Skip to main content

लोकल पारायण

लेखक केदारविदिवेकर यांनी रविवार, 28/10/2012 00:15 या दिवशी प्रकाशित केले.
नवसाला देव पावतो तसं अक्षरशः आजकाल देवा पाव रे आणि मला ती अमुक लोकल वेळेवर मिळू दे रे बाबा. मुळात लोकलमध्ये चढलो म्हणजे तू पावलास नाहीतर तुझी अवकृपा का रे देवा !, असं काहीसा झालय माणसांच इथल्या. मुंबई, चाकरमान्यांची राजधानी म्हणावी. जो लोंढा येतो तो इथेच. अरे अरे कुठे चाललास रे ! कुठे म्हणजे काय मम्बयीला रे. का हो कहा जात हो, अरे गुड बख्त बम्बई नाही मालूम का, हम उहा जात हे . सर्रास हे आजकाल कानी पडतं, वृत्तपत्रात वाचायला मिळतं, टी.व्ही वर पाहायला मिळतं. (इथे कुणा अमुक एका गटाला दुखवायचा हेतू नाहीये, मुद्दा मुंबईच्या लोकल रेल्वेचा फक्त त्रयस्थपणे मांडण्याचा अट्टाहास.) आपल्या मागे कोणी जर धक्का मारत असेल तर दर दुसरा माणूस तो भैयाच असतो का ? .... 'लालूने किया कांड वहा, भेज दिया देखो तुमको यहा', असा काहीस ऐकायला मिळत. का? त्यांना कमवायचा हक्क नाहीये सर्वसामान्यांसारखा ? मुंबईची प्रगती नव्हे का हि, कि सर्व इथेच येऊन पैसा पोटा पाण्यासाठी कमवू इच्छीतात. आता तिथे बिहार, उत्तरप्रदेश नाही सुधारले गेले या राजकारण्यांकडून तर त्यात त्यांची काय चूक. आता हो, यातही काही मस्तवाल लोक असतात, जी मुंबईकरांना जुमानत नाहीत, तुच्छ लेखतात, पण म्हणून एकजात सगळे भैये, उत्तर भारतीय समान पातळीवरचे नसतात ना. माणसच ती. व्यक्ती तितक्या वल्ली म्हणतो आपण... असो... लोकल म्हटली की गट आले, जागेची अडवा-अडवी अनायासे आली असं आजकाल स्वरूप पहायला मिळतं. अरे साले बोला न जगह नही हे चढनेको (जागा असते तरीही, का तर ते सर्वज्ञात आहे की शिट्ट्या, टवाळक्या कोण करणार? शेजारी महिला स्पेशल जात असेल तर पहायलाच नको. त्यांच्या अब्रूचे धिंडवडे निघतात). सुज्ञ माणसे मुकाट निघून जातात, पण त्यातही अवली असतात, नडायला जातात आणि मार खाऊन येतात. सीन बघण्यासारखा असतो (फक्त अनुभवासाठी बरं का, कृतीसाठी नाही). अबे भो**** तेरेको एक बार बोला समझ नही आता क्या ? जगह नही है. तू क्यू चढा? तो बिचारा शिस्तीत चढलेला असतो. पण सणकी असतो ना तो, तोही सुरु, अबे चू*** तुने मुझे गाली क्यू दिया ? आवाज एकदम तार सप्तकातला, पण इथे कर्कश्श असा अर्थ घ्यावा. एक दोन तीन....... सुरू, बोल तुने मुझे गाली क्यू दी ? सणकन एक आवाज कुठून तरी येतो. कानाखाली कोणाच्या तरी बसलेली असते. आणि मग सुरु तांडव. दे मारा ssssss... आजूबाजूची अरे जानेदो यार. उसने गाली दि तुने गाली दि, हो गया ना. गाडीसे गिर जाओगे. ज्याने मार खाल्लेला असतो तो एकदम तावातावाने, अबे माद**** सालो गृपमे हो इसीलिये फुदक रहे हो, एक एक करके सब कि **** चो*** दुंगा. (श्शी..... किती किळसवाणं ऐकायला मिळतं, य्याककककक... वाचकांची इथे मी क्षमा मागू इच्छितो, पण हि वस्तुस्थिती आहे). अपने मा कि औलाद हो तो कल इसी डीब्बेमे आना, एक एक को चून चून के मारेंगे हम. मेरा ग्रुप भी साथ लाउंगा. तुम सबने मिलके मुझे जो मारा है. या उपरं, किती छान अनुभवही येत असतात, कोणी मस्त पत्ते खेळण्यात मन रमवतय, कोणी गट आपलं भजनी मंडळ काढून बसलाय, तर कोणी आपल्याच धुंदीत हरवलेला असतो (हे कधीही उत्तम).. नुकताच एक मनोरंजक किस्सा बघायला मिळाला. एक आपला महम्मद रफी असतो (तो स्वतःला समजेना का), सांगायचा मुद्दा छान आहे. सगळ्यांच सुंदर आवाजात गाणी गाऊन मन रीझवत असतो सकाळच्या वेळी. लोकही तंद्री लावून मंत्रमुग्ध होऊन ऐकतात आणि दाद देतात. आवाज आहे पण सूर आणि तालीमीची गरज आहे..., असे ना का, पण किती छान काम करतोय तो. या लोकलच्या धकाधकीच्या जीवनात जिथे मी दारात चढलो म्हणजे मिळविली, मागचा मरेना का! अस लोक बोलून दाखवणारी पहायला, ऐकायला मिळतात, तिथे हा कोण कोणाचा लागून जातो, पण तरीही असतात अशी माणसे. अगदी जुन्या काळाची माणसे तीच सकाळची लोकल, संध्याकाळची वेळही ठरलेली. एकमेकांना सावरत, सुख- दुःखे समजत मार्गक्रमण करायची, एकमेकांना आवर्जून सणा-समारंभाला अगत्याने (अधोरेखित करा शब्द, अगत्याने..) बोलवायची. पण आजकाल हेच अगत्य काहीस स्वार्थी होत चाललय. मला त्या माणसाचा काही उपयोग होईल का, मग त्याला दारू पार्टी... हो ती तर लागतेच न आजकाल म्हणे. लोकांना खूश ठेवायला. कुठे गेले ते सोनेरी दिवस... (भारताला एकेकाळी सोन्याची लंका म्हणायचे बरं का, ब्रिटीश आले आणि घेऊन गेले म्हणे ते आणि फक्त आपल्याला 'लंकेची पार्वती' ठेवायला दिली, म्हणजे 'गरिबी'.. असो..) एकंदरीत लोकलमध्ये कित्येक मुंबईकरांच आयुष्य जातं, तो प्रवास म्हणजे आयुष्यातील अनुभवाचा एक सुंदर ठेवा आहे प्रत्येकाचा. चांगले-वाईट, कसं वागावं, बोलाव हेही शिकायला मिळत. कित्येकांचा अभ्यासहि होतो म्हणे, या प्रवासात कधी कधी. कित्येक युगुलांची संभाषणे होतात, वाद-विवाद होतात. नोकरी करणा-यांच बोस बरोबर बोलणं, अहवाल सादर करण होत. शेअर्सचे भाव विचारले जातात, व्यवहाराची देवाण-घेवाण होते.. सर्व काही होता या लोकलमध्ये.... फक्त माणुसकी शोधण त्यात आज राहिलंय... कुणी मदत करता का हो माणुसकी हरवलेली ती शोधायला.. या लोकलमध्ये मिळेल का हो ती ? :-( लोकलाय नमः आपला विनम्र -- के डी :-) +91-9920-577-802 सौजन्य: - http://janpravas.blogspot.in/, केदार दिवेकर
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4286
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

लेख जमलेला आहे . आता लोकल रामायण लोकल महाभारत अशी शिरेल चालू करावी. बाकी आमच्या सारख्या लोकलचा दोनच वर्षाचा ( ती ही पुण्याची लोकल) अनुभव असलेल्याचा मुंबईच्या लोकलवाल्याना साक्षात दंडवत !

'भारताला सोन्याची लंका म्हणायचे' ही नवीन माहिती मिळाली. मग लंकेला काय म्हणत असावेत, असा विचार करतोय.

लेखकाचे विचार पाहून सकाळच्या ९.१४ च्या छ शी ट जलद लोकलमध्ये चढल्यासारखेच वाटले..... बाकी लोकलचा प्रवास म्हणजेच एक छोटे विश्वरूपदर्शन असते मुंबईकरांसाठी........ जागेसाठी तर असे भांडतात जसे काही शिवरायांच्या काळात त्यांना त्या सीटची वतनदारी मिळाली असावी.... जागेच्या वादातून झालेले अनेक वाईट प्रसंग आणि त्यात गमावलेले जीव पाहणे म्हणजे रेल्वेच्या कटू आठवणी....सहप्रवाशांशी उद्धटपणे वागणे हा तर जन्मसिद्ध हक्कच असतो काही लोकांचा.....सगळ्यात मोठी गम्मत म्हजे दोन मराठी सहप्रवासी सुद्धा एकमेकांशी भांडायला हिंदीतून च सुरुवात करतात.....मग जर चुकून त्यातल्या एकाने स्वभावाप्रमाणे शेंडीला झिणझिण्या आणणारी मातृभाषा वापरली कि भांडण आपसूकच मराठीतून सुरु होते.....आजूबाजूच्यांची फुकट करमणूक !

मी प्रतिसाद उघडल्या उघडल्या ते लेडीज असे वाचले......... त्यामुळे मेंदूची संपूर्ण यंत्रणा दोन मिनिटांकरिता गडबडून गेली....

In reply to by माम्लेदारचा पन्खा

हो .. लगेज.. सामान डबा. कोथिंबिरीच्या शिंका येतात, क्वचित बकरीच्या लेंड्या बुटांत पडतात आणि बरेचदा डबेवाल्यांच्या स्टँडनी कपाळी खोका पडतात तोच तो डबा.

१) महिला प्रवाशांना, पुरुषांना ढकलून जाण्याची पूर्ण मुभा आहे २) गाडी रिकामी असली तरी दरवाज्यात लटकले नाही तर घोर पाप लागते ३) विरार लोकल हि लोकल नसून वैकुंठाचे विमान असल्या प्रमाणेच पकडावी ४) २ मिनिटाने येणारी लोकल तिसऱ्या मिनिटाला आल्यास लेट आहे असं म्हणतात ५) सेन्ट्रल ला उशिरा म्हणजे कित्ती? याची कोणतीच व्याख्या नाही ६) पाउस कोसळत असेल तर इंडिकेटर कढे चुकूनही पाहू नये ७) लोकल पूर्ण थांबायच्या आत सर्व उतारू उतरलेच पाहिजेत ८) दरवाज्यामधील फट हि थुंकण्यासाठी केलेली व्यवस्था आहे ९) पट्टीचे प्रवासी फलाटावर उभे राहून लोकलची वाट बघत नाहीत ते जीन्यावरूनच अंदाज घेतात १०) प्रवाश्यांसाठी केलेल्या (गैर) सोयींबद्दल रेल्वे नेहमीच दिलगीर असते

In reply to by चेतन माने

) लोकल पूर्ण थांबायच्या आत सर्व उतारू उतरलेच पाहिजेत मी पुण्याचा असल्याने हा नियम मला माहीत नव्हता. सबब एकदा मी विद्याविहार वरून येताना ,ठाणे येथे उतरताना लोकल थांबण्याची वाट पहात उतरलो तर गर्दीने मला फलाटावर आडवे पाडून पायाखाली तुडविले.

In reply to by चेतन माने

@चेतन ह ह पु वा. नेमक्या शब्दात मांडले आहे अजून काही :- हल्ली नवीन जी GPS सिस्टीम लावली आहे त्यात , समजा गाडी येण्याची वेळ अजून २ मिनिट अशी दाखवत असेल , तर साताठ मिनिट उलटून गेली तरी शिंचा दोनाचा आकडा काही एकावर येत नाही . गर्दीच्या वेळी ट्रेन उशिरा आहे.., फलाटावर जे ट्रेन इंडिकेटर आहे ती ट्रेन न येता दुसरीच कुठलीतरी ट्रेन येणार आहे, अशा किरकोळ सूचना करता , मध्य रेल्वे बाकीच्या महत्वाच्या सूचना आठवणीने करते उदा : मी समजा कल्याण ला असेल तर " कृपया लक्ष द्या : ट्रान्स हार्बर मार्गावर पाच वाजून ३ मिनिटांनी सुटणारी पनवेल d9 (?) हि लोकल आज १२ डब्याच्या ऐवजी ९ डब्याची चालवण्यात येत आहे . आता पनवेल लोकल १२ च्या ऐवजी ९ ची चालवण्यात येणार असेल , त्याचा कल्याण वर आत्ता त्याच वेळी उभ्या असणार्या माणसाला काय फायदा? बर D9 म्हणजे काय? तो कोड कुठे पहायचा ? किंवा वाशी A4 हि लोकल आज पनवेल s3 च्या मागून चालवण्यात येत आहे .. आता कशाच्या मागून काहीही चालवा.. पण आत्ता इथे काय घडतंय ते सांगा न.. तिकडच्या बातम्या इकडे कशाला ? एखादी लोकल PLATFORM वर न थांबता धडधडत निघून जाते .. आणि मागून घोषणा " platform नंबर २ के किनारेसे दूर खडे रहिये , एक जलद गाडी जानेवाली हे, कृपया रेल्वे लाईन पार न करे .. अग माठ बाई.. गाडी गेली. पोचली ठाण्याला .. आता थोबाड बंद कर .. असले किस्से अजून बरेच आहेत , वेळ मिळेल तसे विषय निघालाच आहे तर टाकत जैन

In reply to by स्पा

@समजा गाडी येण्याची वेळ अजून २ मिनिट अशी दाखवत असेल , तर साताठ मिनिट उलटून गेली तरी शिंचा दोनाचा आकडा काही एकावर येत नाही .>>> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-049.gif @अग माठ बाई.. गाडी गेली. पोचली ठाण्याला .. आता थोबाड बंद कर ..>>> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-044.gif

प्रवाशांची असुविधा झाल्यावर रेल्वेने, ' आपकी असुविधाके लिये हम पेंडा बाटना चाहते है' किंवा 'युवर इनकन्विनियन्स इज सिलेब्रेटेड', असंच म्हणायला हवं. कारण रेल्वेच्या अधिकार्‍यांना मनातून तसंच वाटत असावं.

कसाब सारख्या लोकांचे येणेजाणे चालू राहिले तर १०० चे ५० व्हायला वेळ लागणार नाही. मग ही समस्या अगदी लगेच सुटते की नाही ते बघाच! ;-)

कसाब सारख्या लोकांचे येणेजाणे चालू राहिले तर १०० चे ५० व्हायला वेळ लागणार नाही. मग ही समस्या अगदी लगेच सुटते की नाही ते बघाच! ;-)

बापरे! रोज असे हापिसला येणार्‍या जाणार्‍यांची कमाल आहे. मी फार कमीवेळा गेले असीन पंध्रा वीस वर्षापूर्वी तेंव्हा तो प्रकार काही मानवला नाही. शेवटच्या स्टेशनात एकदम उतरायचे नाही कारण बायका चढत असतात. त्यांचे घोळके चढले की मग उतरणार्‍यांनी उतरायचे असे समजले. शिवाय भाजीच्या टोपल्या, बायकांची बडबड, काहीबाही विकायला आलेली माणसे........या सगळ्या गर्दीतून आपल्या ठेसनात उतरायचे हाच मोठा विजय झाल्यासारखे. पावसाळ्यात सिंथेटीक आणि मळखाऊ रंगाचे कपडे वापरायचे हे माहित नव्हते. मी आपली मस्त परिटघडीचे कपडे घेऊन गेल्यावर पंचाईत झाली. कधीकधी अचानक प्लॅटफॉर्म बदलतो किंवा असेच काहीसे (मला ऐकू आले नाही पण बाकीच्यांना आले.). इतकी पळापळ झाली की या गर्दीतून पुन्हा कधीही बाहेर येणे शक्य नाही असे वाटले.

२०वर्श पुर्विच प्रवस व आतच प्रवस कहि फरक नहि.मझ पर्देशि मित्रन लोकल कथ सान्ग्तो.मुम्बै आल्यवर एक्द तरि ओफ्फिचे वेलेत प्रवस कर्तो.व जोर आज्मव्तो.

अरेरे ज्या लोकांनी मुंबईच्या लोकलमधुन 'सफर' केली नाही ते खरोखरच एका मोठ्या अनुभवाला मुकलेले आहेत. आमच्या शेजारी राहायला आलेल्या इंदूरच्या एका जोडप्याचा किस्सा सांगतो. नवं नवं लग्न झालेलं, अशात 'साथिया' बघून आल्यामुळे, मुंबईच्या लोकलविषयी कैच्याकैच कल्पना त्यांच्या मनात होत्या. विसा काढायला म्हणून मुंबईला यायला मिळणार याचा आनंद 'अमेरिकेला' जायला मिळणार पेक्षाही जास्त होता .. कारण 'लोकल' मधून 'फेरफटका' मारता येणार होता. दोघे दादरला गेले आणि जिन्यावरून बघितल्यानंतर प्लॅटफॉर्मच दिसेना! त्यातूनही कदाचीत ही गर्दी डाऊनची असेल म्हणून धक्के खात खात खालपर्यंत आले. लोकल येण्याची वेळ जशी जवळ आली तसा मात्र पोटात (भितीने!!!) गोळा आला आणी 'फेरफटका' करण्याऐवजी नुसत्याच फटक्यांवरच समाधान मानून मंडळी परतली आणि सिनेमातल्या गुलाबी स्वप्नांतून दोघं धाडकन् जमिनीवर आली.

लोकल मध्ये विकायला येणारा पांढरा ढोकळा क हिरवी चटणी निव्वळ अफलातून मोबाईल कवर व अश्या अनेक गोष्टी विकायला येणारे विक्रेते अफलातून

१९९७ पासुन मी दररो़ज असे अनुभव विरार ते चर्चगेट कींवा विरार ते अंधेरी अश्या प्रवासादरम्यान घेतलेले आहेत...सगळे अगदी असेच... शनिवार आणि रविवारी तर ट्रेन बघायचा पण कंटाळा येतो...पण बाकिचे दिवस पापी पेट के सवालसाठी ऑफिसला जावेच लागते :( अवांतरः काल रात्री वसई आणि नालासोपारा दरम्यान एक माणुस चालत्या गाडीच्या टपावरुन पडला... :(