हरिकेन सँडीच्या संदर्भात.. अमेरिकेतल्या मिपाकरांसाठी..
भारतात ज्या बातम्या मिळत आहेत त्यानुसार पूर्व अमेरिकेच्या किनार्यावर सँडी महावादळाने फार मोठ्या प्रमाणावर थैमान घालायला सुरुवात केली आहे. न्यू-यॉर्क ते कॅनडा अशा मार्गावरचे काही कोटी लोक याच्या तडाख्यात अडकण्याची शक्यता आहे. आत्ताच काही शहरांत पूरसदृश स्थिती झालीदेखील आहे.
अर्थातच अमेरिका हा देश अशा संकटांना तोंड देण्याबाबत अधिक जागरुक आणि तंत्रसमृद्ध आहे. प्रत्यक्ष वादळाच्या आगमनापूर्वीच घेतलेल्या खबरदार्यांमुळे पुढे होणारी मालमत्तेची नसली तरी मनुष्यजीवांची हानी तरी निश्चित कमीतकमी व्हावी अशी आशा आहे.
आपले असंख्य मिपाकर या वादळाच्या आसपासच्या भागात राहात असतील. त्यांची परिस्थिती इतर मिपाकरांना थेट कळण्याचा मार्ग नाही. प्रत्यक्ष वादळग्रस्त भागात आंतरजाल किंवा अन्य संपर्काच्या सोयींपैकी कोणकोणत्या उपलब्ध आहेत हे आपल्याला माहीत नाही. नुकत्याच वाचलेल्या बातमीनुसार किमान साठ लाख लोक आत्ता विजेशिवाय आहेत. अर्थातच त्यांच्याकडून आंतरजालीय संपर्काची शक्यता कमीच आहे.
एकमेकांशी झालेला स्थानिक संपर्क किंवा अन्य काही ज्ञात अज्ञात मार्गाने सर्व मिपाकरांना आपल्या पूर्व अमेरिकावासी / कॅनडावासी मिपाकर मित्रांची खुशाली कळावी, सर्वांना संपर्कासाठी एक धागा मिळावा म्हणून हा धागा तयार करतो आहे.
ज्या सदस्यांना कोणत्याही मिपाकरांकडून, नातेवाईकांकडून इतरांची खुशाली कळली असेल त्यांनी इथे सर्वांना अपडेट करावं ही विनंती. तिथल्या सर्व मित्रांचे संपर्क सर्वांकडे असणं शक्य नाही पण केवळ आंतरजालीय मित्र या नात्याने आपल्या परदेशातल्या मित्रांसाठी काही पृच्छा / निरोप असेल तरी इथे देता येईल. याचा कितपत "उपयोग" होईल,मला माहीत नाही, पण आपल्या सर्वांच्या सदिच्छा त्यांच्या पाठीशी आहेत हे कळेल.
आपले सर्व मित्र सुखरुप असू देत आणि लवकरात लवकर या निसर्गप्रकोपातून बाहेर येऊन पुन्हा सर्व सुरळीत चालू होऊ दे अशी सदिच्छा व्यक्त करतो.
वाचने
9287
वाचनखूण
प्रतिक्रिया
75
काळजी घ्या दोस्त हो.
In reply to काळजी घ्या दोस्त हो. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
प्रा.डॉ.शी सहमत
सर्व आपद्ग्रस्त अमेरिकन सुखरूप असावेत हीच यशुच्या चरणी प्रार्थना
सगळे सुखरूप दिसत आहेत. बरे
आम्हि सगळे सुखरुप आहोत .
सँडी
आज आमच्या इथे (मिशिगन) सुद्ध
In reply to आज आमच्या इथे (मिशिगन) सुद्ध by मराठे
होय. आज पहाटेपासूनच
धागा अतिशय समयोचित आहे. आवडला
सगळे सुखरुप असावेत हिच
सगळे मित्रगण सुखरूप असल्याचे
सुखरूप आहोत
चला
छान
या धाग्याच्या निमित्ताने दोन
In reply to या धाग्याच्या निमित्ताने दोन by सस्नेह
सहमत !
समस्त पूर्व अमेरिकास्थित
अतिरेक
In reply to अतिरेक by हुप्प्या
+१
In reply to अतिरेक by हुप्प्या
अगदी हेच ...
In reply to अतिरेक by हुप्प्या
छे छे! असे काही नाही. कै च्या
In reply to अतिरेक by हुप्प्या
त्या बातम्या नसून विशफुल
आम्ही सर्वजण सुखरूप आहोत
कळले! कळले! कारण कळले!!