पाठ केलेले भाषण नसल्याने कशी भंबेरी उडालेली आणि त्यात पोलिस अधीक्षक म्हणत होते 'मिस्चीफ मिस्चीफ')

सस्नेह Wed, 10/31/2012 - 11:04
या धाग्याच्या निमित्ताने दोन गोष्टींची प्रचीति आली. १. मिपा हे केवळ मराठी व्यासपीठ नसून एक जगव्यापी परिवार आहे. २. या परिवारातील सदस्य स्नेहाच्या वत्सल 'धाग्यां'नी एकमेकांशी जोडलेले आहेत.

प्रास Wed, 10/31/2012 - 19:48
समस्त पूर्व अमेरिकास्थित मिपाकरांबद्दल सदिच्छा.... ['सँडी स्टॉर्म'नं ८०च्या दशकात अनेकांना (पक्षी - गोलंदाजांना) सतावलंय नि आता तेच नाव अमेरिकेत घोंगावतंय... (हे आपलं उगाच ;-))]

हुप्प्या Wed, 10/31/2012 - 22:00
अमेरिकेत पूर्व किनार्‍यावरील काही राज्यांवर एक वादळ आदळले आहे ह्या बातमीचा भारतात नको इतका बोभाटा झाला आहे असे वाटते. अर्ध्याहून जास्त अमेरिकेतील व्यवहार ठप्प, अमेरिकेची वाताहत, अमेरिकेची कोंडी, काय वाट्टेल ते! उदा. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/17015111.cms बातमीतील शब्द असे वापरले आहेत की तमाम अमेरिकेत शाळा बंद, सर्वत्र महापूराचे थैमान, रस्ते, विमानतळ सगळे बंद बंद बंद. पण तसे आजिबात नाही. पश्चिमेतील किनार्‍यावरील राज्यात खुट्ट देखील झालेले नाही. पूर्वेला जाणारी विमाने बंद आहेत, स्टॉक बाजार बंद आहे ह्याचे थोडे परिणाम जाणवत आहेत. पण बाकी व्यवहार नेहमीसारखेच आहेत. कित्येक ठिकाणी पावसाचा मागमूसही नाही, वादळ तर सोडाच. एकंदरीत अमेरिकेत काही संकट आले की ते फुगवून सांगायची फ्याशन भारतात रूढ होते आहे असे वाटते. मागे जपानमधे सुनामी होऊन अणुभट्टी नष्ट झाली आणि काही काळाने तो किरणोत्सर्ग अमेरिकेच्या किनार्‍यावर पोचला तर अशी बातमी आली की वाटेल जणू अमेरिकेवर अणूबाँबच पडला आहे. कुठल्याशा किरणोत्सर्ग मोजण्याच्या यंत्राने मोजता येईल इतकाच उत्सर्ग अमेरिकेत पोचला पण भारताची बातमी भलतीच मसालेदार होती. तमाम मित्रमंडळी चौकशी करु लागली की काय झाले. असे का होते हे मला तरी अगम्य वाटते. असो. भूकंपाच्या मानाने वादळ परवडले. निदान कित्येक दिवस आधी पूर्वसूचना मिळून काही त्याला तोंड द्यायची तयारी करता येते. आम्हा भूकंपप्रवण भागातील लोकांना अशी चैन लाभत नाही. असो.

In reply to by हुप्प्या

विकास Wed, 10/31/2012 - 23:06
संपूर्ण प्रतिसादाशी सहमत! अगदी किंचित सुधारणा इतकीच करेनः पूर्व किनारपट्टीवरीळ शाळा २ दिवस बंद होत्या काही ठिकाणी अजून देखील बंद आहेत. कारण वीजपुरवठा सर्वत्र पुर्ववत झालेला नाही. स्टॉ़क मार्केट आज चालू झाले. न्ञ्यॉर्कच्या सबवे अंशतः चालू करण्यात आत्ताच यश आल्याचे वाचले. पण त्याचा काही मोठा परीणाम, तुम्ही म्हणल्याप्रमाणे संपूर्ण अमेरीकेवर देखील जाणवत नाही असेच म्हणावे लागेल.

In reply to by हुप्प्या

टिल्लू गुरुवार, 11/01/2012 - 01:07
खुपच अतिरेक केलाय या बातम्यांनी भारतात. मी पश्चिम-किनार्‍यावर असल्यामूळे मला असे वाटले असेल, पण भारतातुन विचारपुस करण्यासाठी नको इतके फोन कॉल्स आलेत. सर्व हितचिंतकानी हेच सांगितले की भारतातल्या बातम्यात खुप भयानकरित्या वर्णन केलं आहे.

येडा अण्णा Fri, 11/02/2012 - 18:01
आम्ही सर्वजण सुखरूप आहोत जर्सि सिति मध्ये. विज, फोन नव्हती ३ दिवस. पण आता आलिये. सँडीचा तडाखा जोरदारच होता. आमचे कार्यालय आता ६-८ वीक्स बन्द असणार आहे. न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन भागात खरेच वाईट परिस्थिति आहे.

हुप्प्या Sun, 11/04/2012 - 05:14
सँडी ह्या महाभयंकर वादळामागे दैवी प्रकोप हे कारण असल्याचे जाणकार इस्लाम तज्ञ वागदी घोनिम यांनी घोषित केले. हे अल्लाशी (बहुधा) डायरेक्ट लाईनवर बोलत असावेत. कारण त्यांच्या बोलण्यातला आत्मविश्वास विस्मित करणारा आहे. सदर गृहस्थ इजिप्तचे रहिवासी आहेत आणि त्यांनी इस्लामचा जबरदस्त अभ्यास केला आहे. http://www.mid-day.com/news/2012/nov/031112-Sandy-is-punishment-for-anti-Islam-film.htm अर्थात दुसर्‍या एका सौदी मुस्लिम तज्ञांनी मुस्लिमांना इशारा दिला आहे की अल्लाची शिक्षा वगैरे ठीक आहे पण लगेच आनंदोत्सव करु नका. अल्लाच्या शिक्षेबद्दल असा आनंद व्यक्त करणे धर्माला पसंत नाही. अर्थात ती आक्षेपार्ह फिल्म लॉस एन्जेलिसमधल्या धर्मबुडव्याने बनवलेली असताना त्याचा राग न्यू यॉर्क न्यू जर्सीवर का काढला जावा ह्याचे उत्तर तो महान तज्ञ देईल का? तो सर्वशक्तिमान देव सर्व काही विचारपूर्वकच करत असल्यामुळे काहीतरी कारण असणारच. पण आता उलगडा झाला. लोक हवामानातील बदल, ग्लोबल वॉर्मिंग वगैरे तारे तोडत होते. पण हेच कारण सर्वात योग्य वाटते. धन्य धन्य तो अल्लाहचा बंदा वागडी घोनिम!