बटाटा-सफरचंद खिर
साहित्यः
अर्धा वाटी तांदूळ
अर्धे सफरचंद
१ छोटा बटाटा
१ मोठी वाटी दुध
पाउण वाटी साखर
थोडे केसर
काजु, बदाम
२ चमचे साजूक तुप
१ छोटा पेला पाणी
कृती:
१) तांदुळ धुवुन ते भाजून घ्या व थंड झाल्यावर मिक्सरमध्ये जाडसर (कणी) दळा.
२) सफरचंद व बटाटा सोलुन किसुन घ्या.
३) काजू व बदामाचे काप करुन घ्या.
४) भांडे थोडे गरम करुन त्यात तुप घालुन लगेच वाटलेले तांदूळ परता.
५) त्यात १ पेला पाणी घाला व किसलेला बटाटा टाकुन तांदुळ व बटाटा शिजू द्या. ७-८ मिनिटांत शिजतात.
६) आता त्यात साखर, ड्रायफ्रुट्स घालुन उकळी आणा.
७) नंतर सफरचंदाचा किस घालुन चांगली उकळी येउ द्या.
८) मग सगळ्यात शेवटी दूध टाकुन उकळी आणा आणि त्यावर केसर घाला.
झाली झटपट सफरचंद, बटाटा खिर तय्यार.
अधिक टिपा:
तुम्हाला आवडतील ते इतर ड्रायफ्रुट्सही घालू शकता.
साखरेचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करु शकता.
स्वादासाठी वेलची-जायफळ घालू शकता.
कधी कधी सफरचंद आंबट असतो म्हणून दुध घालायच्या आधी सफरचंदाचा किस घालून उकळी येउ द्यायची मग दुध घालायचे.
वाचने
7271
वाचनखूण
प्रतिक्रिया
25
व्वा.. मस्तं...
In reply to व्वा.. मस्तं... by प्रभाकर पेठकर
+१
भारीच आहे खिर.
कल्पना वेगळी आहे. प्रयोगशील
In reply to कल्पना वेगळी आहे. प्रयोगशील by गवि
+१
In reply to कल्पना वेगळी आहे. प्रयोगशील by गवि
तर मग गवी मी सांगते ही पाकृ
In reply to तर मग गवी मी सांगते ही पाकृ by स्पंदना
करुन पाहतोच..
नवं नवं काँबिनेशन लै लै झ्याक
लै भारी
गवि, सूड खिर जास्त शिजावी
खिरीत बटाटा ? हे असं
मस्तच
फक्त तांदळाची, फक्त सफरचंदाची
मस्तच ग जागुतै
नवनिर्मीतीचा आनंद काही औरच!
रोचक पदार्थ
In reply to रोचक पदार्थ by श्रीरंग_जोशी
तुम्ही माझा
In reply to तुम्ही माझा by इरसाल
ओह
In reply to ओह by श्रीरंग_जोशी
खिरीत झुरळ पडू नये म्हणून.
अहो
सुंदर!
आणखी एक...
अनन्या आयडीया चांगली आहे.
वावा..
झक्कास!!!