नवसाला देव पावतो तसं अक्षरशः आजकाल देवा पाव रे आणि मला ती अमुक लोकल वेळेवर मिळू दे रे बाबा.
मुळात लोकलमध्ये चढलो म्हणजे तू पावलास नाहीतर तुझी अवकृपा का रे देवा !, असं काहीसा झालय माणसांच इथल्या.
मुंबई, चाकरमान्यांची राजधानी म्हणावी. जो लोंढा येतो तो इथेच. अरे अरे कुठे चाललास रे ! कुठे म्हणजे काय मम्बयीला रे. का हो कहा जात हो, अरे गुड बख्त बम्बई नाही मालूम का, हम उहा जात हे . सर्रास हे आजकाल कानी पडतं, वृत्तपत्रात वाचायला मिळतं, टी.व्ही वर पाहायला मिळतं. (इथे कुणा अमुक एका गटाला दुखवायचा हेतू नाहीये, मुद्दा मुंबईच्या लोकल रेल्वेचा फक्त त्रयस्थपणे मांडण्याचा अट्टाहास.)
आपल्या मागे कोणी जर धक्का मारत असेल तर दर दुसरा माणूस तो भैयाच असतो का ? .... 'लालूने किया कांड वहा, भेज दिया देखो तुमको यहा', असा काहीस ऐकायला मिळत. का? त्यांना कमवायचा हक्क नाहीये सर्वसामान्यांसारखा ? मुंबईची प्रगती नव्हे का हि, कि सर्व इथेच येऊन पैसा पोटा पाण्यासाठी कमवू इच्छीतात. आता तिथे बिहार, उत्तरप्रदेश नाही सुधारले गेले या राजकारण्यांकडून तर त्यात त्यांची काय चूक. आता हो, यातही काही मस्तवाल लोक असतात, जी मुंबईकरांना जुमानत नाहीत, तुच्छ लेखतात, पण म्हणून एकजात सगळे भैये, उत्तर भारतीय समान पातळीवरचे नसतात ना. माणसच ती. व्यक्ती तितक्या वल्ली म्हणतो आपण... असो...
लोकल म्हटली की गट आले, जागेची अडवा-अडवी अनायासे आली असं आजकाल स्वरूप पहायला मिळतं. अरे साले बोला न जगह नही हे चढनेको (जागा असते तरीही, का तर ते सर्वज्ञात आहे की शिट्ट्या, टवाळक्या कोण करणार? शेजारी महिला स्पेशल जात असेल तर पहायलाच नको. त्यांच्या अब्रूचे धिंडवडे निघतात). सुज्ञ माणसे मुकाट निघून जातात, पण त्यातही अवली असतात, नडायला जातात आणि मार खाऊन येतात. सीन बघण्यासारखा असतो (फक्त अनुभवासाठी बरं का, कृतीसाठी नाही). अबे भो**** तेरेको एक बार बोला समझ नही आता क्या ? जगह नही है. तू क्यू चढा? तो बिचारा शिस्तीत चढलेला असतो. पण सणकी असतो ना तो, तोही सुरु, अबे चू*** तुने मुझे गाली क्यू दिया ? आवाज एकदम तार सप्तकातला, पण इथे कर्कश्श असा अर्थ घ्यावा. एक दोन तीन....... सुरू, बोल तुने मुझे गाली क्यू दी ? सणकन एक आवाज कुठून तरी येतो. कानाखाली कोणाच्या तरी बसलेली असते. आणि मग सुरु तांडव. दे मारा ssssss... आजूबाजूची अरे जानेदो यार. उसने गाली दि तुने गाली दि, हो गया ना. गाडीसे गिर जाओगे. ज्याने मार खाल्लेला असतो तो एकदम तावातावाने, अबे माद**** सालो गृपमे हो इसीलिये फुदक रहे हो, एक एक करके सब कि **** चो*** दुंगा. (श्शी..... किती किळसवाणं ऐकायला मिळतं, य्याककककक... वाचकांची इथे मी क्षमा मागू इच्छितो, पण हि वस्तुस्थिती आहे). अपने मा कि औलाद हो तो कल इसी डीब्बेमे आना, एक एक को चून चून के मारेंगे हम. मेरा ग्रुप भी साथ लाउंगा. तुम सबने मिलके मुझे जो मारा है.
या उपरं, किती छान अनुभवही येत असतात, कोणी मस्त पत्ते खेळण्यात मन रमवतय, कोणी गट आपलं भजनी मंडळ काढून बसलाय, तर कोणी आपल्याच धुंदीत हरवलेला असतो (हे कधीही उत्तम).. नुकताच एक मनोरंजक किस्सा बघायला मिळाला. एक आपला महम्मद रफी असतो (तो स्वतःला समजेना का), सांगायचा मुद्दा छान आहे. सगळ्यांच सुंदर आवाजात गाणी गाऊन मन रीझवत असतो सकाळच्या वेळी. लोकही तंद्री लावून मंत्रमुग्ध होऊन ऐकतात आणि दाद देतात. आवाज आहे पण सूर आणि तालीमीची गरज आहे..., असे ना का, पण किती छान काम करतोय तो. या लोकलच्या धकाधकीच्या जीवनात जिथे मी दारात चढलो म्हणजे मिळविली, मागचा मरेना का! अस लोक बोलून दाखवणारी पहायला, ऐकायला मिळतात, तिथे हा कोण कोणाचा लागून जातो, पण तरीही असतात अशी माणसे.
अगदी जुन्या काळाची माणसे तीच सकाळची लोकल, संध्याकाळची वेळही ठरलेली. एकमेकांना सावरत, सुख- दुःखे समजत मार्गक्रमण करायची, एकमेकांना आवर्जून सणा-समारंभाला अगत्याने (अधोरेखित करा शब्द, अगत्याने..) बोलवायची. पण आजकाल हेच अगत्य काहीस स्वार्थी होत चाललय. मला त्या माणसाचा काही उपयोग होईल का, मग त्याला दारू पार्टी... हो ती तर लागतेच न आजकाल म्हणे. लोकांना खूश ठेवायला. कुठे गेले ते सोनेरी दिवस... (भारताला एकेकाळी सोन्याची लंका म्हणायचे बरं का, ब्रिटीश आले आणि घेऊन गेले म्हणे ते आणि फक्त आपल्याला 'लंकेची पार्वती' ठेवायला दिली, म्हणजे 'गरिबी'.. असो..)
एकंदरीत लोकलमध्ये कित्येक मुंबईकरांच आयुष्य जातं, तो प्रवास म्हणजे आयुष्यातील अनुभवाचा एक सुंदर ठेवा आहे प्रत्येकाचा. चांगले-वाईट, कसं वागावं, बोलाव हेही शिकायला मिळत. कित्येकांचा अभ्यासहि होतो म्हणे, या प्रवासात कधी कधी. कित्येक युगुलांची संभाषणे होतात, वाद-विवाद होतात. नोकरी करणा-यांच बोस बरोबर बोलणं, अहवाल सादर करण होत. शेअर्सचे भाव विचारले जातात, व्यवहाराची देवाण-घेवाण होते.. सर्व काही होता या लोकलमध्ये.... फक्त माणुसकी शोधण त्यात आज राहिलंय... कुणी मदत करता का हो माणुसकी हरवलेली ती शोधायला.. या लोकलमध्ये मिळेल का हो ती ? :-(
लोकलाय नमः
आपला विनम्र
-- के डी :-)
+91-9920-577-802
सौजन्य: - http://janpravas.blogspot.in/,
केदार दिवेकर
वाचने
4286
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
आवडेश
धन्यवाद
In reply to आवडेश by एस
लेख जमलेला हाय !
'भारताला सोन्याची लंका
सध्या हाच लेख जगतोय..
अगदी अगदी.
In reply to सध्या हाच लेख जगतोय.. by माम्लेदारचा पन्खा
कधी काळी मी पण ९:१४ ला असायचो
In reply to सध्या हाच लेख जगतोय.. by माम्लेदारचा पन्खा
लगेज म्हणालात का?
हो .. लगेज.. सामान डबा.
In reply to लगेज म्हणालात का? by माम्लेदारचा पन्खा
तुम कायको गया था लगेज डब्बे
In reply to हो .. लगेज.. सामान डबा. by गवि
लोकलचे नियम :
मी पुण्याचा असल्याने
In reply to लोकलचे नियम : by चेतन माने
किस्से
In reply to लोकलचे नियम : by चेतन माने
@समजा गाडी येण्याची वेळ अजून
In reply to किस्से by स्पा
लय भारी चेतनराव ..
In reply to लोकलचे नियम : by चेतन माने
(No subject)
In reply to लय भारी चेतनराव .. by जेनी...
खरे तर
कसाब सारख्या लोकांचे येणेजाणे
कसाब सारख्या लोकांचे येणेजाणे
बापरे! रोज असे हापिसला येणार्
लोकल प्रवस
अरेरे ज्या लोकांनी मुंबईच्या
चांगला लेख..
लोकल मध्ये विकायला येणारा
१९९७ पासुन मी दररो़ज असे