Skip to main content

मदत हवी आहे...

लेखक पाटव यांनी मंगळवार, 30/10/2012 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
समस्त मिपाकार मित्रहो, अश्विन शुध्द पक्षी प्रतिपदेच्या (घटस्थापनेच्या) मुहुर्तावर आमच्या येथे मुलगी जन्माला आली आहे. आता बारसे करावे लागणार तर नाव ठरवावे लागेल ना! मग इथे मिपावर नाही येणार तर कुठे जाणार? तर मदत हवी आहे मुलीचे नाव ठरवण्यासाठी (नावे ठेवण्यासाठी नाही) नावाबद्दल अपेक्षा १. नाव शक्यतो नव्हे मराठीच हवे २. साधे, सोपे, सुटसुटीत असावे ३. स्वाती नक्षत्र आणि तुळ रास आहे तर टंकताय ना?

वाचने 25734
प्रतिक्रिया 107

प्रतिक्रिया

In reply to by चिरोटा

तूळ रास म्हणजे नाव र किंवा त पासून हे कळले.
त वरून सुरू होणारे तनीशा नाव कसे वाटते?

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

हे बघा की..
नावाबद्दल अपेक्षा १. नाव शक्यतो नव्हे मराठीच हवे
म्हणून तर लोचा आहे,कारण हिंदू नावे मिळतील भरपुर, पण "मराठीच" म्हटल्यावर रमा, तुळजा, रुक्मिणी एवढ्यातच गाडं अडलं, माझ्यापुरतं तरी..

In reply to by चिगो

म्हणून तर लोचा आहे,कारण हिंदू नावे मिळतील भरपुर, पण "मराठीच" म्हटल्यावर रमा, तुळजा, रुक्मिणी एवढ्यातच गाडं अडलं, माझ्यापुरतं तरी..
अरे हो की. आमच्या ऑफिसात अगदी सदाशिव पेठेतल्या दोन तनीशा आहेत तेव्हा हे नाव मराठीच वाटले मला :(

In reply to by गणपा

पण ज्यांचा अभ्यास असतो अश्या विषयांचा ते विचारु शकतात म्हणुन आधीच सांगितले...

In reply to by गणपा

राशीवरुन जन्मनाव ठरवतात. पण जन्मनाव लक्षात राहते व राशी लक्षात राहत नसत. म्हणुन जन्मनावावरुन राशी ओळखली जायची.

In reply to by पाटव

अधिक माहिती ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी प्रश्नोत्तरातून सुसंवाद मधे http://mr.upakram.org/node/806 प्रश्न क्रं ५ पहा

साधं, सोपं, सुटसुटीत, प्रचलित नाव ठेवा अशी विनंती. फारच अनवट, एकमेवाद्वितीय, लांबलचक आणि जडजंबाल नाव ठेवलं की मुलाला / मुलीला पुढे सगळीकडे एका विचित्र प्रतिक्रियेला सामोरं जावं लागू शकतं. ग्लोबल वातावरणात पोरं पुढे कोणत्या देशी नशीब काढायला जातील माहीत नाही. तिथे त्यांचं नाव म्हणजे टंग ट्विस्टर ठरु नये. प्रत्येक फोनवर "आँ?" "कुड यू प्लीज रिपीट?" "सॉरी.. कुड यू प्लीज स्पेल इट आउट.." असं ऐकावं लागू नये, म्हणून राधा, रिया, ऋता (अक्षर अवघड असलं तरी उच्चार सोपा), राणी, रसिका, रती, रुची अशी तीन किंवा त्याहून लहान अक्षरी नावं द्या. कुंडलीवरुन / राशीवरुन आद्याक्षर फिक्स करुन मग नाव देण्यात खरा अर्थ नाही, मनाला आवडलेलं नाव ठेवलं तर खरा आनंद मिळतो. ..पण यात पुन्हा आपापल्या विश्वासाचा भाग आला.

In reply to by गवि

कुंडलीवरुन / राशीवरुन आद्याक्षर फिक्स करुन मग नाव देण्यात खरा अर्थ नाही, मनाला आवडलेलं नाव ठेवलं तर खरा आनंद मिळतो.
एक्झॅक्ट्ली. - पॅट्रीक

In reply to by गवि

>>प्रत्येक फोनवर "आँ?" "कुड यू प्लीज रिपीट?" "सॉरी.. कुड यू प्लीज स्पेल इट आउट.." असं ऐकावं लागू नये, सहमत !!

In reply to by गवि

आपण नाव ठेवावे ते आपल्यासाठी. उगाच पुढे मोठे झाल्यावर फलाण्या माणसाला आपले नाव घेता येणार नाही या भीतीने सोपे नाव ठेवावे हे काही खास पटले नाही. तसेही फोरीनरांना आपली साधी साधी नावे पण घेता येत नाही. माझे जोडाक्षर विरहित नाव अनेकांना घेता येत नाही. राशीवरून आद्याक्षर ठरवण्याबद्दलच्या मताशी सहमत.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

आपल्या नावाचा पुरेपूर आनंद मिळत असेल तर सत्यकाम जाबाल हे नावही ठेवायला हरकत नाही रे. फक्त लोकांच्या पुन्हापुन्हा होणार्‍या पृच्छा, हरजागी संदर्भ सोडून नावाचे अर्थ किंवा स्पेलिंग विचारलं जाणं, नावाचे चित्रविचित्र उच्चार, या सर्वांनी आपल्या डोक्याला हेडॅक होत नसला आणि आपण खूष असलो तर जरुर ठेवावं कितीही अनवट नाव. फक्त स्वतःच्या नावाविषयी हा विचार करण्याइतकी समज आणि हक्क त्या पाळण्यातल्या लहानग्याला नसते. माझं नाव "डिंकू" ठेवा असं प्रत्यक्षात तो सांगू शकत नाही. मात्र नंतर त्याच्या "समीहन" किंवा "याज्ञवल्क्य" नावाचा अर्थ, उच्चार आणि इतिहास समजवायला आईबाबा सर्वत्र येणार नसतात इतकंच.

अरे स्वाती नक्षत्र आहे ना? मग स्वाती हेच नाव ठेवा की! तुम्हाला हव्या असलेला राशीच्या नावाचा 'त' येतो त्यात.

In reply to by शुचि

अगं मग रास बदलतेय ना .... बरं मिथ्या ,शाल्वी ,शैली , नीरा , निलांशी .. मीरा बेस्ट :)

रमा नाव छान आहे. सोपं, मराठी आणि शिवाय लक्ष्मीचं नाव, घटस्थापनेला जन्म झालेल्या कन्येला अगदी मस्त.

राशीवरून जन्म नाव ठेवायचं आणि कागदोपत्री तुमच्या आवडीचं ठेवा. हाकानाका (मी पण तूळ रास आणि स्वाती नक्षत्र वालाच आहे. जन्म नाव त वरूनच आहे :))

मुलाचे "आहूत" हे नाव माझ्या आवडीचे आहे. पण तुम्ही तर मुलीचे नाव विचारता आहात मला "आकांक्षा" नाव आवडते. त्यात उमेद आहे स्वप्न आहे.

In reply to by शुचि

आहूत असे नाव असलेल्या मुलाला सगळे अनाहूतपणे सल्ले देत असतील नै ;)

In reply to by Pearl

सुटसुटीत नावे आवडली. अवांतर - कुंडली, पत्रिका वगैरे प्रकार स्वतःपुरते थांबवावेत असे कुणाला वाटते का? मी कधीच थांबवले आहेत अन पुढेही तेच धोरण जोमाने चालवायचे आहे. सदर धाग्याचे अवाजवी विषयांतर होवू नये म्हणून अदृश्य स्वरूपात लिहितोय. ज्यांना कुणाला या विषयावर चर्चा करायची असेल त्यांनी खरडवहीतून संपर्क साधावा...

In reply to by श्रीरंग_जोशी

ब्वॉर.. ब्वॉर... रंगाराव नावाची शोधाशोध तुमचीही चालू झाली तर... ; -(भोचक) सोकाजी

In reply to by प्रभाकर पेठकर

'क्षमता' हे नाव आपण प्रत्यक्षात पाहिले आहे का आजवर? मी तर प्रथमच ऐकतोय. क्र. २ चे नाव मला फार आवडते ; आवडायला हवेच. अत्यंत सुटसुटीत अन बहुधा आजवर मराठी व्यक्तीला नाव सुचवतो - 'अना', पश्चिमी लोक अ‍ॅना म्हणतील कदाचित. पण इंग्रजी स्पेलिंग केवळ ३ अक्षरांत :-).

In reply to by श्रीरंग_जोशी

रंगा काका क्रमांक दोनचे नाव तुम्हाला प्राणापेक्षाहि जास्त प्रिय असेल नै ?? ;)

In reply to by श्रीरंग_जोशी

'क्षमता' हे नाव आपण प्रत्यक्षात पाहिले आहे का आजवर?
होय. अशा नांवाच्या एका मुलीला मी प्रत्यक्ष भेटलो आहे आणि ओळखतोही. मलाही त्या नांवाचे अतिशय कुतुहूल वाटले होते.

In reply to by प्रभाकर पेठकर

"क्षमता" यावरुन काही खत्रा नावं सुचली. धागाकर्त्यासाठी नव्हे, जस्ट अशीच मज्जा.. -घनता -दक्षता (पोलीस टाईम्स नव्हे) -विष्यंदिता -लवचिकता -तन्यता -वारंवारिता -चिकित्सा -वास्तविकता हॅ हॅ..

In reply to by गवि

नववी झाली तर तिचे नाव "सावधानता" ठेवा. जरासी सावधानी जिंदगीभर आसानी. ;)

तुलिका. बघा कस वाटतय. मला विचाराल तर रमा हे अतिशय सुंदर, मनाला भावणार अन लक्ष्मीच नाव आहे. हाक मारुन पहा. "रमेऽऽ!" हे रागान, 'रमाऽऽ!" हे प्रेमान, "रमुटल्याऽऽ!" हे लाडान.

ज्ञानेश्वरी विद्या , शांभवी , केवल्या ( क वर दोन मात्रा - इथे टंकता आल नाही म्हणून ) पुजा ताई ( मिथ्या चा अर्थ खोटा असा होतो , म्हणून ते शक्यतो नको) र आणि त वरुन शक्यतो खूप कमी नाव आहेत. वरील नावं मला भावली म्हणून तुम्हाला सांगितली आहेत.

हे डोरेमॉन मधल्या जियान सारखं दोन्ही हात डोक्यावर जोडुन स्वतःभोवती एक गिरकी घेवुन प्रेमाने म्हणतोय असे इमॅजिन करुन पहा बरं.

In reply to by ज्ञानराम

द्यानुकाका मिथ्याचा अर्थ खरच माहित नव्हता वो :( नकोच्च मिथ्या नाव थेवु:-/ आपण दुसल नाव शोदुया हं ! :-/

'र' जर राशी तुळा साठी असेल तर, आम्ही म्हणतो राशी हे नाव छान जमेल .

In reply to by पाटव

:( वॅरॉनिका माझ्या एका कलिग च नाव आहे :( मला आवडतं ते :) म्हणुन सांगितलं :( अहाना नाव मी लंडन एअर्पोर्टवर ऐकलं होतं :) इकडे येताना मध्येच लंडनला दोन तासांचा हॉल्ट होता . तेव्हा एअरपोर्टवर एका इंडीयन मुलीशी अशीच ओळख झाली होती . तिचं नाव 'अहाना ' होतं . गोड होती दिसायला :) अर्थ माहित नाहि :( आता अर्थ विचारलात तर ...आमी नाय जाबाबा कट्टी :-/

In reply to by जेनी...

वेरॉनिका ग्रीक देवीचे नाव आहे बहुधा. अहाना - हेमा मालिनिच्या धाकट्या मुलीचे नाव आहे. दर वर्षी पुणे फेस्टिवल मध्ये येत असते ती आईबरोबर.

वेरोनिका लॅटीन नाव आहे. (पण अर्थ चान आहे, विजयश्री आणणारी. कुणाला?;)) मराठीच पाहिजे मग वरूणिका ठेवा.;) आणि ईशाची बहीण आहना आहे? का अहाना?

मुलीच नाव स्वाति ठेवा स्वाती नक्षत्र हे स्त्रीया साथि फारच चान्गले आहे . स्वाती नक्षत्रावर जन्म हा भाग्यकारक असतो.

In reply to by पोप्य्लोन

स्वाती नक्षत्रावर जन्म हा भाग्यकारक असतो. खरेच? :) का तो सुध्दा स्त्रियांचाच? :(

In reply to by अभ्या..

मनुष्य जन्म मिळण्यास भाग्यच लागते... (नक्षत्र कुठले का असेना... पण काहींना ते कळत नसावे :()

In reply to by पाटव

हो एकदम सहमत :) नायतर कुठले नक्षत्र आणि कुठले नांव? ठेवा एखादे छानसे नाव जे तुमच्याच मनाला भावेल ते. तूळ राशीतलाच स्वाती नक्षत्रातलाच तानाजी ;) जन्मनाव असलेले २८ वे नक्षत्र

In reply to by जेनी...

आणि पुजाबाई, हा मुजरा शिवाजी महाराजांच्या "तानाजी" ला होता... कॄप्या वर पहा...

In reply to by पाटव

पाटव बूवा, आणि माझी पोस्ट स्वाती नक्षत्रात जन्माला येणार्‍यांच्या विशेष कलागुणांवर होती. क्रुपया समजुन घ्या . :)

In reply to by जेनी...

गैरसमजाबद्दल क्षमा असावी... काय आहे ना सध्या मिपावर सौजन्य सप्ताह चालु अस्ल्याचा अमंळ विसर पडला होता !!! कळावे लोभ असावा...

रागीणि .. ( कस सुचल नाही ब्वा कुणाला ) रूद्रा ( माझ्या ओऴखीतल्याच्या मुलीचे आहे .) रेवती रेखावती रूप ( आठवा रूपकुवँर राठोड ) रेणुका तन्मयी . तनुश्री तनुजा तुळजा बाकी अभिनंदन ! ..लक्ष्मी आली घरात :)

सध्या रमा नावाची चलती आहे. अनिता , विभावरी , शामिष्ठा , देवयानी , ही काही माझी आवडती नावे

तुम्हाला आवडेल ते नाव ठेवा.. एक सुचवू इच्छितो. नावात "क्षित" येईल असे नाव ठेवू नका, जसे की रक्षिता, अक्षिता इ. कारण की स्पेलिंगमध्ये 'शिट' येईल आणि आजकाल कार्टी लै इब्लिस असतात. पोरीला त्रास होईल. अवांतर: माझ्या मुलीचे जन्मनावही र किंवा त वरुनच आले. मी "तेजस्विनी" ठेवलं.. नाव "नंदिनी", कारण मला खुप आवडलं..

राही,रूही,रोहना,रोचना,ऋचा,ऋजुता,ऋद्धी,रजता,राजसी,राखी,राधा अनन्या,अनीता,अनाहिता(पारसी),अनुष्का,अनुपमा,असि,अस्मिता समिधा,समीरा,श्रीकला,चित्कला,उत्पला,उत्तरा,इंदिरा शर्वरी,शर्वाणी,शरयू,शुभ्रा,शुक्ति

In reply to by राही

शर्वरी,शर्वाणी,शरयू,शुभ्रा,शुक्ति बर्‍याच दिवसांनी शुभ्राचे नाव ओठावर आले माझ्या ! ;)

In reply to by मदनबाण

अरे शहाण्या, शुभ्राचे नाव ओठावर यायचं तेंव्हा लगीन झालं नव्हतं तुझं. आता बाप झालास तरी हे उद्योग? ;) मला राजसी हे नाव फार आवडलं. तसंच रिद्धी.

In reply to by रेवती

अरे शहाण्या, शुभ्राचे नाव ओठावर यायचं तेंव्हा लगीन झालं नव्हतं तुझं. आता बाप झालास तरी हे उद्योग? खी. खी.. खी... आज्जे ! तू पण ना ! ;)

प्रतिक्रीयांचा पाऊस पडलाय इथे ;-) अता या धाग्याला नाव ठेवायला सुद्धा जागा नाय उरणार ;-)

धाग्याला मिळणारा उत्स्फुर्त प्रतिसाद पाहता, मिपाकर 'नावं' ठेवण्यात मागे नाहित याची खात्री पटली. ;)

बरं, जिऊ, जिजा, सई, पुतळी, सिंधू, अंबा, सारजा, कितीतरी आहेत. अगदी म्हाळसा, मैना, यमू, चिमा, सगुणा, तुळसा नको असेल तरी तारा, रेशमा, राजस, दीपा, राही, रूपा कित्ती नावं आहेत!

In reply to by पैसा

ऋषिका हेही नाव मला फार आवडायचं. पुण्यात आमच्या इमारतीत ती छोटी रहायची. तिचा लहान भाऊ तिला लुचीका म्हणायला लागल्यानंतर ते आवडेनासं झालं.

आम्ही नावे सांगू पण तुम्ही ते खरेच ठेवणार आहात का ते सांगा की न्यायालयाचा सल्ला मागायचा पण दिल्यावर मानायचाच असलानको व्हायला हा लेख दिसायला हवा होता http://www.misalpav.com/node/20133

In reply to by नर्मदेतला गोटा

नर्मदेतले गोटेसाहेब, इतकी नावे एका बाळाची कशी ठेवणार? प्रत्येक बाळाचे एक नाव ठेवायचे ठरवले तरी या धाग्यावरची पन्नासेक नावं ठेवायला इतकी बाळं होण्याची कल्पनाही धागाकर्त्यांना सहन होणार नाही.

In reply to by नर्मदेतला गोटा

घेतली आहेत... त्यातही Shortlisting चालु आहे... एक विशेष सुचना : आपण सुचवलेले नाव निवडले गेल्यास बारशाचे आमंत्रण दिले जाईल...

नवरात्रात झाली म्हणून - अनिका - देवीचे नाव आहे. सुटसुटीत आणि सोपे. त वरून हवे असेल तर - तनिशा - जिच्या शरीरात इश्वराचे वास्तव्य आहे असा काहिसा अर्थ ऐकला होता. र चे - रिमा, रमा , ऋजुता, राधा इतर - गरिमा, सरस्वती, शलाका, स्वराली, अश्मिका, सानिका, प्रियंवदा

In reply to by पक्या

अनिका नाव पहिल्यांदा ऐकले आणि आवडले. असेच नवे नाव म्हणजे अन्विता.

आशा उशा लता मीना हृदया नलिनी सुमती गीता गितांजली मधुरा मीरा(बोरवणकर) वैजयंती शारदा माधुरी अमृता रेवती रेवा कावेरी जया लीला इंदिरा सुप्रिया सारीका शशिकला शकुन्तला राजश्री कविता बागेश्री (धाकटा भाऊ केदार हे ओघानेच आले) मंदोदरी विनया राधिका उर्मिला सावित्री इरावती विमल सूर्यकांता वंदना प्रतिभा प्रतिमा वैदेही(फ़ारच कॉमन) जान्हवी मैथिली रुक्मिणी लक्ष्मी लीलावती रागिणी विभावरी सुदेष्णा माला मालती नीना नयना सुनन्दा सुरुचि सुनीती (अनकॉमन पण लोकन्ना आवडणारे) श्रद्धा भक्ति विद्या जिजाई सई भवानी अस्मिता देविका नंदिनी कमला (सोवनी)दुर्गा (भागवत) ललिता अभिलाषा स्वरांगी मृण्मयी शर्मिला शैला शैलजा पद्मावती वनमाला तनया यशोदा रोहीणी देवकी मेनका सोनिया अंबिका ऋजुता सुकन्या शीला सुमित्रा

कुठ्लेतरी १ नाव ठेवा की कशाला उगाच किस पाड्ताय प्रतिक्रियांचा. नावांची पुस्तके बाजारात मिळतात त्यात पहा. नाव काय ठेवायचे यावर मदत करा हा काही एवढं चर्वण करायचा विषय आहे का त्यापेक्शा चांगले नविन विषय येउ द्या उगाच मि पा ची २ पाने फुकट घालवीली

शतकाबद्दल श्री पाटव यांचे अभिनंदन. आपल्या कन्येला अनेक उत्तम आशीर्वाद

फुलांसारख्या मुलींसाठी अबोली प्राजक्ता जाई निशिगंधा जुई पुष्पा बाकी सुलभा सुनयना सुचित्रा सुनेत्रा सुधा झेलम गंगा भागीरथी जमुना यमुना पूर्णा

In reply to by नर्मदेतला गोटा

अबोली प्राजक्ता जाई निशिगंधा जुई पुष्पा
ती नांवाला साजेल अशी जन्मभर राहिली पाहिजे. मी 'लता' नांवाची एक बाई पाहिली होती तिचं नांव खर तर 'पिंपळ' पाहिजे होतं. असो.

असो, तर समस्त मिपा परिवाराची अशी इच्चा आहे कि तुमच्या कन्येचे नाव ' रमा ' असावं . ते न ठेवल्यास , इथे प्रतिक्रिया देण्याचे जे कष्ट आम्ही मिपा वासियानी घेतलं त्याचा बदला म्हणुन , तुमच्या मुलीचे नाव काहिहि ठेवा , आम्हि तिला ' रमा' च म्हणु =)) ( बास आता . पळायला पायजेल =)) )

अरे हा तर माझाच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय. माझ्या मुलीला आता सव्वा महिना झाला २३ ऑगस्टला झाली पण अजुन आमचे नाव ठरत नाही. तिची रासही तुलाच आली आहे. १८ नोव्हेंबरला बारसे करायचे ठरवले आहे. तोपर्यंत नाव ठरवायचेच आहे. इथे खुप मदत होईल. धन्स पाटवजी हा धागा काढल्याबद्दल.

In reply to by जागु

आणि सर्व मिपाकार मित्रांचे हार्दिक आभार!!! नामकरण झाले कि पुन्हा हा धागा वर काढुन नाव कळवले जाईल... व्यनिद्वारे नावे सुचविणार्‍या मित्रांचे देखिल जाहीर आभार!!!

तिलोत्तमा, रमा, रेवा, तारा, तारामती, रोचना, गार्गी, मैत्रेयी, अंभृणी, शची, शुचिस्मिता, स्वच्छतोया, ऋक्मवती, रुक्मिणी, इ.इ.

पाट्व्जी तुम्च्या कन्येचे नाव काय थेवले ते नाही सागितले. मी ही तुला रास आणि स्वाती नक्श्त्राची आहे. पण जन्म पोणिर्र्मेचा म्हणुन पुनम.